इम्रान आजही राजकारणात उतरून अशक्य ते शक्य करू पाहतोच आहे! शत्रूच्या देशातही लोकप्रियता मिळवणार्या थोड्या भाग्यवंतांपैकी एक, मला नेहमीच आवडतो.
१९८३ च्या ज्या टेस्ट सीरिजबद्दल तुम्ही लिहिलं आहे, त्यातही गावस्करने मला वाटतं एक शतक आणि ३ अर्धशतकं काढली होती. त्या काळात पाकिस्तानातल्या मॅचमधे भारताकडून एकटा गावस्कर आणि पाकिस्तानकडून १३ जण खेळतात असं म्हटलं जायचं. खुद्द इम्राननेही "मी पाहिलेला सर्वात "कॉम्पॅक्ट" फलंदाज म्हणून सनीची भलावण केली होती.
आपल्याला आजवर फक्त दोनच पाकडे आवडले. एक वसिम अक्रम आणि दुसरा अर्थातच इमरान खान.
लहानपणापासूनच 'पाकिस्तान म्हणजे आपलं शत्रूराष्ट्र' असं शिकवलं गेलेलं असताना 'बाबा, काका या इमरानची का सारखी स्तुती करतात?' असा प्रश्न मला पडायचा.
पण पुढे कळत गेलं चांगलं क्रिकेट जो खेळतो त्याला देशाच्या सीमा बांधून ठेवत नस्तात नि त्याचा धर्मही एकच असतो - क्रिकेट!
उत्तम लेख रे मृत्युंजया! बाकी हा प्रतिसाद इथं लिहिण्याचं कारण हे की वरील प्रतिसादातील "पाकिस्तानातल्या मॅचमधे भारताकडून एकटा गावस्कर आणि पाकिस्तानकडून १३ जण खेळतात असं म्हटलं जायचं. " या वाक्यावरून मला माईक गॅटींग-शकूर राणा चा प्रसंग आठवला.. मग जावेद अख्तरचं डोकं खाजवणं आठवलं.. नि मग नुसता हास्यकल्लोळ!!
आपल्याला आजवर फक्त दोनच पाकडे आवडले. एक वसिम अक्रम आणि दुसरा अर्थातच इमरान खान.
अगदी अगदी. झालंच तर हो-नाही करता करता मी त्यात इंझमामचेही नाव घालेन :)
(अक्रमभक्त)बेसनलाडू
हे पुष्पही छान झाले आहे. पुढील पुष्पे वाचण्यासाठी उत्सुक आहे.
(वाचनोत्सुक)बेसनलाडू
एकदम मस्त ..
इम्रान खान ने पाकिस्तानला विश्वकप जिंकुन दिल्या नंतर एका वर्षांनी क्रिकेट पाहयला लागलो होतो.. विश्वविजेते पाकिस्थान हे शब्द अजिबात आवडत नव्हते .... परंतु तरीही इम्रान खान बद्दल आपले पण वाटत होते .. असे वाटत होते .. कपिल च्या बरोबर हा आपल्या संघात हवा होता ... मज्जा आली असती ..
इम्रान खानचा प्रवास मात्र मला माहित नव्हता .. खरेच खुप खडतर होता.. मानसिक खच्चिकरण होण्याऐवजी ज्या त्वेशाने तो पुन्हा परत आला ते जबरदस्त ...एकदम आवडले ..
तुमचा दुसरा उर्मट शिलेदार ही आवडला ...
नावडत्या जिंकलेल्या संघातील आवडता प्लेअर ....
------
अवांतर : सचिन (विश्वकप २००३ /१९९६) याचा पण या लिस्ट मधेय नंबर असावा असे वाटते .. पण उर्मट हि उपाधी त्याला नसावीच .. त्याच्या बॅटला असेल तर काही हरकत नाहि ...
सचिन विरुद्ध शोएब असताना पाकिस्तानला चारलेली धुळ , जखमी असतानाही शतकाजवळ पोहचलेला सचिन .. खरेच काय मॅच होत्या त्या २००३ च्या.. लाजवाब ...
मृत्युन्जय....तुम्ही हा लेख जरी 'इम्रान खान' याच्यासाठी लिहिला असला (जो सुरेखच आहे, आणि त्याच्या एकूण क्रिकेट कारकिर्दीला न्याय देणारा असला तरी...) तरी माझ्यामते त्याच्या विश्वकप विजेतेपदाला खर्या अर्थाने कुणी योगदान दिले असले तर ते उपांत्य सामन्यातील 'इंझमान-उल-हक' च्या स्वप्नवत वाटणार्या तुफानी खेळीने. [मुळात पाकिस्तान केवळ 'वरूणराजा'च्या कृपाप्रसादाने सेमि-फायनलमध्ये प्रवेश करू शकले होते. लीगच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडविरूध्द त्यांच्या धावा झाल्या होत्या ~ सर्वबाद फक्त ७४....आणि इंग्लंड १ बाद २४ असताना धो-धो पडलेल्या पावसाने तो सामना अक्षरशः वाहून गेला, आणि 'अल्लामिया' ने पाकला १ गुण आयता बहाल केला...आणि हाच १ गुण ऑस्ट्रेलियाच्या बाद फेरीतील प्रवेशामधील अडथळा ठरला.....थोडेसे आणखीन अवांतर इथे ~ याच पावसाने उपान्त्य फेरीतून साऊथ आफ्रिकेलाही 'हकनाक' बाद केले होते. १३ चेंडूत २२ धावा असे लक्ष्य असताना, पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पुढे सामना सुरू झाला त्यावेळी 'रिव्हाईज्ड टार्गेट' झाले "एक चेंडू आणि २१ धावा...." सामन्याचा निकाल तिथेच लागला आणि इंग्लंड फायनलमध्ये....आणि असा हास्यास्पद प्रकार पुढील काळात कधीही घडला नाही ; त्यातूनच आज अस्तित्वात असलेला 'डकवर्थ-लुईस' नियम आला.....असो)
तुम्हाला आठवत असेलच की त्या सीझनमध्ये न्यूझिलंड संघाने मार्टिन क्रोच्या कप्तानपदाखाली अशी काही भरारी मारली होती...जणू काही विश्वचषकाचे ते संभाव्य विजेते वाटत होते (पुढे मार्टिन क्रो यालाच Man of the Series चा पुरस्कार मिळाला होता. उपांत्य फेरीतील क्रो ची प्रथम फलंदाजी करताना त्याची ती ९१ धावाची खेळी आणि त्यावेळी पर्वताएवढा वाटणारा २६२ धावाचा आकडा पाहताना सर्वाना त्यांच्या विजेतेपदाची आणि अंतिम फेरीतील प्रवेशाची खात्री पटलीच होती. त्यातही आमीर, रमीझ राजा, सलीम मलिक, इम्रान तंबूत परतले होते....आणि जावेद १०० चेंडू खेळूनही कसाबसा ४० पर्यंत येऊन थांबला होता...अशावेळी अजून 'बटाटा' न झालेले इंझमाम उल हक नावाचे पाकिस्तानचे नवे फाईंड तिथे आले आणि त्याने एका हाती ४८ चेंडूत ६० धावाचा पाऊस पाडून पाकिस्तानला स्वप्नवत वाटणारा विजय मिळवून दिला होता. अर्थात दुसरीकडे शांत राहून त्याला मार्गदर्शन करणारा सज्जड जावेदही होता, ज्याने १२५ चेंडूत नाबाद ५७ धावा काढल्या होत्या....(एक योगायोग म्हणजे जावेद मियाँदादने अंतिम सामन्यातही १२५ चेंडूत ५८ धावा काढून संघाचा धावफलक सशक्त केला होता. इथे इंझीने ४६ मध्ये ४२ धावा केल्या.)
साखळीतील ८ पैकी ७ सामने जिंकून रुबाबात असलेल्या त्यास्पर्धेतील न्यूझिलंडचा शेवट मात्र एका फलंदाजाच्या तुफानी खेळीने केला; तोही घरच्याच मैदानावर.....[आजतागायत न्यूझिलंड विश्वचषक जिंकू शकलेले नाही].
अंतिम सामन्याबद्दल तुम्ही लिहिलेले आहेच .....पण त्याचे श्रेय मात्र उपांत्य फेरीतील त्या अशक्य वाटणार्या विजयाकडे जाईल.
इन्द्रा
नक्कीच. किंबहुना असे म्हटले जाते की इम्रान खान केवळ जावेद मियांदाद आणि इन्झी च्या खेळाच्या बळावर यशस्वी झाला. अर्थात असा नकारार्थी सुर लावणारे थोडेच जण आहेत. तसेच म्हणायचे झाल्यास इम्रान खान जावेद मियांदाद आणि इन्झी यांच्याबरोबरच वासिम, वकार यांच्यामुळे यशस्वी झाला असे पण म्हणता येइल. लोक तसे म्हणत नाहीत कारण मग एक सर्वोत्तम टीम तयार करण्याचे श्रेय इम्रान खानकडे जाते.
मलाही इन्झी आणि जावेद मियांदाद बद्दल लिहायची खुप इच्छा झाली होती. खासकरुन जावेद मियांदाद बद्दल. पण मग ते मकीसारखे झाले असते. ती कशी इतरांचे धागे हेक करते (असा तिच्यावर आरोप होतो) तसा हा धागा मग जावेद मियांदाद ने हॅक केला असता. मला ते नको होते. त्यामुळे इंझी आणि जावेद मियांदाद यांना वगळले. या दोघांचेहे योगदान असामान्य होते. जावेद मियांदाद इनिंग अँकर करायचा तर इंझी धावगती भन्नाट वाढवायचा.
जावेद मियांदादपेक्षा या लेखमालिकेसाठी इम्रान खानला पसंती देण्याचे एक कारण त्याची विजिगिषु वृत्ती आणि एक अष्टपैलु कर्णधार म्हणुन कामगिरी. बाकी दोघेही सारखेच उर्मट होते. :)
मृत्यंजय धन्स
विश्व चषक जिंकण्याचे संपूर्ण श्रेय हे इम्रान खान ह्यास जाते .
इम्रान खान चे राजकारण आल्यावर पहिल्या निवडणुकी साठी निधी जमवायला युके मध्ये एका जाहीर सभारंभात त्याने मस्त भाषण ठोकले .त्यात त्याने विश्व चषक स्पर्ध्धेसाठी केलेल्या तयारीचे सविस्तर वर्णन आहे .
त्याचा शेवटचा विश्व चषक म्हणून कि काय त्याच्याकडे संघ निवडायचे सर्वाधिकार आले .( सिलेक्तर होते .पण ह्याच्या हातात सूत्र होती .) तशी ती त्याने आधीच घेतली होती .वासिम आणि वकार हे जगातील माझ्या मत्ते सर्वत्तोम गोलंदाजांची जोडी इम्रान खान ह्याने शोधली .(अगदी अनाहूत पणे हे हिरे त्याला गवसले .) त्यांना स्वताच्या तालमीत तयार केले .अर्थात इनस्विंग हे त्याचे मुख्य अस्त्र पण त्याचे शागीर्द त्याच्या दोन कदम पुढे जाऊन स्विंग गोलंदाज बनले.
इमरान ने मुख्य स्पर्ध्धेच्या एक वर्षा आधीपासून संघ जमावाला सुरवात केली .
गोलंदाजी त्यांची मजबूत होती .
त्याला मधल्या फळीसाठी फलंदाज हवा होता .एका सरावाच्या वेळी (कोणी ते नावात आठवत नाही .) सांगितले '' एक मोटा लडका हे लेकीन . गेंद पे नजर अच्छी हे''.त्याला लगेच पाचारण करायला इम्रान ने सांगितले .
प्रथम दर्शनी इम्रान म्हणाला '' ये क्या बेटिंग करेगा ''
पण सरावात त्याने चेंडू भिरकवायला सुरवात केली आणि संघात जागा पक्की केली .(त्याआधी तो अगदीच प्राथमिक स्तरावर खेळायचा .पण त्याच्याकडे सरावासाठी एक वर्ष होते .)
इंझी मुळे निवडसमितील एक सदस्य आणि इमरान मध्ये राडा झाला .पण इम्रान हट्टाला पेटला म्हणून इंझी संघात येऊ शकला .
डावपेच ते एक संघभावना निर्माण करण्यात इम्रान यशस्वी झाला .
त्याचा इनस्विंग म्हणजे इंगळी डसावी तसा होता .
कुठे तरी वाचले होते .
पहिल्यांदा सचिन जेव्हा पाकिस्तानात मध्ये इम्रान चा इनस्विंग खेळला तेव्हा त्याचे पहिले बोल होते '' एक फुट आत घुसला ''
अर्थात त्याच्या बहराच्या काळात तो भलताच उद्दाम होता .
एका कसोटी सामन्यात तो भारतीय संघाला म्हणाला '' कशाला सैन्य /पैसा वाया घालवायचा .आज जो जितेगा काश्मीर उसगा हो जायेगा .
हा किस्सा त्याने भारतात एका शो दरम्यान सांगितला .व अनेक पाकिस्तानी कलीग फुशारकी मारून हा किस्सा मला ऐकवतात .
(माझ्या कडे आता वीरूने सचिनचा सांगितलेला किस्सा आहे '' .बाप ...)
वासिम आणि वकार हे जगातील माझ्या मत्ते सर्वत्तोम गोलंदाजांची जोडी इम्रान खान ह्याने शोधली .(अगदी अनाहूत पणे हे हिरे त्याला गवसले .) त्यांना स्वताच्या तालमीत तयार केले .
एकदम बरोबर. किंबहुना जेव्हा वासिम अक्रमने पदार्पण केले तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय सामन्याचा तर सोडाच, देशांतर्गत स्पर्धेचा सुद्धा फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे तो प्रत्येक षटका आधी इम्रान खान कडे सल्ला मागायचा की चेंडु कसा टाकावा. त्याच्याकडे प्रतिभा तर मुळात होतीच, इम्रान खानच्या सल्ल्याबर्हुकुम तो व्यवस्थित गोलंदाजी करु शकायचा. सुरुवातीचे काही दिवस गोलंदाजी त्याची आनि डोके इम्रानचे होते. नंतर अर्थातच वासिम अक्रम महान गोलंदाज झाला. मला तर त्याचाअ प्रचंड तिटकारा होता. त्याला आम्ही "वासिम अक्रम पुरता चक्रम" म्हणायचो. इम्रान खानला सुद्धा एक मित्र "इम्रान खान संडास घाण" म्हणायचा. त्या वयात त्या दोघांबद्दलही प्रचंड तिटकारा होता.
वासिम अक्रम आणि वकार बद्दल बोलताना एकदा इम्रान म्हणाला होता की वासिम अक्रम वकार पेक्षा कितीतरी आधिक गुणवान गोलंदाज आहे परंतु वकारकडे प्रचंड विजिगिषु वृत्ती आहे तो कधीही हार मानत नाही, त्याच्याकडे किलर इंस्टिंक्ट आहे जे वासिम कडे कमी आहे.
कडक लेखमाला आहे. पाकड्या असुनही इम्रान खान कायमच आवडला. फक्त एकदाच डोक्यात गेला होता. 'सचिन तेंडुलकर मॅच विनर नाही' हे त्याचे आचरट विधान अजूनही लक्षात आहे.
प्रतिक्रिया
मस्त...
अशक्य ते शक्य!
आपल्याला आजवर फक्त दोनच पाकडे
आपल्याला आजवर फक्त दोनच पाकडे आवडले
एकदम मस्त .. इम्रान खान ने
उपान्त्य फेरीतील विजय....!
नक्कीच. किंबहुना असे म्हटले
पुन्हा एकदा झकास
रिवर्स स्विंग चा रचिला तू पाया .वकार ,वसीम ने कळस चढविला
वासिम आणि वकार हे जगातील
अब किसकी बारी
कडक लेखमाला आहे. पाकड्या
इम्रान खान असणार असे पहिला
छान लिहिलेस. आवडलं
अतिशय
ह्यो बी लेख तुफ्फान!