✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गाथा 'टायटन' ची - Heritage Collection

म
मोदक यांनी
Sun, 03/24/2013 - 22:04  ·  लेख
लेख
. टायटन एज् बाजारपेठेमध्ये आले त्याच दरम्यान National Institute of Design मधील एक तरूण 'प्रोजेक्ट वर्क' साठी टायटन मध्ये दाखल झाला. घड्याळांच्या डिझाईन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे नवीन व अननुभवी असलेल्या या तरूणाने Etikoppaka या आंध्र प्रदेशातील पारंपारिक लाकडी खेळण्यांच्या डिझाईन प्रमाणे भिंतीवरील घड्याळे तयार केली. ही कल्पना यशस्वी ठरली व या घड्याळांची अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात विक्री झाली. ही व्यक्ती होती अभिजीत बनसोड. . कराड येथे मेकॅनिकल इंजिनीयरींगची पदवी व National Institute of Design मध्ये पुढील पदवी मिळवणार्‍या अभिजीत यांना टायटनने कायमस्वरूपी सामावून घेतले. टायटनमध्ये काम करण्यास सुरूवात केल्यानंतर तब्बल पाच वर्षे वेगवेगळ्या प्रकाराच्या घड्याळांचा अभ्यास करून, पाश्चिमात्य शैलीप्रमाणे घड्याळे बनवण्याऐवजी 'भारतीय विविधता' घड्याळांमधून टिपण्याचा प्रयत्न म्हणजेच 'हेरीटेज कलेक्शन'. तौफिक कुरेशींच्या एका दिमाखदार कार्यक्रमामध्ये या सुरेख घड्याळांनी बाजारपेठेमध्ये प्रवेश केला. ऐतिहासीक वारसा आणि कलाकृतीं अत्यंत रेखीवतेने टिपणार्‍या या घड्याळांचे उत्साहात स्वागत झाले. हेरीटेज कलेक्शनच्या प्रत्येक घड्याळामागे "Designer Abhijit Bansod" हे ठळकपणे कोरून टायटनने अभिजीत बनसोड यांचा केलेला सन्मानही विरळाच! . अत्यंत बारकाईने तयार केलेल्या या घड्याळांचे कोरीवकाम व सौंदर्यस्थळे दाद देण्यासारखीच आहेत.. . . . . . . . . . हेरीटेज कलेक्शनच्या लोगो पासून पॅकींग मटेरीयल पर्यंत सर्व बाबींवर खास लक्ष दिले गेले. . . या भागामध्ये इतकेच. प्रत्येक घड्याळामध्ये अनेक छोट्या गोष्टी कलात्मकतेने सजवल्या आहेत. सहज सापडण्याजोग्या.. तुम्हालाही सापडतीलच! ****************************************************** माहिती व चित्रे http://www.studioabd.in यावरून. माहिती व छायाचित्रांसाठी अभिजीत बनसोड यांचे आभार. ****************************************************** भाग १ - गाथा 'टायटन' ची - टायटन एज् ****************************************************** 'गाथा टायटनची' समाप्त.

Book traversal links for गाथा 'टायटन' ची - Heritage Collection

  • ‹ गाथा 'टायटन' ची - टायटन एज्
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन
माहिती

प्रतिक्रिया द्या
15881 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

सेक्सिनेस!!!!!!!

लॉरी टांगटूंगकर
Sun, 03/24/2013 - 22:20 नवीन
फोटो बघूनच राजेशाही फिलिंग येते आहे... कल्पनाशक्तीला सलाम !!! मूळ कलाकृतीला दिलेला सन्मानच म्हणायचा हा.. _/\_
  • Log in or register to post comments

क्या बात, क्या बात!

आदूबाळ
Mon, 03/25/2013 - 00:50 नवीन
क्या बात, क्या बात!
  • Log in or register to post comments

आहा! फार सुंदर आहेत घड्याळं..

कवितानागेश
Mon, 03/25/2013 - 00:53 नवीन
आहा! फार सुंदर आहेत घड्याळं..
  • Log in or register to post comments

अफलातून !!!

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/25/2013 - 01:16 नवीन
अफलातून !!! अजून काय ? कोणार्कच्या प्रेमात पडलो आहे :)
  • Log in or register to post comments

+१११११११११११.

बॅटमॅन
Mon, 03/25/2013 - 01:53 नवीन
+१११११११११११. आमचे घड्याळद्वेष्टेपण आता हरपले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सगळी घड्याळे आवडली. अभिजीत

रेवती
Mon, 03/25/2013 - 01:36 नवीन
सगळी घड्याळे आवडली. अभिजीत बनसोड यांचे कौतुक वाटले. टायटनने त्यांचे नाव प्रत्येक घड्याळामागे कोरावे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

जोरदार

श्रीरंग_जोशी
Mon, 03/25/2013 - 03:05 नवीन
या लेखमालिकेबद्दल अनेक धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

फारच छान माहिती. इतकी सुंदर

साऊ
Mon, 03/25/2013 - 08:19 नवीन
फारच छान माहिती. इतकी सुंदर घड्याळे अन आपल्या इथे तयार झालेली.
  • Log in or register to post comments

आवडलं,खुप खुप धन्यवाद.

५० फक्त
Mon, 03/25/2013 - 08:40 नवीन
आवडलं,खुप खुप धन्यवाद. सध्या जसं शिवाजीमहाराजांच्या सैन्यात मंत्रिमंडळात किती कोण कुठले ह्याचे हिशोब करायची फॅशन आहे तसं काही शतकांनी टाटा ग्रुपच्या साम्राज्याबद्दल केलं जाईल तेंव्हा अशी बरीच मराठी माणसं पुन्हा स्म्रुतीत आणली जातील.
  • Log in or register to post comments

बनसोड!

स्पंदना
Mon, 03/25/2013 - 08:45 नवीन
बनसोड! व्वा! काय सुरेख कल्पना आहे आपलीच वैशीष्टे नव्याने सामोरी आणायची. अतिशय आवडल लिखाण. काय एकेक फोटो आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच... खूप रंजक माहिती

नानबा
Mon, 03/25/2013 - 08:47 नवीन
मस्तच... खूप रंजक माहिती मिळाली, सोबत टाटा आणि अभिजीत बनसोडचा अभिमान वाटला..
  • Log in or register to post comments

वेड डिझाईन्स!!!

धमाल मुलगा
Mon, 03/25/2013 - 08:51 नवीन
च्यायला! फाष्ट्र्याकच्या नादी लागण्याऐवजी हे हेरिटेजच पहायला हवं होतं राव! काय एकाहून एक डिझाईनं आहेत राव. जियो!
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
Mon, 03/25/2013 - 13:42 नवीन
च्यायला! फाष्ट्र्याकच्या नादी लागण्याऐवजी हे हेरिटेजच पहायला हवं होतं राव!
पण ही घड्याळं एखाद्या कार्यक्रमात घालायला ठिक आहेत. शेरवानी, पायात करकरणारे जोधपुरी शुज, चंदनाच्या वासाचं अत्तरावर सूट होतात. फास्टट्र्याक स्पोर्ट्स वाच म्हणून ठिक आहे. (खरतर क्याशिओ/शिटीजन अ‍ॅनॅलोग-डीजिटल कॉम्बो विथ १०-बार वाटर प्रूफ आणि स्टॉपवॉच आणि तत्सम स्प्पोर्ट्स फंक्शन असणारी घड्याळं बरी). ऑफीसमध्ये वापरायला मात्रं मेट्यालिक स्ट्राप वाली क्रोनोग्राफ असलेली फ्वासिल, टसेट वगैरे इंप्रेशन पाडायसाठी बरी असतात. -(ट्रेंडी) दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

असहमत!

धमाल मुलगा
Wed, 03/27/2013 - 07:16 नवीन
माझं मत - मेट्यालिक पट्टा अन क्रोनोग्राफ म्हणजे शुक्कीरवारच्या बिझनेस क्याज्युअल्सचा भाग! ऑफिसात वापरायला अस्सल चामडी पट्टा असलेलं, पट्ट्याला म्याच होणारं अ‍ॅनालॉग घड्याळ. ते असं पाहिजे की वेगळं उठून दिसता कामा नये. अन शनिवार रैवारच्या टैमाला टर्रेबाजी करत हिंडताना स्वेटशर्ट/कार्गोशर्ट/टीशर्ट अन कार्गो/थ्री-फोर्थ/रग्ड जिन्स+स्निकर्सवर स्पोर्ट्सवाली घड्याळं! फाष्ट्रॅकची काही मॉडेलं (तेच ते...वाकडेतिकडे डायल असलेले) तद्दन टवाळ वाटतात, पण काही मॉडेल्स असे आहेत की ते ना धड फॉर्मल्समध्ये येतात ना कॅज्युअल्समध्ये. त्यामुळं ते अंमळ आवडतात. अन, शेरवानी+मोजडी+अत्तरासोबत ही नक्कीच भारी दिसतील. पण मला विचारशीला तर शेरवानी वगैरेवर मनगटी घड्याळ घालूच नये. अंमळ टूकार दिसतं. घड्याळ हवंच असेल तर सोनेरी साखळी असलेलं पॉकेटवॉच वापरावं. नाऽऽदखुळा दिसतं मर्दा! :) -(क्वॉनझर्वेटिव्ह) अशोक सराफ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

शेरवानी - सोनेरी साखळी असलेलं

मोदक
Wed, 03/27/2013 - 07:59 नवीन
शेरवानी - सोनेरी साखळी असलेलं पॉकेटवॉच! ह्ये जबरा काँबीणेशन!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अफलातून !!

अक्षया
Mon, 03/25/2013 - 09:31 नवीन
अफलातून घड्याळे.एका पेक्षा एक सुंदर. फोटो शेअर केल्या बद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अजिंठा.. द बेस्ट!!

इनिगोय
Mon, 03/25/2013 - 10:28 नवीन
अजिंठा.. द बेस्ट!! अभिजित बनसोड हा एक भन्नाट डिझायनर आहे. नुसती घड्याळंच नाही, तर त्याची इतर डिझाईन्सही एकसे एक आहेत. त्याने बनवलेल्या एटिकोप्पका घड्याळांपैकी हा एक नमुना.. Image removed. बाकी भलभलते विषय शोधून त्यावर लिहिलेल्या लेखांसाठी आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी मोदकाचे खास आभार :)! लगे रहो..
  • Log in or register to post comments

अभिजित बनसोड हा एक भन्नाट

नानबा
Mon, 03/25/2013 - 10:48 नवीन
अभिजित बनसोड हा एक भन्नाट डिझायनर आहे. नुसती घड्याळंच नाही, तर त्याची इतर डिझाईन्सही एकसे एक आहेत.
एकदम १००% सहमत. त्याची घड्याळाव्यतिरिक्त काही इतर डिझाईन्स - Image removed. BPL Halo हे टेबल लँप्स Image removed. Hopscotch- बेडसाईड ड्रॉवर्स.. Image removed. Image removed. Image removed. Angara- मला सगळ्यात जास्त आवडलेलं डिझाईन. Image removed. CANdle- डिझाईनर कँडल होल्डर.. Image removed. Mubhi Tree Image removed. DIY-a
  • Log in or register to post comments

प्रत्येक घड्याळाचे क्राऊन्स

मोदक
Mon, 03/25/2013 - 11:48 नवीन
प्रत्येक घड्याळाचे क्राऊन्स (किल्ली द्यायचे बटण) बघा... ताजचा क्राऊन हा ताजमहालाचा डोम आहे.. स्तंभाचा क्राऊन हा कलशाकृती आहे... आणखी काही सापडते आहे का..?
  • Log in or register to post comments

जंतर मंतर किंवा अजंता

वपाडाव
Mon, 03/25/2013 - 12:07 नवीन
जंतर मंतर किंवा अजंता घ्यावेसे वाटत आहे... असो. माहिती वाचुन छान वाटले...
  • Log in or register to post comments

उत्तम कल्पना आणि कलात्मता...

मनराव
Mon, 03/25/2013 - 12:41 नवीन
उत्तम कल्पना आणि कलात्मता...
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम!

मैत्र
Mon, 03/25/2013 - 13:00 नवीन
या कलेक्शनची इतकी चित्रदर्शी माहिती .. सुरेख.. काय एक एक फोटो आहेत आणि अर्थात डिझाइन्स.. अनेक धन्यवाद या लेखमालिकेबद्दल.. अभिजित बनसोडबद्दल वाचलं होतं Connect The Dots या रश्मी बन्सल यांच्या पुस्तकात.. टायटनची यानंतर आणि आत्तपर्यंत अतिशय गाजलेल्या RAGA या मालिकेचे डिझाईन बनसोड यांनीच केले आहे. आणि इथे व्हाईट्फिल्ड, बंगलोर इथे त्यांचा स्टुडिओ आहे. अवांतरः ५० फक्त यांचा प्रतिसाद आवडला आणि पहिलंच उत्तुंग व्यक्तिमत्व डोळ्यापुढे आलं - सुमंत मूळगांवकर..
  • Log in or register to post comments

गिरीश वाघ - नॅनोचे शिल्पकार.

नानबा
Mon, 03/25/2013 - 13:40 नवीन
गिरीश वाघ - नॅनोचे शिल्पकार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

नेत्रसुखद..

लाल टोपी
Mon, 03/25/2013 - 13:12 नवीन
खूपच नयनरम्य सफर पण आणखी थोडी माहिती दिली असती तर दुधात साखर पडली असती.
  • Log in or register to post comments

सहमत.. हा विषय एवढा रंजक आहे,

इनिगोय
Mon, 03/25/2013 - 15:20 नवीन
सहमत.. हा विषय एवढा रंजक आहे, की अजून तपशीलात शिरून चाललं असतं. अाधीच्या भागात जशी अल्ट्रास्लिम घड्याळांची जन्मकथा वाचायला मिळाली, तसं तुला यावरही लिहिता येईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

या कलाकृती इतक्या सुंदर आणि

मोदक
Mon, 03/25/2013 - 15:44 नवीन
या कलाकृती इतक्या सुंदर आणि आखीवरेखीव आहेत की त्यांचे वर्णन करणे, सौंदर्यस्थळे टिपणे याची खरंच आवश्यकता आहे का..? कोणत्याही शब्दांच्या अडथळ्याशिवाय या कलाकृतींनी वाचकाशी संवाद साधावा अशी अपेक्षा आहे! (या घड्याळांकडे पाहता यांचे योग्य शब्दात वर्णन करणे हे खूप अवघड वाटले! मला तरी!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

टायटन च्या रागा, झायलस आणि

नानबा
Mon, 03/25/2013 - 16:09 नवीन
टायटन च्या रागा, झायलस आणि लाईटवर चालणार्‍या एच.टी.एस.ई. घड्याळांबद्दल अशी रोचक माहिती तुझ्या लिखाणशैलीत वाचायला आवडेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अप्रतिम..... सुरेख........

धनुअमिता
Mon, 03/25/2013 - 13:44 नवीन
फार सुंदर आहेत घड्याळं..
  • Log in or register to post comments

मस्त डिझाईन्स.

प्यारे१
Mon, 03/25/2013 - 14:19 नवीन
मस्त डिझाईन्स. अ-च-प्रतिम एकदम! बाकी माणसाच्या कर्तृत्वाला सलाम करताना/मारताना त्याचा जन्म, जात, लिंग, प्रदेश, भाषा आणि इतर काही असेल तर ह्यांचा विचार करण्याची गरज असू नये असं वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments

कधी घड्याळ वापरण्याची आवड

खबो जाप
Mon, 03/25/2013 - 15:43 नवीन
कधी घड्याळ वापरण्याची आवड नव्हती, मागच्यावेळी अमेरिकेला गेलो तेव्हा SEIKO चे एक घड्याळ आवडले म्हणून २००$ खर्चून घेतले( स्वताचे ). पण आता हा लेख वाचून आणि 'हेरीटेज कलेक्शन' तेव्हा बघून मोठी चूक केली असे वाटते आहे. चला आता पुढच्यावेळी पहिली पसंती 'हेरीटेज कलेक्शन' लाच ..............
  • Log in or register to post comments

हा भाग देखील आवडला !

मदनबाण
Mon, 03/25/2013 - 16:17 नवीन
हा भाग देखील आवडला ! :) मला कोणार्क आणि लक्ष्मी विलास पॅलेस ही दोन मॉडेल्स फार आवडली. अभिजित बनसोड यांच कौतुक करावे तितके कमीच वाटते.
  • Log in or register to post comments

सुंदर..

चिगो
Tue, 03/26/2013 - 00:32 नवीन
घड्याळे सुंदर.. टायटन आणि अभिजीतचेही कौतूकच वाटले.. आर्टपिस म्हणून उत्तम.. पण 'प्युर युटीलिटी'च्या दृष्टीने बघायची झाल्यास जरा कीचकट वाटली, हे स्पष्ट मत आहे.
  • Log in or register to post comments

ओके

अभ्या..
Tue, 03/26/2013 - 00:51 नवीन
मोदकराव थोडासा अपेक्षाभंग झाला खरा. :( 'एज' चा लेख वाचून बरीचशी पडद्यामागची कहाणी समजली होती. :) इथेही तसेच वाचायला मिळेल असे वाटले पण तुम्ही एकतर फार थोडक्यात आटपले आणि कॅटलॉगचे रसग्रहण आम्हालाच करायला सांगितले. ;) तुमच्या नजरेतून वाचायला जास्त आवडले असते. कोणार्क आणि लक्ष्मीविलास पॅलेस डिझाइनमधील बेल्टला पकडणारे दोन हत्तीची शीर्षे मात्र अप्रतिम. (गितांजली च्या ज्वेलरी डिझाइन कॉम्पीटिशनमधले विनर डिझाइन आठवले. :) )
  • Log in or register to post comments

मस्त रे कांबळे

मन१
Tue, 03/26/2013 - 08:29 नवीन
मस्त रे कांबळे.....
  • Log in or register to post comments

मस्त

प्रचेतस
Tue, 03/26/2013 - 08:39 नवीन
किंमत काय आहे रे या घड्याळ्यांची?
  • Log in or register to post comments

हात्तेच्या....

मन१
Tue, 03/26/2013 - 08:45 नवीन
तुम्हालाही आमच्यासारखीच मध्यमवर्गीय सवय साली . तुम्हाला मारिया शारापोव्हा भेटली बोलायला तरी "इराण्याच्या हाटलित च्या प्यायला येतिस" का म्हणून इचाराल. . (सात जन्माचा निम्नमध्यमवर्गीय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पुण्यात इराण्याचे हाटेल

इनिगोय
Tue, 03/26/2013 - 17:50 नवीन
पुण्यात इराण्याचे हाटेल कुठंसे अाहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

काय पण प्रश्न आहे, या एकदा

५० फक्त
Tue, 03/26/2013 - 18:49 नवीन
काय पण प्रश्न आहे, या एकदा पुण्यात असली नसलेली,बंद पडलेली सगळी इराणी हॉटेलं फिरु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

इराण्याचा च्या तर लै लाबची

प्रचेतस
Tue, 03/26/2013 - 23:01 नवीन
=)) इराण्याचा च्या तर लै लांबची गोष्ट झाली राव. आमची धाव कोपर्‍यातल्या अण्णाच्या टपरीपर्यंतच आणि तो पण कटिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

किंमत काय आहे रे या

मोदक
Tue, 03/26/2013 - 17:23 नवीन
किंमत काय आहे रे या घड्याळ्यांची? या घड्याळांची किंमत ३५०० ते ८००० होती. पुणे शहरात यांपैकी झरोका हेच एकमेव घड्याळ उपलब्ध होते... जे बहुदा काल / आज कंपनीकडे परत पाठवले गेले असावे. (वर दिलेला बॅक कव्हरचा फोटो मला खूप मुश्किलीने मिळाला - अनेक ठिकाणी फिरावे लागले!) आता लवकरच हेरीटेज कलेक्शन II मार्केटमध्ये येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते अजिंठ्याचं बघ ना मिळालं तर

प्रचेतस
Tue, 03/26/2013 - 22:59 नवीन
ते अजिंठ्याचं बघ ना मिळालं तर कुठे. लै भारीय रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बघतो नक्की...

मोदक
Wed, 03/27/2013 - 06:00 नवीन
बघतो नक्की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माताय यातलं एखादतरी मनगटावर

गणपा
Tue, 03/26/2013 - 17:36 नवीन
माताय यातलं एखादतरी मनगटावर मिरवावं असं वाटुन राहिलय.
  • Log in or register to post comments

मस्त आहेत!

पैसा
Tue, 03/26/2013 - 17:55 नवीन
एकेक खास कलाकृतीच! आता पुढचा विषय नॅनो तयार होईपर्यंतच्या अडथळ्यांच्या शर्यतीवर घेतलास तरी चालेल!
  • Log in or register to post comments

आवडला लेख!! पुलेशु

आनन्दिता
Tue, 03/26/2013 - 19:55 नवीन
आवडला लेख!! पुलेशु
  • Log in or register to post comments

काय घड्याळं आहेत .... वा!!!!!

पिलीयन रायडर
Tue, 03/26/2013 - 20:22 नवीन
काय घड्याळं आहेत .... वा!!!!! मोदका... तु धन्य आहेस बाबा...
  • Log in or register to post comments

धन्य रे मोदका.. घड्याळांचे

पिंगू
Tue, 03/26/2013 - 20:57 नवीन
धन्य रे मोदका.. घड्याळांचे कलेक्शन लय भारी आहे.
  • Log in or register to post comments

मस्त...

नाखु
Wed, 03/27/2013 - 09:34 नवीन
"काटा" किर्र लेख... कुणी "भेट" म्हणून दिलं तर अशी घड्याळ वापरायला नक्की आवडेल. सध्या "टायटन"चं " (अति निम्नमध्यमवर्गीय) घड्याळ वापरणारा..
  • Log in or register to post comments

सही.... काय सुंदर आहेत हि

Mrunalini
Wed, 03/27/2013 - 16:50 नवीन
सही.... काय सुंदर आहेत हि घड्याळे... अप्रतिम डिझाईन्स.
  • Log in or register to post comments

मस्त

सुमीत भातखंडे
गुरुवार, 03/28/2013 - 13:22 नवीन
सुरेख डिझाईन्स.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा