मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लघुपाककृती स्पर्धा निकाल

गणा मास्तर · · काथ्याकूट
नमस्कार, लघुपाककृती स्पर्धेचा निकाल रविवार दिनांक २८ सप्टेंबर २००८ रोजी जाहीर करण्यात येईल. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत २७ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. प्रथम पारितोषिक विजेत्याच्या खरडवहीत 'लघुपाककृती स्पर्धा प्रथम पारितोषिक विजेते' असे ठळक अक्षरात लिहिण्यात येईल. आम्ही पुण्यात परतल्यावर त्याला एक मस्त पार्टी देऊ. याशिवाय काही उत्तेजनार्थ पारितोषिकेही आहेत. कळावे, आपला नम्र गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) *सर्व वादविवाद भोकरवाडी न्यायालयाअंतर्गत

वाचने 2883 वाचनखूण प्रतिक्रिया 7

सखाराम_गटणे™ गुरुवार, 09/25/2008 - 11:13
>>दुपारी १२ वाजेपर्यंत म्हणजे कोणती दुपार? मिपाकर सगळ्या जगात आहेत. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

In reply to by सखाराम_गटणे™

मनिष गुरुवार, 09/25/2008 - 11:30
म्हणजे कोणती दुपार? मिपाकर सगळ्या जगात आहेत.
अर्थातच भोकरवाडीची! :)

अनिरुध्द गुरुवार, 09/25/2008 - 11:34
विजेत्याला पार्टी आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देण्याचा कार्यक्रम जर एखाद्या संमेलनासारखा आयोजित केला तर त्या निमीत्ताने विजेत्याला भेटतासुध्दा येईल आणि एकमेकांशी परीचय सुध्दा होईल.

In reply to by अनिरुध्द

गणा मास्तर गुरुवार, 09/25/2008 - 12:43
>>विजेत्याला पार्टी आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देण्याचा कार्यक्रम जर एखाद्या संमेलनासारखा आयोजित केला तर त्या निमीत्ताने विजेत्याला भेटतासुध्दा येईल आणि एकमेकांशी परीचय सुध्दा होईल. एखाद्या मिपा कट्याच्यावेळी हा कार्यक्रम करता येइल,पण सर्वांच्या वेळा जुळायला हव्यात. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)