✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बीटलमेनिया - ४ -> 'Yellow Submarine'

प
प्रास यांनी
Tue, 05/15/2012 - 21:42  ·  लेख
लेख
१९६६ साली आपल्या लोकप्रियतेच्या शिखरावर असणा-या 'बीटल्स' संबंधी सर्वात मोठी 'कॉन्ट्रोव्हर्सी' निर्माण झाली. त्यांचा म्होरक्या जॉन लेनन याने एका मुलाखतीत सहज उद्गार काढले की आज 'बीटल्स' येशू ख्रिस्तापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. त्यानंतर सुमारे आठवडाभर काहीच प्रतिक्रिया नव्हत्या. हेच उद्गार पुन्हा एकदा एका टीन एजर मुलांसाठीच्या डेटबुक नावाच्या मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर छापले आणि अमेरिकाभर गदारोळ सुरु झाला. काही लोकांनी हा जणू ख्रिश्चानिटीवरच हल्ला असल्याप्रमाणे 'बीटल्स' विरोधी सूर आळवणे सुरू केले. त्यांच्या विरोधात चर्चने मोहिम उघडली. त्यांनी तरुणांना चिथावणी देऊन बीटल्सच्या रेकॉर्ड्सची जाहिर तोडफोड केली. टेक्साससारख्या राज्यात बीटल्सच्या रेकॉर्ड्स पायाने तुडवून त्यांचे तुकडे तुकडे करणार्‍या टीन एजर मुलांची दृश्ये सतत टीव्हीवर दाखवली जाऊ लागली. रेडिओ स्टेशनने बीटल्सवर जणु अघोषित बंदी घातली. जॉनचं म्हणण सरळ होतं की हा माझ्या विधानाचा विपर्यास आहे. हेच जर मी टेलिव्हिजनबद्दल म्हणालो असतो तर कुणालाही त्यात काही वावगं वाटलं नसतं. याच सुमारास त्यांचं एक गाणं आलं, "Yellow Submarine".
हे गाणं खास 'रिंगो स्टार'साठी तयार केलेलं होतं. त्यावेळी 'पॉल' आणि 'जॉन', लहान मुलांसाठी एखाद गाणं करण्यावर विचार करत होते आणि ते त्यांना 'रिंगो'साठी बनवायचं होतं. 'रिंगो' च्या आवाजाचा विचार करून त्यांनी हे गायकी ढंगात बनवायचं टाळलं. एक म्हातारा दर्यावर्दी आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना त्याच्या प्रवासाच्या, साहसाच्या कथा सांगतोय अशी थीम घेऊन हे गाणं बनवलंय. या गाण्यात 'बीटल्स'नी अनेक प्रयोग केलेत. बॅकग्राउंडचे विविध आवाज त्याचेच द्योतक आहेत. खरं तर रिंगो हा काही गायक नव्हेच पण त्याच्या आवाजाला साजेसं आणि त्याला पेलवेल असं गाणं देण्याचा जॉन नि पॉलने इथे चांगला प्रयत्न केल्याचं कळतं. माफक आणि रिंगोला साजेशा अशा चुकांसह रिंगोने ते गायलंयही अगदी एखाद्या खुशालचेंडूसारखंच!
हे गाणं इंग्लंड मध्ये १ल्या क्रमांकावर १३ आठवडे राहिलं. पण ख्रिश्च्यानिटीविरोधी रिमार्क्समुळे अमेरिकेत ते कधीच १ल्या क्रमांकावर येऊ शकलं नाही. 'रिंगो'च्या खास गायनाच्या ष्टाईलसाठी हे गाणं जरूर ऐका......
'Yellow Submarine' हे गीत - In the town where I was born Lived a man who sailed to sea And he told us of his life In the land of submarines So we sailed on to the sun Till we found a sea of green And we lived beneath the waves In our yellow submarine We all live in a yellow submarine Yellow submarine, yellow submarine We all live in a yellow submarine Yellow submarine, yellow submarine And our friends are all aboard Many more of them live next door And the band begins to play We all live in a yellow submarine Yellow submarine, yellow submarine We all live in a yellow submarine Yellow submarine, yellow submarine {Full speed ahead Mr. Boatswain, full speed ahead Full speed ahead it is, Sgt. Cut the cable, drop the cable Aye, aye, Sir, aye, aye Captain, captain} As we live a life of ease Every one of us has all we need (One of us, has all we need) Sky of blue and sea of green (Sky of blue, sea of green) In our yellow submarine (In our yellow, submarine, aha) We all live in a yellow submarine A yellow submarine, yellow submarine We all live in a yellow submarine A yellow submarine, yellow submarine We all live in a yellow submarine Yellow submarine, yellow submarine We all live in a yellow submarine Yellow submarine, yellow submarine बीटलमेनिया - १ बीटलमेनिया - २ बीटलमेनिया - ३

Book traversal links for बीटलमेनिया - ४ -> 'Yellow Submarine'

  • ‹ बीटलमेनिया - ३ -> 'Yesterday'
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
2932 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

मस्त गाणे आणि मस्त माहिती

प्रचेतस
Tue, 05/15/2012 - 22:16 नवीन
मस्त गाणे आणि मस्त माहिती प्रासभाउ.
  • Log in or register to post comments

बीटल्स चं सर्वात पहिल्यांदा

गवि
Tue, 05/15/2012 - 22:29 नवीन
बीटल्स चं सर्वात पहिल्यांदा ऐकलेलं गा णं आहे हे माझं बहुधा. माझ्याकडे जुन्या एल्पी आहेत. ये एकदा. माळ्यावरुन काढायला उंच माणसाची गरज आहे.. आणि त्याचा प्लेयय र जड आहे तो काढायला मजबूत माणसाची. दोन्हीसाठी तूच योग्य शिवाय त्या गाण्यांचा शौकीनही. मस्त गाणं आणलंस. धन्यु.
  • Log in or register to post comments

प्रास..

मुक्त विहारि
Tue, 05/15/2012 - 23:12 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर..
  • Log in or register to post comments

मस्तच!

मिहिर
Tue, 05/15/2012 - 23:19 नवीन
हा लेख आणि एकूणच लेखमाला खूप आवडली.
  • Log in or register to post comments

छान ओळख!

पैसा
Wed, 05/16/2012 - 14:17 नवीन
छान ओळख! गाण्याचे सगळे शब्द देतोयस हे फार छान!
  • Log in or register to post comments

वाह... बिटल्स म्हणजे अगदी जिव

महासंग्राम
गुरुवार, 10/06/2016 - 14:22 नवीन
वाह... बिटल्स म्हणजे अगदी जिव कि प्राणच आमचा खूप सुंदर लेख ... अवांतर : जॉन लेननच एक वाक्य आठवलं "Life is what happens to you while you're busy making other plans."
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा