यकु

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
19 Nov 2012 - 9:07 pm

यकु गेला.
इथल्या अनेकांशी बोलून, भांडून, मनात येईल ते येईल तेव्हा बेधडक सांगून.
मैत्री करून. पंगे घेऊन. शाब्दिक हाणामार्‍या करून. म्हणतात तसं, एक तर आपण त्याचे मित्र झालो, किंवा शत्रू; पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं.

यकु गेला.
अनेक अर्धवट गोष्टी मागे ठेवून. अनेक प्रश्न घालून. एका अत्यंत बुद्धीमान माणसाचं हे असं का व्हावं हे त्यातलं सगळ्यात मोठा प्रश्न.
अखेरीस त्याच्या मनात काय होत होतं हे आता नीटसं कधीच कळायचं नाही. त्याचे अलीकडचे विचार ऐकून, त्याच्याशी बोलताना नेहमीच याचा हा असा काहीतरी शेवट असेल हेच वाटत राहायचं. ते तसं होऊ नये, यासाठी कोणालाही काही करायलाही वाव न ठेवता, प्रचंड अस्वस्थ करून यकु गेला.
गेलाच.

काय केलंस यकु? राग येतो आहे तुझा. खूप राग येतो आहे.

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

अगदी हेच म्हणायचय. काय हे?
यकुंची मनस्थिती आजकाल बरी नव्हती हे सगळ्यांच्याच लक्षात आले होते पण इतके जास्त असेल असे वाटले नव्हते. फारच धक्का बसलाय त्यांच्या जाण्याने. त्यांची आठवण येत राहणार. मृतात्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना!

श्रावण मोडक's picture

19 Nov 2012 - 9:15 pm | श्रावण मोडक

यकु गेला त्याचं दुःख आहे. त्याविषयी भावना व्यक्त करण्यास हरकत नाही. मात्र, त्याबाबतच्या चर्चेत अध्यात्म, नर्मदा परिक्रमा, योग, मानस, मनाची स्थिती अशा विषयांवर या किंवा त्याही बाजूने भाष्य न केलं तर ते उत्तम. जे विषय तज्ज्ञांनीच हाताळावेत त्याविषयी आपण कोणीही वरकरणी काही बोलू नये, इतका विवेक राहावा, ही विनंती.

सुधीर१३७'s picture

19 Nov 2012 - 9:20 pm | सुधीर१३७

सहमत.

गणपा's picture

19 Nov 2012 - 9:22 pm | गणपा

सुचनेशी सहमत.
बातमी धक्का दायक आहे.
:(

विकास's picture

19 Nov 2012 - 9:27 pm | विकास

श्रामोंशी सहमत...

ही बातमी वाचून खूप धक्का बसला आणि वाईट वाटले. मृताम्यास सद्गती लाभोत.

नावातकायआहे's picture

19 Nov 2012 - 10:07 pm | नावातकायआहे

मृताम्यास सद्गती!

केशवराव's picture

19 Nov 2012 - 10:14 pm | केशवराव

सहमत

नाना चेंगट's picture

20 Nov 2012 - 2:04 pm | नाना चेंगट

...

अत्यंत वाईट बातमी...मी यकुला वैयक्तिक रित्या ओळ्खत नसलो तरीही त्याची ओळ्ख त्याच्या लेखांमधुन झाली होती...यकुला भावपूर्ण श्रद्धांजली... :(

पुष्करिणी's picture

19 Nov 2012 - 9:19 pm | पुष्करिणी

रेवतीताई +१

यकुला भावपूर्ण श्रद्धांजली...

सुधीर१३७'s picture

19 Nov 2012 - 9:19 pm | सुधीर१३७

मृतात्म्यास शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!

चतुरंग's picture

19 Nov 2012 - 9:25 pm | चतुरंग

मिपावर आला तेव्हापासूनच वेगळा वाटणारा सदस्य होता. स्वतःची ठाम मतं असलेल्या लोकांपैकी एक वाटला.
प्रत्यक्ष ओळख किंवा भेट घडली नव्हती परंतु त्याचे लेख आणि प्रतिक्रियांमधून भेटायचा.
आणि आता तर तो गेलाच आहे. एका उमद्या तरुणाने असे जीवन संपवावे याचे अपरंपार दु:ख आहे. आवंढा येतोय.
जे त्याला व्यक्तिशः ओळखत होते त्यांची अवस्था तर शब्दात सांगणे कठिण!
रेस्ट ईन पीस यकु!
(साश्रु)रंगा

जेनी...'s picture

19 Nov 2012 - 9:25 pm | जेनी...

श्रद्धांजली :(

मृगनयनी's picture

19 Nov 2012 - 10:19 pm | मृगनयनी

:( वाईट झालं.... 'यकु"ना भावपूर्ण श्रद्धांजली....२०१२ हे वर्ष खूप वाईट आहे का?..खूप चांगले लोक आपल्याला सोडून गेले...

खरच अत्यंत वाईट बातमी. लेख आणी खरड वही यातुन ओलख झाली होती. युवा पत्रकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.

अमित's picture

19 Nov 2012 - 9:40 pm | अमित

एवढ्या बुद्धीमान, तरूण माणसाचं अशा प्रकारे जाणं पटतही नाहीये आणि पचतही नाहीये.
मृताम्यास सद्गती लाभो

सांजसंध्या's picture

19 Nov 2012 - 9:42 pm | सांजसंध्या

.....................................................................

जीएस's picture

19 Nov 2012 - 9:47 pm | जीएस

माझ्य मिपावरच्या मर्यादित वावरातही यकुच्या लेखांनी लक्ष वेधले होते. फार अस्वस्थ वाटतय ही बातमी वाचून.
यकुच्या आत्म्यास मुक्ती लाभो...

निवांत पोपट's picture

19 Nov 2012 - 10:03 pm | निवांत पोपट

छे!! असं व्हायला नको पाहिजे होतं ! :(

अमितसांगली's picture

19 Nov 2012 - 10:10 pm | अमितसांगली

भावपूर्ण श्रद्धांजली...

प्यारे१'s picture

19 Nov 2012 - 10:12 pm | प्यारे१

यक्या भोसडीच्या............. श्श्या!

प्यारे१'s picture

19 Nov 2012 - 10:18 pm | प्यारे१

झाली गोष्ट अत्यंत वाईट झाली. पण अध्यात्म असलं काही शिकवत नाही लोकहो!

कर्तव्यापासून पळून जाणार्‍या अर्जुनाला उभं करणारी भगवद्गीता हे अध्यात्माचं 'मॅन्युअल' म्हणून ओळखलं जावं.
कृपया अध्यात्माच्या नावानं खडे फोडू नयेत.

सुधीर's picture

19 Nov 2012 - 10:14 pm | सुधीर

विश्वासच नाही बसत, कालचा एक वाईट दिवस होता आणि आत्ता सुद्धा... सत्य शोधण्याचा प्रयत्न करणारे त्याचे लेख आवडायचे. युजी, ओशो यांच्याबद्दल त्याच्यामुळेच कळलं होतं. खरचं खूप वाईट वाटलं.

पुष्कर जोशी's picture

19 Nov 2012 - 10:15 pm | पुष्कर जोशी

आपण जाणार होतो ना .. धुमाळ काकाना भेटायला काय रे ? ..

अभ्या..'s picture

19 Nov 2012 - 10:16 pm | अभ्या..

यक्कू तू किती छान बोलायचा खरडवहीतून.
सगळे समजावून सांगायचा नवीन सदस्यांशी पण आपलेपणे.
औरंगाबादला ये एकदा भेटायला म्हणायचा.
अन काय केलेस रे हे.
यक्कू तू वाईट केलेस. फार वाईट. :(
.
तू जिथे असशील तिथे तुला शांती लाभो. एवढेच.

मदनबाण's picture

19 Nov 2012 - 10:19 pm | मदनबाण

छ्या... हे कसं शक्य आहे ? आत्महत्या ? :(
अरे यकु काय केलसं हे ? इतका कंटाळलास जगण्याला ? :(

अर्धवटराव's picture

19 Nov 2012 - 10:22 pm | अर्धवटराव

कोणाला नक्की माहित आहे का काय झालय ते? म्हणजे अपघात, हेल्थ इश्यु... कि इतर काहि.
यक्या... असा कसा गेलास बे सगळं सोडुन. अवंढा गिळतोय :(
यकुच्या कुलदैवतावर, त्या दिगंबर दत्तात्रयावर त्याचा सर्व भार.

अर्धवटराव

अत्रुप्त आत्मा's picture

19 Nov 2012 - 10:27 pm | अत्रुप्त आत्मा

गेलं रे यक्क्या गेलं,,,देवासच्या वाड्यात जाणं संपलं...आणी सारं संपलं... http://www.sherv.net/cm/emo/sad/sad-eyes-smiley-emoticon.gif

उणापुरा १ वर्षाचा स्नेह,आणी तिनदा प्रत्यक्ष भेट,,,पण गाढ मैत्री करून,अचानक तोडून गेलास रे...
तुझ्या स्वभावासारखा तडका फडकी गेलास... http://www.freesmileys.org/smileys/smiley-sad007.gif

सानिकास्वप्निल's picture

19 Nov 2012 - 10:37 pm | सानिकास्वप्निल

अत्यंत बेचैन झालेय ही बातमी वाचून
दुर्दैवी घटना :(
यकुस सद्गती लाभोत

इतक्या मनस्वी व्यक्तीचं असं तडकाफडकी जाणं अतिशय धक्कादायक आहे..
ही १७ तारखेपेक्षा जास्त वाईट बातमी आहे.. :(

इश्वर मृतात्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!

अस्वस्थामा's picture

19 Nov 2012 - 10:43 pm | अस्वस्थामा

यकुला नेहमी लेखाद्वारेच पाहिला.. अशी इच्छा होती की असाच रहावा.. बराचसा पटायचा..
काहीही असेल तरी मनापासून व्यक्त व्हायचा ते भावायचं..
आज ही बातमी वाचून बराच धक्का बसलाय. ज्याच्याशी कसलाही काडीमात्र संबंध नाही अशा व्यक्तीबद्दल इतक असं का वाटावं याला काही उत्तर नाही..

कदाचित तो 'पांडुरंग सांगवीकर' किंवा 'Holden Caulfield' यांची आठवण करून द्यायचा म्हणून असेल..

असो, मृतात्मा वगैरेवर विश्वास नाही तरी पण जिथे असेल तिथे त्यास शांती लाभो..

बहुगुणी's picture

19 Nov 2012 - 11:11 pm | बहुगुणी

प्रत्यक्ष न भेटलेली पण ओळखीची वाटणारी व्यक्ति. खूप वाईट वाटलं, आणि आता दिवसभर अस्वस्थ वाटणार. कुलकर्णींचं मनस्वी लिखाण वाचलं होतं, वर्षापूर्वी सबूरीचे काही व्यनि देखील दिले-घेतले होते, त्यामुळे या घटनेला अगदीच 'अनपेक्षित' म्हणणं म्हणजे अप्रामाणिकपणा ठरेल. इथे धाग्यावर आणि खरडींमध्ये काहीच माहिती मिळाली नाही तेंव्हा आंतर्जालावर शोधलं तर हे वृत्त मिळालं. स्वतःच्या मतांवर बरेचसे ठाम असणारे कुलकर्णी निग्रही होते, त्यांनी जे काही पाऊल उचललंय ते योग्य/अयोग्य ठरवणारे आपण कोण? कायमच restless असणारा हा तरुण, त्याला आता rest in peace म्हंटल्याने त्याला काय फरक पडणार आहे? असो, पण असे विचारी जीव आत्महत्येच्या मार्गाने का जातात हे मला न समजणारंच कोडं आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Nov 2012 - 11:42 pm | लॉरी टांगटूंगकर

प्रत्यक्ष न भेटलेली पण ओळखीची वाटणारी व्यक्ति.

याचे लिहिणे बराच विचार करायला लावायचं,असे नको करायला होत...
श्रद्धांजली

गवि's picture

19 Nov 2012 - 11:30 pm | गवि

फार त्रास होतोय. य कु फोनही करावासा वाटला नाही कोणालाच ? कसला हा क्षणिक झटका.

मन१'s picture

20 Nov 2012 - 1:34 am | मन१

फोन करावासा वाटला नाही त्याला. हे ठीक आहे. पण
त्याला फोन केले तर सतत बिझी असल्याचं सांगायचा ह्लकट .
मागच्या आठवडाभरात नीट बोलला नाही, "बिझी आहे" म्हणायचा.
आमच्या फोन कॉलचं अगणित बिल वाढवून नि फुकटातला पाहुणचार झोडून फुकट्या गेला शेवटी एकदाचा, धड न बोलता. आणि पुस्तक भाषांतराचं प्रोजेक्ट/ प्रॉमिस अर्धवट ठेउन.
कुणाकडे त्याचा कच्चा मसूदा, हस्तलिखित, वगैरे असेल महेश भट्ट च्या केलेल्या पुस्तकाच्या भाषांतराचा तर अजूनही त्याच्या प्रकाशनाचा प्रयत्न करता येइल. कच्चा मसूदा उत्तम होता त्याचा.

इष्टुर फाकडा's picture

19 Nov 2012 - 11:33 pm | इष्टुर फाकडा

धक्कादायक....

आज काही करावंसंच वाटत नाहीये. :(

राघव's picture

19 Nov 2012 - 11:44 pm | राघव

मन सुन्न करणारी घटना.
वाईट झाले.

मोदक's picture

20 Nov 2012 - 12:13 am | मोदक

यक्या...

:-(

स्पंदना's picture

20 Nov 2012 - 12:43 am | स्पंदना

अतिशय राग आहे मनात. अतिशय. रात्रभर नुसत्या विचाराने डोक फुटायची वेळ आलीय.
सोड हे यशवंत , सोड हे यशवंत अगदी काही जणांचा विरोध घेउन सांगितल.
तुला यकु बनायच होत ना रे?

निल्या१'s picture

20 Nov 2012 - 1:08 am | निल्या१

बातमी वाचून वाईट वाटले. वेळ पैसा आणि व्यक्ती या पलीकडे जगातला कोणाताही प्रॉब्लेम असू शकत नाही असं वपूंनी सांगितलंय. यकुंचा प्रॉब्लेम या तीन मितींच्या पलिकडे होता का? काहीही झाले तरी सोन्या सारखा जीव काही परिस्थिती जन्य कारणांमुळे घालवू नयें असे फार वाटते.

मी_आहे_ना's picture

20 Nov 2012 - 2:03 pm | मी_आहे_ना

यकुंचे लेख वाचून यूजींबद्दल माहिती मिळवायला लागलेलो, कामाच्या पसार्‍यात त्यांच्याशी बोलणे असे झाले नाही, पण अतिशय दु:खद बातमी...श्रद्धांजली!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Nov 2012 - 1:26 am | निनाद मुक्काम प...

धक्कादायक
त्याच्या ह्या मन स्थितीचा कोणाला अंदाज कसा आला नाही.

निशदे's picture

20 Nov 2012 - 1:34 am | निशदे

हे प्रचंड धक्कादायक आहे. माझ्या लेखानंतर त्याची अन माझी ओळख झाली. लेखन आणि इतर गोष्टींवर अधूनमधून चर्चा होत असत. गप्पांमधूनच त्याचे अन त्याच्या विचारांचे वेगळेपण कळत असे. मात्र हे असे काही करील असे कधीच वाटले नाही.
:(

बंडा मामा's picture

20 Nov 2012 - 1:45 am | बंडा मामा

अरेरे..हे काय घडुन गेल! ह्याचे आई वडील/ कुटुंबिय ह्यांच्या संपर्कात कुणी आहे का? हा धक्का पचवायला त्यांना खूप मदत लागेल.

पिवळा डांबिस's picture

20 Nov 2012 - 2:13 am | पिवळा डांबिस

बातमी वाचून वाईट वाटलं...

शिल्पा ब's picture

20 Nov 2012 - 2:35 am | शिल्पा ब

:( अत्यंत धक्कादायक बातमी.

मन१'s picture

20 Nov 2012 - 2:39 am | मन१

सगळा राग, संताप साल्याच्या खरडीत जाउन ओकून आलोय.
rest in peace छाप काहीही म्हणू शकत नाही. peace मध्ये राहणं नि राहू देणं भाड्याचा स्वभावच नाही.
ह्या जित्याची खोड मेला तरीही जाणार नाही.

धनंजय's picture

20 Nov 2012 - 2:40 am | धनंजय

बातमी ऐकून फार वाईट वाटले. एक मनस्वी व्यक्तिमत्त्व.

स्वाती दिनेश's picture

20 Nov 2012 - 12:33 pm | स्वाती दिनेश

बातमी ऐकून फार वाईट वाटले. एक मनस्वी व्यक्तिमत्त्व.

ह्याच भावना आहेत,
स्वाती

नंदन's picture

20 Nov 2012 - 2:55 am | नंदन

वाईट झालं. धक्कादायक बातमी.

Nile's picture

20 Nov 2012 - 3:00 am | Nile

बातमी वाचून वाईट वाटलं.

सुहास झेले's picture

20 Nov 2012 - 3:36 am | सुहास झेले

अरे काय यार....दोन वर्षापूर्वी स्टारमाझा कार्यक्रमात भेट झाली होती.. किती बडबड करत होतास. आपण कट्टे करूया, गप्पा करू... पण तू सगळं सोडून निघून गेलास :( :(

कौशी's picture

20 Nov 2012 - 3:41 am | कौशी

यकु ला भावपूर्ण श्रद्धांजली...

चित्रगुप्त's picture

20 Nov 2012 - 4:39 am | चित्रगुप्त

श्रद्धांजली.
अवघ्या सव्वीस वर्षे वयात त्याला असे काय झाले असेल ज्यातून असे घडले, हा प्रश्न वारंवार येतोय.
ओशो बद्दल त्याचे मत आणि लेखन, त्याचे युजींच्या विचारांनी भारून जाणे, त्याने दिलेले युजींचे ( विचित्र, अकल्पनीय) व्हिडियो, यामुळे जरा आश्चर्य वाटले होते.
'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' म्हणून जाणकारांना यावर काही प्रकाश टाकता येइल का?
बाकी होणार ते अटळच असते, हेही खरेच.

राजेश घासकडवी's picture

20 Nov 2012 - 4:45 am | राजेश घासकडवी

सकाळी बातमी कळली, आणि त्यानंतर दिवसभर सुन्न होतो. प्रतिसाद लिहिण्याचा विचार करत होतो, पण काय लिहावं कळत नव्हतं. यकुसारख्या तरुणाचा असा शेवट व्हावा ही फारच खेदाची गोष्ट आहे.

त्याला मी कधीच भेटलो नाही. पण लेखनातून बरीच ओळख झाली होती. त्याने लिहिलेलं जवळपास सगळं मी वाचून काढलेलं आहे. त्याचे विचार आणि दृष्टिकोन मला व्यक्तीशः कधी पटले नाहीत, पण तरीही त्याच्या लेखनात एक पॅशन होती. त्यामुळे त्याची नैसर्गिक शैलीही सर्वसामान्य लेखकापेक्षा वेगळी होती. त्याचा लेख पाडलेला कधीच नसायचा - त्याला खरोखर पडलेले प्रश्न तो सरळसरळ मांडायचा. कुठचेही आढेवेढे न घेता, शुगरकोटिंग न करता. वर धनंजयने म्हटल्याप्रमाणे त्याचं मनस्वी व्यक्तिमत्व होतं, आणि लेखनात त्याचं स्वच्छ प्रतिबिंब पडलेलं दिसायचं.

शेवटच्या शेवटच्या लिखाणात काहीतरी नेहमीच्या पॅशनपलिकडचं, काहीतरी डगमगल्यासारखं वाटत होतं. अनेकांना तसं जाणवल्याचं लक्षात आलं होतं. खूप जणांनी त्याला वेळोवेळी 'सांभाळ रे बाबा' असं म्हटलं होतं. आईवडिलांपासून दूर, एकटा राहून तो प्रश्नांशी लढा देत होता. त्याला मदतीची गरज होती. पण असं काही होईल अशी कोणालाच सूतरामही कल्पना नसावी. जालीय विश्वातल्यांशी प्रत्यक्ष भेटण्याची वेळ मोजक्या लोकांच्या बाबतीतच येते. तरीही त्यांचा आपल्या जीवनाला स्पर्श होतोच. अशा वेळी पश्चातबुद्धीने 'अरे, काहीतरी करायला हवं होतं राव' अशी चुकचुकही लागणं साहजिकच आहे. दुर्दैवाने प्रत्येक ठिकाणी आपल्याला हवी तितकी मदत करता येत नाही, आणि बऱ्याच वेळा किती मदतीची गरज आहे याचीही जाणीव होत नाही. मागे वळून पहाताना बऱ्याच गोष्टी अधिक स्पष्ट दिसतात हेच खरं.

चित्रा's picture

20 Nov 2012 - 5:39 am | चित्रा

खूप वाईट वाटले.
ओळख अशी नव्हती. पण त्यांनी मला पुलंच्या काही सुरेख विडियोंचे दुवे दिले.
यकु स्मरणात राहतील.

आबा's picture

20 Nov 2012 - 6:54 am | आबा

यकूंच्या लिखाणामध्ये जानवण्याइतपत असंबद्धता आली होती...
काळाची पावले आपल्याला ओळखता आली नाहीत...
हा गिल्ट जायचा नाही कधीच !

निनाद's picture

20 Nov 2012 - 7:02 am | निनाद

अगदीच अविश्वसनीय... :(

मृदुला सूर्यवंशी's picture

20 Nov 2012 - 7:22 am | मृदुला सूर्यवंशी

यकुंची काहीच ओळख नसतांना देखील यकूंच्या लिखाणामुळे ते अनोळखी वाटले नाही. फार वाईट झाले...

चाफा's picture

20 Nov 2012 - 8:17 am | चाफा

मिपा वर आल्यानंतर सगळ्यात आधी पुढे आलेला दोस्तीचा हात, अपरात्री हमखास सापडणारा परवा परवा पर्यंत व्यनीतून शिव्या घालत होतो त्याला. नालायकाला सिलिंग फॅन मित्रांपेक्षा जवळचा वाटला. कालचा दिवस सुन्न..
अजुनही वाटतंय 'व्यक्तीगत संदेश १' असं दिसेल आणि हाच साला कसं गंडवलं म्हणून फिरकी घेईल.

जयंत कुलकर्णी's picture

20 Nov 2012 - 8:19 am | जयंत कुलकर्णी

अमोल क्षणांची फूले
खय्यामला माझ्यामते मित्र आणि सवंगडी यांच्याशिवाय मुळीच करमत नसावे. आपल्या सारखेच. त्याच्या सगळ्या मित्रांना त्याच्या प्रेयसीएवढेच महत्व आहे. किंबहुना जरा जास्तच आणि त्यामुळे मित्रांमधील एखादा जाणे यासारखी दु:खद घटना तो सहन करु शकत नसावा. एखादा मित्र जाणे हा त्याला देवाचा दुष्टपणा वाटत असे. अर्थात त्याचे मित्रपण त्याच लायकीचे असणार हे निर्विवाद.
ज्यांचे जीवनावर प्रेम आहे त्यांना मित्र असणे अपरिहार्य आहे. त्यांची
एखादा मित्र गेल्यावर काय अवस्था होते हे आरती प्रभूंनी फार छान
सांगितले आहे -
एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्म्रृतींवर
हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा
एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात,
आणि मग कधीतरी झोपेतून उठून
स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात,
स्वत:लाच नमस्कार करतात !
एकमेकांच्या संगतीतील दिवस आठवून !

देवाच्या ह्या दुष्टपणाला उत्तर म्हणजे जास्त विचार करायचा नाही. म्हणजे हाच क्षण जगायचा नाहीतर गेलेल्या मित्रांशिवाय जगणे अशक्य आहे. खय्याम म्हणतो,
मित्रांनो, त्याचा दुष्टपणा हा जाणुन घ्या
मित्रांना नेले ओढुन, जग हे रिते पहा
जगता आला क्षण अपुल्यापुरता, आज जगा
शोधा न काल, ना उद्या बघा, क्षण हाच पहा

प्रशु's picture

20 Nov 2012 - 8:26 am | प्रशु

अतिशय दुखःद बातमी, फार वाईट वाट्ले. कर्त्या सवर्त्या वयात अस जाणं त्याच्या मागे असलेल्या त्याच्या कुटुंबीयां साठी फार धक्कादायक ठरेल.

मागे त्याच्याशी ज्ञानेश्वरांची समाधी कि आत्महत्या असा काहिसा वाद माझा झाला होता. तेव्हा तो बहुतेक युजी. च्या प्रेमात होता.

खुप वाईट वाट्ले..

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Nov 2012 - 8:50 am | श्री गावसेना प्रमुख

खुप वाइट वाटले ऐकुन,

चौकटराजा's picture

20 Nov 2012 - 8:58 am | चौकटराजा

मला तर मिपावर येऊन फक्त आठ नउ महिने झालेयत . परवा वल्लीच्या पाठीमागे बसून जाताना कासारवाडी फ्लाय ओव्हर पाशी १४ तारखेला युकुची आठवण आली नि तीन चार दिवसात हे अघटित !

एनी वे , यकू मला आजोबा पदावर बसवणारा तूच ना रे इथला मिशकिल नातू ? तुला जीवनाचा अर्थच कळला नाही रे ! की तुलाच कळला फक्त ?

मूकवाचक's picture

20 Nov 2012 - 9:01 am | मूकवाचक

मृतात्म्यास सद्गती मिळो अशी ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.

स्पा's picture

20 Nov 2012 - 9:14 am | स्पा

आपट्या, भाड्या लेका कुठे उलथ्तोस रे सारखा
काढली गाडी कि निघाला .
तुझा जीव किती नि त्या गाडीचा किती ???

दर वेळी GTALK वर यकूच हे असलं काहीतरी पिंग यायचं , नि गप्पा सुरु व्हायच्या

"मला न्या , मला न्या" सुरु असायचं , सुधागड च्या वेळी माझ्या गाडीवरून फिरायचं म्हणून साहेब औरंगाबाद हून इथे आले देखील
पण आयत्यावेळी काय बिनसलं माहित नाही .. मला नाही जमणार म्हणून तसाच निघून गेला :(

अगदी दिवाळीच्या आधी बोलणं झालेलं , माझ्या गावाला "आडिवऱ्याला" यायचं होत त्याला ..
दर वेळी म्हणायचा तुझ बरंय स्वताला गुंतवुन घेतलंस , साला मी जाम एकटा पडलोय .
पण तो हे असं काही पाऊल उचलेल ,अस स्वप्नात देखील वाटलं नव्हत

काल पासून डोक सुन्न झालंय

कुठल्या अघोरी पंथाला लागलेला देवच जाणे .

काही सुचत नाहीये
अजूनही वाटतंय त्याच पिंग येईल
"आपट्या, भाड्या लेका कुठे उलथ्तोस रे सारखा ?
काढली गाडी कि निघाला ."

:(

श्रीरंग_जोशी's picture

20 Nov 2012 - 9:15 am | श्रीरंग_जोशी

हि बातमी वाचून धक्काच बसला. २६ व्या वर्षी हि वेळ यावी?

एखाद्या विषयामागे झपाटून घेतलेल्या व्यक्तीने असे करावे अशा काही दुर्दैवी उदाहरणांचे स्मरण झाले अन त्यात एकाची भर पडली.

या घटनेबद्दल अनेक जर तर मनात येतात पण आता कितीही विचार केला तरी हाती काय येणार?

अशी वेळ शत्रूवरही न येवो...

माझीही शॅम्पेन's picture

20 Nov 2012 - 9:17 am | माझीही शॅम्पेन

काय चाललाय काय , कळत नाही..
मी त्याला ओळखत नाही पण एवढा धडाडीचा माणूस आत्म-हत्या कशी करेल ? पोलिसांनी तपास पूर्ण केला काय ?

जयवी's picture

20 Nov 2012 - 9:20 am | जयवी

ओह गॉड....... अत्यंत वाईट बातमी !!
विनम्र श्रद्धांजली !!

वामन देशमुख's picture

20 Nov 2012 - 9:23 am | वामन देशमुख

श्रद्धांजली!

अक्षया's picture

20 Nov 2012 - 9:24 am | अक्षया

माझा मिपावरचा पहिल्या लेखनाची पहिली प्रतिक्रिया कधीच विसरणार नाही..
अतिशय वाईट वाटले..
विनम्र श्रद्धांजली :(

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Nov 2012 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार

यक्या भाड्या काय केलस हे? या थराला जाशिल असे कधिच वाटले नव्हते. असे जायचे होते तर भेटलासच कशालारे उगाच जीवाला घोर लावायला?
पैजारबुवा,

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Nov 2012 - 9:27 am | llपुण्याचे पेशवेll

यकु भेटायचे राहून गेले बघ. १-२ वेळा फोनवर बोललो रे तुझ्याशी पण भेटायचे राहून गेले. भेटायची तीव्र इच्छा होती. तीव्र.

लीलाधर's picture

20 Nov 2012 - 9:47 am | लीलाधर

अरे अशी खरड कोणाला पाठवू रे अता ??????? :(

वर स्पा म्हणतोय त्याप्रमाणे सुधागडला येणार आहेस हे त्याने सांगितले होते पण तेव्हाही आला नाहीस..........
म्हण्टले त्यानिमित्याने भेट होईल पण कसले काय ? शेवटी नाही ती नाहीच फार वाईट वाटले रे...........

विनम्र श्रद्धांजली ;(

लीलाधर's picture

20 Nov 2012 - 9:48 am | लीलाधर

अरे अशी खरड कोणाला पाठवू रे अता ??????? :(

वर स्पा म्हणतोय त्याप्रमाणे सुधागडला येणार आहेस हे त्याने सांगितले होते पण तेव्हाही आला नाहीस..........
म्हण्टले त्यानिमित्याने भेट होईल पण कसले काय ? शेवटी नाही ती नाहीच फार वाईट वाटले रे...........

विनम्र श्रद्धांजली :(

चिंतामणी's picture

20 Nov 2012 - 9:53 am | चिंतामणी

प्रत्यक्ष भेटीचा योग जरी आला नव्हता तरी खरडवही, चेपु आणि चॅटद्वारे संवाद व्हायचे.

हे काय वय होते जाण्याचे.

काय लिहावे हेच समजत नाही.

विनम्र श्रद्धांजली

इरसाल's picture

20 Nov 2012 - 10:03 am | इरसाल

मिपावर चाललेल्या परिक्रमेबद्दल लिहीताना यकुचा गोंधळ बरेच काही सुचवु पहात होता परंतु दुर्दैवाने कोणाच्या लक्षात आले नाही.मिपावर लिहीता असताना त्याचा ओढा जिकडे वाटत होता त्यात तो बराच गुरफटला होता.मग मधे असे काय घडले की त्याला इहलोक नकोसा झाला ?

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Nov 2012 - 10:04 am | माम्लेदारचा पन्खा

तसा आमचा काही परिचय नव्हता परंतु मिपा च्या निमित्ताने आपण सगळेच एकमेकांशी जोडले गेलो आहोत.

मिपा परिवारातील एक सदस्य असे काही करू शकेल ह्यावर विश्वासच बसत नाही.

काय भयानक असेल तो क्षण ज्यावेळी यकु च्या मनात हा विचार आला असेल? त्याचे प्रश्न त्यालाच ठाऊक असणार पण कोणत्याही गोष्टीचा "जीव देणे" हा उपाय असूच शकत नाही. अस्वस्थ झालो आहे.

ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.

अविनाशकुलकर्णी's picture

20 Nov 2012 - 10:22 am | अविनाशकुलकर्णी

असे काय दुख्ख वा प्रश्न असावेत त्याचे उत्तर नसावे...वा जे सुटू शकत नाहीत>???
खूप वाईट वाटले हे ऐकून..

भावपूर्ण श्रद्धांजली...

ऋषिकेश's picture

20 Nov 2012 - 10:35 am | ऋषिकेश

अरेरे..वैयक्तीक परिचय नव्हता तरी इतक्या टोकाचा प्रकार घडेल वाटलं नव्हत :(
धक्का बसला.. वाईटही वाटलं!
त्यास अंजली!

मृत्युन्जय's picture

20 Nov 2012 - 10:42 am | मृत्युन्जय

दु:ख झाले आहे तसाच धक्काही बसला. राजेश घासकडवींनी आधीही एका प्रतिक्रियेत की लेखात सांगितले होते की यकुला मदतीची गरज आहे. त्यावेळेस खरे वाटले नाही. गुर्जी उगाच नस्ती ठाम मते मांडत आहेत असे वाटले. आता वाटते त्यांचे बरोबरच होते. कदाचित त्यांना याचा आधीच अंदाज आला असावा.

असो. यकु हुषार होता तरी त्याने असे का केले कधीच समजणार नाही. यकुच्या आत्म्याला शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना

तिमा's picture

20 Nov 2012 - 10:46 am | तिमा

यकुंचे लिखाण मनस्वी असायचे. अतिशय वाईट वाटले. नैराश्याच्या विळख्यातून, तरुण पिढीला सोडवण्यासाठी मिपावर काही करता येईल का ?

नगरीनिरंजन's picture

20 Nov 2012 - 10:57 am | नगरीनिरंजन

धक्कादायक!
काय म्हणावे सुचत नाहीये. गर्दीने वेढलेला असूनही माणूस किती एकटा असतो याची तीव्र जाणीव झाली.

प्रभाकर पेठकर's picture

20 Nov 2012 - 11:05 am | प्रभाकर पेठकर

कुटुंब सदस्य गेल्याची अस्वस्थ भावना निर्माण झाली आहे. काय लिहू? शब्दच नाही उरले.

पियुशा's picture

20 Nov 2012 - 11:07 am | पियुशा

अनबिलिव्हेबल ..........अतिशय दुखःद बातमी :(
एका लेखावर त्याने माझ्याबद्दल भलतीच प्रतिक्रिया दिली होती नंतर आमच्यात शाब्दिक चकमक झाली होती
" मला प्रतिक्रियेत माझा असा उल्लेख अजिबात आवडला नाही य.कु. मी मुलगी आहे जरा सांभाळुन लिहीत जा
तर लगेच पाच मिनिटात त्याचा भलामोठा व्य नी आलेला " मला माफ कर ,माझ्या लिहिण्याने दुखावली गेली असशील तर मी क्षमस्व आहे मी ते मिस्किलपणे लिहीले होते तरीही तुला त्यात काही वावगे वाटत असेल तर सॉरी, अन भविष्यातदेखील मी अस काही लिहिणार नाही ज्यामुळे तुला त्रास होइल .खात्री बाळ्ग "

अन यक्याने तो शब्द पाळला :) " फिलहालचा / भानाचा पुढ्चा भाग कधी लिहितेस गं ? आधी कथा पुर्ण कर मग कायतरी नविन लिही ,इतक छान लिहितेस नी सगळ अर्धवट सोड्तेस अस म्हणनारा यक्या आज सगळ अर्धवट सोडुन गेलाय :(
काय केलंस हे यकु ? कुठतरी मनं मोकळ का नाही केलस ?

काय बोलायचं अशा वेळी कळत नाही. असो. श्रद्धांजली !!

सर्वसाक्षी's picture

20 Nov 2012 - 11:18 am | सर्वसाक्षी

एखादा तरूण असा टोकाला का जात असेल? हे पराकोटीचे नैराश्य की विरक्ती की स्वतःचाच तिरस्कार की काय म्हणायचे?
संभाषण बंद होणे हे अत्यंत घातक असते. माझा यकुचा परिचय नाही पण इथे प्रतिसादात जे वाचतोय त्यावरुन त्याने जाण्यापूर्वी संपर्क टाळला होता. ही तयारी होती?

इश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2012 - 11:21 am | बिपिन कार्यकर्ते

त्रास सगळ्यांनाच होणार. मला मात्र किंचित जास्तच होतोय. त्याच्याशी सतत बोलत होतो. मागच्या वेळेस योग्य वेळी हस्तक्षेप करता आला आणि परिस्थिती सुधारली. मात्र दुर्दैवाने काही वैयक्तिक कारणांमुळे गेल्या महिन्या दोन महिन्यात फारसे बोलणे होऊ नाही शकले. तो धोक्याच्या बाहेर आहे असं वाटत होतं म्हणूनही फोन करणं कमी झालं असावं माझ्याकडून.

शेवटी चकवलंच साल्याने!