✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पोश्टरबॉईज

अ
अभ्या.. यांनी
Wed, 04/27/2016 - 23:34  ·  लेख
लेख
इलेक्शनचे पोस्टर्स, बॅनर्स, बॅजेस अन स्टीकर करुन करुन डोस्कं पार कामातनं गेलेलं. तीन पगाराचा ओव्हरटाइम काढला पण महिनाभर डोळ्यासमोर नाचलेले उमेदवारांचे ते मुर्दाड चेहरे हलायचे नाव घेईनात. पार सुम्म होऊन तीन दिवसाची सुट्टी मारली. पैला दिवस सरेस्तोवर मालकाचा फोन. "ये प्रेसला पटकन" "जमणार नाही. इलेक्शनचे अर्जंट काम तर नीट्ट करणार नाही" "अर्रर्र इलेक्शन आग्याद आपी. कन्नड नाटक बंदद. बर्री लगोलगो." ("अरेरे इलेक्शन संपली आता. कन्नड नाटकाचे काम आलेय. पटकन ये") अरारारारा. चला उठा राष्ट्रवीर हो. प्रेससमोर दोन ४७४७ बोलेरो लागलेल्या. आत जाताच मालकाने जावई असल्यागत माझी ओळख करुन दिली. "इदे नोडरी डिझाइनर. हेळ सावकारु येन्बेकु" ("हे बघा डिझायनर, सावकार तुम्हाला काय पाहिजे ते यांना सांगा") एक कार्यकर्ता लगेच "येन्स्वामी, आरामरी?" ("काय स्वामी, आरामात का?") करुन सलगी दाखवता झाला. "मालक ह्याना सांगा मला कन्नड येत नाही, परत तरास नको" हा व्युहाचा सुरुवातीचा भाग. "चालतयरी कलाकार, पर्वा इल्ला, स्टार्ट मारा तुमी. आमाला येतय की तुमचं मराठी तोडंतोडं" "द्या आप्पा मजकूर? "मजगूर? येनु?" ("मजगूर म्हणजे काय?") "कागद ओ. लिव्हलेला" "ते म्हणता व्हय. आद आद. तगोरी" ("आहे आहे, हे घ्या") मजकूर म्हणजे हे भल्या मोठ्या ड्रॉईंग शीटवर चार पाच फोटो चिकटवलेले. स्केचपेननी बॉर्डर वगैरे काढून पार गिचमिड काला केलेला. अर्धे कन्नड, थोडे मराठी आन उरलेसुरले इंग्लिश भाषेतल्या अक्षरांनी केलेले अ‍ॅबस्ट्रॅक्ट जणू. "हेसरु येनु?" ("नाव काय नाटकाचे?") चुकुन माझ्या तोंडातून कन्नड जातेच. हळूच सावरुन नाटकाचे नाव काय विचारतो. "ते बगा 'मांगल्य यारदु नि मडदी यारीगे" "?" "पुढे लिव्हा मत्तु कुंकुम तंद सौभाग्य" "म्हणजे?" "ते बायको कुणाची आन झोपती कुनासंगट हो" मी खुर्चीतच पडायचा बाकी. च्यायला असले नाटक. नंतरच्या तीन तासाच्या घमासान कानडी परिसंवादातून कळलेली माहीती अशी. सीमेवरच्या गावात ह्या मल्टीलॅन्ग्वल नाटकांना लै डिमांड. हा तीन तीन दिवस चालणारा प्रोग्राम असतो. हिरोईन, डान्सर, एक कॉमेडीयन आणि म्युझिक पार्टी बाहेरची असते. बाकी सगळी कास्ट गावातलीच. हिरोपेक्षा व्हिलनच्या रोलला जादा डिमांड. स्टाइल आणि डान्सरसोबत ठुमके मारायला मिळतात. हा रोल बहुधा पाटलाचा किंवा सरपंचाचा पोरगाच करतो. त्याची वर्गणी सगळ्यात जास्त असते, रोजचा सराव असतोच शिवाय हौस दांडगी. बाहेर थांबलेल्या दोन्ही बोलेरो बहुतेक त्याच्याच असतात. हिरो म्हणजे सेकंड पोस्ट. त्यालाही डिमांड असते पण जरा कमीच. पोलीस भरतीत वारंवार नापास होऊन इन्सपेक्टर व्हायची तमन्ना इथे पूर्ण करायची असते. हिरोचा मित्र हा सात्विक दिसणारा, शालेय भाषणस्पर्धेत बक्षीस मिळवणारा होतकरु तरूण असतो. बाकी हिरो हिरवीनीचे आइबाप, गावकरी, पुजारी, अशी पात्रे वर्गणी आणि वकूबानुसार गावकर्‍यांनी वाटून घेतलेली असतात. यात्रेआधीच एक महिना बाहेरच्या कलावंत मंडळींना ही सुपारी दिलेली असते. त्यांनी दिलेल्या स्क्रीप्ट (संहिता हा शुध्द शब्द ऐकायला मिळाला चक्क) नुसार तालमी चालू असतात. आम्ही सांभाळून घेऊ अशी बोली असल्याने ह्या तालमीत केवळ सपाट पाठांतर एवढेच झालेले असते. आता नाटकाची जाहीरात करणे जरुरी झालेले असते. त्यासाठी ही मंडळी आमचे सामान्य ज्ञान वाढवित असतात. एका पाकिटात मोठ्या साइजचे २०-२५ आणि पासपोर्ट साइजचे ७०-८० फोटो. मोठे फोटो गावतल्या हौशी फोटोग्राफरने पार गुळगुळीत आणि लग्न जमवायच्या हेतूनेच मेकपलेले. बारक्या फोटोत मात्र फुल्ल व्हरायटी. शाळेच्या आयकार्डापासून व्होटर्सकार्डपर्यंत सगळे नमुने. ते एका ऑपरेटरला स्कॅन करायला दिले. कन्नड मजकूर दुसर्‍या एका ऑपरेटरला टाइप करायला दिला. त्याची पाठ धरुन लगेच एक शाळामास्तर बसलाच. कानडी असो की मराठी, लेटेस्ट शाळामास्तर एका साचातले. पेपरातले वाक्यप्रचार आणि काही सरकारी शब्द इतकीच शब्दसंपदा सर घेऊन प्रुफरिडींगला बसले. आता महत्त्वाचा विषय लेआउट. पोस्टरसाईज डेमी. साधारण दीड बाय दोन फूट. वरच्या साईडला बसवेश्वर, जवळचे एखादे जागृत देवस्थान, ग्रामदैवत, नटराज आणि सिध्देश्वर मस्ट. सगळ्यांना श्री प्रसन्न करुन खाली महाराज मंडळी. ह्या मठाचे, त्या मठाचे, ब्रह्मचारी, आचार्य वगैरे सगळे भगवे वस्त्र मुकुट आणि दाढीधारी. त्यातले काही सिध्द कॅटेगरीतले. फोटोशॉपात मागची प्रभावळ करणे मस्ट. नंतर क्रम नाट्यमंडळीच्या नावाचा. त्यात भरती गायनाचार्य आणि संगीताचार्यांची. "ओ आर्टिस्ट, खानेका क्या करते?" "गडबडीत डबा नाही आणला मी." "चला निघा ओ. थोडं टिफिन मागवू हितं. अस करु चला बाहेरच. तवर आमचं नेते येतेतच ओ. आता मेन काम सुरुच करा की. थोडं सिग्रेट बिग्रेट घ्या तुमी. आपल्या कामात फ्रेश राह्यचं बगा" त्यांच्या सोबतचं पब्लिक दर १५ मिनिटाला कुठं जाउन फ्रेश होत होतं कळलं. बाहेर जाउन सोलापूरातही कामतच सापडावे ह्यांना. एका बेचव थाळीच्या बिलापोटी ह्यांच्या सरपंचानी हिरॉइन आणि डान्सर कशी बुक केली ह्याची रसभरीत स्टोरी ऐकून मी ह्या जाहिरातनाटकाचा पुढचा प्रयोग सजवायला सज्ज झालो. ............................................... (क्रमशः) . (टिप : ह्याचा पुढचा भाग तयार असलेने अगदी लगोलग येईल. टांगारुपणा केला जाणार नाही. जुन्या कथांच्या क्रमश: भागाच्या चौकश्या करु नयेत. ;) )
  • पोश्टरबॉइज -२

Book traversal links for पोश्टरबॉईज

  • पोश्टरबॉइज -२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
33152 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

भारी! क्रमशः कशाला घातलं रे

यशोधरा
Wed, 04/27/2016 - 23:37 नवीन
भारी! क्रमशः कशाला घातलं रे ते!
  • Log in or register to post comments

वाचतिये.

रेवती
Wed, 04/27/2016 - 23:40 नवीन
वाचतिये. वर्णन छान झालय. डोळ्यासमोर आला प्रसंग!
  • Log in or register to post comments

+ १, चांगला जमलाय हा भाग !

स्रुजा
गुरुवार, 04/28/2016 - 00:12 नवीन
+ १, चांगला जमलाय हा भाग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+२

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/28/2016 - 10:56 नवीन
असेच म्हणतो. लेखनशैली छान. पुभाप्र. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

एकदम जोरदार सुरवात मालक.!

कानडाऊ योगेशु
Wed, 04/27/2016 - 23:42 नवीन
एकदम जोरदार सुरवात मालक.! बाकी मी ही सोलापूरचाच!
  • Log in or register to post comments

हान्न!

वैभव जाधव
Wed, 04/27/2016 - 23:44 नवीन
हान्न! अब्या त्या एअरटेल चं फुडं काय झालं बे? अभिषेक,जीत,लाश ;)
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो!!!

संजय पाटिल
गुरुवार, 04/28/2016 - 10:41 नवीन
हेच म्हणतो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

व्वाव्वाव्वाव्वा आप्पा !

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/27/2016 - 23:57 नवीन
व्वाव्वाव्वाव्वा आप्पा ! व्वा!!! ठाका, ठाका फुड्डल्ला भाग लौकर!
  • Log in or register to post comments

ललित लेखन लय भारी करतो राव

किसन शिंदे
गुरुवार, 04/28/2016 - 01:02 नवीन
ललित लेखन लय भारी करतो राव अभ्या तू.. ते 'दादा'वाल्या बोलेरो झटकन नजरेसमोर आल्या.
  • Log in or register to post comments

अभ्या.. मिपाचा नागराज मंजुळे

संदीप डांगे
गुरुवार, 04/28/2016 - 01:13 नवीन
अभ्या.. मिपाचा नागराज मंजुळे आहे असे मी इथे घोषित करतो. यक लंबर. येउदेत, भौत तरसाता है तू.
  • Log in or register to post comments

नाही ओ डांगेअण्णा...

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 20:20 नवीन
नाही ओ डांगेअण्णा... अभ्या मिपाचा आकाश ठोसर हाय (सैराटचा हीरो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अभ्याची येंट्री हीरोसारखीच

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 20:28 नवीन
अभ्याची येंट्री हीरोसारखीच आस्तीया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

आमची आर्चि लै जिगरीची. तिच्या

अभ्या..
गुरुवार, 04/28/2016 - 20:58 नवीन
आमची आर्चि लै जिगरीची. तिच्या जीवावर तर हे समद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

हे ज्जिगर अभ्याभौ...

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 21:03 नवीन
हे ज्जिगर अभ्याभौ... साल्या कुठनं एवढं वाचन केलंस रे माणसांचं... जळजळ वाटते रे साल्या... बाकी तुला अने तुज्या हिरविणीला लै लै लै लै शुभेच्छा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मिपा आणि इतर मराठी आंतरजाल

वीणा३
गुरुवार, 04/28/2016 - 01:50 नवीन
मिपा आणि इतर मराठी आंतरजाल लेखन याच कारणासाठी वाचायला आवडत, वेग-वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या करणाऱ्या लोकांचे अनुभव वाचायला मिळतात. थोडसं one stop shop सारखं पुभाप्र.
  • Log in or register to post comments

कुठाय ते पुढचं?

आदूबाळ
गुरुवार, 04/28/2016 - 03:11 नवीन
कुठाय ते पुढचं?
  • Log in or register to post comments

तेवढं भाषांतर करा कुणीतरी ...

उगा काहितरीच
गुरुवार, 04/28/2016 - 06:43 नवीन
तेवढं भाषांतर करा कुणीतरी ...
  • Log in or register to post comments

लोल, लय भारी रे, कन्नड

स्पा
गुरुवार, 04/28/2016 - 07:01 नवीन
लोल, लय भारी रे, कन्नड ऎकायला जाम गोड वाट्टे
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

बोका-ए-आझम
गुरुवार, 04/28/2016 - 08:39 नवीन
हिरोपेक्षा व्हिलनच्या रोलला जादा डिमांड. स्टाइल आणि डान्सरसोबत ठुमके मारायला मिळतात. हा रोल बहुधा पाटलाचा किंवा सरपंचाचा पोरगाच करतो. त्याची वर्गणी सगळ्यात जास्त असते, रोजचा सराव असतोच शिवाय हौस दांडगी.
हे भारी आहे. पण मग शेवटी हीरोकडून मार खाऊन घेतो का? का तसलं काही नसतं?
  • Log in or register to post comments

छान लेख . पुरेपुर सोलापुर .

सिरुसेरि
गुरुवार, 04/28/2016 - 08:40 नवीन
सोलापुरमध्ये हिन्दी , मराठी , कानडी , तेलुगु अशा अनेक भाषा कानावर पडतात . एकाच चौकात अमिताभ , अशोक सराफ , महेश बाबु , गणेश यांच्या चित्रपटांची पोश्टरं लावलेली असतात . यापुर्वी सोलापुर म्हणले की हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे आणी त्यांच्या गोष्टीतला "पारो , पारो , येन्न चेस्तनाडु पारो" म्हणत पारोला शोधणारा तेलगु देवदास आठवत असे . आता त्यामध्ये या लेखाची भर पडली . एक शंका - बाकी ते सोलापुर फेमस "बेणं" , "कडु" राहुन गेलं का ?
  • Log in or register to post comments

आहा...

सतिश गावडे
गुरुवार, 04/28/2016 - 09:28 नवीन
यापुर्वी सोलापुर म्हणले की हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे आणी त्यांच्या गोष्टीतला "पारो , पारो , येन्न चेस्तनाडु पारो" म्हणत पारोला शोधणारा तेलगु देवदास आठवत असे .
हा देशपांडेंचा मास्टरपीस आहे. नान वच्चिन्ड पारो.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

हे राह्यलंच बे

चौकटराजा
गुरुवार, 04/28/2016 - 08:46 नवीन
महिनाभर डोळ्यासमोर नाचलेले उमेदवारांचे ते मुर्दाड चेहरे हलायचे नाव घेईनात. आन्त तेजा खालची ती माठ पिलावळीची रांग ती बी लय खतरनाक आसतीया !
  • Log in or register to post comments

भारी लेख. बादवे 'येर्टेल' कधी

एस
गुरुवार, 04/28/2016 - 09:11 नवीन
भारी लेख. बादवे 'येर्टेल' कधी पूर्ण करताय?
  • Log in or register to post comments

तुमचं पोश्टरबॉईज आमाला लई

सतिश गावडे
गुरुवार, 04/28/2016 - 09:29 नवीन
तुमचं पोश्टरबॉईज आमाला लई आवडलं बगा.
  • Log in or register to post comments

संवाद लै म्हणजे लैच भारी. मजा

प्रचेतस
गुरुवार, 04/28/2016 - 09:48 नवीन
संवाद लै म्हणजे लैच भारी. मजा आली.
  • Log in or register to post comments

छलो री अप्पा !

सस्नेह
Fri, 04/29/2016 - 16:08 नवीन
मुंद भाग जल्दी हाक.
  • Log in or register to post comments

मस्तच!

चांदणे संदीप
गुरुवार, 04/28/2016 - 11:04 नवीन
जुन्या कथांच्या क्रमश: भागाच्या चौकश्या करु नयेत.
तरी लोक्स सुधारत नै! नै का? दादानु पुढल्या येळेला "सुधरोमायसीन" च्या ट्याबलेट पण लेखासोबत घेऊन या! Sandy
  • Log in or register to post comments

खि खि खि....जब्राट

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/28/2016 - 11:47 नवीन
खि खि खि....जब्राट
  • Log in or register to post comments

मस्तच...

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 12:18 नवीन
मस्तच... ग्रामीण भागातील एका अनवट कलाप्रकाराची मस्त ओळख करुन दिलेली आहे. त्यातले काही सिध्द कॅटेगरीतले. यासारखे काही पंचेस अतिशय आवडल्या गेले आहेत. एकंदरीत बटाट्याची चाळ आठवली... या गावात पण साधारण तसंच वातावरण असत असेल...
  • Log in or register to post comments

हान तिच्येयला धुरळा!! भावा

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 04/28/2016 - 12:56 नवीन
हान तिच्येयला धुरळा!! भावा अमेजिंग स्किल आहे हे माणसे निरीक्षायचे तुझ्याकडे त्याची अशीच उत्तरोत्तर वृद्धी व्हावी! जियो!
  • Log in or register to post comments

लय भारी.फुडं?

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 04/28/2016 - 13:19 नवीन
लय भारी.फुडं?
  • Log in or register to post comments

पुभाप्र

सूड
गुरुवार, 04/28/2016 - 14:32 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments

अभ्या भाषेच्या अडचणीमुळे लेख

एक एकटा एकटाच
गुरुवार, 04/28/2016 - 20:25 नवीन
अभ्या भाषेच्या अडचणीमुळे लेख समजला नाही तरी तुझ्या इतर लेखांप्रमाणे हां ही उत्तम झाला असणार हयात शंकाच नाही. आणि वरील प्रतिसादही ह्याला दुजोरा देताहेत माझ्याकडून तुला पुढील लिखाणास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अरे दिलंय ना भाषांतर, नीट पहा

अभ्या..
गुरुवार, 04/28/2016 - 21:02 नवीन
अरे दिलंय ना भाषांतर, नीट पहा जरा. श्रीरंगाने दुपारचं करून दिलाय उपदते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच

अरे दिलंय ना भाषांतर, नीट पहा

अभ्या..
गुरुवार, 04/28/2016 - 21:02 नवीन
अरे दिलंय ना भाषांतर, नीट पहा जरा. श्रीरंगाने दुपारचं करून दिलाय उपदते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच

सॉरी दादा

एक एकटा एकटाच
गुरुवार, 04/28/2016 - 21:12 नवीन
सॉरी दादा वर लक्ष दिलं नाही आता वाचलं मस्त मस्त मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१..सकाळी उगीचच न कळल्यासारखी

असंका
गुरुवार, 04/28/2016 - 22:07 नवीन
+१..सकाळी उगीचच न कळल्यासारखी वाटली होती. आत्ता परत वाचल्यावर भयंकर हसायला येत होतं.. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच

छान तरी किती वेळा म्हणायचं.

रातराणी
गुरुवार, 04/28/2016 - 21:01 नवीन
छान तरी किती वेळा म्हणायचं. जळफळाट झाला आहे.
  • Log in or register to post comments

ಬಹಳ ಸಂತೋಷವನ್ನು ನಾನು ಇಷ್ಟ

जव्हेरगंज
गुरुवार, 04/28/2016 - 21:18 नवीन
ಬಹಳ ಸಂತೋಷವನ್ನು ನಾನು ಇಷ್ಟ ಅಭಿಜಿತ್ ಅದನ್ನು ಇರಿಸಿಕೊಳ್ಳಲು
  • Log in or register to post comments

बहळ संतोषवन्नु नानु इष्टा...

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 21:22 नवीन
बहळ संतोषवन्नु नानु इष्टा... अभीजीत् अदन्नु इरिसिकोळ्ळलु... बरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

ಸರಿಯಾದ ಶ್ರೀ ವಿಜಯ್

जव्हेरगंज
गुरुवार, 04/28/2016 - 21:48 नवीन
ಸರಿಯಾದ ಶ್ರೀ ವಿಜಯ್ ಸಂತೋಷವನ್ನು ನೀವು ಕನ್ನಡ ಜ್ಞಾನ ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಆದರೆ ನಾನು ಹಾಗೆ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

सरीयाद श्री विजय्

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 22:07 नवीन
सरीयाद श्री विजय् संतोषवन्नु नीवु कन्नड ज्ञान करेयल्वाडुव... अदरे नानु हागे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

जव्हेर्या मेल्या माका कन्नड

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 22:09 नवीन
जव्हेर्या मेल्या माका कन्नड फक्त वाचता येता मा... समजत नाय बाकी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

अदरे नानु हागे...

भीमाईचा पिपळ्या.
Fri, 04/29/2016 - 07:05 नवीन
अदरे नानु हागे...
मिपा हागणदारी मुक्त झाले आहे. हे नानु हागे काय. ननगे कन्नड बुर्गेदील्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

बहळ संतोषवन्नु नानु इष्टा...

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 21:22 नवीन
बहळ संतोषवन्नु नानु इष्टा... अभीजीत् अदन्नु इरिसिकोळ्ळलु... बरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

सुरुवात तर जोरदार...

मुक्त विहारि
Fri, 04/29/2016 - 08:08 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

दनका! लै झ्याक!

ऋषिकेश
Fri, 04/29/2016 - 09:39 नवीन
दनका! लै झ्याक!
  • Log in or register to post comments

जाहिरात क्षेत्र व साहित्य

चौकटराजा
Fri, 04/29/2016 - 09:40 नवीन
अभ्या म्हाराज उत्त्म कलाकार तर आहेतच पण एक चांगली जीवनद्रुष्टी असलेले साहित्ययात्री आहेत. काही दिवसानी अभ्या म्हाराजाचे या जगतावरचे पुस्तक ही निघू शकते.
  • Log in or register to post comments

धमकी फाट्यावर

नाखु
Fri, 04/29/2016 - 10:04 नवीन
(टिप : ह्याचा पुढचा भाग तयार असलेने अगदी लगोलग येईल. टांगारुपणा केला जाणार नाही. जुन्या कथांच्या क्रमश: भागाच्या चौकश्या करु नयेत. ;) )
आणि

धागा डोक्यावर

घेतलाय... कथा बुंगाट वाचक झिंगाट झिंगाटलेला नाखु
  • Log in or register to post comments

+१११११११

सुधांशुनूलकर
Fri, 04/29/2016 - 19:25 नवीन
लय भारी बुंगाट पोश्टर-ब्यानरांचा आणि ब्यानरम्यानचा फ्यान सुधांशुनूलकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा