✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

श्रावणाच्या कविता १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी

आ
आदिजोशी यांनी
Fri, 08/12/2011 - 11:05  ·  लेख
लेख
सद्ध्या श्रावण का काय ते सुरू असल्याने दारू हा केवळ बोलण्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता काही खास श्रावण स्पेशल कविता करायचे योजिले आहे. त्यातला हा पहिला पेग एका फांदीवरच्या समस्त कावळ्यांना अर्पण.
झिंगलेल्या बाबाची कहाणी
आपण बघतो की साधारण पणे बेवड्या माणसांच्या संसाराची, मुलांची अवस्था फार वाईट असते. बाबा दारू पिऊन घरी येतो, शेष नागासारखं घर डोक्यावर घेतो. पण ह्या सगळ्याला दुसरी बाजूही असते. दारूच्या बाबतीत बापसे बेटा सवाई असं घडलं तर काय होईल हेच बघण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत. सोफ्यावर निजलेला एक बंडू बाळ संपलेली दारू ओठा सुकलेली लाळ कामवली सखू बाई आली आज नाही धुतलेला ग्लास एक उरलेला नाही झोपेतच आता तुला पाजतो बशीत निजतच तरी पण ढोसशी खुशीत सांगायची आहे माझ्या बेवड्या मुला झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला आटपाट नगरात बार होते भारी दररोज राजा करी एकेकाची वारी रोज सकाळीस राजा निघताना बोले आंटी कडे जाणे काल राहूनिया गेले जमलेच नाही काल जाणे मला जरी आज परी जाणार मी वेळेतच बारी स्वप्नातल्या बार मधे मारू मग फेरी खर्या खुर्या पेगमधे दारू भरू भारी पाजीन मी थकलेल्या हातानी तुला झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला बारमधे उशिरा तू असतो बसून, भंडावला बाबा गेला दारूत बुडून. तास तास जातो खाल मानेने निघून, एक एक पेग जातो हळूच संपून. वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे, तुझ्या सोबत मी ही पुन्हा बसायला घ्यावे. उगाचच बेट काही लावावी तुझ्याशी, चिमुकले टकिला शॉट्स वाटावे तुझ्याशी. बरळत अडखळत बोलतोस काही ढोसताना भान तुला उरतच नाही चोरूनिया तुझा ग्लास संपवाया पाही दुरुनच आपल्याला बघणारी आई तरी सुद्धा दोघेजण दंगा मांडू असा चादरीला ग्लास देई ओलसर ठसा सांगायची आहे माझ्या बेवड्या मुला झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला ट्रे मधे लुकलुकलेला पहिला ग्लास, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा ओठी एक लार्ज. सोडा घालण्याआधी सुद्धा संपवलास तू खंबा, रांगत रांगत घेतलास जेव्हा बारचा तू ताबा. लुटू लुटू उभं रहात भरलास नवा ग्लास, तुझा अचाट स्टॅमीनासमोर बाबा हरला आज. असा गेलो आहे बाळा पुरा घाबरून हल्ली तुला ढोसताना पाहतो दुरून असा कसा बाळ देव बाबाला ह्या देतो खंबा घेऊन येतो आणि एकटाच पितो हातातून ग्लास तुझ्या जाई निसटून उरे काय तुझ्या माझ्या बाटली मधून जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी शिवी दारू साठी वाटे मला जणू एक ओवी माझ्यासाठी थोडी तरी ठेवशील का रे ढोसताना बाबा तुला आठवेल का रे बारला तू जाता जाता उंबरठ्यामधे बाबासाठी येईल का दारू ग्लास मधे -----x----- - आदि जोशी (कवितेतला बाबा मी नव्हे.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
8317 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

__/\__ मस्त!!!

रत्नागिरीकर
Fri, 08/12/2011 - 11:16 नवीन
__/\__ मस्त!!!
  • Log in or register to post comments

सूचना

आदिजोशी
Fri, 08/12/2011 - 11:16 नवीन
लिखाण आवडले आणि जर ते कुणाला पाठवावेसे वाटले तर नाव गाळून पाठवू नये. स्वतःचे लेख दुसर्‍याच्या नावावर मेल मधे बघायचा कंटाळा आलाय आता.
  • Log in or register to post comments

!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/12/2011 - 11:27 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) चालीत म्हणून बघितली....... एकदम चपखल आहे!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

किसन शिंदे
Fri, 08/12/2011 - 11:39 नवीन
हॅहॅहॅ :D :D सकुच्या चालीतच वाचली....चपखलपणे बसली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) =)) =)) फक्त ला

प्रीत-मोहर
Fri, 08/12/2011 - 12:01 नवीन
=)) =)) =)) =)) =)) फक्त ला ला ला ला ला... लालालालाला नवत .. तेवढ अ‍ॅड कर आदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

भारीच!!!! माझ्या भविष्यातली

दैत्य
Fri, 08/12/2011 - 11:32 नवीन
भारीच!!!! माझ्या भविष्यातली कथा तू आत्ताच मांडलीस..! ;)
  • Log in or register to post comments

वृत्तात अगदी परखड आपलं चपखल

llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/12/2011 - 11:32 नवीन
वृत्तात अगदी परखड आपलं चपखल बसली आहे. ;)
  • Log in or register to post comments

जबर्‍या

जे.पी.मॉर्गन
Fri, 08/12/2011 - 11:35 नवीन
हिडीssssssssस जमून आलिये ! आवडेश ! :) जे पी
  • Log in or register to post comments

कडक. ../\.. अभिज्ञ.

अभिज्ञ
Fri, 08/12/2011 - 11:40 नवीन
कडक. ../\.. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

बाब्बो

आदिजोशी
Fri, 08/12/2011 - 11:42 नवीन
तू जित्ता हायस व्हंय रे अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

तू जित्ता हायस व्हंय रे

बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/12/2011 - 16:08 नवीन
तू जित्ता हायस व्हंय रे अजून.
बघ ना! माझ्याही कविता वाचून मिळालेल्या आनंदावर पाणी फिरलं बघ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

हा हा हा! मस्त

सहज
Fri, 08/12/2011 - 11:45 नवीन
ही कविता इमेल मधुन हिंडणार पण आदिच्या नावाशिवाय. पक्षी: ही पौर्णीमा घाणेरणी. सहत्सु
  • Log in or register to post comments

हे केव्हाच सुरु झालंय. आताच

पिंगू
Fri, 08/12/2011 - 12:56 नवीन
हे केव्हाच सुरु झालंय. आताच एका सहकार्‍याला ही लिंक दिल्यावर तो बोललाच की आधी वाचली आहे म्हणून.. - पिंगू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

धमाल आली

पप्पु अंकल
Fri, 08/12/2011 - 11:46 नवीन
__/\__ काय जबरदस्त मांडणी एकदम आवडली
  • Log in or register to post comments

झक्कास रे.

Dhananjay Borgaonkar
Fri, 08/12/2011 - 12:01 नवीन
झक्कास रे. :)
  • Log in or register to post comments

कडक !!

सुहास झेले
Fri, 08/12/2011 - 12:04 नवीन
कडक !!
  • Log in or register to post comments

वृत्तात वगैरे

गवि
Fri, 08/12/2011 - 12:07 नवीन
वृत्तात वगैरे परफेक्ट.. धमाल... करुण धोधो हसलो.
  • Log in or register to post comments

आई ग!! मस्तच!!

स्वैर परी
Fri, 08/12/2011 - 12:09 नवीन
जमलिये!! आवडेश! :)
  • Log in or register to post comments

उत्तम! फॅन्टास्टीक! ग्रेट!

इंटरनेटस्नेही
Fri, 08/12/2011 - 12:15 नवीन
उत्तम! फॅन्टास्टीक! ग्रेट! ऑसम! वंडरफुल! अप्रतिम! कडक! चाबुक! जबरदस्त! आदि.. आमचा _/\_ प्रणाम स्वीकारावा!
  • Log in or register to post comments

वाह!!! वाह!!

मनराव
Fri, 08/12/2011 - 12:28 नवीन
मस्त जमलिये.........
  • Log in or register to post comments

मस्तच

प्रचेतस
Fri, 08/12/2011 - 12:32 नवीन
जबरदस्त...
  • Log in or register to post comments

:)

गणपा
Fri, 08/12/2011 - 12:59 नवीन
<गणेशा मोड> काही लोकांना कधी कळणार की विडंबन म्हटले की ते नेहमी बाई, बाटली, नशा, सिगारेट अश्याच गोष्टी भवती फिरत रहायचे नसते. असली विडंबन एकुन डोकच सपक झालेय. आवांतर : हक्काच्या कुरणात मनसोक्त चरतोय अ‍ॅड्या. =)) एक लंबर रे भावड्या.
  • Log in or register to post comments

<\ गणेशा मोड> टॅग उघडा राहिला

बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/12/2011 - 16:06 नवीन
<\ गणेशा मोड> टॅग उघडा राहिला होता तो बंद करतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तत्परता

श्रावण मोडक
Sat, 08/13/2011 - 16:39 नवीन
उघड्या गोष्टी बंद करण्यातली आपली तत्परता वाखाणण्याजोगीच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

भन्नाट!

अन्या दातार
Fri, 08/12/2011 - 12:42 नवीन
हहपुवा झाली.
  • Log in or register to post comments

मस्त अमोल केळकर

अमोल केळकर
Fri, 08/12/2011 - 12:46 नवीन
मस्त :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

लै भारी !

शाहिर
Fri, 08/12/2011 - 12:50 नवीन
ओरिगिनल एवढाच भारी आहे ..लढ्ढ बाप्पू
  • Log in or register to post comments

भन्नाट उतरलीय.. सॉरी,..

शैलेन्द्र
Fri, 08/12/2011 - 13:48 नवीन
भन्नाट उतरलीय.. सॉरी,.. चढलीय...
  • Log in or register to post comments

__/\__

सूड
Fri, 08/12/2011 - 13:52 नवीन
__/\__ :D
  • Log in or register to post comments

"झेंडूचे फूल"

तर्री
Fri, 08/12/2011 - 14:08 नवीन
झेंडूचे फूल टाईट विडंबन. आपल्या प्रतिभेला स.ला.म. संपलो.
  • Log in or register to post comments

तोडलस लेका !! १ नम्बर हे !!

आचारी
Fri, 08/12/2011 - 16:02 नवीन
तोडलस लेका !! १ नम्बर हे !!
  • Log in or register to post comments

बिचारा सन्दिप खरे !! आता खरेच

आचारी
Fri, 08/12/2011 - 16:04 नवीन
बिचारा सन्दिप खरे !! आता खरेच झिन्गायला लागेल हे वाचुन !!
  • Log in or register to post comments

बेक्कार !

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/12/2011 - 16:25 नवीन
एक लंबर पैल्या धारेची कविता अ‍ॅडीभौ. आता येतो आहेस तेंव्हा आपल्याकडून तुला एका जबर्‍यादस्त ओळीसाठी २ टकिला शॉटस ते पण किव्हाज चे सप्रेम.
उगाचच बेट काही लावावी तुझ्याशी, चिमुकले टकिला शॉट्स वाटावे तुझ्याशी.
  • Log in or register to post comments

एकच नंबर!!

श्रीरंग
Fri, 08/12/2011 - 18:25 नवीन
एकच नंबर!!
  • Log in or register to post comments

क ड आणी क!!

प्रभो
Fri, 08/12/2011 - 19:02 नवीन
क ड आणी क!!
  • Log in or register to post comments

मस्त....

सिद्धार्थ ४
Fri, 08/12/2011 - 20:03 नवीन
मजा आली वाचताना.....
  • Log in or register to post comments

खुप छान..

योगी९००
Fri, 08/12/2011 - 20:23 नवीन
खुप मजा आली वाचताना.. (तुमच्याच नावाने नॉर्वे मराठी मंडळाला आणि आमच्या फाटक हायस्कुल रत्नागिरी ग्रुपला ही कविता पाठवली...)
  • Log in or register to post comments

'बाबा' तुझे पाय कुठे

प्राजु
Fri, 08/12/2011 - 22:27 नवीन
'बाबा' तुझे पाय कुठे आहेत?? एकदम 'सरळ' चालीत बसतेय ही 'झिंगलेली' कविता. :)
  • Log in or register to post comments

मस्त!

रुपी
Fri, 08/12/2011 - 23:06 नवीन
>>हातातून ग्लास तुझ्या जाई निसटून << माझ्या हातातून (कॉफीचा) ग्लास निसटून जाणार होता. गाताना खूप मजा आली!
  • Log in or register to post comments

भीषण सुंदर!

पैसा
Fri, 08/12/2011 - 23:22 नवीन
गटारी संपली नाही काय अजून?
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन, आणि वर

५० फक्त
Sat, 08/13/2011 - 06:56 नवीन
मस्त विडंबन, आणि वर म्हणल्याप्रमाणे खरंच खरेंची उतरायची वेंळ आली आहे.
  • Log in or register to post comments

जबराट

नेत्रेश
Sat, 08/13/2011 - 07:07 नवीन
संदिप खरे तुझी सुपारी देणार आता.....
  • Log in or register to post comments

... मालक ...वाईट अशक्य !

कुळाचा_दीप
Sat, 08/13/2011 - 07:27 नवीन
... मालक ...वाईट अशक्य !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा