डुलकी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
तो २००८ सालातील ११ मी हा दिवस होता. मी केसरी टुर्स सोबत ओस्ट्रेलिया टूरवर गेले होते. त्या दिवशी आम्ही सिडनीहून सकाळी ८ वाजत कॅनबेरा या कॅपिटल सिटीमध्ये गेलो. जाताना बसमधून बाहेर निसर्गाने उधळलेल्या सौदर्याचा आस्वादघेत गेलो. पूर्वीची राजधानी सिडने होती. पण सिडने समुद्र किनार्यावर आहे. आणी राजधानी समुद्रकिनार्यावर असणे सुरक्षेच्या दृष्टीने ठीक नाही म्हणून नंतर ती कॅनबेराला आणली.
DSCN2065
आमचा ड्रायव्हर ...
पुर्वि हा प्रदेश ओसाड होता. पण व्यवस्थित प्लानिंग करून हे शहर वसवले आहे. त्यामुळे ते अतिषय सुबक आहे. जाताना १२ वाजता आम्ही जेवलो. आम्ही शहरात शिरल्यावर प्रथम बसमधूनच विविध देशांच्या एम्बसीज बघितल्या. ‘न्यू पार्लमेंट हाऊस’ आतून पाहिले. सभागृहात पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांच्या शेजारी शेजारी बसण्याच्या जागा आहेत. गोलाकार खुर्च्यांची रचना. आणी पंतप्रधानांच्या समोर अध्यक्षांची खुर्ची. येथून आम्ही वरती गच्च्चीत गेलो.. तेथे मध्यभागी राष्ट्रध्वज आहे. हा बाराही महिने सतत फडकत असतो.फक्त फाटला तरच उतरवला जातो. समोरच वॉरमेमोरिअल हाउस आहे.येथे लाल पिवळ्या रंगांची पाने असलेली अतिशय सुंदर झाडे आहेत. तशी ती रस्त्यांच्या दुतर्फाही आहेत.वारमेमोरीलमध्ये सतत जळणारी ज्योत आहे. बाजूच्या भिंतीवर पहिली महायुध्धात शहीद झालेल्या देशोदेशींच्या जवानांची नावे आहेत. त्यात कित्येक भारतीयांची नावेही आहेत. माउंट Ainsliए वर. हि हाईयस्ट जागा आहे. येथून कॅनबेरा शहर सुरेख दिसते.
DSCN2111
मावळत्या दिनकरा.....
आज दिवसभर खूप फिरणे झाले. परतताना उशीर झाला होता. ०९४५ ला रात्रीचे जेवण घेतले. आम्ही सर्व दमलो होतो. मी खिडकी पाहिजे म्हणून सर्वात मागच्या रिकाम्या विंडोसीटवर बसले. सकाळी लवकर उठलो. दिवसभराचे फिरणे, त्यातच ज्रात्रीचे जेवण झालेले.आता गाडी थेट हॉटेलवर जाणार होती. गाडी सुरु झाली आणी मला गाढ झोप लागली.मधेच कोथेतरीए गाडी थांबली तेव्हा मी डोळे उघडून पाहिले; आणी गाडी इतका वेळ का थांबलेय? सिग्नलला गाडी इतकी कधी थांबत नाही असा विचार करीत परत झोपी गेले.
नंतर केव्हातरी मला परत जाग आली तेव्हा गाडी उभी असल्याचे लक्षात आले. सगळीकडे काळोख होता. साधारणत: गाडी थांबली की आतले दिवे चालू होतात. मी उभी राहिले. पहाते तर गाडीत कोणीच नव्हते.मला वाटले हॉटेल आले. मी पुढे जाऊन खाली उतरले. समोर काळोखात गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. हॉटेलचा पत्ता नव्हता. मग मी बसला वळसा घालून पलीकडे गेले तर बसचा ड्रायव्हर कारचे दार उघडून आत काहीतरी करत होता.माझी चाहिल लागताच तो वळला. मला पहाताच आश्चर्याने तो उडालाच. मला म्हणाला म्याडम तुम्ही इथे काय करताय? मी त्याला विचारले हॉटेल कुठाय? तो म्हणाला हॉटेल ७/८ मैल लांब अआहे. सर्व तेथे उतरले तुम्हा इथे काय करताय? मी म्हणाले मला झोप लागली होती.हॉटेल आले, सगळे उतरले ते मला कळलेच नाही.मी सर्वात शेवटच्या सीटवर झोपलेली असल्याने मी आत राहिलेय ते कोणाच्या लक्षातच आले नाही.आणि सार्वजण उतरलेत असे समजून ड्रायव्हरने गाडी माझ्यासकट गाडी पार्किंगमध्ये आणली होती.ही जागा म्हणजे शहराबाहेरचे पार्किंग ग्राउंड होते.
DSCN2061
सिडने ब्रिज ..
ड्रायव्हर बिचारा सज्जन होता.टो म्हणाला आता मला तुम्हाला हॉटेलवर पोचवावे लागेल. मग त्याने बस लॉक केली. त्यानंतर त्याच्या गाडीत बसून आम्ही हॉटेलकडे निघालो. कार वेगात धाऊ लागली आणि क्षणभर मनात विचार आला, हा परका देश.आपण घरापासून खूप लांब परदेशांत आहोत. आपल्याला कोणी ओळखीत नाही; येथे आपण कोणाला ओळखत नाही. आपल्याला मदत करणारेही येथे कोणी नाही. इथले रस्ते वैगारेचीही आपल्याला काही माहिती नाही. आपले काही बरेवाईट झाले तरी कोणाला समजणार नाही. या विचारासरशी मी मनातून खूप घाबरून गेले. पण चेहेर्यावर तसे काही न दाखवता शांत राहिले. इथ्क्यात त्याने घरी त्याच्या बायाकोलां फोन लावला की, एक महिला प्रवासी गाडीत झोपाल्यमुळे राहिलेय तिला सोडून मी घरी येतो. यायला थोडा उशीर होईल. ते ऐकून थोडे हायसे वाटले. थोड्याच वेळात आम्ही हॉटेलवर पोचलो आणी माझां जीव भांड्यात पडला. मला हॉटेलपाशी सोडून तो निघून गेला.
DSCN2093
एकाएकी मला जाणीव झाली की एका फार मोठ्या संकटातून मी सुखरूप बाहेर पडलेय. .साऱ्या टुरिस्ट बसेस दिवसभराचे साइट्सीइन्ग झाल्यानंतर ‘पार्किंग झोनमध्ये’ पार्क होतात. हा झोन शहराबाहेर, एका बाजूला, सुनसान जागी असतो. मला सर्व प्रवासी उतरून गेल्यावर बस पार्किंगला पार्क झाल्यावर जाग आली होती अजून २/३ मिनिटे जर जाग आली नसती तर ड्रायव्हर बस लॉक करून गाडी घेऊन निघून गेला असता. तसाही तो निघालाच होता. मग मी या सुनसान जागी बसमध्ये अडकून पडले असते. आणखी ५/६ मिनिटानी मला जाग आलीच असती. कारण बस ए.सी. आणि बसच्या काचा बंद होत्या. हळूहळू साफोकेशान होऊ लागले असते. मला तसेही कोंदट बंदिस्त जागी थांबायला आवडत नाही. गुदमरल्या सारखे होते. काय केले असते मी? या विचाराने आजही अंगावर शहारा येतो.कदाचित कोंडली गेल्यामुळे मी बेशुध्द झाले असते.
काय केले असते मी? मी आरडाओरडा केला असता का? पण या एकाकी जागी कोण ऐकणार होते? कोण आले असते? आणी ओरडूनही कोण येणार होते? उलट माझीच शक्ती वाया गेली असती. बसचे लॉक उघडणे शक्यच नव्हते. बसच्या काचा फोडता आल्या असत्या का? आणि उघडल्या तर वरून उडी मारता आली असती का? कारण इथल्या बसेस उंच असतात. कदाचित.माझा आरडाओरडा ऐकून कोणी आले असते तर? कदाचित म्हटले कारण ती शक्यता फारच कमी होती. पण कोणी आले असते तरी इतक्या रात्री वावरणाऱ्या व्यक्तींवर किती विश्वास टाकता येणार? मी काय केले असते? माझे काय झाले असते? मी बसमधून उतरले नाही; हॉटेलमध्ये मी आले नाही हे कोणाच्या लक्षात कसे आले नाही?अस्वस्थ करणारे असंख्य प्रष्ण..खरोखर एका जीवघेण्या संकटातून मी वाचले होते..
मी हॉटेलमधल्या माझ्या रुममध्ये आले. माझी रुममेट तिची सुटकेस उघडून बसली होती. ती मला म्हणाली, काय ग कोणाशी बोलत बसली होतीस इतका वेळ? की कम्प्युटरवर काम करीत होतीस? छान म्हणजे हिला काहीच गंधवार्ता नव्हती तर ..काय बोलणार..? मी आपली कॉफी घेतली. अंघोळ केली आणी परत झोपी गेले...
प्रतिक्रिया
मला फोटु टाकता येत नाहित .
फोटोच्या लिंक द्या. संमं
मिपावर चित्रे टाकण्याची कृती
मस्त अनुभव :)
डुलकी
भारी!
सुखरुप परतल्यामुळे बरे झालं.
अवघड प्रकार
ही ही डुलकीमुळे कायम दोन
अनुभव
टूअर गाइडने खरं तर सगळे
हो. लिहिणर आहे नक्की !
एकेका ट्रेकबद्दल बैजवार लिहा.
चूक टूर गाईडची आहे. साधारण
बापरे! बरे झाले वेळेवर जाग
डुलकी
बापरे!