मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पेन्सिल शेडींग : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व

बबन ताम्बे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
संपादक मंडळास नम्र विनंती, मिपावर कलादालन हा टॅब ब-याच दिवसांपासून दिसत नाही. कृपया कलादालन विभाग परत सुरू करावा. pula

वाचने 23807 वाचनखूण प्रतिक्रिया 73

खेडूत Fri, 08/21/2015 - 13:12
सुंदर! ...__/\__ कुतूहल म्हणून विचारतो: किती वेळ लागला याला? आणि आकांर केव्हढा आहे? A4/ A3?

In reply to by बबन ताम्बे

खेडूत Fri, 08/21/2015 - 15:44
ओके . धन्यवाद. म्हणजे A4 च्या निम्मा कागद ! यावरून आमचे हुल्ल्याळ नामक शिक्षक आठवले. इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं- व्यक्तिचित्र काढायचं तर आधी लहान आकारात काढा. म्हणजे चुकाही लहान होतात. त्याचं प्रात्यक्षिक म्हणून पोस्टाच्या तिकीटाएव्हढं लोकमान्य टिळक यांचं चित्र शिकवलं होतं. तीनचार डीटेल्स- बस्स . चित्र तयार. गणपतीचं चित्रही तसंच!

In reply to by खेडूत

बबन ताम्बे Fri, 08/21/2015 - 16:46
तुम्हाला चांगले गुरु लाभले. चित्राची साईज A4 च्या अगदी निम्मि नाही. १५० मिमि बाय २०० मिमि म्हणजे साधारण A4 च्या ७० टक्के. (A4 - २१० मिमि बाय २९७ मिमि. - Being a hardcore Mechanical Draughtsman, size तोंडपाठ :-)) )

बहुगुणी Fri, 08/21/2015 - 19:48
फ्रेम करून संग्रही ठेवावं इतकं सुरेख चित्र आहे. [तुमची सहीदेखील आवडली :-)]

मयुरा गुप्ते Fri, 08/21/2015 - 20:10
सुंदरच झालयं चित्र. विशेषतः डोळे,चष्मा,व गालांचे स्नायु..त्यांचं रेखाटन फारच तंतोतंत आलय. -मयुरा

शब्दबम्बाळ Mon, 08/24/2015 - 20:19
तुम्ही ग्राफाईट पेन्सील वापरता का? ब्लेंडिंग कशाने करता? एखादा लेख लिहा कि तुमच्या स्केचिंगच्या साहित्यावर ! :)

In reply to by शब्दबम्बाळ

बबन ताम्बे Tue, 08/25/2015 - 11:46
मी स्केचींगसाठी कॅमलीनची ३ बी आणि शेडींगसाठी ६ बी पेन्सिल वापरतो. बाकी काही विशेष साहित्य वापरत नाही. चांगला इरेजर, चांगले स्केच बूक, शार्पनर आणि पेन्सिल. बस्स. ब्लेंडींग बोटांनीच करतो. फक्त मी जे काही करील ते उत्कृष्टच करील असे नेहमी ध्येय ठेवतो आणि चित्रात जिवंतपणा आणण्यासाठी खूप मेहनत घेतो.

नाखु Tue, 08/25/2015 - 10:59
तर अप्रतीम पण चित्रही भन्नाट. काढलागणपतीझालामारूतीफेमडाणी (वि)चित्रवाला नाखुस

बबन ताम्बे गुरुवार, 08/27/2015 - 14:01
खरं म्हणजे पुलंचेच एक वाक्य स्मरते की पोटापाण्यासाठी जे करायला लागते ते जरूर करा पण आयुष्यात एक तरी छंद जोपासा. मलाही त्या वाक्याने प्रेरणा दिली.

मैत्र गुरुवार, 08/27/2015 - 16:34
शेडिंगचे कष्ट आणि चिकाटी प्रचंड दिसते आहे. अवघड बाबी जसे चष्म्याचा पोत आणि रंग, केस वगैरे अतिशय उत्तम आले आहेत. खूप छान चित्र आहे. खरंच अवघड वाटतंय सांगायला पण हे अगदी पुलं सारखे दिसणारे गृहस्थ वाटत आहेत. जबडा / ओठांचा भाग वेगळा आला आहे. इतक्या सुंदर चित्राला आणि मेहनतीला काही बारीक चू़क काढायला नको. राग मानू नये. पुढच्या चित्रासाठी शुभेच्छा..

In reply to by मैत्र

बबन ताम्बे गुरुवार, 08/27/2015 - 17:29
राग वगैरे काही नाही. उलट तुम्ही स्पष्ट सांगीतलेत त्यामुळे सुधारणा करता येतील. तुमच्या निरिक्षणांशी सहमत. मुळ चित्रात ओठ थोडे जाड आहेत. पण होते काय की अगदी ०.१ मिमि थिकनेस जरी वाढवायची म्हटली तरी एखादेवेळी हात योग्य जागी फिरत नाही आणि चित्र बिघडून जाते. म्हणून मी आहेत तसेच ठेवले.

बबन ताम्बे Wed, 04/20/2016 - 19:10
नवीन सदस्यांसाठी खाली लिंक देत आहे. माझी आतापर्यंतची कला मी सादर केली आहे. धन्यवाद. :-) http://misalpav.com/node/31290 http://misalpav.com/node/31283 http://misalpav.com/node/28637 http://misalpav.com/node/28217 http://misalpav.com/node/28207