✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विधानसभा मतदान: १५ ऑक्टोबर २०१४ - आपले अनुभव

प
प्रचेतस यांनी
Wed, 10/15/2014 - 08:27  ·  लेख
लेख
आज १५ ऑक्टोबर २०१४, विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचा दिवस. आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते. तेव्हा सकाळी लवकर उठून ६.५०लाच मतदान केंद्रावर गेलो. चिंचवडच्या माटे शाळेत माझे मतदान केंद्र होते. वोटर्स स्लिप मिळाली नव्हतीच मात्र निवडणूक आयोगाच्या संस्थळावरुन अगोदरच माहिती घेतल्यामुळे मतदान केंद्र, विभाग क्रमांक, अनुक्रमांक इत्यादी तपशील घेऊन ठेवला होताच. इतक्या लवकर जाऊनही केंद्रावर माझ्याहीआधी २/३ लोक उभे होते. लगेचच माझ्यामागे १५/२० जणांची रांग उभी राहिली. एकंदरीत मतदान सुरु व्हायच्या आधीपासूनच उत्साह दिसत होता. मतदान सुरु झाल्यावर माझ्या पुढच्या दोघा तिघांचा क्र. दुसर्‍या खोलीत असल्याचे कळाले त्यामुळे पहिला नंबर माझा लागला. स्लिप नसल्यामुळे केंद्र अधिकार्‍याने फोटो आयडी पुरावा तपासून पाहिला व त्याच्या यादीतील माझ्या नावापुढे लाल रंगाने रेघ ओढली व माझी सही घेतली. त्याच्या पुढच्या अधिकार्‍याने पावती दिली व बोटाला शाई लावली व मला पुढच्या अधिकार्‍याकडे पाठवले. पुढील अधिकार्‍याने पावती जमा करून मतदानाचे यंत्र कार्यान्वित केले व मी मतदान करून बाहेर आलो. मतदान हा आपला हक्क नसून कर्तव्य आहे. आपणही आजच्या दिवशी मतदानाचे कर्तव्य पार पाडाल याची खात्री आहेच. आपले आजच्या दिवसातील मतदानाचे अनुभव आपण येथे अवश्य लिहावेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
15269 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

ग्रेट !!

अर्धवटराव
Wed, 10/15/2014 - 08:36 नवीन
पण...
आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते.
तुम्ही स्वतः ऑफीसला जायला तयार असाल तर ठीक... अन्यथा (जर परप्रांतीय मॅनेजर असेल तर) मराठी बाणा दाखवायचा चान्स सोडल्याबद्दल तीव्र निषेध :P
  • Log in or register to post comments

म्यानेजर मराठीच आहे पण लै काम

प्रचेतस
Wed, 10/15/2014 - 09:15 नवीन
म्यानेजर मराठीच आहे पण लै काम आहे त्यामुळे यावे लागले. अर्थात सी-ऑफ मिळेलच त्यामुळे चिंता नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अरे वाह...

सतिश गावडे
Wed, 10/15/2014 - 08:42 नवीन
अरे वाह... माझे नांव गावी कोकणात (महाड मतदार संघ) आहे. कार्यालयास सुट्टी नसल्यामुळे तसेच सुट्टी घेणे शक्य नसल्यामुळे मतदान करता येणार नाही याबद्दल खेद वाटतो. लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी कार्यालयास सुट्टी होती तेव्हा गावी जाऊन मतदान केले होते. :)
  • Log in or register to post comments

दुपारच्या

नाखु
Wed, 10/15/2014 - 08:53 नवीन
सत्रात मतदान करणार आहे.(कंपनी ने अर्धी सुट्टी दिलेली आहे).घरच्याच "भावी" मतदाराचे शाळेत मतदान असल्याने काहीच अडचण नाही.
  • Log in or register to post comments

अनुभव ...

चौकटराजा
Wed, 10/15/2014 - 09:03 नवीन
मला आज सकाळ पर्यंत कोण उमेदवार आहेत हेच माहीत नव्हते. मी समजत होतो मी चिंचवड मतदार संघात आहे. पण सकाळी स्लीप पहातो तर पिंपरी मतदार संघ ! नोटा ला द्यावे की मोदी .....द एंटरटेनर ला ... ?
  • Log in or register to post comments

काय काका, तुम्ही जागरूक

प्रचेतस
Wed, 10/15/2014 - 09:17 नवीन
काय काका, तुम्ही जागरूक नागरीक ना? मग हे असं कसं? ;) बाकी माझाही मतदार संघ पिंपरीतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

काका जरी जागरुक नागरिक असले

सतिश गावडे
Wed, 10/15/2014 - 09:28 नवीन
काका जरी जागरुक नागरिक असले तरी त्यांचं आता वय झालंय हे विसरु नका. पळा आता. चिंचवडला गेलो की म्हातारा खरडपट्टी काढणार. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

या.

नाखु
Wed, 10/15/2014 - 09:34 नवीन
सत्कार्याला मी सक्रिय पाठींबा देणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सध्या तरी आमच्या कडे लक्ष्मी पूजन असल्याने....

मुक्त विहारि
Wed, 10/15/2014 - 09:19 नवीन
मतदान करू शकत नाही.
  • Log in or register to post comments

अर्रे वा!

पैसा
Wed, 10/15/2014 - 09:28 नवीन
सर्व महाराष्ट्रीय मतदाराना मद्दानासाठी शुभेच्छा! मला वाटले होते, एवढे रंगीत सामने बघून लोक कंटाळतील पण सकाळी ७ वाजता १५-२० लोक म्हणजे बराच उत्साह दिसतो आहे! जास्त मतदान म्हणजे काँग्रेसला धोका हा आतापर्यंतचा समज आहे. १९ ला कळेलच काय ते!
  • Log in or register to post comments

आमच्या पिंपरी मतदारसंघात

प्रचेतस
Wed, 10/15/2014 - 09:43 नवीन
आमच्या पिंपरी मतदारसंघात मात्र मतदारांची थोडीशी गडबड झाली आहे. आमचा विभाग हा भाजपबहुल मतदारांचा. हा मतदारसंघ युतीच्या वाटपात भाजपाकडून आठवलेप्रणित रिपब्लिकन पक्षाच्या वाटेला गेलाय त्यामुळे येथे कमळ चिन्ह नाही. त्यामुळे बहुसंख्य मतदार कमळ कुठे दिसत नाही याची चर्चा करत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बोटावरची शाई

भाते
Wed, 10/15/2014 - 09:40 नवीन
मतदान केंद्रावर बोटावर शाई लावायला बहुदा कॉलेजमधली (किमान तशी दिसणारी) मुलगी होती. इथे आपल्याला दुसऱ्यांच्या बोटावर नेलपॉलिश लावायला बसवले आहे अशी कदाचित तिने आपली समजूत करून घेतली असावी. बोटाचा अर्धा आणि संपुर्ण नख मिळुन किमान इंचभर मोठी रेघा तिने माझ्या बोटावर उमटवली. :)
  • Log in or register to post comments

आमच पण अगदी अस्सच फक्त

बिहाग
Wed, 10/15/2014 - 11:24 नवीन
आमच पण अगदी अस्सच फक्त नाखला रंग लावायला अज्जीबाई बसल्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

तर्जनीवरच का शाई लावायची,

बॅटमॅन
Wed, 10/15/2014 - 16:04 नवीन
तर्जनीवरच का शाई लावायची, मधल्या बोटावर लावा म्हटल्यावर मद्दानवाले लोक जे उखडले म्हणता!! डोळे वटारून काहीतरी महापाप केल्यागत पाहू लागले. तेहाची...गाढवे...जे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 10/15/2014 - 16:12 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आमीपण जाणारे मतदानाला पण

यशोधरा
Wed, 10/15/2014 - 09:51 नवीन
आमीपण जाणारे मतदानाला पण हापिस संपवून. आमाला सुट्टी नाई. संध्याकाळी ५ परेंत आहे ना?
  • Log in or register to post comments

वल्लीद सारखा आनुभव.

जेपी
Wed, 10/15/2014 - 09:52 नवीन
वल्लीद सारखा आनुभव. बाकी रिझल्ट काय येईल याची कल्पना आल्यामुळे NOTA.
  • Log in or register to post comments

आमच्या क्लायन्टचा म्यानेजर

विजुभाऊ
Wed, 10/15/2014 - 10:18 नवीन
आमच्या क्लायन्टचा म्यानेजर मराठीच आहे पण तो इतक्या रेम्याडोक्याचा आहे की विचारायची सोय नाही. त्याने कोण कोणत्या गावी मतदान करणार आहे या नोंदी अगोदरच घेतल्या आहेत. त्या नुसार एकतर पूर्न सुट्टी किंवा स्थानीक लोकाना दोन तास सुट्टी घ्यावी आणि डोंबिवली किंवा अंबरनाथ / वसई येथे जाउन मतदन करावे अशा मताचा आहे.
  • Log in or register to post comments

मी पण ७:१५ लाच गेलेलो...२०-२५

टवाळ कार्टा
Wed, 10/15/2014 - 10:52 नवीन
मी पण ७:१५ लाच गेलेलो...२०-२५ लोकतरी आधीच येउन गेलेली
  • Log in or register to post comments

माझ्या इथले मतदान केंद्र

अजया
Wed, 10/15/2014 - 11:08 नवीन
माझ्या इथले मतदान केंद्र गावाच्या टोकाला,वस्ती संपते तिथे शेताडीत एक उध्वस्त धर्मशाळेसारखी दिसणारी शाळा आहे ,त्यात होते.गवतात मोठ्ठी बीळं,सर्वत्र सांडपाणी.रस्त्याचा पत्ता नाही. तिथल्या विद्यार्थ्यांची,आज तिथे काम करावे लागणार्या कर्मचार्यांची,पोलिसांची दयाच आली.आणि हो मद्दानाला मीच पयली होते!
  • Log in or register to post comments

या वेळी नेली की नाही कार?

काळा पहाड
Wed, 10/15/2014 - 11:18 नवीन
या वेळी नेली की नाही कार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

कार नाही स्कूटी!!न धडपडता!!

अजया
Wed, 10/15/2014 - 12:55 नवीन
कार नाही स्कूटी!!न धडपडता!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

कार्यालयाला सुट्टी नाही आणि

क्रेझी
Wed, 10/15/2014 - 11:43 नवीन
कार्यालयाला सुट्टी नाही आणि फक्त दोन तासामधे गावी जाऊन परत येऊ शकत नाही त्यामुळे मतदान नाही करू शकणार :(
  • Log in or register to post comments

सकाळीच जाऊन मतदान करून आलो.

श्रीगुरुजी
Wed, 10/15/2014 - 11:45 नवीन
सकाळीच जाऊन मतदान करून आलो. मतदान अधिकार्‍यांना दर २ तासांनी मतदानाचे आकडे पाठवावे लागतात. त्यामुळे ९ वाजता ८-१० मिनिटे मतदान थांबले होते. त्या दरम्यान १५-२० जणांची रांग लागली. मतदान पुन्हा सुरू होतानाच ६० च्या आसपास वय असलेले व चांगली ठणठणीत प्रकृती असलेले मागून येऊन पुढे घुसू लागले. घुसताना त्यांनी मागच्या अजून एका माणसाला खुणेने पुढे बोलाविले. तो माणूसही ५५ च्या आसपास वय असलेला व तब्येतीने चांगला धडधाकट होता. मी त्या तिघांनाही आक्षेप घेतल्यावर पुढील माणसाने आपण ज्येष्ठ नागरीक असल्याचा दावा केला. ६० च्या आसपास वय व तब्येतीने धडधाकट असूनसुद्धा वयाचा फायदा घेऊन रांगेत घुसण्याचा प्रयत्न संतापजनक होता. त्या दोघांना चांगला झापडला. मागच्या माणसाला घुसखोरीबद्दल विचारल्यावर आपला मणका फ्रॅक्चर असल्याची थाप मारली. मणका फ्रॅक्चर असणारा माणूस अंथरूणातून उठू सुद्धा शकणार नाही आणि तुम्ही तर निवांत फिरताय असे सांगितल्यावर ३ वर्षांपूर्वी मणक्याचे ऑपरेशन झाल्याचे त्याने सांगितले. त्यालाही चार शब्द सुनावल्यानंतर सुद्धा निर्लज्जपणे तिघेही इतरांच्या पुढे आत घुसून मतदान करून आले. स्वतःची तब्येत धडधाकट असताना सुद्धा वयाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी तिघांनाही योग्य त्या शब्दात सुनावले. याचा चांगला परीणाम असा झाला का त्यांनी खूण करून पुढे बोलाविलेल्या अजून १-२ जणांना दारातल्या पोलिसांनी परत पाठवून रांगेतून येण्यास सांगितले. मतदान संपल्यावर बाहेर आल्यावर आपण ज्येष्ठ नागरीक असण्याचा दावा करून मध्ये घुसलेला तोच "ज्येष्ठ" नागरीक अक्षरशः पळत पळत रस्ता ओलांडताना दिसला!
  • Log in or register to post comments

गुमान अकरा वाजता केंद्रावर

स्पा
Wed, 10/15/2014 - 11:51 नवीन
गुमान अकरा वाजता केंद्रावर गेलो, फक्त एक नंबर पुढे होता. दोन मिनिटात मद्दान करुन बाहिर... आता वेंजोयिंग सुट्टी
  • Log in or register to post comments

संपादकांनी मद्दान करायला सांगितल्यावर

माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/15/2014 - 11:57 नवीन
कुणाची माय व्यालीये मद्दान न करायची... चला रे...
  • Log in or register to post comments

पहाटे पहाटे ७.११ वाजता

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/15/2014 - 12:02 नवीन
पहाटे पहाटे ७.११ वाजता प्राधिकरणाच्या म्हाळसाकांत विद्यालयात कर्तव्य पार पाडलेलं आहे. जेमतेक २ मिनिटात काम झाल. फार गर्दी नव्हती.
  • Log in or register to post comments

आरामशीर

सुनील
Wed, 10/15/2014 - 12:20 नवीन
काही वर्षांपूर्वी राहते घर बदलले परंतु मतदारयादींतून नावे बदलून घेतली नाहीत. त्यामुळे एकाच घरात दोन मतदान केंद्रांत (खरे म्हणजे दोन विधानसभा क्षेत्रांत) नावे असणार्‍या व्यक्ती! एक केंद्र घरापसून ६ किमींवर तर दुसरे विरुद्ध दिशेला २ किमींवर. पावणे सातला घरून निघालो. दोन्ही मतदान केंद्रे आटोपून पावणे नवाला हपिसात हजर! कुठेही गर्दी नव्हती.
  • Log in or register to post comments

मतदारसंघ पुढच्या एक दोन

असंका
Wed, 10/15/2014 - 12:49 नवीन
मतदारसंघ पुढच्या एक दोन आठवड्यात सोडणार आहे. तरी चाललोय अधिकार बजावायला. यस्टीत आहे. बहुतेक पोचेन वेळेत. पाच वाजता शेवट आहे ना? रांगेत असणार्यांना पाच वाजून गेल्यावरसुद्धा मतदान करु देतील अशी आशा आहे...
  • Log in or register to post comments

आपले अभिनंदन.

प्रचेतस
Wed, 10/15/2014 - 13:29 नवीन
आपले अभिनंदन. पाच वाजता रांगेत असूनही ज्यांचे मतदान झाले नाही त्यांच्यासाठी रांग संपेपर्यंत मतदान चालूच ठेवणार येणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

वल्लीने लेन बदलली आज. शाई

कंजूस
Wed, 10/15/2014 - 13:24 नवीन
वल्लीने लेन बदलली आज. शाई लावण्याची पध्दत त्यांना शिकवली आहे तसेच ते करत आहेत चूक नाही. आता जो कोणी निवडून येईल त्याच्याकडून आपण हक्काने काम करून घ्यायचे शाई उगाच नाही लावून घेतली आम्ही.
  • Log in or register to post comments

वल्ली का गेला मतदानाला ..

चौकटराजा
Wed, 10/15/2014 - 14:32 नवीन
वल्ली मतदानाला गेला याचे कारण सातवाहन कालीन निवडणुका - आजच्या निवडणुकांचा मूलस्त्रीत असा लेख तो लिहिणार आहे. लेन बिन काही नाही बदलली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

शुकशुकाट

राही
Wed, 10/15/2014 - 14:43 नवीन
मुंबईत शुकशुकाट आहे. सेना कार्यकर्त्यांची नेहमीची लगबग आज दिसत नाहीय. त्यांना माणसे बाहेर काढता आलेली दिसत नाहीत. फ्लॅटवाले/टॉवरवाले मात्र सकाळीच मतदान करून आले आहेत. संध्याकाळपर्यंत झोपडपट्टीवाल्यांना बाहेर आणता आले नाही तर मुंबईतले निकाल उघड आहेत.
  • Log in or register to post comments

३ वाजता

पैसा
Wed, 10/15/2014 - 16:14 नवीन
३ वाजता मुंबईत ३७% आणि बाकी महाराष्ट्रात ४६% मतदान झाले अशा बातम्या दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

अरेरे...परत खांगरेस येनार???

टवाळ कार्टा
Wed, 10/15/2014 - 16:23 नवीन
अरेरे...परत खांगरेस येनार??? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सकाळी ९:३०-१०:०० ला मतदान

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/15/2014 - 14:53 नवीन
सकाळी ९:३०-१०:०० ला मतदान केले. यावेळेला मागच्या निवडणूकीच्या मानाने कमी गर्दी दिसली. आता १९ तारखेपर्यंत वाट पाहणे आणि तोपर्यंत दूरचित्रवाणीवर चर्चाचर्वण पाहणे हेच नशीबी आहे :)
  • Log in or register to post comments

आज आमचा सेल्फि काढुन

सुहास..
Wed, 10/15/2014 - 14:53 नवीन
आज आमचा सेल्फि काढुन चेपुवर बोट दाखविण्याचा हक्क हिरावला गेलाय ! पहाटे चार वाजेपासुन काम करत होतो, गावात एकुण तीनच मतदान केंद्रे आहेत, पुण्यात सर्वात जास्त मतदार संख्या असलेला वार्ड हा आपला आहे, मतदान कर्मचार्‍यांची मदत, अगदी ,खुर्च्या लावण्यापासुन ते बाहेर गर्डर लावणे, महिला पोलीस व स्त्री कर्मचार्‍यांसाठी सुविधा ची गाडी मागविणे ( जिप च्या शाळेत आहे मतदान ), बाहेर गर्डर लावणे, म्हणजे सीमा सुरक्षा करणे, मग बाहेर टेबल लावण्यापर्यंत सगळ काही करून दिले मंडळाने, अर्थात हे दरवेळचचं आहे काम !! सव्वासहाच्या सुमारास निवडणुक अधिकार्‍याबरोबर नाष्टा करताना मस्त गप्पा हाणल्या , त्यांना स्वतः ला पोस्टाने मत पाठवावे लागणार होते " या वर्षी मतदानाचा टक्का घसरणार बघा " !! साडे सहाच्या सुमारास सर्व मशीन च्या टेस्ट घेतल्या, एक बंद होती , लगेच दुसरी आली !! सात वाजता आपलीच काही मंडळी लायनीत मत देवुन गेली ....मग मी निघालो ..माझ व्होटिंग नागपुरचाळीत आहे , साडेसात ला सगळ्यांच्या झोपा उडवायला पोहोचलो ...सात लिस्टा उलट्या-पालट्या घातल्या ..आमचं नाव नाही ...च्यायला माझाच पत्ता कट !! घरातल्या बाकी पाच ही जणांच नाव ......... हाय रे किस्मत !! मायच्या भोपळा त्या निवडणुक आयोगाच्या :(
  • Log in or register to post comments

हात्तेरेकी!

पैसा
Wed, 10/15/2014 - 16:06 नवीन
मागच्या निवडणुकांत चुन चुन के नावं कट केली म्हणून पुणेकर बोंबलत होते. यावेळी काय झालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

यावेळी पण आमच कोंबडं पाण्यात

सुहास..
Wed, 10/15/2014 - 16:44 नवीन
यावेळी पण आमच कोंबडं पाण्यात गेलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी पण सक्काळी सक्काळी

भिंगरी
Wed, 10/15/2014 - 16:17 नवीन
जाउन मतदान केले. पण माझे वडील (वय ८९,ऐकायला येत नाही)काल नाशिकहुन ठाण्याला खास मतदानासाठी आले आहेत.
  • Log in or register to post comments

मतदान झाले....

माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/15/2014 - 16:28 नवीन
एरवी नेत्यांच्या नावाने शिमगा करणारे..... कुठे नेऊन ठेवलेत लोक माझ्या महाराष्ट्राचे?
  • Log in or register to post comments

मी पण ७ वाजताच गेले मतदानाला!

अनन्न्या
Wed, 10/15/2014 - 16:34 नवीन
आमचे मतदानकेंद्र आमच्या घ्रराशेजारीच असल्याने दोन मिनीटांचा पायी प्रवास! घरासमोर सेना भाजपचे कार्यकर्ते मिळून मिसळून वडपाव खात होते, कसे फसवले असे म्हणत!
  • Log in or register to post comments

कार्यकर्ते सर्व एकत्रच असतात

सुहास..
Wed, 10/15/2014 - 16:43 नवीन
कार्यकर्ते सर्व एकत्रच असतात ..सकाळी ही आणि संध्या समयी ही ;) ...आज सात वाजेपासुन धिंगाणा सुरु होणार आहे बघा .......=))
  • Log in or register to post comments

माझं नाव कर्नाटकातल्या मतदार

यसवायजी
Wed, 10/15/2014 - 16:49 नवीन
माझं नाव कर्नाटकातल्या मतदार यादीत आहे त्यामुळे 'पास'. 'पॉवर' सायबानं लोकसबेच्या टायमाला दोनीकडं मत द्याया सांगितलं हुतं. पण ह्या वेळेला तसं काय इशेश आवाहन (पक्षी- प्रलोभन) न मिळाल्याने - नॉट मतदान्ड इन पुणे टूडे. ;)
  • Log in or register to post comments

आत्ता मतदान करुन आले.

यशोधरा
Wed, 10/15/2014 - 17:31 नवीन
आत्ता मतदान करुन आले.
  • Log in or register to post comments

किती दळभद्रीपणा हा...

अर्धवटराव
Wed, 10/15/2014 - 17:38 नवीन
इतकं कमी मतदान झालय :(
  • Log in or register to post comments

आम्हीही केलं

धर्मराजमुटके
Wed, 10/15/2014 - 19:08 नवीन
आमी ठाण्यात रवतयं पण मतदान असल्फा, साकीनाका भागात (जुन्या घरी) आहे. घाटकोपर ते असल्फा असा मेट्रोचा वातानुकुलीत प्रवास करुन मतदान केंद्रावर पोहोचलो. उमेदवारांची यादी बघून डोके भंजाळले. जी शिवसेना मराठी मराठी करते त्यांचा उमेदवार युपीवाला सिंह होता. कदाचित मराठी शेर संपले असावेत. ईश्वर तायडे नावाचे साहेब जे मागच्या निवडणूकीत रा.कॉं. मधे होते ते चक्क मनसेच्या इंजिनावर आरुढ होते. काही वर्षांपूर्वी नगरसेवकाच्या निवडणूका झाल्या ( तेव्हा मनसेला इंजिन हे अधिकृत चिन्ह मिळाले नव्हते) तेव्हा मनसेची निशाणी "शिट्टी" होती ती एक अपक्ष उमेदवार वाजवत होता. मायाबाईंचा हत्ती होता. शरद पवार नेहमीप्रमाणे घड्याळ या चिन्हावर लढत आहेत. फक्त आरिफ नसीम खान हे ओळखीचे उमेदवार आणी त्यांचा हाताचा पंजा हे कॉम्बीनेशन वर्षानुवर्षे कायम आहे ते ह्या ही वेळेस कायम होते.
  • Log in or register to post comments

आमी नाय केलं मद्दान, अजून १८

रेवती
Wed, 10/15/2014 - 19:23 नवीन
आमी नाय केलं मद्दान, अजून १८ पूर्न न्हाईत.
  • Log in or register to post comments

एक गोष्ट सांगायची राहिलीच

धर्मराजमुटके
Wed, 10/15/2014 - 19:34 नवीन
एक गोष्ट सांगायची राहिलीच ती म्हणजे मी जातपात किंवा धर्म पाहून माझे मत देत नाही. आजच व्हाटसअप वर एक मेसेज फिरत होता. " आपल्या जातीच्याच उमेदवारास मत देईन असा हटट बाळगू नका. तुम्ही तुमचा आमदार निवडत आहात. तुमच्या मुलीसाठी नवरा नाही." अवांतर : यातून स्त्रीयांचा उप(मर्द) करायचा माझा कोणताही हेतू नाहीये. मी फक्त सोशल मिडीयात फिरत असलेला मेसेज उदाहरणादाखल वापरला आहे.
  • Log in or register to post comments

अच्छा म्हणजे तो मेसेज

हाडक्या
Wed, 10/15/2014 - 19:55 नवीन
अच्छा म्हणजे तो मेसेज पाठवणार्‍यास म्हणायचे आहे की तुम्ही(च) तुमच्या मुलीसाठी नवरा निवडायचा आहे आणि तो पण तुमच्याच जातीतील..!! बाकी असे(च) असेल तर मग निवडणुकीत उमेदवार जात बघून निवडला तर काय झालं मग ? भंकस दांभिकता साली सगळीकडे.. (तुमच्याबद्दल हा प्रतिसाद नाहीये हो, तो मेसेज ज्याने तयार केला आणि ज्यांनी पुढे पाठवला त्यांच्याबद्दल आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा