सद्ध्या श्रावण का काय ते सुरू असल्याने दारू हा केवळ बोलण्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता काही खास श्रावण स्पेशल कविता करायचे योजिले आहे.
त्यातला हा पहिला पेग एका फांदीवरच्या समस्त कावळ्यांना अर्पण.
झिंगलेल्या बाबाची कहाणी
आपण बघतो की साधारण पणे बेवड्या माणसांच्या संसाराची, मुलांची अवस्था फार वाईट असते. बाबा दारू पिऊन घरी येतो, शेष नागासारखं घर डोक्यावर घेतो. पण ह्या सगळ्याला दुसरी बाजूही असते. दारूच्या बाबतीत बापसे बेटा सवाई असं घडलं तर काय होईल हेच बघण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत.
सोफ्यावर निजलेला एक बंडू बाळ
संपलेली दारू ओठा सुकलेली लाळ
कामवली सखू बाई आली आज नाही
धुतलेला ग्लास एक उरलेला नाही
झोपेतच आता तुला पाजतो बशीत
निजतच तरी पण ढोसशी खुशीत
सांगायची आहे माझ्या बेवड्या मुला
झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला
आटपाट नगरात बार होते भारी
दररोज राजा करी एकेकाची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
आंटी कडे जाणे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल जाणे मला जरी
आज परी जाणार मी वेळेतच बारी
स्वप्नातल्या बार मधे मारू मग फेरी
खर्या खुर्या पेगमधे दारू भरू भारी
पाजीन मी थकलेल्या हातानी तुला
झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला
बारमधे उशिरा तू असतो बसून, भंडावला बाबा गेला दारूत बुडून. तास तास जातो खाल मानेने निघून, एक एक पेग जातो हळूच संपून. वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे, तुझ्या सोबत मी ही पुन्हा बसायला घ्यावे. उगाचच बेट काही लावावी तुझ्याशी, चिमुकले टकिला शॉट्स वाटावे तुझ्याशी.
बरळत अडखळत बोलतोस काही
ढोसताना भान तुला उरतच नाही
चोरूनिया तुझा ग्लास संपवाया पाही
दुरुनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
चादरीला ग्लास देई ओलसर ठसा
सांगायची आहे माझ्या बेवड्या मुला
झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला
ट्रे मधे लुकलुकलेला पहिला ग्लास, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा ओठी एक लार्ज. सोडा घालण्याआधी सुद्धा संपवलास तू खंबा, रांगत रांगत घेतलास जेव्हा बारचा तू ताबा. लुटू लुटू उभं रहात भरलास नवा ग्लास, तुझा अचाट स्टॅमीनासमोर बाबा हरला आज.
असा गेलो आहे बाळा पुरा घाबरून
हल्ली तुला ढोसताना पाहतो दुरून
असा कसा बाळ देव बाबाला ह्या देतो
खंबा घेऊन येतो आणि एकटाच पितो
हातातून ग्लास तुझ्या जाई निसटून
उरे काय तुझ्या माझ्या बाटली मधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी शिवी
दारू साठी वाटे मला जणू एक ओवी
माझ्यासाठी थोडी तरी ठेवशील का रे
ढोसताना बाबा तुला आठवेल का रे
बारला तू जाता जाता उंबरठ्यामधे
बाबासाठी येईल का दारू ग्लास मधे
-----x-----
- आदि जोशी
(कवितेतला बाबा मी नव्हे.)
प्रतिक्रिया
12 Aug 2011 - 11:16 am | रत्नागिरीकर
__/\__ मस्त!!!
12 Aug 2011 - 11:16 am | आदिजोशी
लिखाण आवडले आणि जर ते कुणाला पाठवावेसे वाटले तर नाव गाळून पाठवू नये. स्वतःचे लेख दुसर्याच्या नावावर मेल मधे बघायचा कंटाळा आलाय आता.
12 Aug 2011 - 11:27 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
चालीत म्हणून बघितली....... एकदम चपखल आहे!
12 Aug 2011 - 11:39 am | किसन शिंदे
हॅहॅहॅ :D :D
सकुच्या चालीतच वाचली....चपखलपणे बसली!
12 Aug 2011 - 12:01 pm | प्रीत-मोहर
=)) =)) =)) =)) =))
फक्त ला ला ला ला ला... लालालालाला नवत .. तेवढ अॅड कर आदी
12 Aug 2011 - 11:32 am | दैत्य
भारीच!!!! माझ्या भविष्यातली कथा तू आत्ताच मांडलीस..! ;)
12 Aug 2011 - 11:32 am | llपुण्याचे पेशवेll
वृत्तात अगदी परखड आपलं चपखल बसली आहे. ;)
12 Aug 2011 - 11:35 am | जे.पी.मॉर्गन
हिडीssssssssस जमून आलिये ! आवडेश ! :)
जे पी
12 Aug 2011 - 11:40 am | अभिज्ञ
कडक.
../\..
अभिज्ञ.
12 Aug 2011 - 11:42 am | आदिजोशी
तू जित्ता हायस व्हंय रे अजून.
12 Aug 2011 - 4:08 pm | बिपिन कार्यकर्ते
बघ ना! माझ्याही कविता वाचून मिळालेल्या आनंदावर पाणी फिरलं बघ! ;)
12 Aug 2011 - 11:45 am | सहज
ही कविता इमेल मधुन हिंडणार पण आदिच्या नावाशिवाय. पक्षी: ही पौर्णीमा घाणेरणी.
सहत्सु
12 Aug 2011 - 12:56 pm | पिंगू
हे केव्हाच सुरु झालंय. आताच एका सहकार्याला ही लिंक दिल्यावर तो बोललाच की आधी वाचली आहे म्हणून..
- पिंगू
12 Aug 2011 - 11:46 am | पप्पु अंकल
__/\__
काय जबरदस्त मांडणी
एकदम आवडली
12 Aug 2011 - 12:01 pm | Dhananjay Borgaonkar
झक्कास रे. :)
12 Aug 2011 - 12:04 pm | सुहास झेले
कडक !!
12 Aug 2011 - 12:07 pm | गवि
वृत्तात वगैरे परफेक्ट..
धमाल... करुण धोधो हसलो.
12 Aug 2011 - 12:09 pm | स्वैर परी
जमलिये!! आवडेश! :)
12 Aug 2011 - 12:15 pm | इंटरनेटस्नेही
उत्तम! फॅन्टास्टीक! ग्रेट! ऑसम! वंडरफुल! अप्रतिम! कडक! चाबुक! जबरदस्त!
आदि.. आमचा _/\_ प्रणाम स्वीकारावा!
12 Aug 2011 - 12:28 pm | मनराव
मस्त जमलिये.........
12 Aug 2011 - 12:32 pm | प्रचेतस
जबरदस्त...
12 Aug 2011 - 12:59 pm | गणपा
<गणेशा मोड> काही लोकांना कधी कळणार की विडंबन म्हटले की ते नेहमी बाई, बाटली, नशा, सिगारेट अश्याच गोष्टी भवती फिरत रहायचे नसते. असली विडंबन एकुन डोकच सपक झालेय.
आवांतर : हक्काच्या कुरणात मनसोक्त चरतोय अॅड्या. =))
एक लंबर रे भावड्या.
12 Aug 2011 - 4:06 pm | बिपिन कार्यकर्ते
<\ गणेशा मोड>
टॅग उघडा राहिला होता तो बंद करतोय.
;)
13 Aug 2011 - 4:39 pm | श्रावण मोडक
उघड्या गोष्टी बंद करण्यातली आपली तत्परता वाखाणण्याजोगीच. ;)
12 Aug 2011 - 12:42 pm | अन्या दातार
हहपुवा झाली.
12 Aug 2011 - 12:46 pm | अमोल केळकर
मस्त :)
अमोल केळकर
12 Aug 2011 - 12:50 pm | शाहिर
ओरिगिनल एवढाच भारी आहे ..लढ्ढ बाप्पू
12 Aug 2011 - 1:48 pm | शैलेन्द्र
भन्नाट उतरलीय.. सॉरी,.. चढलीय...
12 Aug 2011 - 1:52 pm | सूड
__/\__
:D
12 Aug 2011 - 2:08 pm | तर्री
झेंडूचे फूल टाईट विडंबन.
आपल्या प्रतिभेला स.ला.म.
संपलो.
12 Aug 2011 - 4:02 pm | आचारी
तोडलस लेका !! १ नम्बर हे !!
12 Aug 2011 - 4:04 pm | आचारी
बिचारा सन्दिप खरे !! आता खरेच झिन्गायला लागेल हे वाचुन !!
12 Aug 2011 - 4:25 pm | परिकथेतील राजकुमार
एक लंबर पैल्या धारेची कविता अॅडीभौ.
आता येतो आहेस तेंव्हा आपल्याकडून तुला एका जबर्यादस्त ओळीसाठी २ टकिला शॉटस ते पण किव्हाज चे सप्रेम.
12 Aug 2011 - 6:25 pm | श्रीरंग
एकच नंबर!!
12 Aug 2011 - 7:02 pm | प्रभो
क ड आणी क!!
12 Aug 2011 - 8:03 pm | सिद्धार्थ ४
मजा आली वाचताना.....
12 Aug 2011 - 8:23 pm | योगी९००
खुप मजा आली वाचताना..
(तुमच्याच नावाने नॉर्वे मराठी मंडळाला आणि आमच्या फाटक हायस्कुल रत्नागिरी ग्रुपला ही कविता पाठवली...)
12 Aug 2011 - 10:27 pm | प्राजु
'बाबा' तुझे पाय कुठे आहेत??
एकदम 'सरळ' चालीत बसतेय ही 'झिंगलेली' कविता. :)
12 Aug 2011 - 11:06 pm | रुपी
>>हातातून ग्लास तुझ्या जाई निसटून <<
माझ्या हातातून (कॉफीचा) ग्लास निसटून जाणार होता.
गाताना खूप मजा आली!
12 Aug 2011 - 11:22 pm | पैसा
गटारी संपली नाही काय अजून?
13 Aug 2011 - 6:56 am | ५० फक्त
मस्त विडंबन, आणि वर म्हणल्याप्रमाणे खरंच खरेंची उतरायची वेंळ आली आहे.
13 Aug 2011 - 7:07 am | नेत्रेश
संदिप खरे तुझी सुपारी देणार आता.....
13 Aug 2011 - 7:27 am | कुळाचा_दीप
... मालक ...वाईट अशक्य !