मक्केतील उठाव ४
आधीचा भाग ३
मशिदीचा नकाशा
सौदी अरेबियाच्या वेळेनुसार बुधवारी (२१ नोव्हेंबर १९७९) रात्री उशिरा दळणवळण बंदी (अर्थात कम्युनिकेशन ब्लॅकआउट) उठवण्यात आली. मग थोडी फार खरी हकीकत लोकांच्या कानावर येऊ लागली.
सौदी अरेबियाचे राज्यकर्ते ह्या नात्याने सौदी राजघराणे हे इस्लामच्या सर्वात पवित्र स्थळाचे विश्वस्त बनलेले आहेत. त्यातून त्यांना प्रत्येक वर्षी अब्जावधी डॉलर्स महसूल मिळतो. तेलाचे भाव कमी जास्त होतात पण जगभरातून येणारे इस्लामी भाविक प्रत्येक वर्षी वाढत्या संख्येने येतात त्यामुळे उत्पन्नाचा हा स्रोत कधीच आटत नाही. अनेक इस्लामी देशांना हे खुपते. तमाम इस्लाम देशांची एक संघटना बनवावी आणि तिला ह्या तीर्थस्थळांचे विश्वस्त बनवावे अशी एक मागणी मधून मधून डोके वर काढत असते. जर ह्या हल्ल्याचे प्रकरण असेच चिघळत राहिले असते तर ही मागणी करणारे लोक हे अजून एक कारण देऊ शकले असते. त्यामुळे सौदी सरकारला तातडीने ह्या संकटाचे निवारण करणे आवश्यक होते. कितीही पैसे, मेहनत खर्च झाली तरी ती करणे आवश्यक होते. अनेक इस्लामी लोकांचा हाही एक आक्षेप असतो की सौदी घराणे हे कुरेशी घराण्याशी संबंध नाही. प्रेषित महम्मद हा कुरेशी घराण्याचा. तेव्हा मक्का आणि मदिना ह्या स्थानांची जबाबदारी कुरेशी घराण्यातच असली पाहिजे. हाही एक नाजूक मुद्दा आहे. तो इतका सहजासहजी निकालात काढता येत नाही कारण प्रेषिताशी संबंधित आहे. त्यामुळे शाही मशिदीचे प्रकरण हा मोठा बाका प्रसंग होता.
सुरवातीला सौदी सरकारने असे ठरवले की हा अंतर्गत मामला आहे त्याकरता सैन्याची मदत घ्यायची नाही. पोलिसदलाच्या मदतीने ह्याचा बंदोबस्त करता येईल.
सुरवातीला सरकारने अगदी जपून हल्ला करायचे ठरवले. तोफांतून नुसतेच आवाज आणि प्रकाश निर्माण करणारे बहुतांश निरुपद्रवी गोळे झाडून मशीदीतील अतिरेक्यांना गोंधळात टाकायचे आणि त्याचा फायदा घेऊन बाब अल सलाम (शांतता फाटक) ह्या गेटमधून प्रवेश करायचा आणि पुढच्या सैन्याचा टोळीला घुसण्याचा मार्ग करून द्यायचा असा बेत होता. पण ह्या निरुपद्रवी तोफहल्ल्याचा अतिरेक्यांवर काहीही परिणाम झाला नाही. ते चांगले कसलेले सैनिक होते. पहिली टोळी गेटच्या जवळ येताच मिनारावरील नेमबाजांनी काही मिनिटात त्या सगळ्यांवर अचूक गोळ्या झाडून बहुतेक सगळ्यांना ठार केले. दोन चार लोक वाचले ते कसेबसे आसपासच्या लोकांच्या मदतीने खुरडत निसटले. मग एका सैन्याच्या तुकडीला बोलावले गेले. त्यांच्या सेनापतीने राजपुत्र नाएफ ह्याला आपला बेत सांगितला की अंधार पडल्यावर आम्ही हल्ला करतो. पण ते राजपुत्राला आजिबात आवडले नाही. "तू खरोखरचा मर्द आहेस का कोण आहेस?" असे काहीसे विचारुन त्याला खजील केले. ते ऐकताच नाखुशीने सेनापती लगेच हल्ला करायला तयार झाला. सैन्याने कसेबसे लपतछपत मारवा गेटजवळ सुरुंग पेरले. त्यांचा स्फोट करुन ते मजबूत गेट मुळापासून उखडले. पहिल्या तुकडीने मशिदीत प्रवेश केला. मारवा गेट ते सफा गेट असा एक अंतर्गत मार्ग आहे त्यावर ते चालू लागले. काही काळ सामसूम होती. पण सैन्य योग्य ठिकाणी येताच अतिरेक्यांनी त्यांना खिंडीत गाठावे तसे गाठले आणि सर्व बाजूंनी गोळीबार केला. ह्या हल्ल्यात खुद्द माहदी मानला जाणारा महंमद अब्दुल्ला हा नेतृत्त्व करत होता. त्या भयंकर कोंडीतून सुटणे कुणाला शक्य झाले नाही. सगळी तुकडी मारली गेली. त्यांच्या मदतीला दुसरी तुकडी धावली तिचीही तशीच गत झाली.
असला भयंकर रक्तपात झाला पण बाहेरच्या जगात ह्यातले काही समजले नाही. कुठल्याशा अनाकलनीय कारणाने २२ नोव्हेंबर १९७९ च्या गुरुवारी सौदी सरकारने असे जाहीर केले की मक्का मशीद अतिरेक्यांच्या तावडीतून सोडवण्यात यश आले आहे. आता सगळे ठीक आहे! एका मंत्र्याने सांगितले की "हा संपूर्ण विजय अगदी संपूर्ण नाही. शेवटचे वळवळणारे शेपूट उरले आहे ते संपवले की ही कारवाई खरोखर पूर्ण होईल." मग काय? सगळ्या मुस्लिम जगतातून सौदी सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पाकिस्तानातून झियाने सौदीला तार धाडली "आम्हा सर्वांना एक सुटकेचा आनंद होतो आहे आणि धन्य वाटते आहे की सर्वशक्तिमान अल्लाहच्या कृपेने आपल्या सैन्याने त्या कृष्णकृत्य करणार्यांना पराभूत केले". "तमाम इस्लामी भक्तगणांना पुन्हा मुक्तपणे शाही मशिदीत प्रार्थना करता येणार आहे आणि ह्याचे सगळे श्रेय आपणालाच जाते". सुरवातीला अमेरिकेलाही हे खरे वाटले. पण पुन्हा तोच हेलिकॉप्टर पायलट! त्याने अशी खबर आणली की तो जेव्हा शाही मशिदीजवळ घिरट्या घालत होता तेव्हा त्याला सर्वत्र सामसूम आढळली. भाविक लोक वगैरे कुणी दिसले नाहीत. आसपासच्या रस्त्यांवर मोठा बंदोबस्त होता. ही विजयाची बातमी खरी नसावी.
हे ऐकून अमेरिकन सरकार बुचकळ्यात पडले. अजूनही इस्लामी जगात हे सगळे अमेरिकेचेच कारस्थान आहे असा समज होताच. बांगला देशमधे अमेरिकन दूतावासावर मोठा जमाव मोर्चा घेऊन गेला. तिथे काही अघटित घडू शकले असते. पण सुदैवाने जवळच्या सौदी दूतावासातील अधिकारी जातीने तिथे उपस्थित होते. त्यांनी लोकांना साकडे घालून सांगितले की अमेरिकेचा ह्या हल्ल्याशी काही संबंध नाही. आणि परिस्थिती नियंत्रणात आली.
२३ तारखेला शुक्रवार. हा जगभरातील मुस्लिमांचा पवित्र दिवस (यौम अल जुम्मा अर्थात एकत्र येण्याचा दिवस!) . मक्केतील शुक्रवारचे व्याख्यान इस्लामी जगात रेडियो आणि टीव्हीद्वारा प्रसारित होत असे. पण ह्या शुक्रवारी अघटित घडले. मक्केतून काहीही प्रक्षेपण झाले नाही. त्याऐवजी रियाधच्या इमामाने धार्मिक प्रवचन दिले. मग तमाम इस्लामी जगतात खळबळ माजली. पण अतर्क्य गोष्ट अशी की सगळा संताप हा अमेरिकेविरुद्ध होता! त्यात सौदी सरकारने ह्यात अमेरिकेचा काही हात नाही असे स्पष्ट बोलणे टाळले. सौदी सरकारला अमेरिकेचा राग आला होता कारण त्यांनी अगदी मंगळवारीच मक्केवर हल्ला झाल्याची बातमी छापून सौदी सरकारची नाचक्की केली होती. एका राजपुत्राचे वाक्य असे होते की "इतक्या कमी वेळात अमेरिकन सरकारने ह्या हल्ल्याची प्रतिक्रिया दिली की इतरांना अशी शंका येणे स्वाभाविकच आहे की ह्यांना हे आधीच माहित होते की काय?"
शुक्रवारी ढाक्यात पुन्हा दंगा उसळला. पण तो कसाबसा नियंत्रणात आला. कलकत्त्यात इंदिरा गांधींनी ह्या आगीवर आपली पोळी भाजायचे ठरवले. त्यांनी स्थानिक मुस्लिम लोकांना चिथावणी देऊन कलकत्यातील अमेरिकन कॉन्सुलेटवर दगडफेक करवली. प. बंगालमधे कम्युनिस्ट सरकार होते त्यांना नामोहरम करायची ही एक संधी म्हणून काँग्रेसने हे केले. सुदैवाने कलकत्त्यातील पोलिसांनी अश्रूधूर वापरुन दंगल काबूत आणली. अनेक डझन लोक जखमी झाले. दक्षिणेत हैद्राबादेत अमेरिकन वकिलात वगैरे काही नव्हती. मग तिथल्या लोकांनी हिंदू दुकानांवर हल्ले केले. लुटालूट, दगडफेक वगैरे कार्यक्रम केले. मग सरकारने संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली.
यानंतर अमेरिकन सरकारने सौदी सरकारवर जोरदार दबाव आणणे सुरू केले आणि शेवटी नाईलाजाने सौदी सरकारने असे निवेदन दिले की मक्केवरील हल्ल्यात अमेरिका आणि इराण ह्यांचा काहीही सहभाग नाही. हे सगळे सौदी नागरिकांनीच घडवून आणलेले आहे. आणि मग हे जगभरातील दंगे थांबले. ह्या मक्केच्या हल्ल्याचे असे जीवघेणे पडसाद जगभर उमटले. सौदी सरकारचा खोटारडेपणा आणि मानीपणा ह्याची मोठी किंमत अमेरिका आणि भारतासारख्या देशांना भोगावी लागली ज्यांचा ह्या हल्ल्याशी काहीही संबंध नव्हता.
मक्केतील हल्लेखोर पुरेपूर तयारीत होते. दारूगोळा आणि अन्नपाण्याचा मोठा साठा त्यांच्याकडे होता. सगळ्यांनी सैनिकी प्रशिक्षण घेतलेले होते. आणि धार्मिक उन्माद असल्यामुळे इच्छाशक्ती जबरदस्त होतीच. ओलिस असणार्या यात्रेकरूंचे मात्र हाल होते. हल्लेखोरांनी ताब्यात घेतलेल्या मशिदीच्या भागात स्वच्छतागृहे नव्हती. त्यामुळे कुठल्याशा खोलीतच लोकांना ते विधी करावे लागत. थोड्याच वेळात तो परिसर दुर्गंधाने भरून गेला. हल्लेखोरांना ह्याची काडीचीही पर्वा नव्हती. आता इस्लामचे शुद्ध राज्य येणार आहे ह्या विचाराने ते भारून गेलेले होते.
Book traversal links for मक्केतील उठाव ४
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बापरे! वाचून थक्क झाले!
लेख मालिका वाचतोय !!!!
चांगली माहिती पण
हो, हे माझ्याही मनात आले खरे.
+१.
बहुधा त्या इंदिरा गांधी नसाव्यात
...
पुरावे
..
ही विकीपिडियावरील एक लिंक आहे.
मोर्चा आणि हल्ला`
पुरावे
वाचतोय
चित्राबै
छान चालली आहे लेखमालिका.
छान चालली आहे लेखमालिका.
इंदिराबाईंबद्दल अजून थोडे
हे मान्य आहे. बिपान चंद्रा यांच्या
छान
माहितीपूर्ण मालिका वाचतो आहे
पुरावा: २४ नोव्हेंबर १९७९ न्यू यॉर्क टाईम्स
लिंक कुठाय ?
ही घ्या
...
...
...
ही घ्या लिंक
...
लिन्क वर क्लिक केलंत तर
क ड क !
+१
तुमचे तुम्हाला तरी कळते आहे काय ?
+++१११
..
मस्त मालिका! चालू राहू द्या!
सहमत!
वाचतोय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- छम छम छम... छम छम छम... ;) :- BAAGHIपुढचा लेख लगेच टाका हो फार
अधर्म - युद्ध तसेच एका
मस्त ओघवते, चित्रे हवीत, लिंक्स हव्यात