Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by इनिगोय on Mon, 11/19/2012 - 21:07
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
यकु गेला. इथल्या अनेकांशी बोलून, भांडून, मनात येईल ते येईल तेव्हा बेधडक सांगून. मैत्री करून. पंगे घेऊन. शाब्दिक हाणामार्‍या करून. म्हणतात तसं, एक तर आपण त्याचे मित्र झालो, किंवा शत्रू; पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. यकु गेला. अनेक अर्धवट गोष्टी मागे ठेवून. अनेक प्रश्न घालून. एका अत्यंत बुद्धीमान माणसाचं हे असं का व्हावं हे त्यातलं सगळ्यात मोठा प्रश्न. अखेरीस त्याच्या मनात काय होत होतं हे आता नीटसं कधीच कळायचं नाही. त्याचे अलीकडचे विचार ऐकून, त्याच्याशी बोलताना नेहमीच याचा हा असा काहीतरी शेवट असेल हेच वाटत राहायचं. ते तसं होऊ नये, यासाठी कोणालाही काही करायलाही वाव न ठेवता, प्रचंड अस्वस्थ करून यकु गेला. गेलाच. काय केलंस यकु? राग येतो आहे तुझा. खूप राग येतो आहे.
  • Log in or register to post comments
  • 42338 views

प्रतिक्रिया

Submitted by रेवती on Mon, 11/19/2012 - 21:12

Permalink

अगदी हेच म्हणायचय. काय हे?

अगदी हेच म्हणायचय. काय हे? यकुंची मनस्थिती आजकाल बरी नव्हती हे सगळ्यांच्याच लक्षात आले होते पण इतके जास्त असेल असे वाटले नव्हते. फारच धक्का बसलाय त्यांच्या जाण्याने. त्यांची आठवण येत राहणार. मृतात्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 11/19/2012 - 21:15

Permalink

एक सूचना

यकु गेला त्याचं दुःख आहे. त्याविषयी भावना व्यक्त करण्यास हरकत नाही. मात्र, त्याबाबतच्या चर्चेत अध्यात्म, नर्मदा परिक्रमा, योग, मानस, मनाची स्थिती अशा विषयांवर या किंवा त्याही बाजूने भाष्य न केलं तर ते उत्तम. जे विषय तज्ज्ञांनीच हाताळावेत त्याविषयी आपण कोणीही वरकरणी काही बोलू नये, इतका विवेक राहावा, ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर१३७ on Mon, 11/19/2012 - 21:20

In reply to एक सूचना by श्रावण मोडक

Permalink

+१

सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 11/19/2012 - 21:22

In reply to एक सूचना by श्रावण मोडक

Permalink

+१

सुचनेशी सहमत. बातमी धक्का दायक आहे. :(
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 11/19/2012 - 21:27

In reply to एक सूचना by श्रावण मोडक

Permalink

...

श्रामोंशी सहमत... ही बातमी वाचून खूप धक्का बसला आणि वाईट वाटले. मृताम्यास सद्गती लाभोत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Mon, 11/19/2012 - 22:07

In reply to ... by विकास

Permalink

?

मृताम्यास सद्गती!
  • Log in or register to post comments

Submitted by केशवराव on Mon, 11/19/2012 - 22:14

In reply to एक सूचना by श्रावण मोडक

Permalink

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Tue, 11/20/2012 - 14:04

In reply to एक सूचना by श्रावण मोडक

Permalink

+१

...
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Mon, 11/19/2012 - 21:15

Permalink

यकुला भावपूर्ण श्रद्धांजली...

अत्यंत वाईट बातमी...मी यकुला वैयक्तिक रित्या ओळ्खत नसलो तरीही त्याची ओळ्ख त्याच्या लेखांमधुन झाली होती...यकुला भावपूर्ण श्रद्धांजली... :(
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Mon, 11/19/2012 - 21:19

Permalink

रेवतीताई +१

रेवतीताई +१ यकुला भावपूर्ण श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर१३७ on Mon, 11/19/2012 - 21:19

Permalink

श्रद्धांजली............................

मृतात्म्यास शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 11/19/2012 - 21:25

Permalink

यकु!

मिपावर आला तेव्हापासूनच वेगळा वाटणारा सदस्य होता. स्वतःची ठाम मतं असलेल्या लोकांपैकी एक वाटला. प्रत्यक्ष ओळख किंवा भेट घडली नव्हती परंतु त्याचे लेख आणि प्रतिक्रियांमधून भेटायचा. आणि आता तर तो गेलाच आहे. एका उमद्या तरुणाने असे जीवन संपवावे याचे अपरंपार दु:ख आहे. आवंढा येतोय. जे त्याला व्यक्तिशः ओळखत होते त्यांची अवस्था तर शब्दात सांगणे कठिण! रेस्ट ईन पीस यकु! (साश्रु)रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Mon, 11/19/2012 - 21:25

Permalink

श्रद्धांजली

श्रद्धांजली :(
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Mon, 11/19/2012 - 22:19

In reply to श्रद्धांजली by जेनी...

Permalink

वाईट झालं.... 'यकु"ना

:( वाईट झालं.... 'यकु"ना भावपूर्ण श्रद्धांजली....२०१२ हे वर्ष खूप वाईट आहे का?..खूप चांगले लोक आपल्याला सोडून गेले...
  • Log in or register to post comments

Submitted by ramjya on Mon, 11/19/2012 - 21:37

Permalink

भावपूर्ण श्रद्धांजली

खरच अत्यंत वाईट बातमी. लेख आणी खरड वही यातुन ओलख झाली होती. युवा पत्रकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

Submitted by अमित on Mon, 11/19/2012 - 21:40

Permalink

वाईट वाटलं ...

एवढ्या बुद्धीमान, तरूण माणसाचं अशा प्रकारे जाणं पटतही नाहीये आणि पचतही नाहीये. मृताम्यास सद्गती लाभो
  • Log in or register to post comments

Submitted by सांजसंध्या on Mon, 11/19/2012 - 21:42

Permalink

.............................

.....................................................................
  • Log in or register to post comments

Submitted by जीएस on Mon, 11/19/2012 - 21:47

Permalink

नि:शब्द...

माझ्य मिपावरच्या मर्यादित वावरातही यकुच्या लेखांनी लक्ष वेधले होते. फार अस्वस्थ वाटतय ही बातमी वाचून. यकुच्या आत्म्यास मुक्ती लाभो...
  • Log in or register to post comments

Submitted by निवांत पोपट on Mon, 11/19/2012 - 22:03

Permalink

छे!! असं व्हायला नको पाहिजे

छे!! असं व्हायला नको पाहिजे होतं ! :(
  • Log in or register to post comments

Submitted by अमितसांगली on Mon, 11/19/2012 - 22:10

Permalink

भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 11/19/2012 - 22:12

Permalink

यक्या भोसडीच्या.............

यक्या भोसडीच्या............. श्श्या!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 11/19/2012 - 22:18

In reply to यक्या भोसडीच्या............. by प्यारे१

Permalink

या उप्पर सांगायचंय ते....

झाली गोष्ट अत्यंत वाईट झाली. पण अध्यात्म असलं काही शिकवत नाही लोकहो! कर्तव्यापासून पळून जाणार्‍या अर्जुनाला उभं करणारी भगवद्गीता हे अध्यात्माचं 'मॅन्युअल' म्हणून ओळखलं जावं. कृपया अध्यात्माच्या नावानं खडे फोडू नयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Mon, 11/19/2012 - 22:14

Permalink

खूप वाईट वाटतयं.

विश्वासच नाही बसत, कालचा एक वाईट दिवस होता आणि आत्ता सुद्धा... सत्य शोधण्याचा प्रयत्न करणारे त्याचे लेख आवडायचे. युजी, ओशो यांच्याबद्दल त्याच्यामुळेच कळलं होतं. खरचं खूप वाईट वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर जोशी on Mon, 11/19/2012 - 22:15

Permalink

आपण जाणार होतो ना .. धुमाळ

आपण जाणार होतो ना .. धुमाळ काकाना भेटायला काय रे ? ..
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 11/19/2012 - 22:16

Permalink

काय रे हे?

यक्कू तू किती छान बोलायचा खरडवहीतून. सगळे समजावून सांगायचा नवीन सदस्यांशी पण आपलेपणे. औरंगाबादला ये एकदा भेटायला म्हणायचा. अन काय केलेस रे हे. यक्कू तू वाईट केलेस. फार वाईट. :( . तू जिथे असशील तिथे तुला शांती लाभो. एवढेच.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 11/19/2012 - 22:19

Permalink

छ्या... हे कसं शक्य आहे ?

छ्या... हे कसं शक्य आहे ? आत्महत्या ? :( अरे यकु काय केलसं हे ? इतका कंटाळलास जगण्याला ? :(
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 11/19/2012 - 22:22

Permalink

:(

कोणाला नक्की माहित आहे का काय झालय ते? म्हणजे अपघात, हेल्थ इश्यु... कि इतर काहि. यक्या... असा कसा गेलास बे सगळं सोडुन. अवंढा गिळतोय :( यकुच्या कुलदैवतावर, त्या दिगंबर दत्तात्रयावर त्याचा सर्व भार. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 11/19/2012 - 22:27

Permalink

गेलं रे यक्क्या गेलं,,

गेलं रे यक्क्या गेलं,,,देवासच्या वाड्यात जाणं संपलं...आणी सारं संपलं... Image removed. उणापुरा १ वर्षाचा स्नेह,आणी तिनदा प्रत्यक्ष भेट,,,पण गाढ मैत्री करून,अचानक तोडून गेलास रे... तुझ्या स्वभावासारखा तडका फडकी गेलास... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Mon, 11/19/2012 - 22:37

Permalink

अत्यंत बेचैन झालेय

अत्यंत बेचैन झालेय ही बातमी वाचून दुर्दैवी घटना :( यकुस सद्गती लाभोत
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Mon, 11/19/2012 - 22:37

Permalink

अत्यंत धक्कादायक आणि वाईट बातमी

इतक्या मनस्वी व्यक्तीचं असं तडकाफडकी जाणं अतिशय धक्कादायक आहे.. ही १७ तारखेपेक्षा जास्त वाईट बातमी आहे.. :( इश्वर मृतात्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Mon, 11/19/2012 - 22:43

Permalink

यकुला नेहमी लेखाद्वारेच

यकुला नेहमी लेखाद्वारेच पाहिला.. अशी इच्छा होती की असाच रहावा.. बराचसा पटायचा.. काहीही असेल तरी मनापासून व्यक्त व्हायचा ते भावायचं.. आज ही बातमी वाचून बराच धक्का बसलाय. ज्याच्याशी कसलाही काडीमात्र संबंध नाही अशा व्यक्तीबद्दल इतक असं का वाटावं याला काही उत्तर नाही.. कदाचित तो 'पांडुरंग सांगवीकर' किंवा 'Holden Caulfield' यांची आठवण करून द्यायचा म्हणून असेल.. असो, मृतात्मा वगैरेवर विश्वास नाही तरी पण जिथे असेल तिथे त्यास शांती लाभो..
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Mon, 11/19/2012 - 23:11

Permalink

अरे काय हे!

प्रत्यक्ष न भेटलेली पण ओळखीची वाटणारी व्यक्ति. खूप वाईट वाटलं, आणि आता दिवसभर अस्वस्थ वाटणार. कुलकर्णींचं मनस्वी लिखाण वाचलं होतं, वर्षापूर्वी सबूरीचे काही व्यनि देखील दिले-घेतले होते, त्यामुळे या घटनेला अगदीच 'अनपेक्षित' म्हणणं म्हणजे अप्रामाणिकपणा ठरेल. इथे धाग्यावर आणि खरडींमध्ये काहीच माहिती मिळाली नाही तेंव्हा आंतर्जालावर शोधलं तर हे वृत्त मिळालं. स्वतःच्या मतांवर बरेचसे ठाम असणारे कुलकर्णी निग्रही होते, त्यांनी जे काही पाऊल उचललंय ते योग्य/अयोग्य ठरवणारे आपण कोण? कायमच restless असणारा हा तरुण, त्याला आता rest in peace म्हंटल्याने त्याला काय फरक पडणार आहे? असो, पण असे विचारी जीव आत्महत्येच्या मार्गाने का जातात हे मला न समजणारंच कोडं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on Mon, 11/19/2012 - 23:42

In reply to अरे काय हे! by बहुगुणी

Permalink

खरय

प्रत्यक्ष न भेटलेली पण ओळखीची वाटणारी व्यक्ति. याचे लिहिणे बराच विचार करायला लावायचं,असे नको करायला होत... श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 11/19/2012 - 23:30

Permalink

फार त्रास होतोय. य कु

फार त्रास होतोय. य कु फोनही करावासा वाटला नाही कोणालाच ? कसला हा क्षणिक झटका.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 11/20/2012 - 01:34

In reply to फार त्रास होतोय. य कु by गवि

Permalink

फोन

फोन करावासा वाटला नाही त्याला. हे ठीक आहे. पण त्याला फोन केले तर सतत बिझी असल्याचं सांगायचा ह्लकट . मागच्या आठवडाभरात नीट बोलला नाही, "बिझी आहे" म्हणायचा. आमच्या फोन कॉलचं अगणित बिल वाढवून नि फुकटातला पाहुणचार झोडून फुकट्या गेला शेवटी एकदाचा, धड न बोलता. आणि पुस्तक भाषांतराचं प्रोजेक्ट/ प्रॉमिस अर्धवट ठेउन. कुणाकडे त्याचा कच्चा मसूदा, हस्तलिखित, वगैरे असेल महेश भट्ट च्या केलेल्या पुस्तकाच्या भाषांतराचा तर अजूनही त्याच्या प्रकाशनाचा प्रयत्न करता येइल. कच्चा मसूदा उत्तम होता त्याचा.
  • Log in or register to post comments

Submitted by इष्टुर फाकडा on Mon, 11/19/2012 - 23:33

Permalink

.....

धक्कादायक....
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Mon, 11/19/2012 - 23:38

Permalink

आज काही करावंसंच वाटत नाहीये.

आज काही करावंसंच वाटत नाहीये. :(
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Mon, 11/19/2012 - 23:44

Permalink

:(

मन सुन्न करणारी घटना. वाईट झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 11/20/2012 - 00:13

Permalink

यक्या...

यक्या... :-(
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 11/20/2012 - 00:43

Permalink

अतिशय राग आहे मनात. अतिशय.

अतिशय राग आहे मनात. अतिशय. रात्रभर नुसत्या विचाराने डोक फुटायची वेळ आलीय. सोड हे यशवंत , सोड हे यशवंत अगदी काही जणांचा विरोध घेउन सांगितल. तुला यकु बनायच होत ना रे?
  • Log in or register to post comments

Submitted by निल्या१ on Tue, 11/20/2012 - 01:08

Permalink

वाईट बातमी

बातमी वाचून वाईट वाटले. वेळ पैसा आणि व्यक्ती या पलीकडे जगातला कोणाताही प्रॉब्लेम असू शकत नाही असं वपूंनी सांगितलंय. यकुंचा प्रॉब्लेम या तीन मितींच्या पलिकडे होता का? काहीही झाले तरी सोन्या सारखा जीव काही परिस्थिती जन्य कारणांमुळे घालवू नयें असे फार वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on Tue, 11/20/2012 - 14:03

In reply to वाईट बातमी by निल्या१

Permalink

+१

यकुंचे लेख वाचून यूजींबद्दल माहिती मिळवायला लागलेलो, कामाच्या पसार्‍यात त्यांच्याशी बोलणे असे झाले नाही, पण अतिशय दु:खद बातमी...श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 11/20/2012 - 01:26

Permalink

धक्कादायक

धक्कादायक त्याच्या ह्या मन स्थितीचा कोणाला अंदाज कसा आला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by निशदे on Tue, 11/20/2012 - 01:34

Permalink

अरे बाप रे

हे प्रचंड धक्कादायक आहे. माझ्या लेखानंतर त्याची अन माझी ओळख झाली. लेखन आणि इतर गोष्टींवर अधूनमधून चर्चा होत असत. गप्पांमधूनच त्याचे अन त्याच्या विचारांचे वेगळेपण कळत असे. मात्र हे असे काही करील असे कधीच वाटले नाही. :(
  • Log in or register to post comments

Submitted by बंडा मामा on Tue, 11/20/2012 - 01:45

Permalink

अरेरे..हे काय घडुन गेल!

अरेरे..हे काय घडुन गेल! ह्याचे आई वडील/ कुटुंबिय ह्यांच्या संपर्कात कुणी आहे का? हा धक्का पचवायला त्यांना खूप मदत लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Tue, 11/20/2012 - 02:13

Permalink

:(

बातमी वाचून वाईट वाटलं...
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 11/20/2012 - 02:35

Permalink

अत्यंत धक्कादायक बातमी.

:( अत्यंत धक्कादायक बातमी.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 11/20/2012 - 02:39

Permalink

सगळा

सगळा राग, संताप साल्याच्या खरडीत जाउन ओकून आलोय. rest in peace छाप काहीही म्हणू शकत नाही. peace मध्ये राहणं नि राहू देणं भाड्याचा स्वभावच नाही. ह्या जित्याची खोड मेला तरीही जाणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 11/20/2012 - 02:40

Permalink

फार वाईट वाटले

बातमी ऐकून फार वाईट वाटले. एक मनस्वी व्यक्तिमत्त्व.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 11/20/2012 - 12:33

In reply to फार वाईट वाटले by धनंजय

Permalink

:(

बातमी ऐकून फार वाईट वाटले. एक मनस्वी व्यक्तिमत्त्व. ह्याच भावना आहेत, स्वाती
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com