✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वाचन का करावे?

न
निमिष सोनार यांनी
गुरुवार, 03/31/2016 - 15:19  ·  लेख
लेख
"पुस्तके कशाला वाचायची? पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही" "इतरांच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्यासाठी पुस्तके वाचावीत! त्या चुका आपण करून नये यासाठी!" "पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे. चुका करत करत शिकणे मला आवडते! माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! अनुभवातून!" "मान्य आहे. अरे पण, जीवनातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या चुकांतून शिकून शिकून त्यातील तत्वज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते. समजा तुला अनुभवातून शिकत शिकत एखादी गोष्ट समजली पण तोपर्यंत त्या अनुभवाचा उपयोग करण्याचे वय आणि वेळ निघून गेली असेल तर? आणि तुझ्या अनुभवातून आणि चुकांतून तू जो निष्कर्ष काढला तो जसाच्या तसा जर का या आधीच कुणी महान लेखकाने व्यवस्थित पुस्तकरूपात लिहून ठेवलेला असेल तर? तेवढा आपला वेळ नाही का वाचणार? एखादी चूक होण्यापूर्वीच आपण ती टाळू शकणार!" "पण लेखकाची आणि आपली पार्श्वभूमी, आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. लेखकाचे सगळे अनुभव आपल्याला कसे लागू होतील? सांग बरे?" "अरे! सगळे अनुभव नाही लागू होणार पण काही टक्के तर नक्कीच होईल! पुस्तकातून आपल्याला प्रेरणा मिळते. शेवटी, लेखक हाही एक आपल्यासारखाच माणूसच असतो ना! त्याच्या भावना आणि आयुष्याच्या अवस्था- उदाहरणार्थ - प्रेम, लोभ, मत्सर, सुख, दु:ख, तारुण्य, बालपण वगैरे या आपल्या सारख्याच असतात की! सगळ्या माणसांच्या भावना शेवटी सारख्याच! त्यासंदर्भातील त्याचे अनुभव बऱ्याच प्रमाणात सगळ्या माणसांना लागू होणार नाहीत का? लेखक एलियन थोडेच असतो? माणूसच असतो. आपल्यासारखाच! आलं का लक्षात? आणि पुस्तकातून विचारांना चालना मिळते, आपण विशिष्ट प्रकारच्या संकुचित विचारांतून बाहेर पडून नवनवीन विचार स्वीकारायला शिकतो! आपल्या विचार कक्षा रुंदावतात! "तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे असं वाटतंय बरं का!" "आहे ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?" - निमिष सोनार (एक पुस्तक प्रेमी आणि वाचन समर्थक!)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
2883 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

निमिष सोनार, आपणाला मदतीची गरज आहे!

अमृता_जोशी
गुरुवार, 03/31/2016 - 15:47 नवीन
"आहे ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?
" हे
  • Log in or register to post comments

"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे

अमृता_जोशी
गुरुवार, 03/31/2016 - 15:52 नवीन
"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे असं वाटतंय बरं का!" "आहे ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?"
का कोणास ठाऊक, मला तुमचे दोन्ही लेख शासकीय जाहिरातींसारखे वाट आहेत.
  • Log in or register to post comments

कसं बरोबर ओळखलंत!

निमिष सोनार
गुरुवार, 03/31/2016 - 16:51 नवीन
काय मग, वाचणार ना या जाहिरातीने प्रभावित होऊन पुस्तके उद्यापासून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

तुम्ही खूपच आशावादी आहात हो.

अमृता_जोशी
गुरुवार, 03/31/2016 - 17:46 नवीन
तुम्ही खूपच आशावादी आहात हो! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

पुस्तकी ज्ञानातून कधीही

अत्रे
गुरुवार, 03/31/2016 - 15:53 नवीन
पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही
प्रत्येक गोष्टीत असा फायदा बघितलाच पाहिजे का? नसेल काही फायदा तर मग ती गोष्ट करूच नये का?
  • Log in or register to post comments

बरोबर! फायदा बघितला नाही पाहीजे प्रत्येक गोष्टीतून!

निमिष सोनार
गुरुवार, 03/31/2016 - 16:52 नवीन
पुस्तके "फक्त" मनोरंजनासाठी सुद्धा वाचता येऊ शकतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

हो ना! चल मग कोणते पुस्तक

अत्रे
गुरुवार, 03/31/2016 - 17:41 नवीन
हो ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

वाचाल

सिरुसेरि
Fri, 04/01/2016 - 10:18 नवीन
तर वाचाल .
  • Log in or register to post comments

वाचन का करावे?

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 16:59 नवीन
वाचन का करावे? >> तुम्ही कधीतरी लिहाल तेव्हा प्रेक्टीस असायला पाहिजे म्हणून... (ह. घ्या)
  • Log in or register to post comments

लेखक एलियन थोडेच असतो?

होबासराव
Fri, 04/01/2016 - 17:15 नवीन
आम्हाला तरी आपले सगळे लेख एलियन ने लिहिल्यसारखेच वाटतात ;) पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. खलच ? हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे अले बाप ले शाला! पला मुलानो पला चुका करत करत शिकणे मला आवडते! अले काका पन किति चुका आणखि कलनाल आहेस. माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! काका हे काय असत, तु माझ ऐकतोस का एक छान तज्ञ आहेत पुण्यात चलतोस का. आता होबासराव जोमात अन लेखक कोमात ;)
  • Log in or register to post comments

(No subject)

जव्हेरगंज
Fri, 04/01/2016 - 17:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/01/2016 - 17:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

तज्ञ **

होबासराव
Fri, 04/01/2016 - 17:16 नवीन
मानसोपचार तज्ञ
  • Log in or register to post comments

.. का करावी?

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/01/2016 - 17:39 नवीन
.. का करावी?
  • Log in or register to post comments

मला पुस्तके वाचायचा छंद

विवेकपटाईत
Fri, 04/01/2016 - 21:06 नवीन
मला पुस्तके वाचायचा छंद बालपणा पासून आहे. कारण घरात पंखा नव्हता. दिल्ली पब्लिक पुस्तकालयात पंखा होता आणि कुलरचे थंड पाणी हि. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात सकाळी ९ वाजता जेवण करून थेट पुस्तकालयात जात होतो आणि दुपारी ३-४ च्या सुमारास परत (भूक लागल्यावर). रोज ३-४ पुस्तके तिथेच बसून वाचायचो. काही कळत नसले तरी. गेल्या १७-१८ वर्षांत पुस्तके वाचणे कमी झाले पण विशेषज्ञ लोकांच्या विभिन्न सरकारी धोरणांवर बर्याच रिपोर्ट्स वाचल्या आहेत. काहींची चिरफाड होताना हि पाहिली आहे. टीप: रिपोर्ट्स ७व्या माल्या वर लिहिल्या जातात, जमिनीशी त्यांचे काही नाते नसते. अश्या रिपोर्ट्स लिहिणारे ग्यानी लोक असतात. आमच्या सारख्या जमिनीवर राहणार्या सामान्य माणसांचे विचार फडतूस असतात.
  • Log in or register to post comments

यु बिट द *ट ओट्टोफ़ *किंग रीडर्स.... लगे रहो निसो भाई

भाऊंचे भाऊ
Fri, 04/01/2016 - 23:37 नवीन
तुमचे संवाद लेखन बघून ब्राडपिटच्या फाईट क्लब ची आठवण होउ लागली आहे...! आता लेखनी थांबवू नका
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा