साईनफेल्ड/seinfeld (1989-1998)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
साईनफेल्ड(1989-1998)
काल एव्हरीबडी लव्हज रेमंड च्या लेखनानंतर दुसऱ्या काही sitcoms आठवल्या ज्यांना टाळून अनेक अमेरिचनां चे तरुणपण अपुरेच राहील. भारतात देखील प्रचंड लोकप्रिय असणारी सीटकॉम म्हणजे फ्रेन्डस्/FRIENDS. आजही फ्रेंड्स या मालिकेची पारायणे/ बिंज वाचिंग करणारे भरपूर लोक्स आहेत. खास करून 20 ते 45 वयातला गट. पण फ्रेन्डस् उत्तम आहे यात तिळमात्र शंका नाही. अस्मादिकांनीसुद्धा त्याचे 22 एपिसोड्स × 10 सीझन्स अशी 10 एक वेळेस तरी रिव्हिजन मारली आहे. इतकी कि त्यातील एपिसोड्स मधील कोणते पात्र कोणते वाक्य बोलते हे ठामपणे सांगु शकतो. तर सांगायचा उद्देश हा कि या फ्रेन्डस् भक्तीमुळे एक सर्वोत्तम सीटकॉम फार काही प्रसिद्धी न होता दुर्लक्षित राहिली... निदान भारतात तरी. ..... तिचे नाव साईनफेल्ड. (पहा why seinfeld is not so popular in India like friends https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.quora.com/Why-isnt-Seinfeld-as-popular-as-Friends-in-India&ved=0ahUKEwiWm_nS6_jLAhUXBY4KHbOsBbYQFggaMAA&usg=AFQjCNEgZKvnqQhPcWettxmOR_UpPzYE0w&sig2=DNdUoSQEeeCCH9w02h2oTQ)
साईनफेल्ड ह्या सीटकॉमला बाकी 1990 नंतर आलेल्या सर्व सीटकॉमचा जनक मानतात. त्यांनी सीटकॉम क्षेत्रात प्रथमच वापरलेली तंत्रे :
. त्यांच्या 20 मिनिटाच्या एपिसोड्स मध्ये एखादा अजब/ सामाजिकरित्या awkward असलेला विषय हाताळलेला असतो. मग पुढच्या एपिसोडला नवीन विषय. एखादी थिम सोडता कॅंटीन्यूटी काही नाहीच. म्हणजे लक्षात आले का कि प्रेक्षकांच्या डोक्याला काहीही लक्षात ठेवायचा ताप नाही. त्या आधीच्या विनोदी मालिकांमध्ये ही कॅंटीन्यूटीन्यू जपण्याच्या नादात आणि प्रेक्षकांना गोडगोड एंडिंग पुरवण्याच्या नादात खूप तडजोडी केल्या जायच्या. प्रेक्षकाला uncomfortable वाटू नये म्हणून नायकाला कमीपण दाखवणे, त्याचे/तिचे दुर्गुण दाखवणे होत नसायचे. मग नायक मसीहा नाहीतर अवतार वाटायचा आणि पब्लिक त्याच्यावर फिदा असायची. (आपल्याकडे हे नायक पूजन अजूनही चालू आहे. पण दबंग नंतर काही प्रमाणात अँटी हिरो/ न-नायक ह्याच्या छटा दिसतायेत.) हे नायकाचे सामान्यपण का महत्वाचे आहे ते पाहू. कोणत्याही समाजातील लोक समाजातील लोक एक मसीहा शोधून त्याच्यावर त्यांच्या सगळ्या समस्यांची जबाबदारी टाकून मोकळे होतात. (उदा. प्रत्येक निवडणुकीत नाही का आपल्याला वेगळा नायकच पं प्र पदी योग्य आहे असे वाटते. मग आपल्या मनावर ठसवले जाते कि मागचा नायक काहीच नव्हता आताच्या नायकाची छाती पहा. वगैरें वगैरे).
साईनफेल्डचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे " no hugging no learning rule" म्हणजे थोडक्यात पात्रे कधीही "सुधारणार"नाहीत.( आठवतंय का men always will be men). त्या आधी कस व्हायचे माहितेय का कि पडद्यावरची पात्रे आपली चूक लक्षात आणून दिल्यावर चक्क सुधारायची म्हणजे एकतर नायकांत कोणता दोष नाही आणि वरून ते आपल्या स्वभावात कायम सुधारणा करत राहणार. हे थोडेसुद्धा पटनेबल नाही. कारण आपल्याला माहित आहे कि स्वभाव काही तरी अघटित/drastic घडल्याशिवाय बदलत नाही.(मृत्यू, लग्न,अपघात वगैरे. खरतर arrange marrige हा सुद्धा अपघातच मानावा काय?:):))( बाकी लीडरशिप प्रोग्रॅमवाले काहीही दावे करोत).
साईनफेल्ड ला "show about nothing " असे म्हटले जाते. कारण त्या शोमध्ये काही नवीन तत्वज्ञान सांगितलय किंवा उपदेशाचे डोस पाजलेत असे काही नाही. सगळे रोजमर्रा कि जिन्दगीशी निगडित. पण त्यात बदल हा कि त्यातली पात्रे स्वभावतःच स्वार्थी असल्याने ते प्रत्येक समस्या आपल्या पद्धतीने हाताळतात आणि विनोद घडत जातो.
आता थोडी पात्र ओळख :
जेरी साईनफेल्ड : 30-32 वय, कॉमेडीअन, निटनेटकेपणाशिवाय न जमणारा, ज्यू, लाईफ सिरियसली न घेणारा, सुपरमॅन चा फॅन,
जेरी कितीही संकटे आलि तरी टेन्शन घेत नाही. लाईफ फाट्यावरच मारलीय त्याने. Aha who cares? इथे कोणाला पडलीये असा स्वभाव. खर तर जेरीचे हीच non- caring काळ्जीमुक्त जीवनशैली अमेरिकन तरुण पिढीला भावली असावी. त्यामुळेच साईनफेल्ड एवढे प्रसिद्ध झाले असावे.
जॉर्ज कोस्टान्झा : 30-32 वय, बहुतेक वेळा बेरोजगार, टक्कल पडत चाललेले, बिनधास्त खोटे बोलणारा म्हणजे नोकरी नसताना देखील आहे म्हणून सांगणारा वगैरे, GF पटवण्यासाठी वेगवेगळ्या शकली लढवणारा, कंजूष, आई-वडिलांसोबत राहावं लागत असल्याने फ्रस्टेटेड असलेला,
जीवनातील बंधने ज्याला काही लोक मँनर्स असे पाचगल नाव देतात ते तो पळत नाही. उदा. वेटरला टीप देणे, GF ला ती आजारी पडल्यानंतर तिच्याशी break up न करणे, लहान मुलांशी न भांडणे. फक्त काही रुपये वाचविण्यासाठी तो लग्नपत्रिकांची जुनाट पाकिटे घेतो. त्या तोंडाच्या थुंकीने चिटकवायला जाऊन त्याच्या नियोजित वधूचे निधन होते तरीही त्याला वाईट वाटत नाही आणि दुसर्या पात्रांना देखील नाही.
GF ने nose job करावे असे तो आडून आडून तिला सुचवत राहतो कारण डायरेक्ट तोंडावर सांगणे बरोबर होणार नाही असे त्याला वाटते.
इलेन बेनेस: 30-32 वय, tomboy अर्थात लाजन मुरडण याचे वावडे असलेली, स्वतंत्र, स्वतःची ठाम मते असलेली, पुरुषांना काही वेळा फक्त सेक्स साठी वापरणारी, बुक ऑडिटर,
आपल्याला माहित आहे कि bimbo म्हणजे डोकं नसलेली सुंदर स्त्री. हे सरसकटीकरण चूक आहे पण इथे एलेन एका मंद पात्राला तो केवळ सुंदर आहे म्हणून date करते. पण शेवटी हर मानून सोडून देते. जेरी चा सुद्धा असा बिम्बो ला date करण्याचा प्रसंग असतो त्याला तो "war between his brain and penis" असे म्हणतो. तर george त्याला म्हणतो "बरोबरच आहे आणि 40 वर्षेपर्यंत तरी त्यात पेनिसच जिंकणार." मग साईनफेल्ड विचारतो"मग चाळीशीनंतर?" मग जॉर्ज म्हणतो" तेव्हा पण पेनिसच जिंकणार पण मोठ्या फरकाने नाही.
JERRY- "I have never been so repulsed by someone mentally and so attracted to them physically at the same time. It's like my brain is facing my penis in a chess game. And I'm letting him win."
GEORGE -"You're not letting him win. He wins 'til you're forty."
JERRY- "Then what?"
George- "He still wins, but it's not a blow-out."
क्रेमर: विक्षिप्त , अवलिया, जेरी च्या अपार्टमेंटमध्ये बिनदिक्कत वावरणारा , अंगविक्षेप करून हसविणारा
हि सगळी पात्रे प्रत्येक GF/BF मध्ये काही ना काही बारिकसरीक त्रुटी काढून तिला नकार देतात. उदा. तिचे नकोच मोठे आहेbig nose/ ती खूपच हळू आवाजात बोलते low talker/ तिला माणसासारखे हात आहेत Manhands इत्यादी.
अशी चित्र-विचित्र पात्रे बघण्याची मजा फक्त सांगून कळणार नाही. त्यासाठी ती मालिका पहावी लागेल. आणखी एक फ्रेन्डस् सारखे यात instant जोक्स सुरु होत नसल्याने मालिकेत रमण्यासाठी त्यातील विनोद कळण्यापूर्वी काही एपिसोड्स असेच पहावे लागतील. पण एकदा चटक लागल्यावर तुम्ही सगळे सीझन्स झाल्याशिवाय उठणार नाही याची खात्री बाळगा.
हि नवदीच्या काळातील मालिका असल्याने studio audience laughter track सहन करावे लागेल.
अवांतर: seinfeld vs fiends vs everybody loves remond
Seinfeld - 30+ वयोगट, अविवाहित 4 मित्र (1989- 1998)
Friends - 25+ वयोगट , अविवाहित 6 मित्र(1995-2005)
Everybody loves remond : 35+ वयोगट रेमंड व त्याचे वृद्ध आई वडील(1996-2005)
वरील तिन्ही सीटकॉम प्रचंड प्रसिद्द आहेत. पण त्यांनी एकमेकांच्या ऑडीएन्स वर कधी अतिक्रमण केले नाही. कारण ELR फॅमिली कॉमेडी असल्याने सासू- सून, आई-वडील मुलगा, नवरा बायको, sibling rivalry यासारखे विषय हाताळत असल्याने ती इतर दोघांच्या स्पर्धेत नव्हती. साईनफेल्ड फ्रेन्डस् एवढी ड्रॅमॅटिक नाही. कि त्यात बऱ्याच मोठ्या थिम नाहीत. प्रेक्षकांना साईनफेल्ड emotionally blackmail करत नाही. Oh! So sweet,nice असले क्षण साईनफेल्ड मध्ये नाहीत. उलट कधी मधी जर नायक परोपकार करण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो त्याच्या अंगलट कसे येतो हे दाखवलय. उलट फ्रेन्डस् वाले 6 जिवलग मित्रांची गोष्ट सांगतात जे एकमेकांपासून कध्धी कध्धी अलग होत नाहीत. एकमेकांच्या मदतीला नेहमी धावून येतात. एकमेकांना "मी आहे कि तुझ्या मदतीला" "I'll be there for you असे सुचवितात. जे तारुण्याच्या भरात , मित्रांसाठी जण ओवाळून टाकण्याच्या काळात अपील होत राहते. पण मला वाटते कि ते विषफुल थिंकिंग असावे. कोणीही एवढे निःस्वार्थी नसते/नसावे किंवा केवळ फॅन्तसी मध्ये असावे(हे जोडीदाराला देखील लागू होते). त्यापेक्षा आपला स्वार्थ बघत कोणतीही कृत्रिम आपुलकी न दाखवता समाजातील शिष्टाचार न पाळल्याने होणाऱ्या गमती जमती दाखविणारा साईनफेल्ड शो मला जास्त भावतो. आणि हे महत्वाचे आहे कि मी फ्रेन्डस् फॅन झाल्यांनंतर साईनफेल्ड फॅन झालो.
प्रतिक्रिया
बघायला हवा :)
साइनफेल्ड अत्यंत आवडते.
पण मला वाटते कि फ्रेंड्स
उलट आहे माझं..
तेच सांगतोय कि फ्रेन्डस्
सिएन्फ़ेल्द मधले आणखी एक
अॅकॉर्डिंग टू जिम
तुमच्या वर्णनावरून everybody
साधर्म्य
येस मिनिस्टर/येस प्राइम
या दोन्ही
अगदी. कोणत्याही राजकारणाला
इन द थिक ऑफ इट
फ्रेंड्स = वपु
फ्रेन्डस् ला थर्ड क्लास
फ्रेन्डस् ला थर्ड क्लास
फ्रेन्डस् ला थर्ड क्लास
पण मला वाटते कि फ्रेंड्स पुन्हा पुन्हा पाहणारे जास्त लोक्स असावे
एलेन ला स्टेरिओटाईप नाही केले
तशी तुलना जरा कठीण आहे
मला न्यूमनचा गुबगुबीत लहान
साईनफेल्ड मधल्या पात्रांशी
जॉर्ज,क्रेमर,एलेन शी काय
अनेक सिचुएशन्स मधलं त्यांच
साईनफेल्डचे अर्थशास्त्र
हा हा☺ त्या शेवटाबद्दल
लॅरी डेव्हीड
Curb your enthusiasm असे
Seinfeld अप्रतिमच आहे.
जास्त ड्रामा वाटत असेल
नाही. मला उलट नाट्यमय मालिका आवडतात.
येमि/ येप्रामि दर्जेदार
हाउस
मस्त विषय
साइनफेल्ड चांगली आहेच
तुम्ही hbo वरचा the wire हा
नाही अजून
Curb Your Enthusiasm
ऐकलेले होते. आता पाहून बघतो.
कुठे
अमेरीकेत नेटफ्लिक्सवर मिळेल.