मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पावसात जळाया लागलो...

सतिश गावडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय... चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं सोडून गेली रं मैना दोस्त टाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो आज काल दिस रात मला सुचंना कायी पार झालो देवदास आन्न पोटात जात न्हाई येईना हो झोप मला कुशीवर वळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो कसं सांगू काय झालं खेळ खल्लास झाला उडवलेला पैसा सगळा आता वाया तो गेला पैलवान मी मर्द गडी आसू गाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो

वाचने 19333 वाचनखूण प्रतिक्रिया 102

In reply to by टवाळ कार्टा

नाही. पात्तळेश्वरा जवळ सुचली असणार! ;-) हापिसात असताना ढ़णाजीराव त्या एकांतवासी स्थानात नेहमी अधून मधून जात असतात. बरुबर ना हो स.गा. ? ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे Mon, 06/08/2015 - 22:35
तुमच्यासारखे "त्या एकांतवासी स्थानी" गेल्यावर सुचायला ही शौच काही कविता नाही. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे Mon, 06/08/2015 - 22:59
मलाही शौच काव्य तिथे कधीच सुचलेली नाहित.
मग तुम्हाला शौच काव्य कुठे सुचतात?
पिकत तिथे विकत नाहीच
म्हण अस्थानी वाटते. म्हणजे काही टोटल लागत नाही. जरा इस्कटून सांगता का?

In reply to by बॅटमॅन

वरील संवाद आवडला नाही :-\ प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर एखाद्या सदस्याची किती टर उडवावी हे आपल्याला कळायला हवेय. एखादा माणूस चिडत नाही म्हणून त्याची कितीही चेष्टा करायची हे पटत नाही.. #हीणसंवाद

In reply to by बॅटमॅन

सतिश गावडे Tue, 06/09/2015 - 14:31
अशी टिका करू नये तर कशी करावी? आपण साक्षात भाषाप्रभू पाणिनी आहात. आपणच आम्हा अडाण्यांना मार्गदर्शन करावे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Tue, 06/09/2015 - 14:20
एकदा कशाचे बळी ते नक्की ठरवा राव. कधी म्हणताय भ्रामक भ्रमवाद तर कधी म्हणताय निरर्थक स्वात्मवाद.

आदूबाळ Mon, 06/08/2015 - 21:39
भारी! मला वर्जिनल गाणं पण खूप आवडतं. माझ्यासारखे जे झंगड असतील त्यांना "कल्लूळाचं पानी..." हे गाणंही आवडेल.

In reply to by आदूबाळ

सतिश गावडे Tue, 06/09/2015 - 13:17
मला वर्जिनल गाणं पण खूप आवडतं.
मलाही. पाच वर्षांपूर्वी मी त्या गाण्याचं रसग्रहण केले होते. एकदा जुन्या हायवेने मुंबईला जात होतो. वाटेत खोपोलीला पेट्रोल टाकायला पंपात गेलो. गाडीत हे गाणं जोराने वाजत होतं. मी गाडीतून बाहेर पडताच पेट्रोल टाकणारा पोऱ्या माझ्याकडे अनाकलनीय नजरेने पाहू लागला. बहुतेक त्याला माझी गाडी, माझा गेटप आणि गाडीत वाजणारे गाणं याची सुसंगती लागत नव्हती.

रमेश आठवले Tue, 06/09/2015 - 07:56
बरेच वर्षा पूर्वी बडे गुलाम अली खान यांच्या ठुमरी मध्ये हे बोल ऐकले होते -क्या तमाशा है के बारीश मे घर जलता है- जाणकाराना विचारल्यावर त्यांनी याचा अर्थ असा समजाऊन सांगितला होता- विरहिणी नायिका अश्रु ढाळत असते व ते तिच्या वक्षावर पडत असतात- हे पाहून शाय्र्र म्हणतो क्या तमाशा है के बारीश मे घर (दिल ) जलता है

नाखु Tue, 06/09/2015 - 08:45
जोमदार काव्य. पुभाप्र धीर धरा. मी पळाया लागलो हे विडंबन येईल (माझ्या कडून नाही "शिष्योत्तम,मर्यादापुरूष, लाडोबा") आम्ही दिलेले नामाभिधान किती सार्थ होते ह्याची प्रचीती आली असेलच तरी हि जिल्बी टकायला घेणे. सूचक अभामिपाहाविकसंघ

उत्स्फुर्त काव्य म्हणजे काय याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सगांच्या या काव्यपुष्पाकडे पहाता येईल. "कोणाला कशाच आणि करीनाला सैफच", किंवा "ये ये बैला आपण खेळु भोंडला" ह्या म्हणी सार्थ करणारी अशी ही कविता वाचताना आमच्या चश्म्यासमोर साक्षात सुर्यनारायण चमकून गेले. अहाहा केवढीही अगाध प्रतिभा. ज्ञानदेवांच्या विरहीणींचा आनंद सगळेच घेतो. पण विरह्याची बाजू मात्र आतापर्यंत फारच थोड्या कवींनी मांडली आहे. ज्या काही थोड्या फार कवीता प्रकाशीत झाल्या त्या सर्वांमधे या कवीतेचा नंबर बराच वरचा आहे हे सर्व रसिक "बिनशर्त" मान्य करतील. शतकानूशतके दूर्लक्षीत / अप्राकाशित राहिलेली बाजू इतक्या प्रभावीपणे आणि प्रांजळ पणे मांडण्याचे धाडस दाखवणार्‍या कवीचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. पहिल्या चार ओळींमधेच कवी आपल्याला सांगतो की त्याला मैना सोडून गेली आहे आणि त्यामूळे तो जळायला लागला आहे. ही मैना म्हणजे कोण हे जरी कवीने गुलदस्त्यात ठेवले असले तरी ती कोणती तरी महत्त्वाची व्यक्ती किंवा वस्तू यांचे प्रतिक म्हणून कवीने वापरली आहे हे जाणकारांच्या सहज लक्षात येईल. उदा. घरातले "पायलेक्स" अचानक संपले किंवा हरवले तर ते नियमीत वापरणार्‍याची काय अवस्था होईल तशीच काहीतरी अवस्था ही मैना सोडून गेल्या मूळे कवीतेतल्या नायकाची झाली आहे. त्याच्या सर्वांगाचा दाह होत आहे काही केल्या तो दाह कमी होत नाही म्हणून शेवटी अग्नीशामक दलाला पाचारण करावे असे तो सूचवतो. येथे अग्नीशामक दल हे सुध्दा प्रतिक कवीने मोठ्या हुशारीने निवडले आहे. कवीच्या या निवडचातुर्याला नक्कीच "दाद" द्यायला पाहीजे. केवळ या उपमे करता म्हणुन आमच्या तर्फे कवीला दाद खाज खुजली का दुष्मन असलेले "बी-टेक्स" मलम भेट देण्यात येत आहे. थोड्याशा विषयांतराबद्दल क्षमस्व पण मला जेष्ठ कवी आनंद बक्षी साहेबांची "टीप टीप बरसा पानी" हे अजरामर काव्य आणि त्यावर रविनाताईंनी केलेले नृत्य आठवले. तिकडे तर नायकाची नुसती आठवण आली म्हणून नायिकेच्या बॉडीला आग लागली आहे "तेरी याद आयी तो जल उठा मेरा भीगा बदन, अब तुही बता ओ सजन मै क्या करु?" असे ती नायकाला विचारते आहे. (बक्षी साहेबांना त्या वेळी फयरबंब बोलवायचे कसे सुचले नाही?) त्या मैना नामक व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या विरहाने आता आपल्या काव्यनायकाची तहानभूकही हरपली आहे. काय करु आणि काय नको याचे त्याला फारच टेंन्शन यायला लागले आहे.त्यातच मैना जवळ नसल्यामूळे ह्या टेंशनचा निचरा करण्याचे कोणतेही साधन नायका कडे उपलब्ध नाही. मग तो ते टेंन्शन उराशी बाळगत गादिवर तळमळत रहातो. "अग मैना अग मैना तुझी हौस पुरवीन" हे मैनेला दिलेले वचन नायकाने बहुतेक पाळले नसावे. त्यामुळेच रागावून मैनाबाई त्याच्या पासून दुर गेल्या असाव्या. इकडे मध्यमवर्गीय कुटुंबाचा अजून एक प्रॉब्लेम कवीने नकळत अधोरेखीत केला आहे. "कामासाठी जर कोणी उपलब्ध नसेल तर आपण आपल्या हाताने काम करावे" याची साधी शिकवण हे मध्यमवर्गीय आईवडील मुलांना देत नाहीत आणि मग मुलांवर अशी गादिवर तळमळत पडण्याची वेळ येते. हे कवीने मोठ्या खूबीने सांगीतले आहे. मग आपला काव्यनायक काय करतो? तर मैनेच्या विरहामुळे होणार्‍या या त्रासापासून मोकळे होण्याचे विविध मार्ग शोधू लागतो. म्हणजे बायको माहेरी गेल्यावर घरातला पुरुषमाणूस कसा हॉटेल मधे जोवायला जातो तसेच काहीतरी. पण हे मार्ग मोठे खर्चिक असतात. दोनचार दिवसातच नायकाचा खिसा खाली होतो. एवढे पैसे उडवले तरी हाती काहीच लागत नाही. म्हणून उव्दीग्न झालेला नायक दु:खी होतो. रोज चांगल्या हॉटेल मधे जेवणे त्याला परवडेनासे होते. पैसे संपल्या मूळे नायक बहुतेक कोणत्या तरी खालच्या दर्जाच्या हॉटेल मधे जाउन आपली भूक भागवायला लागला आणि मग होउ नये तेच झाले. तो बहुतेक कोणत्यातरी संसर्गजन्य रोगाचा बळी पडला. नायक इकडे प्रांजळ पणे कबूल करतो "पैलवान मी मर्द गडी आसू गाळाया लागलो" आणि मग तो आपल्या मित्रांना विनंती करतो की या जाचातून सोडवण्यासाठी तुम्ही काहीतरी करा मला हे सगळे आता सहन होत नाही. असे हे एक अर्थवाही पण गुढगर्भ काव्यपुष्प प्रसवल्या बद्दल कविचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. (भेटवस्तु कवीला योग्यवेळी कुरीयरने पाठवली जाईल. त्यासाठी कृपया मागे तगादा लाउ नये) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

दमामि Tue, 06/09/2015 - 11:56
कामासाठी जर कोणी उपलब्ध नसेल तर आपण आपल्या हाताने काम करावे" :):):):):) यावर मोरोपंतांची एक आर्या आठवली, परवानगी असेल तर लिहितो.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सतिश गावडे Tue, 06/09/2015 - 13:11
बेक्कार हसतोय राव... एव्हढा विचार मी ही कविता पाडताना केला नव्हता. कृपा त्या अमितसांगलीची.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गणेशा Wed, 06/10/2015 - 09:15
@ पैजारबुवा मस्त रसग्रहन ... सगा चे खेचक शब्द खुप मस्त असतात ... कायम लक्षात राहतात.. जसे की तू ये तुला फुकट देईन .. आणि येथील फायरबंब आणि जळाया लागलोय या २ ओळी.. नक्कीच प्रेरणादायी

In reply to by गणेशा

प्रचेतस Wed, 06/10/2015 - 09:18
सगा चे खेचक शब्द खुप मस्त असतात ... कायम लक्षात राहतात..जसे की तू ये तुला फुकट देईन
ह्या ओळीचे पितृत्व श्री सगा यांचेकडे नाही.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे Wed, 06/10/2015 - 09:33
होय. एका गुर्‍हाळवाल्याकडून ऐकल्या मी त्या ओळी. अगदी या कवितेतील "पावसात जळाया लागलो" ही ओळसुद्धा माझी नाही. ती अमितसांगली यांच्या एका प्रतिसादावर आधारीत आहे. आणि "तुम्ही बोलवा फायरबंब" ही ओळ मला माझ्या "तुझी घागर नळाला लाव" या आवडत्या गाण्यावरून सुचली.

In reply to by सतिश गावडे

गणेशा Wed, 06/10/2015 - 18:36
कवीने शब्द नविन तयार करावा अशी कधीच अपेक्षा नसते.. असलेल्या शब्दातुनच त्याने कविता लिहिलेली असते... आणि जो माणुस प्रामाणिक पणे हे कबुल करतो त्याचा तर मला जास्त हेवा वाटतोच .. जरी मुळा वाक्य तुझे नसले तरी मुळा कविता तुझ्याच आहे.. अआणि आम्ही तरी तसेच माणनार.. अंध भक्ती म्हणु शकते कोणी... पण राजकारणात अंध भक्ती करण्यापेक्षा साहित्यात केली तर जास्त बरी.. आता... "मन तळ्यात" हे शब्द आधीच होते... तरी संदिप खरेंची सुंदर कविता यावरुन आहेच ना ... तसेच हे...

बॅटमॅन Tue, 06/09/2015 - 12:13
सगाकाकांनी सखू नंतर लैच दिवसांनी एक फर्मास लोकगीत लिवल्याबद्दल पूस्प्गुच देऊन सत्कार केल्या जात आहे. पैजारबुवांचे परीक्षणही भन्नाट जमले आहे.

In reply to by सतिश गावडे

जेपी Tue, 06/09/2015 - 15:15
मंजे जे अस्तित्वात नाही त्याच अस्तित्व नाकारुन तुम्ही अस्तित्वात असणार्या गोष्टीच अस्तित्वात असण शक्य नाही अस म्हणत आहात तर ते अस्तित्वावरच शंका घेण्यासारखे आहे..!!

In reply to by स्पंदना

सतिश गावडे Tue, 06/09/2015 - 18:51
लोकसंगीतात लोकांची भाषा असते. फ़ायरबंब हा रुळलेला शब्द आहे. जर मराठी शब्दच वापरायचा ठरवला तर मला तरी "अग्निशामक दलाची गाडी" असा लांबलचक शब्दच समोर येतो. दुसरा सुटसुटीत शब्द मला माहिती नाही. याच नियमाने "राया माझ्या हिरीला इंजिन बसवा" या लावणीत इंजिन या शब्दाऐवजी "पाणी उपसायचे यंत्र" असा शब्द वापरायला हवा होता त्यांनी.

In reply to by खटपट्या

सतिश गावडे Tue, 06/09/2015 - 20:10
हे ही चालेल. मात्र मीटरमध्ये बसते किंवा कसे हे सूडला विचारावे लागेल. त्याच्याकडे शिंप्याकडे असते तशी मीटरपट्टी आहे.

In reply to by सतिश गावडे

खटपट्या Wed, 06/10/2015 - 09:44
हो चालेल. कधी कधी गाण्याचे संगीत आधीच तयार असते आणि त्या चालीवर गीतकाराला गाणे लीहायला सांगीतले जाते. अशावेळी गीतकार गाणे लीहून आधीच तयार असलेल्या चालीवर म्हणून बघतो. या प्रक्रीयेला गाणे मीटरमधे बसवणे असे म्हणतात. चू.भू.दे.घे.