आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून!
आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून!
जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा
दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा
शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!
संवेदनाशीलता मेली काय?
बिनपाण्याने हजामत
राजा! ही तुझी बदमाषी आहे
आत्महत्या नव्हे, शासकीय खून!
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
यंदाचा दुष्काळ "न भूतो न भविष्यति" असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. "रोजचे मढे त्याला कोण रडे" अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.
जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा
दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा
शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!
संवेदनाशीलता मेली काय?
माणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता; पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.
आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप!
शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.
हुश्श! एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो? हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय? असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.
बिनपाण्याने हजामत
या विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.
यंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.
राजा! ही तुझी बदमाषी आहे
विदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत 'भारतीय कापूस महामंडळा' च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि "आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना" अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे "कायदेशीर शोषण" झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.
मध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं? कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.
जेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.
आत्महत्या नव्हे, शासकीय खून!
ज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे! शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना "शेतकर्यांचा शासकीय खून" असेच संबोधावे लागेल.
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचने
85788
वाचनखूण
प्रतिक्रिया
246
In reply to गरीब बिच्चारा शेतकरी. by प्रभाकर पेठकर
चर्चेची ही कोणती पातळी आहे?
In reply to चर्चेची ही कोणती पातळी आहे? by गंगाधर मुटे
चर्चेची पातळी.....
प्रत्येक धंदा / व्यवसाय
In reply to प्रत्येक धंदा / व्यवसाय by vikramaditya
साहेब, आपल्याला किती
In reply to साहेब, आपल्याला किती by हाडक्या
शेतकर्यांनी संघटीत व्हावे.
In reply to साहेब, आपल्याला किती by हाडक्या
///म्हणजे मी साखर
In reply to ///म्हणजे मी साखर by जयंत कुलकर्णी
वर कोणीतरी म्हणाले की
In reply to वर कोणीतरी म्हणाले की by प्रसाद१९७१
अहो ते वाक्य माझे नाही.
In reply to अहो ते वाक्य माझे नाही. by जयंत कुलकर्णी
पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे
In reply to ///म्हणजे मी साखर by जयंत कुलकर्णी
पेठकर काका आणि जयंत काका
In reply to पेठकर काका आणि जयंत काका by हाडक्या
अहो मी तुम्हाला टिमकी वाजवताय
In reply to अहो मी तुम्हाला टिमकी वाजवताय by जयंत कुलकर्णी
आणि मला कोणालाही दुखवाय्चे
In reply to आणि मला कोणालाही दुखवाय्चे by जयंत कुलकर्णी
///तुम्ही धरणग्रस्तांचे
In reply to ///तुम्ही धरणग्रस्तांचे by जयंत कुलकर्णी
आणि शेवटचे. टुमचे भावनिक
In reply to आणि शेवटचे. टुमचे भावनिक by जयंत कुलकर्णी
हे खरेच.
In reply to आणि शेवटचे. टुमचे भावनिक by जयंत कुलकर्णी
"इंडिया'' आणि "भारत"
In reply to आणि शेवटचे. टुमचे भावनिक by जयंत कुलकर्णी
शेतकरी आणि बिगर शेतकरी
In reply to पेठकर काका आणि जयंत काका by हाडक्या
शेतकरी समस्या.
In reply to शेतकरी समस्या. by प्रभाकर पेठकर
आपण बर्याच गोष्टी सारख्याच
In reply to शेतकरी समस्या. by प्रभाकर पेठकर
मसिहा
In reply to मसिहा by सतिश गावडे
तिसाद उडवलेला दिसत आहे.
In reply to पेठकर काका आणि जयंत काका by हाडक्या
उत्तम प्रतिसाद हाडक्या
In reply to उत्तम प्रतिसाद हाडक्या by स्पा
धन्यवाद, पण खासकरून
In reply to धन्यवाद, पण खासकरून by हाडक्या
तसे काही नाही
In reply to तसे काही नाही by गंगाधर मुटे
तसे काही नाही. जसा वेळ मिळाला
In reply to तसे काही नाही. जसा वेळ मिळाला by हाडक्या
प्रतिसाद पटला...
In reply to प्रतिसाद पटला... by सतिश गावडे
अन्नदात्याला झोडपण्याचा
In reply to अन्नदात्याला झोडपण्याचा by प्रसाद१९७१
नका पिकवू शेती, काही अडत नाही
In reply to नका पिकवू शेती, काही अडत नाही by सतिश गावडे
+सहमत
In reply to अन्नदात्याला झोडपण्याचा by प्रसाद१९७१
याच धर्तीवर असेही म्हणता येईल
In reply to अन्नदात्याला झोडपण्याचा by प्रसाद१९७१
नका पिकवू शेती, काही अडत नाही
In reply to तसे काही नाही. जसा वेळ मिळाला by हाडक्या
क्रमवार प्रतिसादांना उत्तर
In reply to प्रत्येक धंदा / व्यवसाय by vikramaditya
टेक्नीक आणि शेती तंत्र
मुटेंनी आज मिपाकरांनी दिवसभर
In reply to मुटेंनी आज मिपाकरांनी दिवसभर by सतिश गावडे
+१ .. हे मान्य सगा.
In reply to +१ .. हे मान्य सगा. by हाडक्या
का हा निव्वळ "योगायोग"
In reply to मुटेंनी आज मिपाकरांनी दिवसभर by सतिश गावडे
निदान बेरीज तरी शिकून घ्या हो!
काल भुसारी कॉलनी मधे एका
आमच्या ओळखीतला पोष्टातुन
In reply to आमच्या ओळखीतला पोष्टातुन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
माझ्या बर्याच 'शेतकरी' मित्रांनी
In reply to माझ्या बर्याच 'शेतकरी' मित्रांनी by कपिलमुनी
वर लिहिल्याप्रमाणेशेतकरी
In reply to वर लिहिल्याप्रमाणेशेतकरी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
येते हो
In reply to येते हो by कपिलमुनी
इथेच द्या की....
In reply to इथेच द्या की.... by प्रभाकर पेठकर
नक्कीच ! खरोखर इथे तो उपाय
In reply to नक्कीच ! खरोखर इथे तो उपाय by डॉ सुहास म्हात्रे
ऐकिव माहिती...
In reply to ऐकिव माहिती... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
ते कोणता उपाय सांगतात ते
या अशा लोकांची संख्या पूर्वी
In reply to या अशा लोकांची संख्या पूर्वी by जयंत कुलकर्णी
फारच पराकोटीचे गैरसमज
मी पण शेतकरी आहे
अरेच्चा,
In reply to अरेच्चा, by जयंत कुलकर्णी
इंडस्ट्रीज
अण्णासाहेब शिंदे नावाचे एक
In reply to अण्णासाहेब शिंदे नावाचे एक by जयंत कुलकर्णी
इतर उत्पन्न वाढले तरच शेतकर्
इतर उत्पन्न वाढले तरच शेतकर्यांचे प्रश्न सुटू शकतील असे त्यांचे म्हणणे होते.+१००० अण्णासाहेब शिंदे यांच्याबद्दल अगोदर माहिती नव्हती. पण ते केवळ शेतीतज्ञच नव्हे तर पूर्ण अर्थतज्ञ होते असेच म्हणावे लागेल. सर्वसाधारण जनतेची आर्थिक ताकद वाढवणार्या उद्योगधंद्याना मदत केल्यावरच शेतमालाची (किंबहुना सर्वच आवश्यक उत्पन्नांची) सबसिडीमुक्त किंमत देऊन जनता तो माल खरेदी करू शकेल. म्हणजेच पर्यायाने शेतकर्यालाही योग्य आर्थिक उत्पन्न मिळेल. सर्वसाधारणपणे सबसिडी ही केवळ तात्कालीक सेतूयोजना (ब्रिजिंग सोल्युशन) म्हणून वापरली जाते... तिला कायमस्वरुपी योजना बनवण्याने शेतकर्याला (किंवा इतर कोणत्याही उत्पादकाला) सतत परावलंबी ठेवण्यापलिकडे काहीच साधले जाणार नाही हे शेतकरी (आणि इतर सर्व उत्पादक) समजतील तोच सुदिन.In reply to इतर उत्पन्न वाढले तरच शेतकर् by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to अण्णासाहेब शिंदे नावाचे एक by जयंत कुलकर्णी
उदाहरण
In reply to उदाहरण by कपिलमुनी
बरोबर आहे. मी अलिकडील
कोणी जिरायती, बागायती आणि
In reply to कोणी जिरायती, बागायती आणि by सतिश गावडे
भूगोलच नक्की पण यत्ता सहावी,
In reply to भूगोलच नक्की पण यत्ता सहावी, by प्यारे१
धन्यवाद.
श्री. मुटे यांची उत्तरे
In reply to श्री. मुटे यांची उत्तरे by जयंत कुलकर्णी
+१
In reply to श्री. मुटे यांची उत्तरे by जयंत कुलकर्णी
अनर्थक चर्चा गुर्हाळ...
गंगाधर मुटे साहेब संघटने काम
सहमत
देशोन्नती-२०/११/१४
In reply to देशोन्नती-२०/११/१४ by गंगाधर मुटे
हे येथे दाखवायचे प्रयोजन कळले
In reply to देशोन्नती-२०/११/१४ by गंगाधर मुटे
हे पेपरातून बातम्या वगैरे
In reply to हे पेपरातून बातम्या वगैरे by सतिश गावडे
ते उपक्रम वैगेर चालवत आसतील
लेख आणि प्रतिसाद
In reply to लेख आणि प्रतिसाद by विटेकर
+१
In reply to लेख आणि प्रतिसाद by विटेकर
गावगाडा
In reply to लेख आणि प्रतिसाद by विटेकर
+११११
In reply to लेख आणि प्रतिसाद by विटेकर
+१००
In reply to लेख आणि प्रतिसाद by विटेकर
उत्तम प्रतिसाद. मिपा वरच्या
In reply to उत्तम प्रतिसाद. मिपा वरच्या by प्रसाद१९७१
+संतुलीत आणी थेट समयोचीत प्रतिसाद.
- किती शेतकरी मंडळांनी/जिल्हा मित्र मंडळानी (खान्देश मित्रमंडळ्/मराठवाडा मित्रमंडळ ई.)समस्या निवाराणासाठी जनजागृती केली आहे उदा.व्यसनमुक्ती,आत्महत्येपासून पराव्रुत करणे त्याकरता समुपदेशन्,कर्ज काढून लग्न सोहळा करून नका असे मार्गदर्शक उदाहरण ठेवून जास्तीत जास्त शेतकर्यांचा सहभाग वाढवणे
जर शहरात स्थाईक झालेल्या शेतकरी-पुत्र्/बाधवांची अनास्था आणि स्वतः शेतकर्यांची मूळ समस्येकडे डोळेझाक असेल तर शहरातील पांढरपेशांवर विनाकारण चिखलफेक करण्याचा कुणालाही अधिकार नाही. याकरता एकच उदाहरण देतो: गावाकडून पडेल ते काम करायला आलेल्या अकुशल कामगारांच्या बायका वेळ प्रसंगी धुणी-भांड्याची कामे करून संसाराला हातभार लावतात्.माझ्या परिचयातील कुटुंबप्रमुखाची नोकरी कंपनी बंद झाल्याने, केवळ पत्नीच्या कामाने पुढची नोकरी लागेपर्यंत गुजराण केली.तात्पर्य मूळ उत्पन्न स्तोत्र तोकडे/अपूरे असेल तर पर्यायी मार्ग शोधावेच लागतात. आजोबांची जमीन कुळकायद्यात गेलेला आणि वाडा जाळला गेलेला (गांधी हत्येनंतर) आपल्याच गावाला परका झालेला पांढरपेशा नाद खुळाIn reply to +संतुलीत आणी थेट समयोचीत प्रतिसाद. by नाखु
सहमत.
//पण शेतकर्यांच्या
शेती आणि शेतकरी
In reply to शेती आणि शेतकरी by आदिजोशी
>>तस्मात, बेंबट्या, स्वतःच्या
आक्षेप
In reply to आक्षेप by विटेकर
तो वास बर्याच दिवसांपासून
अंडर सेम जिओ-पोलिटिकल
In reply to अंडर सेम जिओ-पोलिटिकल by vikramaditya
नक्कीच असेल
In reply to अंडर सेम जिओ-पोलिटिकल by vikramaditya
ज्ञान आणि तंत्रज्ञान एकुण
In reply to ज्ञान आणि तंत्रज्ञान एकुण by माहितगार
>>>> तोटा आहे म्हणून शेती
शेतकरी आणि शेतकर्यांचे नेते
In reply to शेतकरी आणि शेतकर्यांचे नेते by आदिजोशी
ज्या गावात एखादा शेतकरी
लेख वाचला. चिडचिड पाह्यली.
महाराष्ट्रातील पुढार्यांचा