Skip to main content

एक मराठा लाख मराठा

लेखक खिलजि यांनी बुधवार, 25/07/2018 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
" एक मराठा लाख मराठा " पूर्वी गुंजला होता नाद गिनीज बुकात नाव नोंदवुनी मराठ्यांनी घेतली होती दाद नव्हता कुणाचा अंकुश तेथे नव्हते कुणीही नेते गल्लोगल्ली येऊनि मिसळले लाख लाख मराठे काकासाहेब गेले बुडुनी (?) झाला मोठा आघात बंद पुकारला खरा तरीही पण चढला हिंसेचा माज मी हि मराठा तरी भेदत आलो चक्रव्हुय ते सारे शांततेतच खरा जोर असे नको हिंसेचे वारे मराठा असूनही आज मला वाटत आहे लाज पुन्हा रोवूया अटकेपार झेंडा नको आरक्षणाचा साज सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचने 69102
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

ही कविता तुमी लिव्हली ?? खर न्हाय वाटत , लैच बेस काम क्येलय बघा !!!

In reply to by सोमनाथ खांदवे

बस्स काय खांदवे भाऊ , मी स्वतःच लिवतो आणि सोडून देतो आंजावर . या मराठा आंदोलनाबद्दल आणि त्यानुषंगाने पुकारलेल्या बंद बद्दल माझं जे काही मत आहे ते मी या कवितेत मांडले आहे . आतापर्यंत ५८ मोर्चे निघाले तेव्हा साधा कागदही रस्त्यावर पडू दिला नाही मराठ्यांनी , सर्व काही शांततेत पार पडलं . साऱ्या जगात कौतुक झालं . पण आता हे असं कसं काय घडलं कि कुणी मुद्दाम घडवून आणलं याची खोलवर चौकशी व्हावी असं वाटत .

नको आरक्षणाचा साज ठार निषेध !! मराठा समजाच्या भावना दुखाऊ नका . आरक्षण ही केवळ मागणी नाही , गरज आहे गरज ! आणि कोंबडं झाकुन ठेवलं म्हणुन सुर्योदय होण्याचं टळत नाही ! कोणी किती ही विरोध करा , मराठा आरक्षण होणारच आणि नुसते होणारच नाही तर अन्य अरक्षणांप्रमाणे यावश्चंद्रदिवाकरौ रहाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

मित्रा , मला तुझ्या भावना समाजतायत पण काल जे घडलं ते योग्य नव्हतं आणि त्याचे समर्थन मी कधीच करणार नाही . अर्थात ते घडलं कि कुणी मुद्दाम घडवून आणलं , नाव खराब करायला ते बघायला हवं . हे राजकारण , आपल्याला आजून काय काय दिवस दाखवणार आहे ते तो वरचाच जाणे . सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by एमी

हा प्रतिसाद खवचतपणे दिलेला आहे.
>>>> तुम्हाला असं का वाटलं ? संदर्भासहित स्पष्टीकरण द्या नाहीतर चुकीचे आरोप केल्य्याबद्दल माफी मागा ! मराठा समजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आमची पहिल्या पासुन ठाम भुमिका आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

मराठा समजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आमची पहिल्या पासुन ठाम भुमिका आहे ! -> तुमची अशी भूमिका का आहे ते अधिक सविस्तर सांगू शकाल का?

In reply to by एमी

तुमची अशी भूमिका का आहे ते अधिक सविस्तर सांगू शकाल का? >>>> सांगतो पण त्या आधी तुम्हाला माझा इतका स्पष्ट लिहिलेला प्रतिसाद खवचट का वाटाला ते सांगु शकाल ?

In reply to by प्रसाद गोडबोले

कारण मराठा आरक्षणाला इतकं स्पष्ट/ठाम + प्रामाणिक समर्थन मिपावर + मराठा नसलेल्याकडून पाहिल्याच आठवत नाहीय.... चुभूद्याघ्या. तो प्रतिसाद खवचट नसेल तर माफ करा माझ्या आकलनात चूक झाली _/\_

In reply to by एमी

तुमची अशी भूमिका का आहे ते अधिक सविस्तर सांगू शकाल का?
मराठा समाजतील सर्वच जण पुढारलेले आहेत हा बर्‍याच लोकांचा गैरसमज आहे. काही शहरातील किंव्वा श्रीमंत गावातील जमीनदार मराठा वर्ग पुढारलेला आहे बाकी बहुतांश मराठा समाज हा मागासलेलाच आहे. त्यांना ही समान संधी मिळालेल्या नाहीत . अगदी SC ST इतका सामाजिक मागसले पणा नसल तरीही किमान OBC इतका मागासले पणा नक्कीच आहे . आता काही स्वतःच्या पहाण्यात आलेली उदाहरणे सांगतो, मी सातार्‍यात राहिलो आहे , आणि पहिल्यापासुन स्पष्ट बोलण्याची सवय असल्याने कट्टर सनातनी असुनही माझे सर्वच्या सर्व जातीतले मित्र होते. मझ्य कॉलेजात मी चौथा रॅन्कर होतो आणि माझ्या पेक्षा वर ३ मुली होत्या ज्या मराठा समजतील होत्या. केवळ इंजिनियरिंग / मेडिकल ची फी भरता येणे शक्य नाही म्हणुन बी.एस.स्सी ला अ‍ॅडमिशन घ्यावे लागले होते त्यांना . त्या तिघिंपैकी कोणाच्याच घरची आर्थिक स्थिती बक्कळ नव्हती . सर्वच्या सर्व दुरवर असलेल्या खेड्यातुन प्रवास करुन कॉलेजला येत. केवळ वडीलोपार्जित थोडीफार शेती आहे म्हणुन ह्यांना सामाजिक दृष्ट्या प्रगत म्हणात येईल का ? जी अवस्था ओ.बी.सी समाजाची होती तीच मराठा समाजाची होती. एक मराठा समाजतील मित्र तर दररोज ठोसेघर वरुन सातार्‍यात कॉलेजला येत होता सायकल वरुन ! येताना समजु शकतो पण जाताना ?? आय. कान्ट इव्हन इमॅजिन ! शहरात रहाण्या इतकी आर्थिक सुब्बत्ताच नव्हती ! काय करणार ! आता ह्या लोकांना सामाजिक दृष्ट्या समान संधी मिळाल्या असे कसे म्हणता येईल ? हे सामाजिक दृष्ट्या पुढारर्लेले आहेत असे कसे म्हणता येईल ? आणि ही परिस्थीती सातार्‍यासारख्या बर्‍यापैकी मोठ्ठ्या शहरातील आहे , अन्य छोट्या खेड्यापाड्यात काय अवस्था असेल ? आर्थिक मागासलेपण हे सामाजिक मागासलेपणाचे एक लक्षण आहेच आहे ! अर्थात तरीही आरक्षण हे जाती आधारितच असले पाहिजेल . नाकरल्या गेलेल्या संधी हाच आरक्षणाचा बेसिस असला पाहिजे. मराठा समाजातील थोडाफार एलिट वर्ग वगळता बहुतांश मराठा समाजाला ह्या व्याखेनुसार आरक्षण मिळायला हवे असे माझे प्रांजळ मत आहे ! (हा तर्क ब्राह्मणा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला लागु पडत नाही , ब्राह्मणांमधील गरीबी ही कर्तृत्व शुन्यतेमुळे आलेली आहे संधीच्या अभावाने नाही , हे मला माझ्या एका मराठा समाजातील ज्येष्ठ हितचिंतकाने समजाऊन सांगितले होते आणि हे मला अगदी १००% पटते ! ब्राह्मण समाजाला कायमच शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत्या, अगदी वार लाऊन जेवायला घालणारीही अनेक ब्राह्मण कुटुंबे होती. मला स्वताला किमान १०-१२ ब्राह्मण संस्थांनी , ५-६ ब्राह्मण लोकांनी वैयक्तीकली , आणि अन्य समजातील किमान २०-३० व्यक्तींनी शिक्षणात मदत केलेली आहे , ब्राह्मणांना शिक्षणाची , सामाजिक अन आर्थिक प्रगतीच्या संधींची दारे कायमच ओपन होती, आता आमचे पुर्वज केशवाय नमः नारायणाय नमः मध्ये अलप्संतुष्ट होते खुष होते त्याचा दोष अन्य समाजाला कसा देणार ? ब्राह्मणांनी आर्थिक निकषावर आरक्षण मागणे मला तरी पटत नाही. कोणी गरीब ब्राह्मण पहाण्यात आला तर मी त्याला वैयक्तिक माझ्या खिशातुन आर्थिक मदत करेन, पण सरकारने त्याला आरक्षण द्यावे ही मागणी अनाकलनीय आहे किमान मला तरी! ) अवांतर : बाकी ह्या आरक्षण शब्दाला काहीतरी विचित्र अर्थ प्राप्त झाल आहे , अमेरिकेत वाप्रतात तो शब्द किती तरी भारी आहे - अ‍ॅफरमेटीव्ह अ‍ॅक्शन !! आरक्षण हा जन्मसिध्द अधिकार नाही की कुबड्या नाहीत की कोणी तरी सर्कार ने केलेला उपकार नाही , ते केवळ एक अ‍ॅफरमेटीव्ह अ‍ॅक्शन आहे समाजामध्ये समानता येण्यासाठी केलेली ! अवांतर २ : बाकी मराठा समाजातील मान्यवर मात्र आरक्षण मागताना सेल्फ गोल करुन बसलेत . परवाच्या त्यांच्या पत्रकात म्हणाले की - मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक प्रमुख कर्ता आणि वडिलधारा समाज आहे तुम्ही जर स्वतःहुनच म्हणत असल की तुम्ही कर्ते वडीलधारे आहात तर मग सामाजिक मागासले पण हा मुद्दाच खोडुन काढला जातो ना ? मग आरक्षण कोणत्या मुद्द्यावर देणार ? एकीकडे मागास म्हणुन आरक्षण मागणे आणि एकीकडे वडीलधारे (पक्षी क्षत्रिय वगैरे) म्हणुन मिरवणे हे सेल्फ कॉन्ट्रॅडिक्शन आहे ! तुम्हाला एकदा एक काय ते ठरावावे लागेल .

मला वाटतं की आपण काय करतोय याची कल्पना नाही आपल्याला. मराठा असाल आणी असे लिहित असाल तर पुढे जाऊन काय होईल याची कल्पना नाही. पुलेशू

मला वाटतं की आपण काय करतोय याची कल्पना नाही आपल्याला. मराठा असाल आणी असे लिहित असाल तर पुढे जाऊन काय होईल याची कल्पना नाही. पुलेशू

In reply to by शिवाय

मित्रा , हा सिद्धेश्वर विलास पाटणकर उर्फ खिलजी , शंभर नंबरी ( ९६ कुलीन ) मराठा आहे रे .. माझे गोत्र भारद्वाज. पूर्वीचे आडनाव साळुंखे , " पाटण " चे वतन महाराजांकडून मिळाले म्हणून कालानुपरत्वे पाटणकर झालो . आजही आम्हाला आमच्या गावाकडे अदबीने " सरकार " असे म्हंटले जाते . माझी बायको हि तर फलटणचे जमीनदार " स्व श्री श्री लालासाहेब राजेनिंबाळकर " यांची नातं . ती देखील राजघराण्यातली . अजून इतर काही माहिती हवी असल्यास व्यनि करेन. अजून के मित्रा , मी परिणामांना कधीच घाबरलो नाही आणि पुढे घाबरणारही नाही . माझी काळजी तू करू नकोस , माझे दोन हात , दोन तलवारींप्रमाणे आहेत आणि गरज पडेल तेव्हा मी माझे कर्तृत्व सिद्ध करत आलोय तेसुद्धा समोर कितीही फौजफाटा असला तरीही. असं समाज कि हा एक मराठा , लाख मराठ्याप्रमाणे आहे ...

In reply to by खिलजि

एक नं ललकारी दिलीस खिलजी भाऊ !!! निर्मळ मनाची माणस शब्दांचा खेळ , मग त्यातुन जातीपाती च राजकारण , मग एका विशिष्ट उच्च भृ भू भू समाजाचा कंपू बनवून बाकीच्या नां झोडून काढणे असले प्रकार करत नाही . खिलजी भाऊ नीं ' जय शिवाजी !! जय भवानी ' घोषणा दिल्याच्या आवेशात म्यांनातून तलवार बाहेर काढली पण समोर कोणी थांबलेच नाही .

In reply to by खिलजि

तुमची भूमिका सुसंगत अाहे. बरोबर चूक सोडून देऊ. तुंम्हाला घराण्याचा, जातीचा अाभिमान अाहे व अारक्षणाचा ‘साज’ नको अाहे. पण अांदोलनकर्त्यांना काय हवे अाहे? त्यांना हे सर्व हवे अाहे अाणि शिवाय जातीमुळे कोणतीही संधी, प्रतिष्ठा, शिक्षण नाकारले गेले नसूनही, अारक्षणही पाहिजे. त्यांची भूमिका सुसंगत दिसत नाही. जातीमुळे अारक्षण मिळालेली माणसं अशी जात जाहीरपणे ‘मिरवू’ शकत नाहीत, कारण त्यांना हिणवले जाण्याची, पात्रता असूनही कमी लेखले जाण्याची सामाजिक भिती असते. ‘ग्रेट मराठा’ लिहीलेल्या मोडक्या रिक्षा, भज्याच्या गाड्या अनेक दिसतात. अार्थिक गरीबी असली, तरी जातीचा अभिमान जात नाही. अशांनी जातीच्या अाधारावर अारक्षण मागणे खरोखर विसंगत वाटते. तुमच्या भूमिकेशी सहमत अाहे, फक्त ती अांदोलनकर्त्या मराठा बांधवांना पटवून कोण देणार हाच प्रश्न अाहे.

तोडफोड, हिंसा झाली हे वाईटच पण नको आरक्षणाचा साज -> याच्याशी असहमत आहे. आरक्षणाची मागणी का होते आहे याचा विचार करायला हवा सगळ्यांनीच. कारण सगळ्या प्रश्नांवर आरक्षण हेच एक उत्तर नसलं तरी प्रश्न आहेत हे नक्की. === मला थोडा वेगळाच प्रश्न पडला आहे: जर मराठा मतपेढी ३२-३५% असेल तर हा फारच मोठा आकडा आहे. २०१९ मधे तो कसा वागेल यावर बरेच अवलंबून राहील. यांना सध्याचे भाजप, फडणवीस, मोदी नकोच आहेत पण परत काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाण्याचीदेखील इच्छा नाही कारण तिकडे आधीच भ्रमनिरास झालेला आहे. दुसरी एक रोचक बाब म्हणजे इतके मराठा मोर्चे होऊनही, शेतकऱ्यांचे खरच काही प्रोब्लेम आहेत हे मान्य असूनही सध्याचे विचारवन्त आणि सत्ताधारी दोघेही यांना दादागिरी करणारे म्हणूनच बघतायत. हा गावाशी नाळ तुटलेल्या शहरी/पुस्तकी विचारवन्तांचा steriotypeला बळी पडलेला limited दृष्टिकोन आहे कि खरंच मराठ्याचा behavioural प्रॉब्लेम आहे ते कळत नाही. खरंच मराठ्याचा behavioural प्रॉब्लेम असेल हे मान्य करणे अवघड जाते कारण इतक्या मोठ्या लोकसंख्येला एकाच साच्यात बसवणे अशक्य/अयोग्य आहे

In reply to by एमी

त्यामुळे आता मला स्व/कम्पू घोषित विचारवंत, डावे वगैरेंबद्दलच शंका वाटू लागली आहे. नक्की काय हवं आहे यांना? २०१९ निवडणूकसाठी यांचा काही प्लॅन आहे का? एका मोठ्या मतपेढीला एकत्र आणावं अस यांना वाटत नाही का? शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सोडवायचे नाहीतच का कोणाला? कि ते शेतकरी म्हणून समोर येण्याऐवजी मराठा म्हणून समोर येतायत हाच प्रॉब्लेम आहे? आर्थिक मागासनाच आरक्षण द्यावे या फसव्या युक्तिवादाला बळी पडत चाललेल्या मराठ्यांचे नीट प्रबोधन करावे असे वाटत नाही का कोनाला? ते भिडे वगैरेंच्या नादी लागून भीमा कोरेगावला दगडफेक करणाऱ्यांबद्दल काही बोलायलालाच नको. एका मोठ्या लोकसंख्येला प्रखर हिंदुत्ववाद पासून दूर नेण्याची संधी वाया घालवली जात आहे असे वाटते.... असो. आपल्या हातात काहीच नाही त्यामुळे जे जे होईल ते ते पहावे...

In reply to by एमी

न्यायसंस्था वेळ घालवत असेल तर राज्यघटनेतील संबंधीत तरतुदी बदलाव्यात. शेवटी जनतेचे राज्य म्हणजे लोकशाही. राज्यघटना जनतेस हवी तशी ठेवावी हे सर्वात उत्तम.

In reply to by एमी

....तरी प्रश्न आहेत हे नक्की.
सर्व आयोगांचे ज्यात मागासवर्गीय आयोग तसेच महाराष्ट्र लोक्सेवा आयोग इत्यादींचे सर्व कामकाज आणि न्यायालयीन कामाचे लाईव्ह प्रसारण करावे. शिवाय महाराष्ट्र लोक्सेवा आयोगाचे संचालक मंडळावर ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांच्या जाती जाहीर करुन मराठा समाजास समान संधी का मिळू शकली नाही याची सार्वजनिक चौकशीचे लाईव्ह टेलीकास्टींग करुन मिडीया ट्रायल करावे म्हणजे तरी जनतेला प्रश्न नीट समजतील.

In reply to by माहितगार

आरक्षणाचा जांगडगुत्ता रमेश जाधव राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावर व्यक्त केलेल्या मतावरून सध्या गदारोळ माजला आहे. "दलित आणि आदिवासी या समाजांच्या आरक्षणाबद्दल कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. अन्य घटकांच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आरक्षणाबाबत माझी स्वच्छ भूमिका आहे. अन्य घटकांबाबत आरक्षणाचा निर्णय घेताना जातीनिहाय विचार करून नये. त्याऐवजी जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, तो कोणत्याही जातीचा असो, त्याला आरक्षण मिळाले पाहिजे,`` असे पवार म्हणाले. आपल्या देशात आरक्षण हे आर्थिक निकषावर नव्हे तर सामाजिक आधारावर दिले जाते. आर्थिक निकषावर आरक्षणासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल, पण घटनेच्या मूळ ढांच्याला हात लावता येत नाही, मग हा पेच सोडविण्याचा अन्य मार्ग कुठला असा उपप्रश्न त्यावर राज ठाकरेंनी विचारायला पाहिजे होता. तसे घडले नाही. त्यामुळे पवारांच्या अर्धवट विधानावरूनच सगळीकडे चर्चेचे फड रंगले आहेत. मुळात मराठा, जाट, पाटीदार यासारख्या शेतकरी जाती आरक्षण का मागत आहेत, याच्या खोलात गेले पाहिजे. आरक्षणाची ही मागणी म्हणजे रोगाचे लक्षण आहे, मूळ आजार शेतीची दुरवस्था हाच आहे. त्यातून निर्माण झालेले हे प्रश्न आहेत. जेव्हा आपल्याला ताप येतो, तेव्हा तो ताप हे दुसऱ्या एखाद्या गंभीर रोगाचे लक्षण असू शकतो. अशा वेळी मूळ दुखण्यावर इलाज करण्याऐवजी तापावरची औषधं घेऊन उपयोग नसतो. अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शेती हा आतबट्ट्याचा आणि दिवाळखोरीचा धंदा झाला आहे. त्यामुळे शेतीतून बाहेर पडून नवीन संधी शोधण्याशिवाय गत्यंतर नाही. सरकारी नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललीय. दर्जाहीन शिक्षण इतर क्षेत्रातल्या संधी हस्तगत करण्यासाठी कुचकामी ठरतेय. शेतीतून बाहेर पडू पाहणाऱ्या लोकसंख्येला सामावून घेऊ शकेल, इतकी औद्योगिक व सेवा क्षेत्राची वाढ झालेली नाहीयै. अर्थव्यवस्थेची वाट लागलीय. जे सध्या नोकरीवर आहेत, त्यांच्या नोकऱ्या चालल्यात. उच्च शिक्षित बेकारांच्या फौजा तयार होतायत. अशी कोंडी झालेल्या तरूणांना `मागास जातींना आरक्षण मिळत असल्यामुळे आपल्या संधी हिरावल्या जातायत` ही मांडणी दिशाभूल करणारी असली तरी पटणे साहिजक आहे. कारण ते ज्या अवस्थेमधून जात आहेत, त्यातून `आपण या व्यवस्थेचे बळी आहोत,` ही भावना मूळ धरणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आरक्षणाचे गाजर हा मोबिलायजेशनचा मुख्य मुद्दा बनतो. समजा वादासाठी असं गृहित धरू की दलित, आदिवासी व्यतिरिक्त इतर जातींसाठी आर्थिक निकषावर आरक्षण लागू झालं तरी त्यातून त्या समाजातील अशा किती मोठ्या घटकाला लाभ होणार आहे? हे आरक्षण प्रामुख्याने सरकारी नोकऱ्या आणि सरकारी शिक्षणसंस्थांतील प्रवेशासाठी लागू असेल. खासगी क्षेत्रात तर आरक्षण नाही. आज सरकारी नोकऱ्यांची उपलब्धताच तोकडी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या तीन वर्षांत ६९ पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल दीड लाखाच्या घरात आहे. सरकारी शिक्षणसंस्थांतील जागाही मोजक्याच आहेत. ही अशी सगळी परिस्थिती असूनही आरक्षण हाच एकमेव उपाय असल्याची हाकाटी पिटणे कितपत योग्य ठरते? आरक्षण हे सामाजिक न्यायाचे तत्त्व अंमलात आणण्यासाठी आहे, तो काही गरीबी निर्मुलनाचा कार्यक्रम नाही, याचा विसर पडल्याने हा पेच निर्माण झाला आहे. तसेच आरक्षण ही कुबडी आहे, सक्षम झाल्यानंतर ती कुबडी फेकून दिली पाहिजे; ना की त्या कुबडीची व्याप्ती वाढवून आणखी समाजगटांना त्यात सामावून घेण्याचा आटापिटा केला पाहिजे, याकडे आपण जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहोत. आदिवासी, दलितेतर जातींतल्या आर्थिकदृष्ट्या गरीब तरूणांची कोंडी, त्यांचा उद्रेक, त्यांचा संताप जेन्युईन नाही का? तर शंभर टक्के आहे. पण आरक्षण हा त्यावरचा उपाय असल्याची मांडणी करणे ही आत्मवंचना आहे. या तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या आकांक्षांना न्याय देण्यासाठी इतर सिस्टिम्स, व्यवस्था, मार्ग उभे करण्यात आलेले अपयश हे या आत्मवंचनेला कारणीभूत आहे. त्यामुळे या वर्गासाठी एक नवीन कार्यक्रम आखणे हीच आपली पुढची दिशा असली पाहिजे. शरद पवारांनी मराठा आरक्षणाला पूर्वी स्पष्ट शब्दांत विरोध केलेला होता. परंतु नंतरच्या टप्प्यात हा मुद्दा राजकीय बनून इतक्या टोकाला गेला की त्यांना राजकीय अपरिहार्यतेपोटी का होईना आपल्या भूमिकेला मुरड घालावी लागली. आज ते अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर जातींसाठी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण असलं पाहिजे, अशी भूमिका मांडत असतील तर त्याला `दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याचा प्रयत्न` म्हणून उडवून लावणे योग्य ठरणार नाही. आरक्षण हा उपाय खचितच नाही, पण या आर्थिकदृष्ट्या मागास तरूणांचा कन्सर्न अॅड्रेस केलाच पाहिजे, हाच पवारांच्या भूमिकेचा आशय आहे. एक प्रकारे मराठा आरक्षणाचा विषय इतःपर राजकीय अजेंड्यावर राहणार नाही, हेच त्यांनी सूचित केलं आहे. सत्तर हजार लोकांना रोजगार देणारा हणमंत गायकवाड (बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख) हाच तुमचा आयकॉन असला पाहिजे असे या मुलाखतीत सांगून ते जो मेसेज देत आहेत, त्याला काही महत्त्व आहे की नाही ? जनाधार (मास बेस) असलेल्या नेत्याला एकदम टोकाची भूमिका घेता येत नाही, त्याला हळूहळू समाजमनाला आकार द्यावा लागतो. त्या नेत्याच्या भूमिकेतील विसंगतींवर बोट ठेवलेच पाहिजे पण त्याची दिशा योग्य आहे की नाही यावरूनही त्याचे मूल्यमापन करायला हवे. शरद पवार किंवा भालचंद्र नेमाडे जी विधाने करत असतात ती शब्दशः घेऊन उपयोग नसतो; त्यातला `बिटविन दि लाईन्स` अन्वयार्थ लक्षात घेतला नाही तर फसगत होण्याचीच शक्यता जास्त. खरं तर पवारांच्या भूमिकेवर अधिक व्यापक परिप्रेक्ष्यात आणि अधिक खोल पाण्यात उतरून टीका केली पाहिजे, प्रतिवाद आणि विरोध केला पाहिजे. ही प्रगल्भता आज दिसत नाही. काठावर बसून पाण्यात खडे फेकण्यापलिकडे आपली काही भूमिका व जबाबदारी आहे, याची जाणीव नसलेले पत्रकार, अभ्यासक, कार्यकर्ते आणि कथित (स्वयंघोषित) विचारवंत यांचा सुकाळ झाला की पवारांसारख्या व्यक्तींचं ना खरंखुरं मूल्यमापन होतं, ना त्यांच्या चुकीच्या गोष्टींना ठाम विरोध होतो. आरक्षण ही समान संधींचा अवकाश उपलब्ध करून देणारी कुबडी आहे, हत्यार नव्हे याचा विसर पडलेला आपला समाज आहे. अमेरिकेत जशी `अफर्मेटिव्ह अॅक्शन` झाली, तशी स्थिती आपल्या समाजात आहे का? गोऱ्यांनी वर्चस्ववादी भूमिका घेऊन आपल्याला संधी नाकारल्यामुळे आपण मागे पडलो; आता त्या संधी हस्तगत करून त्यांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्याहून अधिक चांगला परफॉर्मन्स आपण देऊ ही तिथली विजिगिषू वृत्ती आपल्या समाजात आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातींकडे दिसते का? त्याच्या वरताण म्हणजे `त्यांना आरक्षण मिळतंय तर आम्हालाही द्या` ही याचकाची वृत्तीच अधिक आक्रमक होऊन आपल्याकडे इतर जाती मांडत आहेत. ज्ञानाची आस आणि संपत्तीनिर्मितीचा ध्यास याला कवडीचंही महत्त्व नसलेल्या समाजाचं हेच भाग्यध्येय असणार. आजच्या पर्यावरणात अशी आस आणि ध्यास असलेला समाज (सोसायटी) निर्माण करणं हा आज एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा अजेन्डा असणं शक्य आहे का, याचं आपणही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हे आपलं `कलेक्टिव्ह फेल्युअर` आहे. उद्या समजा ऑक्सफर्ड किंवा हार्वर्ड विद्यापीठाचा कुलगुरू आपण शक्य ते सगळे प्रयत्न करून भारतात आणला आणि त्याच्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या किंवा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी सोपवली तर काय होईल? एक तर तो इथल्या कुलगुरूंसारखाच होऊन जाईल किंवा कंटाळून निघून जाईल. कारण इन्स्टिट्युशन्स उभारण्याचं महत्त्व आपण विसरून गेलो आहोत. नेहरूंच्या काळात ज्या इन्स्टिट्युशन्स उभ्या राहिल्या (त्यासाठी अनेकांनी गाडून घेऊन काम केलं) त्या पलीकडे आपण फार काही मजल मारलीय असं दिसत नाही. आधुनिकता या मुल्याचा स्वीकार करताना आपली जी गोची झालीय किंवा जो पेच आपण ओढवून घेतला आहे, त्यावरून आपली एकंदर धारणा आणि जडणघडण कशी आकारला आली यावर प्रकाश पडतो. त्यातून सध्याच्या या कोंडीचं गणित काही प्रमाणात सुटतं. ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक सुनिल तांबे यांना इथे उध्दृत करणं मला आवश्यक वाटतं. तांबे लिहितात- ``आधुनिकता म्हणजे प्रगतीविषयीची नवी कल्पना स्वीकारणे, त्या कल्पनेवर आधारित नवा जीवनमार्ग स्वीकारणे, आपल्या समाजापुढील प्रश्नांचे यथार्थ स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करणे, त्या प्रश्नाच्या सोडवणुकीची जबाबदारी स्वीकारणे आणि त्यासाठी सतत कृतिशील राहणे. स्वातंत्र्य, व्यक्तिमूल्य, इहवाद (सेक्युलॅरिझम), समता ही आधुनिक मूल्यं मानली जातात. ह्या मुल्यांची पायाभरणी युरोपातील पुनरूज्जीवन आणि प्रबोधन या सांस्कृतिक आंदोलनांमध्ये झाली. या सांस्कृतिक आंदोलनांनी औद्योगिक क्रांतीला जन्म दिला. निसर्ग आणि मानवी समाजाचे नियम जाणून घेणं, त्या नियमांचं सखोल ज्ञान मिळवणं आणि त्या ज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञान व समाजाची रचना करणं याला प्रबोधनाची विचारसरणी म्हणतात. युरोप आणि अमेरिका खंडांतील राष्ट्रांनी वा समाजांनी आधुनिक मूल्यांना अनुरूप अशी नवी समाज-संस्कृती घडवली. युरोपियन देशांचा वसाहतवाद, साम्राज्यवाद यांच्यामार्फत आधुनिकतेचा परिचय जगातील अन्य समाज संस्कृतींना झाला. तंत्रज्ञानामार्फत ही आधुनिकता जगभर पसरली. मात्र आधुनिक मूल्यं जगभर रूजलेली नाहीत. ऐहिक निष्ठा आणि आधुनिकता प्रामाणिकपणे कशा स्वीकारायच्या हा प्रश्न बहुसंख्य बिगर युरोपियन राष्ट्रांपुढे आहे. आपल्या भौतिक प्रगतीसाठी एक समर्थ हत्यार म्हणजे आधुनिकता अशी धारणा बहुसंख्य भारतीयांची आहे. अमेरिका असो की युरोप, आधुनिकता हा जनआंदोलनाचा अजेंडा होता. त्यातून तिथे क्रांती झाली. राजाचे अधिकार मर्यादीत झाले वा केवळ देखाव्यापुरते उरले वा राजाला सुळावर चढवण्यात आलं. भारतात आधुनिकता हा सरकारचा कार्यक्रम होता आणि तो तसाच असायला हवा अशी बहुतेक पुरोगाम्यांची धारणा आहे. राखीव जागा असणार, असायला हव्यात याबद्दल एकमत असायला हवं. मात्र लाभधारकांच्या निश्चितीबाबत वेगळी व्यवस्था वा मेथॉडॉलॉजी शोधायला हवी. अशी मेथॉडॉलॉजी की जी विविध घटकांना न्याय देईल.`` शेती किंवा पशुपालन या क्षेत्रांत शेकडो वर्षांपासून काम करत असलेल्या अनेक जाती आपल्याकडे आहेत. या जातींकडे विशिष्ट, दुर्मिळ कौशल्यसंपदा (स्किलसेट) आहे. या संपदेचा उपयोग करून त्यांच्या विकासासाठी नवीन प्रारूप आकाराला यावं, अशा प्रकारची रचना आपण का उभी करू शकत नाही? त्यांच्या उत्थानासाठीही सरकारी नोकरीतील आरक्षण या `सब घोडे बारा टक्के` छापाच्या कार्यक्रमाखेरीज अन्य कार्यक्रम का असू शकत नाही? या जातींकडे असलेल्या गुणसंपदेचा सरकारी नोकरीत काय परिपोष होणार आहे? सजल कुलकर्णी हे तरूण संशोधक स्थानिक पशुप्रजाती व लोकसमुहांचे अभ्यासक आहेत. आपल्याकडील दुधाळ गायी-म्हशींच्या स्थानिक जाती हुडकणे आणि त्यांचे पालन करणाऱ्या समुहांचे ज्ञान विकसित करणे, त्यांच्या दुधाला आणि मूल्यवर्धित उत्पादनांना बाजारपेठ विकसित करणे हा मार्ग चोखाळला पाहिजे, अशी मांडणी ते सातत्याने करत आहेत. धनगरांनी त्यांच्या पशुपालनाच्या ज्ञानाचा, कौशल्यांचा विकास करायला हवा; त्यातून त्यांचे आर्थिक सामाजिक प्रश्न सुटायला हवेत; त्यासाठी त्यांना योग्य संधी आणि एनॅबलिंग वातावरण तयार करण्याची जबाबदारी सरकारची आहे अशा पध्दतीने आपल्याकडे विचार होत नाही, असे ते म्हणतात. अशा दृष्टिकोनाऐवजी धनगरांना सरकारी नोकरीत आरक्षण, राखीव जागा देणे हाच त्यांच्या प्रगतीचा एकमेव मार्ग असल्याचा निष्कर्ष आपण काढून ठेवलेला आहे. ज्ञानाची आणि लक्ष्मीची उपेक्षा करण्यात आपण मास्टरी मिळवली आहे. मग हा आरक्षणाचा जांगडगुत्ता सुटणार कसा?

In reply to by एमी

अ‍ॅमी ताई आपण स्वतःच्या मताच्या विरोधातला लेख का कॉपी पेस्ट केला आहे ? 'वैचारीक गोंधळ' आहे की 'वैचारीक कोलांटउडी; की विरुद्ध बाजूचे मत की अजून काही वेगळे कारण आहे ?

In reply to by माहितगार

प्रश्न काय आहेत आणि त्यावर दीर्घकालीन उत्तर काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न.

In reply to by एमी

...प्रश्न काय आहेत आणि त्यावर दीर्घकालीन उत्तर काय आहे......
या गोष्टी विवेकाशी संबंधीत असतात -त्यावर चर्चा करु नये असे नाही; पण जिथे विवेकापेक्षा भावनिक परसेप्शन, मतपेटीचे आणि उत्पातमुल्य अधिक असणार आहे. जिथ पर्यंत न्यायालय स्विकारते तिथपर्यंत आरक्षण द्यायचे हे नक्की आहे आणि न्यायालय नाही म्हणाले तर उत्पात आणि हिंसा आणि झूंडशाही किंवा निवडणूकातील मतपेटीचा प्रभाव म्हणून राज्यघटना बदलण्या शिवाय संसद सदस्यांना पर्याय असणार नाही हि ज्या राजकारणाची दिशा स्पष्ट आहे तिथे खरे प्रश्न आणि नेमक्या विश्लेषणाची बूज शिल्लक रहाण्याची शक्यता कितपत आहे ? एखाद खिलजी कविता लिहील दोनचार त्यांचे समर्थन करतील दोघे चौघे विश्लेषण करतील पण जे व्हायचे नक्की आहे ते होऊन रहाणार हे माहित असताना, त्याची चिंता का पडलेली आहे . हि चर्चा चालू असताना सरकारी नौकर्‍यांची संख्या तर मर्यादीत आहे. आरक्षण उपलब्ध असूनही सरकारी नौकरीत नंबर न लागणारे ओबीसी काय करतात ह्याची चर्चा झाली तर हे आरक्षण पदरात पडूनही सरकारी नौकरीचा लाभ न होणार्‍या बहुसंख्य मराठा समाजा समोरच्या खर्‍या आव्हानांची चर्चा कदाचित होऊ शकावी . पण अशा चर्चांची क्षमता महाराष्ट्रीयात असती तर चळवळींच्या दिशा बर्‍याच वेगळ्या राहील्या असत्या असे वाटून जाते. अशी वाक्ये भविष्यातील इतिहास संशोधंकांना रेकॉर्डवर असे वाक्य दिसले होते हो या पलिकडे याची वास्तव किंमत काही नसावी. असो.

In reply to by एमी

अँमी ताई, मला आपला प्रबोधनाचा मुद्दा पटला. खरंच समाजप्रबोधनाची नितांत गरज आहे . आपल्या संपूर्ण देशाला एक ठेवण्यासाठी , देश सध्या तरी दूर ठेवूया , राज्याला एक ठेवण्यासाठी , चांगले लोकनेते प्रत्येक पक्षात असणे गरजेचे आहे . इथे त्यातच आपण चुकत आहोत . सध्या निवडणूक पक्षाच्या नावाखाली लढवली जाते आणि उभे राहतात वरिष्ठांच्या मार्जीतलेच . ते काय प्रबोधन करणार . मी तर म्हणतो , निवडणुकीला उभे राहण्यासाठीच काहीतरी कायदा असावा . पात्रतेचा निकष असावा .

In reply to by एमी

पुन्हा एकदा आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे दळण- प्रा.हरी नरके या देशातील बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स आणि थिंक टॅंकमधील श्रेष्ठी जी विषयपत्रिका ठरवतात, ती सामान्य माणसांच्या गळी उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. कितीही वेळा ते पराभूत झाले तरी चिवटपणाने लढत राहतात. थोडीशी फट दिसली की लगेच आपला अजेंडा [मुद्दा] पुढे सरकवतात. आता पुन्हा आले दिल्लीकरांच्या मना आणि सुत्रांच्या नावे एक पिल्लू सोडण्यात आले. लगेच पुन्हा एकदा आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे दळण माध्यमांनी सुरू केले. आधी त्याबाबतची वस्तुस्थिती तरी समजावून घेऊया. 1. आधुनिक चाणक्य पं.प्र. नरसिंहराव यांच्या सरकारने मंडल आयोगाविरूद्ध पेटविण्यात आलेला दंगा आटोक्यात आणण्यासाठी एक खेळी केली. 25 सप्टेंबर 1991 रोजी त्यांनी आर्थिक निकषांवर 10% आरक्षण घोषित केले. सवर्ण समाजातील सर्व गरिबांना ते मिळणार होते. मात्र 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधिशांच्या बेंचने ते घटनाबाह्य ठरवून रद्द केले होते. [इंद्र साहनी वि. भारत सरकार, म्हणजेच मंडल आयोगाची केस.] 2. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे केस लॉ असतो. तो रद्द करण्यासाठी घटना दुरूस्तीच करावी लागते. आता तो पर्याय सुचवला जातो आहे. मात्र अशी घटना दुरुस्ती केली तर ती ही घटनाबाह्य ठरेल व ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असे त्या बेंचमध्ये असलेले न्या.पी.बी.सावंत यांनी लिहिले आहे. [ पाहा- प्रा. अशोक बुद्धीवंत, मराठा ओबीसीकरण, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, 2009, प्रस्तावना, पृ. 10 ते 12] न्या.सावंत म्हणतात, "विद्यमान आरक्षण हे जात, जमात व गट केंद्रीत आहे. व्यक्ती विशिष्ट गटाची आहे म्हणून तिच्यावर आजपर्यंत अन्याय झालेला आहे व आजही होत आहे म्हणुन त्या व्यक्तीला आरक्षणाचा फायदा दिलेला आहे. व्यक्ती म्हणून दिलेला नाही. त्या गटाची सदस्य म्हणून दिलेला आहे. आर्थिक आधारावरचे आरक्षण हे व्यक्तीकेंद्रीत होणारे असल्याने तेथे समतेच्या तत्वाचा भंग होणार आहे. त्यामुळे घटनादुरूस्ती करूनही आर्थिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही." 3. राज्यघटनेत आरक्षणाला जात, जमात, वर्ग हा निकष लावताना त्याबाबत सविस्तर उहापोह झालेला आहे. [पाहा- CAD भारतीय संविधान परिषद वृत्तांत, खंड 1 ते 12, लोकसभा सचिवालय, भारत सरकार, नवी दिल्ली] आपल्या घटनेत अनु.जाती, अनु.जमाती आणि इतर मागास वर्ग यांनाच आरक्षण देण्याची तरतूद आहे. इ.मा.व ची व्याख्या करताना त्यात आर्थिक निकष लावलेला नाही. तो विचारपुर्वक गाळलेला आहे. त्यात फक्त सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा निर्देश आहे. ओबीसीमध्ये एखादी जात समाविष्ट करायची असेल तर त्याची 23 गुणांची एक सुची असते. त्यातले 12 गुण सामाजिक मागसलेपणाला, 8 गुण शैक्षणिक मागासलेपणाला व 3 गुण आर्थिक मागासपणाला दिलेले असतात. यात 23 पैकी किमान 12 गुण मिळाले तरच ती जात ओबीसीत समाविष्ट केली जाते. आर्थिक निकष का नको? 4. आरक्षणामुळे शिक्षण व नोकरी मिळते त्यामुळे जरी आर्थिक उन्नती होत असली तरी तो प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मात्र सध्या सर्वत्र आरक्षण म्हणजे गरिबी निर्मुलन असे समीकरण बनवण्यात आलेले आहे. देशातील बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स आणि थिंक टॅंकमधील श्रेष्ठी यांचा कल आर्थिक निकष लावून आरक्षण द्यावे याकडे झुकलेला आहे. 5. गरिबी हटावसाठीही घटनेने कलम 38, 39, 41 व 46 मध्ये तरतूद केलेली आहे. त्यातूनच बीपीएल [दारिद्र्य रेषेखालील गरिबांसाठी] पिवळे रेशनकार्ड, स्वस्त धान्य, आरोग्य, शिक्षण योजना आल्यात. बीपीएलमध्ये नसणारांसाठी केसरी रेशनकार्ड व इतर उपाययोजना आहेत. त्यात वाढ करायला हवी. गरिबांना न्याय मिळायलाच हवा. देशातील सर्व गरीबांसाठी भरीव आणि कार्यक्षम कृतीकार्यक्रम आखणे अत्यावश्यक आहे याबद्दल दुमत नाही. 6. मुलत: सामाजिक अन्याय, शोषण आणि पक्षपात व भेदभाव यातून आलेली समाजरचना ज्यांना शिक्षण, प्रगती, उन्नती यांची संधी नाकारते त्यांना विशेष संधी देणे, अन्यायाची भरपाई करणे, परिमार्जन करणे हा उद्देश आरक्षणामागे असल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने आजवर अनेक वेळा जातीवर आधारित आरक्षण उचलून धरलेले आहे. 7. आपल्या समाजव्यवस्थेत जातनिहाय व्यवसाय ठरवून दिलेले होते. ही व्यवस्था किमान 2800 वर्षे या देशात होती. व्यवसाय हाच उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परिणामी जातीव्यवस्थेनेच कामाच्या वाटपाद्वारे गरीब -श्रीमंत कोण राहणार याची व्यवस्था केलेली होती. आजही देशातील सगळे हलके, कष्टाचे आणि निकृष्ठ व्यवसाय व उद्योगधंदे हे स्त्रिया, दलित, आदिवासी, ओबीसीच करतात. याउलट कमी श्रमाचे, सामाजिक प्रतिष्ठा असलेले, बुद्धी व ज्ञानावर आधारित कामधंदे उच्च वर्णांचे लोक करतात. जोवर कामावरून जात ओळखता येते तोवर आधार जातच राहाणार. 8. समजा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर ते सर्व जाती-धर्मांच्या लोकांना दिले जाईल. म्हणजेच एससी, एसटी, ओबीसींना गट व आर्थिक आधार असे दुहेरी आरक्षण द्यावे लागेल आणि तेही घटनाविरोधी ठरेल. 9. आजही देशातल्या बहुतेक सर्व संसाधनांची, [जमीन, हवा, पाणी, उर्जा, संपत्ती यांची ] मालकी ही त्र्यैवर्णिकांचीच आहे. मनुस्मृती गेली पण मनुस्मृतीची मानसिकता गेली का? मालकीचे वाटप बदलले का? आजही देशातले 99%+ विवाह जातीतल्या जातीत होतात. लग्नं जातीत, संघटना जातीच्या, धर्मशाळा, कितीतरी बॅंका आणि आणखी काय जातीचे पण आरक्षण मात्र आर्थिक निकषांवर हवे हा दुटप्पीपणा नाही? आजही सर्व शंकराचार्य, सर्व धर्मसत्ता एका विशिष्ट वर्णाच्या हाती, राजसत्ता दुसर्या वर्णाच्या हाती तर अर्थसत्ता [ शेयरमार्केट, कारखाने, व्यापार ] तिसर्या वर्णांच्या हाती आहे. याला कोणाचाच आक्षेप नाही. हे मनूने दिलेले आरक्षणच आहे. ते आजही चालते. धर्माधिकारी नेमताना त्यांची गुणवता तपासणारी विद्यापीठाच्या धर्तीवर परीक्षा घ्या आणि त्या परीक्षेला सर्व हिंदूंना स्त्री-पुरूषांना बसू द्या अशी मागणी बाबासाहेबांनी 100 वर्षांपुर्वी केली होती. ती आजही मान्य झालेली नाही. ती नियुक्ती जातीवर का? 10. जाती/लिंगावर आधारित आरक्षण नसते तर राजसत्ता, अर्थसत्ता, प्रशासन सत्ता, न्यायसत्ता, ज्ञानसत्ता, माध्यमसत्ता, मतं घडवणारे- ओपिनियन मेकर आदींमध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसींना स्थान मिळाले असते का? 11.आर्थिक आधारावर आरक्षण देणे याचा अर्थ आयकर भरणारे 3-4 कोटी लोक सोडले तर उरलेल्या 125 कोटी भारतीयांना आरक्षण देणे होय. 12. पैसा/गरिबी/श्रीमंती ही कधीही बदलणारी बाब आहे. आज आहे, उद्या नाही. कमी उत्पन्नाचा दाखला मिळवणे ही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच सर्वात सोपी गोष्ट आहे. 13. ज्या देशात फक्त 10% पैसेवाले आयकर भरतात व 90 टक्के पैसेवाले तो चोरतात त्या देशात आर्थिक आधारावर आरक्षण देणे ही भ्रामक गोष्ट आहे. 14. राजकीय आरक्षण, [ निवडणुकीतले आरक्षण ] आर्थिक आधारावर कसे द्यायचे याचा खुलासा जाणते लोक करतील काय? 15. ओबीसींना शिक्षण व नोकरीतील आरक्षणासाठी क्रिमी लेयर असते. मात्र पंचायत राज्यातील [ग्राम पंचायत, पंचायत समिती, जि.प. न.प. मनपा ]यातील आरक्षणसाठी क्रिमी लेयर तत्व लावलेले नाही हे किती लोकांना माहित आहे? 16. ओबीसी ठरवताना सामाजिक व शैक्षणिक आधार आणि एकदा ती जात ओबीसी ठरल्यावर त्यातल्या खर्या गरजू व होतकरूंना आरक्षण मिळावे म्हणून त्यानंतर क्रिमीलेयरचे तत्व सर्वोच्च न्यायालयाने लावलेले आहे. हा विषय अतिशय ज्वलंत, स्फोटक, वादग्रस्त असल्याने फक्त आर्थिक निकष एव्हढा एकच मुद्दा चर्चेला घेतलेला आहे. खुसपट काढण्यासाठी, बुद्धीभेद करण्यासाठी इतर मुद्दे पुढे करू नयेत. ज्यांना याबाबतचे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आजवरचे निकाल, घटनात्मक तरतुदी यांची माहिती नसेल त्यांनी कृपया ती आधी करून घ्यावी. शाळकरी, पोरकट, बालीश आणि दांभिक मुद्दे उपस्थित करून टाईमपास करू नये. उगीच खिजवू नये. असल्या कॉंमेंट्स उडवल्या जातील. - प्रा.हरी नरके

In reply to by एमी

आरक्षणाची मागणी का होते आहे याचा विचार करायला हवा सगळ्यांनीच. कारण सगळ्या प्रश्नांवर आरक्षण हेच एक उत्तर नसलं तरी प्रश्न आहेत हे नक्की. -> https://www.maayboli.com/node/66915?page=2#new इथला 'डब्बा बाटली' या आयडीचा प्रतिसाद वाचनीय आहे.

In reply to by एमी

कारण सगळ्या प्रश्नांवर आरक्षण हेच एक उत्तर नसलं तरी प्रश्न आहेत हे नक्की. -> डॉ.बाबासाहेब : शेतकर्यांचे सच्चे मित्र शंभर वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर "स्माल होल्डींग्ज इन इंडीया" हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता. 1. शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन अशी शेतं एकत्र करून शेतकर्याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला. 2. बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्या बोजाची. शेतीवर ज्याकाळात 80 टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले 60 टके लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे. 3. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल. 4. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत. 5. शेतीला 24 तास आणि 365 दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात. 6. शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी. असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी 100 वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब 100 वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते. त्यांनी कुलाबा [आताचा रायगड] जिल्ह्यात शेतकरी समुदायाची आंदोलनं संघटित केली. विधीमंडळावर शेतकर्यांचे मोर्चे काढले. त्यांच्या "स्वतंत्र मजूर पक्षातर्फे" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारलं होतं. त्या चळवळीमुळंच पुढं कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली. शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले. देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले. आज राज्यात जेव्हा भीषण दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचं बघणारा आवाका चकीत करून जातो. डॉ. बाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचं प्रतिक बनलेले आहेत. खरंतर ते सच्चे शेतकरी मित्र होते आणि सर्वांना कसायला जमीनी मिळायला हव्यात अशी त्यांची भुमिका होती. त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता. -- प्रा. हरी नरके

In reply to by एमी

...त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता.
हम्म

फक्त मरा ठा म्हणून जातीनिहाय मागणी का असा वी? ती ही शतकानु शतके सत्ताधारी असलेल्या जाती ने ही माग णी करावी का? मुळात आपल्यात ताकद असताना, आपल्याला बुद्धी मिळालेली असताना, शेतज मिनी सारखा आधार असताना कुणीच आरक्षण वापरु नये असे प्रामाणिक पणे वाटते. त्याच वेळी जे ख रेच वंचित आहेत त्यांना ते मिळावेच. पण आपल्याला फक्त राडे करण्यात आणि सोपे र स्ते निवडण्यात रस आहे असे वाटते अनेकदा. बायदवे, भिड्यान्च्या ज्या भाषणाने कोरेगाव पेटले असे म्हणता - त्या भाषणाचा रेफरन्स द्याल का? मला फारच उत्सुकता आहे.

कुणालाही आरक्षण मिळाले किंवा नाही मिळाले तरी मला पर्सनली काहीच फरक पडणार नाहिये. प ण आश्चर्य मात्र खूप वा टते(च)

>> आर्थिक मागासनाच आरक्षण द्यावे या फसव्या युक्तिवादाला बळी पडत चाललेल्या मराठ्यांचे नीट प्रबोधन करावे असे वाटत नाही का कोनाला? घटनेनुसार अारक्षण हे केवळ सामाजिक मागासलेपणाच्या निकषांवरच दिले जाऊ शकते, तो गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. म्हणून तो युक्तीवाद फसवा अाहे का? का दुसरे काही कारण अाहे ज्यामुळे याला अापण फसवा युक्तीवाद म्हणत अाहात? प्रबोधनाचे म्हणत असाल, तर असे प्रबोधन कुणीही त्यांचे करायला जाणे अवघड दिसते. ती त्या नेत्याची राजकीय अात्महत्याच ठरण्याची शक्यता अाहे. मराठ्यांना इतर सर्व मागास समाजटांगप्रमाणे संधी नाकारण्यात अालेली नव्हती, असे कोणी सांगू जाणे, अाणि ते ऐकणे, या परिस्थितीत खरेच अवघड दिसते.

In reply to by एमी

...जातीतोडोची लढाई आपण गमावलेलीच आहे,...निखील वागळे
* हि लढाई गमावणारे आपण म्हणजे नेमके कोण ?

In reply to by माहितगार

आपण म्हणजे सगळेच आले त्यात. सगळ्या जातीचे. "खरंतर मी जन्माने क्ष पण जातपात मानत नाही" असे सांगणारेदेखील ;)

In reply to by चौथा कोनाडा

रोचक पण त्या व्यासपिठावरचे आज तिघे हयात नाहीत आणि चौथे मनोहर जोशींना आजच्या राजकारणात स्थान नाही.

In reply to by चौथा कोनाडा

देशमुखांनी काय तोडगा सुचवला होता हे कोणीतरी थोडक्यात लिहू शकेल का? काही कारणास्तव मी व्हिडिओ बघू शकत नाही

In reply to by एमी

अँमी ताई , स्व श्री विलासराव देशमुखांनी आपल्या भाषणात खालील मुद्दा अधोरेखित केलेला आहे . " जर आरक्षणावरून उद्भवणारा संघर्ष टाळायचा असेल तर जातीनिहाय आरक्षण ना देता , आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे . असे जर झाले तर पुढे भविष्यात कुणालाही जात पडताळणी करायची गरजच भासणार नाही आणि त्या अनुषंगाने जातीयवादी संघर्ष पण उफाळून येणार नाही . " सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by खिलजि

अच्छा. धन्यवाद. 'केवळ' आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यास माझा विरोधच असेल. जातीवर आधारित आरक्षण देऊन मग त्यात क्रिमी लेयर वगळणे किंवा त्यात आर्थिक मागास अशी सबकॅटेगरी करणे याला समर्थन आहे.

आताच आलेल्या ताज्या बातमीनुसार कोपरखैराणेत ( नवी मुंबई ), जिथे मी सध्या काम करतोय तेथे लष्कराला पाचारण केले आहे . सध्या तणावपूर्ण शांतता आहे तिथे . कालचा बंद असताना तिथे पूर्व वैमनस्यातून एका नगरसेवकाचे घर फोडले , त्याच्या मालमत्तेची वाट लावली . निमित्त ठरला मराठ्यांचा बंद . हे असे व्हायला नको असे मनापासून वाटते . आता बघू पुढे काय होते ते ..

In reply to by पुंबा

अतिशय रोचक माहिती आहे या धाग्यात. मराठी अनुवाद करुन समजाऊन घ्यायला लागेल. कुणी इंग्रजी जाणकार मराठीत अनुवाद/गोषवारा देईल का ?

मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे काय , ह्यासंबंधीचा रोचक धागा "The three groups demanding OBC status and, in turn, access to reservations (quotas), are already closer to the upper castes than to the more disadvantaged groups in their respective states. Their anxieties seem to be based more on perception than on empirical evidence. An overwhelming amount of evidence suggests that these communities are not the most marginalised in their respective states; additionally, these jatis have consolidated their advantage over the marginalised groups and have narrowed gaps with the dominant groups in their respective states between 2004–05 and 2011–12. " Jats, Marathas, and Patels Want Quotas, But Do They Need Them?

खिलजि, मराठ्यांनी आरक्षणाच्या सापळ्यात अडकू नये हे माझं स्पष्ट मत आहे. साधा प्रश्न आहे, शिवाजीमहाराज कोणत्या आरक्षणामुळे जागी सर्वत्र तळपले? एक सोडून दोनदा तत्कालीन जगातली सर्वात मोठी युद्धं (१७६१ चं पानिपत व १८५७ चं स्वातंत्र्ययुद्ध) मराठ्यांनी कसल्या आरक्षणाच्या जोरावर लढली? उगीच काहीतरी फालतू बकवास चाललाय. एकंदरीत माझ्या मते चालू आंदोलनाचं फडणवीस हेच एकमेव लक्ष्य आहेत. मराठा आरक्षण हे केवळ निमित्त आहे. खरं अघोषित आरक्षण मुख्यमंत्रीपद हे आहे. राज्यातल्या मराठा प्रस्थापितांना एक ब्राह्मण मुख्यमंत्री फक्त कामाच्या जोरावर जनतेत लोकप्रिय होतोय हे पाहवंत नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद हा जातीसिध्द अधिकार (= बापाची पेंड) वाटतो. हे खरं दुखणं आहे. त्यामुळे अपक्ष आमदार रवी राणा यांची भूमिका मला पटली. ते म्हणतात की आरक्षण देण्यास फडणवीस समर्थ आहेत. कोणी त्यांना बदललं तर सरकारचा पाठींबा काढून घेणार. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

1) आरक्षण फक्त आर्थिक निकष आणि गुणवत्तेवर दिले गेले पाहिजे जेणेकरून गरीब मराठे, ब्राह्मण , दलित सर्वांना त्याचा लाभ घेता येईल . 2) मुख्यमंत्री बदलाची हवा विनाकारण भाजपच्या ब्राह्मण प्रस्थापित नेत्यांनी आईची पेंड खाऊन उठवली असेल असं वाटतंय , कदाचित उरलेल्या दिवसा करिता मुख्यमंत्री पद शिवसेनेला देऊन पुढच्या विधानसभा निवडणुकीत सेनेची विकेट काढायचा गेमप्लॅन असू शकतो . सुप्रीम कोर्टाच्या गाईड लाईन प्रमाणे 52 % पेक्षा ज्यास्त कोणीही आरक्षण देऊ शकत नाही , मराठे मागत आहेत 16 % , म्हणजे हे झाले 68 % . नाण्याची दुसरी बाजू अशी की सेना अचानकपणे मराठी आरक्षणाची बाजू घेऊन भाजप ला अडचणीत आणतेय ना मग द्या सेनेला मुख्यमंत्री पद . मराठी मते मिळवण्यासाठी सेना आरक्षण देण्याचा जुगार खेळेल मग कोणीतरी सुप्रीम कोर्टात याचिका टाकेल , कोर्टात आरक्षणाचा मुद्दा टिकणार नाही म्हणजे सेनेचा मुखभंग होणार . एका दगडात दोन पक्षी !!!!!!!

In reply to by सोमनाथ खांदवे

आरक्षण फक्त आर्थिक निकष आणि गुणवत्तेवर दिले गेले पाहिजे जेणेकरून गरीब मराठे, ब्राह्मण , दलित सर्वांना त्याचा लाभ घेता येईल .-> मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, दलित, ओबीसी सगळ्यांनाच आपापल्या लोकसंख्येइतके आरक्षण द्यायला हरकत नाही. यापैकी दलित, ओबीसींना आधीच लोकसंख्येइतके आरक्षण आहे; उरलेल्या ५०%ची देखील त्या त्या गटाच्या लोक्संख्याच्या प्रमाणात वाटणी करून टाका. आणि मग त्यातले ५०% आर्थिक निकषांवर ठेवा. म्हणजे कसं आपापल्या वाट्यातला काही भाग आपापल्या जातीतील गरिबांसाठी देतोय असे होईल. मग कोणी भांडणार नाही (अशी आशा आहे;))

मराठा आरक्षणासाठी बुधवारी ठाणे शहरात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान दगडफेक, पोलिसांवर हल्ला आणि मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३६ आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये शिवसेना नगरसेविका निर्मला कणसे यांचे पती शरद कणसे, शाखाप्रमुख अशोक कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी राजेश बागवे यांचाही समावेश आहे. अटक आरोपींमध्ये काही उत्तर भारतीय तरुणांचाही समावेश असल्याने ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव झाल्याच्या केलेल्या दाव्यास एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे. ठाणे न्यायालयाने या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. आंदोलनास हिंसक वळण देण्यात अग्रभागी असलेल्या आणखी २० जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यांचाही शोध घेतला जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी ठाणे शहरात मराठा संघटनांकडून बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनी चौकाजवळील उड्डाण पुलाच्या पायथ्याशी मराठा समाजाने ठिय्या आंदोलन केले होते. यामुळे चार तास महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. या सर्वाना महामार्गावरून हटविल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. २० जणांना अटक केली होती. त्यापैकी पाचजणांना नागरिकांनी पकडून दिले होते. या हिंसक आंदोलनाप्रकरणी नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्य़ात नौपाडा पोलिसांनी २३ तर वागळे इस्टेट पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली आहे. वागळेच्या गुन्ह्य़ातील आरोपींमध्ये उत्तर भारतीयांचा समावेश आहे तर नौपाडय़ाच्या गुन्ह्य़ात शिवसेनेचे शरद कणसे, शाखाप्रमुख अशोक कदम यांचा समावेश आहे. या सर्वाना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. हे वर्तकनगर, पडवळनगर, रामचंद्रनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट, नवी मुंबई, भिवंडी आणि मानपाडा भागातील रहिवासी आहेत. आरोपींची नावे.. दारा विक्रमादित्य चौहान, अंगद लालचंद चौहान, तेजस राजेश रेणुसे, सुनील शिवाजीराव पाटील, शिवाजी मारुती कदम, निखिल नंदकुमार जाधव, अक्षय अनिल आंबेरकर, दीपेश बंधू वनवे, राहुल अशोककुमार चौहान, रमण वासुदेव लाड, किरण पंढरीनाथ मोरे, विश्वास नथू चव्हाण, राजेश प्रताप बागवे अशी वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शरद शंकर कणसे, अशोक कदम, महेश अतकरे, दिनेश साठे, शुभम दरेकर, मंगेश बादल, अजय पाटील, वैभव पाटील, रोहित वीर, युवराज अवघडे, संदीप गावडे, हेमंत कुमावत, शिवाजी पाटील, संदेश पवार, शैलेंद्र उत्तेकर, संदीप कुटे, योगेश पवार, अनिकेत जाधव, विग्नेश भिलारे, निखिल वाईकर, प्रगती भोईर, गौरव देशमुख आणि १७ वर्षांचा मुलगा अशी नौपाडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. First Published On: Jul 27 2018 01:38 a.m.

आरक्षण जातीवर आधारीतच हवे. आर्थिक प्रश्नांसाठी स्कॉलरशिप टाईप गोष्टी असू शकतात पण आरक्षण नाही. कारण ह्या महान भारत देशात उत्पन्न लपवता येणे काहीच अवघड नाही. नोकरी करणारे तर काही करू शकत नाहीत. पण ज्यांचा व्यवसाय आहे, शेती आहे ते लोक बराच जुगाड करू शकतात. (ती टिना डाबी च होती ना जिचे आई वडील दोघेही उच्च पदावर असून सुद्धा तिने आपण मागासवर्गीय आहोत असं म्हणून आरक्षणाचा फायदा घेतला. आता ओपन वाल्याला काही फरक पडत नाही. पण तिच्याच जातीच्या एका गरजू व्यक्तीची सीट गेली असेल. इथे क्रिमी लेयर सुद्धा कसा काय लागू पडला नाही काय कळलं नाही) . शिवाय मुख्य मुद्दा असा की तुम्ही खरंच गरीब असलात तरी ती वेळ समाजाने तुमच्यावर आणलेली नाही, तेव्हा तुम्ही आरक्षण घेऊन कशावरही हक्क सांगू शकत नाही. ज्यांना संपूर्ण समाजाने पिढयान पिढ्या मागे राहायला लावले त्यांना मात्र हेडस्टार्ट मिळाला पाहिजे. माझा प्रश्न असा की मराठ्यांना कधी कुणी असे मागे ठेवले? माझी जातीच्या उतरंडीची समज लिमिटेड आहे. तरी कधी असे ऐकण्यात नाही. आणि मराठा शेतकरी समाजाचे प्रश्न हे जाती वर आधारित नाहीत. कोणत्याही जातीच्या शेतकऱ्याला तेच प्रश्न आहेत. त्यासाठी कर्जमाफी वगैरे चालू असतेच. ते प्रश्न "आरक्षण" मिळवून कसे सुटणार आहेत? मला कोणत्या बेसिस वर हे आरक्षण मागण्यात येत आहे तेच कळलं नाहीये. कुणी सांगेल का?

In reply to by पिलीयन रायडर

(ती टिना डाबी च होती ना जिचे आई वडील दोघेही उच्च पदावर असून सुद्धा तिने आपण मागासवर्गीय आहोत असं म्हणून आरक्षणाचा फायदा घेतला. आता ओपन वाल्याला काही फरक पडत नाही. पण तिच्याच जातीच्या एका गरजू व्यक्तीची सीट गेली असेल. इथे क्रिमी लेयर सुद्धा कसा काय लागू पडला नाही काय कळलं नाही) ->> टीना डाबी दलित आहे SC कॅटेगरी. त्याला क्रिमी लेयर नाही. ते फक्त ओबीसीसाठी आहे. ओपनमधले श्रीमंत ओपनमधल्या एका गरजू व्यक्तीची सीट हिरावून घेतात असे तुम्हाला वाटते का?

In reply to by एमी

ओके, म्हण्जे दलित असतील तर श्रीमंत असलात तरी पिढ्यानुपिढ्या ही आरक्षण घेऊ शकतात का? पण मग पुन्हा एकदा, टेक्निकली त्यांना ह्याची गरज नाही. तर त्यांच्याच जातीबान्धवाला (जो अजुनही खर्‍या अर्थाने मागासलेला असू शकेल) ही सीट मिळायला हवी तर "मूळ हेतू" साध्या होतो. बाकी नियमच तसा असेल तर मग काही बोलु शकत नाही. ओपनला आरक्षण नाहीच. तेव्हा ओपनमध्ये केवळ गुणवत्ता हाच एक निकष आहे जागा मिळवायला. त्यातला कुणीही श्रीमंत अथवा गरीब असला तरी काय फरक पडतो? आर्थिक आरक्षणाला माझा विरोधच आहे. त्या दोघांवरही कुणीही भेदभाव, सामाजिक विषमते सारखा अन्याय केलेला नाही इतकंच पुरेसं आहे ना? बाकी ते आपापल्या कर्मानी गरीब श्रीमंत, काळे गोरे, ऊंच बुटके काही का असेनात, तो सरकारी प्रश्न नाहीये. त्यामुळे ती सीट श्रीमंताला मिळाली तरी गरजूवर तो "अन्याय" नाही.

In reply to by पिलीयन रायडर

मुळात इथे टीना डाबीचे नाव का आले कळले नाही. तुम्हाला खोब्रागडे म्हणायचे होते का? कि टिनाचापण काहीतरी इश्यू झालेला आणि मला माहित नाहीय? === म्हण्जे दलित असतील तर श्रीमंत असलात तरी पिढ्यानुपिढ्या ही आरक्षण घेऊ शकतात का? -> हो घेऊ शकतात. पण मग पुन्हा एकदा, टेक्निकली त्यांना ह्याची गरज नाही. तर त्यांच्याच जातीबान्धवाला (जो अजुनही खर्या अर्थाने मागासलेला असू शकेल) ही सीट मिळायला हवी तर "मूळ हेतू" साध्या होतो. -> तुमच्या मते "मुळ हेतू" काय आहे आरक्षणाचा? ती "गरजू"ला आर्थिक सबळ करण्यासाठी केलेली तरतूद नाहीय. प्रत्येक जातीजमातीला सर्व क्षेत्रात (खासकरून जातीवरून नाकारली गेलेली क्षेत्र) प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण दिलेलं आहे. + एखादा दलित जरी श्रीमंत झाला असला तरीही त्याचे 'सामाजिक स्थान' इतरांच्या दृष्टिकोनातून वधारलेले असतेच असे नाही. त्यामुळे क्रिमी लेयर दलितांना लागू नाहीय.

In reply to by एमी

@ अ‍ॅमीताई
...श्रीमंत झाला असला तरीही त्याचे 'सामाजिक स्थान' इतरांच्या दृष्टिकोनातून वधारलेले असतेच असे नाही. त्यामुळे क्रिमी लेयर दलितांना लागू नाहीय.
ठिके Affirmative actions ना विरोध नाहीए. आरक्षणाचा आजीबात उपयोग नाही असा दावाही नाही. आरक्षण पिढ्या न पिढ्या आर्थीक अटी न टाकताही द्या पण 'सामाजिक स्थान' या साठी एवढे पुरेसे आहे का ? नागपूरच्या एका कविने स्वतःचे स्थान बनवले, कोण बरे ते आठवते का ? मी उत्तम कांबळेंचे स्तंभ लेखन वाचतो तेव्हा किमान ९० ते ९९.९९ टक्के वेळ ते दलित असल्याचा मला विसर पडलेला असतो. Affirmative actions चा त्यांनीही लाभ घेतला आणि सामाजिक दरी कमी झली तर स्वागतच आहे पण Affirmative actions म्हणजे केवळ आरक्षण ह्या समिकरणास एकमेवाद्वितयतेचा ठप्पा बसला आहे त्या बद्दल साशंकता आहे. कला क्रिडा या क्षेत्रातही प्रयत्न करुन नाव कमावले पाहीजे ना की नको ? राजकीय आरक्षीत जागेवरुन निवडून येतात हे ठिक पण जेवढे लोक निवडणूकीत आरक्षण घेऊन निवडून गेल्या ७० वर्षात गेले त्या पैकी -आर्थीक प्रगती बाजूस ठेवा- किती जणांनी स्वतःची वेगळी सकारात्म्क सामाजिक ओळख बनवली ? * तुमचा वरच्या एका प्रतिसादातील एक मुद्दा सगळ्याच जाती धर्मांना लोकसंख्येनुसार आरक्षण देऊन टाका म्हणतो. शेवटी तेच होणार आहे पण तात्विक चर्चा यात माझ्या काही शंका आहेत ** याने सामाजिक स्थान निर्माण करण्यास काय मदत होते ? ** याने जाती निर्मुलनास नेमका कोणत्या पद्धतीने हातभार लागतो ? ** भारतातील एका राज्यातून दुसर्‍या राज्यात स्तलांतरीत होणार्‍यांच्या संततीसाठी आरक्षणात जागा कश्या स्वरुपाने असाव्यात ? ** जे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करतात त्यांच्या संततीस वेगळे आरक्षण असावे की नसावे असावे तर किती असावे ? बाकी वर तुम्ही हरि नरकेंच्या लेख कॉपीपेस्टवला आहे त्यातील क्रमांक ९ मध्ये व्यक्त पुरोहीतशाही जन्माधारीत असू नये या बद्दल क्रांतीकारी पाऊल उचलले जाणार नाही आणि जन्माधारीत ब्राह्मण समाजातील आंतरजातीय विवाहाचे प्रमाण सबस्टँशीअल झाल्याचे आकडेवारीने साधार सिद्ध होई पर्यंत भारतातील हे वाद निवळण्याची शक्यता कमी असावी. या दोन्ही बाबीतील काही भाग बहुजनांच्या कदाचित केवळ परसेप्शनचा असेल पण काही वेळा ते नेमके बदल झाल्या शिवाय काही केल्या परसेप्शन्स बदलत नाहीत.

In reply to by एमी

नाही, देवयानी खोब्रागडे नाही. टिनाच आय.ए. एस ऑफिसर झाली ना? तिचे आई आणि वडील दोघेही सरकारी उच्छपदस्थ आहेत बहुदा. आता माझ्या मते एखादा दलित ज्याला समाजाने हीन वागणूक दिलेली आहे. त्याला अनेक पिढया शिकू दिलेलं नाही आणि तोवर बाकी समाज पुढे निघून गेला आहे, आजही ज्या घरात शिक्षणाचा अभाव दिसतो, कुटुंब मोल मजुरीच्याच कामाने पोट भरते, अशा घरातल्या व्यक्तीला शिकणे आणि पुढे जाणे इतर जातीच्या तुलनेत अत्यन्त अवघड आहे. आणि ही परिस्थिती सामाजिक विषमतेमुळे त्या व्यक्तीवर आणली गेली आहे, लादली आहे. अशा व्यक्तीला नियमात थोडी सूट, म्हणजेच आरक्षण (कमी मार्क, जास्त मुदत वगैरे) आवश्यक आहे. पण ह्यात जर "मला अजूनही दलित म्हणून कमी लेखले जाते आहे" हा न मोजण्या सारखा मुद्दा आय.ए. एस ऑफिसर सुद्धा आणत असेल तर आरक्षण कधीही संपणार नाहीच. शिवाय पुढारलेले दलित जे आपल्या मुलांना शहरात राहून सर्व सोयी सुविधा अगदी व्यवस्थित पुरवत असतील त्यांना नक्की कोणत्या प्रॅक्टिकल कारणासाठी आरक्षण द्यायला पाहिजे? त्यांच्या मुलांना नक्की कोणता संघर्ष करावा लागला? म्हणून म्हणलं, मूळ हेतू माझ्या मते साध्य झालेला नाही इथे. प्रतिनिधित्व कुणालाच नाकारण्यात येत नाही कायद्यानेच. पण तिथवर पोहचायला सवर्ण म्हणवणाऱ्या घरात आधीच पोषक वातावरण आणि सोयी आहेत. त्यांना सवलत मिळण्याची गरज नाही. गरज आहे ती खऱ्या अर्थाने मागासलेल्या घरांना. जिथे आजही पुरेसे पोषक वातावरण नाही. इथे त्या अर्थाने गरजू व्यक्तीला सवलत मिळायला हवी. पण टिना सारख्यांना तरीही हे मिळायला हरकत नाही असे आपले मत असेल तर मग तो आपल्यातला मूलभूत मतभेद आहे. त्याचं पुढे चर्चा करून काहीही होऊ शकत नाही. प्रश्न मराठा समाजाला नक्की ह्यातल्या कोणत्या कारणासाठी आरक्षण हवं आहे हा आहे. मला कोणतंही रास्त कारण अजून सापडलेलं नाही.

In reply to by पिलीयन रायडर

मला टीनाचा मुद्दा कळत नाहीय. काय प्रॉब्लेम आहे तिच्या केसमध्ये? ती ओव्हरऑल सगळ्याच कॅटेगरीत टॉपर होती म्हणून तिचे कौतुक झाले होते ना? === त्याला अनेक पिढया शिकू दिलेलं नाही आणि तोवर बाकी समाज पुढे निघून गेला आहे, आजही ज्या घरात शिक्षणाचा अभाव दिसतो, कुटुंब मोल मजुरीच्याच कामाने पोट भरते, अशा घरातल्या व्यक्तीला शिकणे आणि पुढे जाणे इतर जातीच्या तुलनेत अत्यन्त अवघड आहे. आणि ही परिस्थिती सामाजिक विषमतेमुळे त्या व्यक्तीवर आणली गेली आहे, लादली आहे. अशा व्यक्तीला नियमात थोडी सूट, म्हणजेच आरक्षण (कमी मार्क, जास्त मुदत वगैरे) आवश्यक आहे. पण ह्यात जर "मला अजूनही दलित म्हणून कमी लेखले जाते आहे" हा न मोजण्या सारखा मुद्दा आय.ए. एस ऑफिसर सुद्धा आणत असेल तर आरक्षण कधीही संपणार नाहीच. शिवाय पुढारलेले दलित जे आपल्या मुलांना शहरात राहून सर्व सोयी सुविधा अगदी व्यवस्थित पुरवत असतील त्यांना नक्की कोणत्या प्रॅक्टिकल कारणासाठी आरक्षण द्यायला पाहिजे? त्यांच्या मुलांना नक्की कोणता संघर्ष करावा लागला? म्हणून म्हणलं, मूळ हेतू माझ्या मते साध्य झालेला नाही इथे. प्रतिनिधित्व कुणालाच नाकारण्यात येत नाही कायद्यानेच. पण तिथवर पोहचायला सवर्ण म्हणवणाऱ्या घरात आधीच पोषक वातावरण आणि सोयी आहेत. त्यांना सवलत मिळण्याची गरज नाही. गरज आहे ती खऱ्या अर्थाने मागासलेल्या घरांना. जिथे आजही पुरेसे पोषक वातावरण नाही. इथे त्या अर्थाने गरजू व्यक्तीला सवलत मिळायला हवी. पण टिना सारख्यांना तरीही हे मिळायला हरकत नाही असे आपले मत असेल तर मग तो आपल्यातला मूलभूत मतभेद आहे. त्याचं पुढे चर्चा करून काहीही होऊ शकत नाही. -> तुम्ही परत परत जात && आर्थिक परिस्थिती हा आरक्षण देण्याचा निकष आहे/असावा अशा समजुतीतून बोलत आहात. 'केवळ' आर्थिक निकष असावा या मागणीतून बाहेर आलात, पण पूर्णपणे नाही. SC या कॅटेगरीतदेखील परत आर्थिक निकष असावा असे तुमचे म्हणणे आहे. जे सध्या सरकारला मान्य नाही म्हणून त्यांनी SCST ला क्रिमी लेयर ठेवली नाही. === माझे काय मत आहे ते मी वर मांडले आहे. प्रत्येकाला आपापल्या लोकसंख्ये इतक्या जागा, त्यात लिंगसापेक्ष आरक्षण, त्यात परत आर्थिक गटानुसार आरक्षण. मराठा ३२% आहेत तर त्यांना तेवढ्या जागा, त्यातली वाटणी १६% मुलींना, त्या सबगटात परत वाटणी ८% गरीब मुलींना.....

In reply to by एमी

टिनाहून जास्त मार्क होते कुणाला तरी. तो मुद्दा मी क्रिमी लेयर लागू का असावा हे सांगायला मांडला होता. आणि माझ्या मते ते बरोबरच आहे. आर्थिक निकष लावून आरक्षण द्या म्हणल्याच कुठे दिसत नाहीये मी. पण आरक्षणावर क्रिमी लेयर हवा ह्यात लॉजिकली चूक काय? म्हणजे गडगंज श्रीमंत माणसालाही केवळ जातीवरून का सवलत मिळावी? इन जनरल लोकांची मानसिकता बदलत नाही म्हणून? बाकी तुमची आरक्षणाची कल्पना (लोकसंख्या आधारीत) मला चूक वाटते. सवलती सरसकट द्याव्यातच कशाला? गरज काय? हे आरक्षण सामाजिक विषमता लक्षात घेऊन आणले होते. त्यासाठी ते पुरेसे आहे. आता मी ब्राह्मण म्हणून मला साडे तीन (किंवा हे असेल ते) टक्के आरक्षण तरी कशाला? जात का निकष माझ्या शिक्षणात का यावा? मी मागासवर्गीय आहे की नाही इतकंच पुरे. त्यातही मुलींचे आरक्षण असेल तरी मी क्रिमी लेयर मागेन. मी स्त्री असले तरी माझ्यावर स्त्री म्हणून कुणी अन्याय केलेला नाही, कारण मी तशा परिस्थितीमध्ये जन्मलेले नाही. पण माझ्या कामवाल्या मावशींच्या मुलीला मिळावं. जात ही विषमता आहे (आणि होप्फुली ती संपेल) इतक्याच मुद्द्यावर निकष म्हणून वापरली जावी. सरसकट जात अजिबात विचारली जाऊ नये.

In reply to by पिलीयन रायडर

टीना ला मेन्स मध्ये सर्वात जास्त मार्क्स होते , तसेच नुकतेच तिला ट्रैनिंग मध्ये First in Order of Merit’असल्याने President's Gold मेडल मिळाले आहे. अजूनही गुणवत्तेबद्दल शंका आहे का ?

In reply to by बार्नी

तुम्ही ना जरा शांतपणे वाचा माझे प्रतिसाद. टिनाने माझं काहीही घोडं मारलेलं नाही आणि तिच्या गुणवत्तेवर मी एकदाही शंका घेतलेली नाही. शेवटचं एकदा माझा मुद्दा काय ते सांगतेय, पुन्हा बोलायची इच्छा नाही. टिनाच्या आजोबांपासून, आई बाबा ह्या सर्वांनी आरक्षण घेतलेले आहे. त्यामुळे टिनाचा जन्म सुशिक्षित आणि सधन कुटुंबात झालाय. तिला कोणतीही "सवलत" घेण्याची तशी काहीच गरज नव्हती. पण तिने प्रिलीम्स मष्ये ती घेतली. आणि 11 मार्क कमी असूनही ह्या सवलतीमुळे ती सिलेकट झाली. पुढे तिने मेन्स मध्ये मार्क मिळवलेच. ती हुशार आहेच. आणि ती बिनडोक असूनही तिला ऑफिसर केलंय असंही कुणी म्हणत नाहीये. पण तिच्या जातीपुरता विचार केला तर तिला ह्याची गरज होती का? माझ्या मते नव्हती. कदाचित इतर कुणाला तरी बरीच जास्त होती. हे आर्टिकल पटकन सापडलं. ह्यात सर्व डिटेल्स आहेत. पुढे एका ब्राह्मण मुलाचा पण मुद्दा आणलाय तो इग्नोर करा. https://ipious.blogspot.com/2016/05/tina-dabi-and-reservation-controver… ह्याहून जास्त माझं काहीही म्हणणं नाहीये. क्रिमी लेयर सर्वांना हवा इतकच माझा मुद्दा आहे. बाकी आपण काय काय अर्थ काढाल त्याला मी जबाबदार नाही.

In reply to by एमी

तिला कोणतीही "सवलत" घेण्याची तशी काहीच गरज नव्हती. पण तिने प्रिलीम्स मष्ये ती घेतली. आणि 11 मार्क कमी असूनही ह्या सवलतीमुळे ती सिलेकट झाली. -> अच्छा हे मला माहित नव्हते. मुद्दा लक्षात आला आहे. === बार्नी यांनी त्यांच्या प्रतिसादात जे लिहिले आहे तेच निरीक्षण असल्याने, विचार करूनच सरकारने सध्या दलितांसाठी क्रिमी लेयर ठेवली नाहीय. "दलितांमधील आर्थिक && सामाजिक गरजूला हेडस्टार्ट मिळावा, त्याला त्याची जास्त गरज आहे. सबळ दलितानी ती सहूलत वापरू नये कारण ते फक्त सामाजिक गरजू आहेत" असा विचार केल्याने दलितनादेखील क्रिमी लेयर लावा अशी मागणी होते. त्याऐवजी "प्रत्येक जातीजमातीला सर्व क्षेत्रात (खासकरून जातीवरून नाकारली गेलेली क्षेत्र) प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण दिलेलं आहे. मग तो गरीब असो कि श्रीमंत; ते प्रतिनिधीत्वच आहे." असा विचार केला तर मग तो विरोध रहात नाही. === रोचक बाब ही आहे कि "दलितांमधील सबलानी दलित दुर्बलांसाठी जागा सोडून द्याव्यात" म्हणणारे "श्रीमंत ब्राह्मणाने/मराठ्याने गरीब ब्राह्मण/मराठ्यासाठी जागा सोडून द्याव्यात, त्याने इंजिनिअर, डॉक्टर बनण्याऐवजी इतर क्षेत्रात जावे, इतरांच्या हाताखाली नोकरी करन्याऐवजी नोकऱ्या निर्माण करणारे बनावे" हे म्हणणे मान्य करत नाहीत. "खुला वर्ग असावा आणि तो कमीतकमी ५०% तरी असावाच" हे assumed/taken for granted असते. खुला वर्ग पूर्णच काढून टाकला किंवा १०% ठेवला आणि बाकीचे लोकसंख्यानुसार वाटले तर चालेल का विचारलं तर no flexibility there! असो.

In reply to by एमी

प्रतिनिधित्व कायद्यानुसार कुणालाही नाकारलेले नाही. आता कागदोपत्री जातीभेद अस्तित्वात नाही. तेव्हा त्यासाठी आरक्षण कसे असेल? आरक्षण हे मागे पडलेल्या जातींना इतर पुढारलेल्या जातींशी निव्वळ गुणवत्तेवर लढता येणार नाही कारण त्यांच्याकडे आवश्यक ते वातावरण , सोयीसुविधा वगैरे गोष्टी नाही. मग आरक्षण काही सीट्स राखीव ठेवते ज्यात ह्या अटी शिथिल केलेल्या आहेत. ह्यामुळे अशा जातींना प्रतिनिधित्व मिळवणे सोपे जाईल, अन्यथा हा प्रवास त्यांच्यासाठी खडतर आहे. म्हणजेच प्रतिनिधित्व सगळ्यांना सारखे उपलब्ध आहे. तिथवर पोहचायचा मार्ग प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे कारण आपण सगळे वेगवेगळ्या वातावरणात वाढत आहोत. म्हणून आरक्षण आहे. सगळ्यांचे प्रतिनिधित्व असावे म्हणून नाही. (ते असणारच, कायदा मुळात ते नाकारत नाहीचे. पण सामाजिक स्थिती नाकारते म्हणून फक्त एका विशिष्ट गटाकरता आहे.) आणि म्हणूनच आरक्षण हे केवळ जातीनिहाय आहे. बाकी उर्वरित समाजाला अशी कोणतीही सूट का मिळावी? आर्थिक आरक्षण का असू नये हे आता पुन्हा बोलण्यात अर्थ नाही. (i.e Not गरिबी हटाव योजना). मग एकदा तुम्ही मागासलेले नाही म्हणलं की तुमची जात irrelevant आहे. तुमच्या जातीत किती लोक आहेत ह्याने तुम्हाला किती सीट्स राखीव असाव्यात हे का ठरावं? तुमची गुणवत्ता हा सरळ निकष का असू नये? तुम्ही एक लक्षात घेत नाही आहात की मुळात आरक्षण देण्याची वेळ का आली? कारण काही लोकांवर संपूर्ण समाजाकडून अन्याय झाला. म्हणून संपूर्ण समाज ही जबाबदारी उचलत आहे. पण कुणासाठी? तर अन्याय झाला त्यांच्यासाठी. सरसकट सर्व गरिबांसाठी सर्व श्रीमंतांनी करायची ती गोष्ट नव्हे. तुमच्या सोयीसाठी साधं उदाहरण घेऊ. अ आणि ब ही दोन खुल्या वर्गातील घरं आहेत. एक गरीब आणि एक श्रीमंत. दोघांनाही एक एक मुलगा आहे. अ चा मुलगा गरीब पण हुशार आणि मेहनती. शिकला आणि चांगला पैसा मिळवला. ब चा मुलगा हुशार पण आळशी. आहे तो पैसा उडवला. आता तिसऱ्या पिढी मध्ये. अ आणि ब ची नातवंडे एकाच आर्थिक स्थितीमध्ये आहेत किंवा अ कुटुंब जरा पुढे गेलेय असं म्हणू. ब मात्र जवळपास भणंग आहे. आता "समाजाची" ह्यात काही जबाबदारी आहे का? सांगायचा मुद्दा असा की आज माझी आर्थिक स्थिती कशीही असू शकते. ती पिढ्यानपिढ्या तशीच राहणार नाही. किंवा आधीही तशी नव्हती. पण तुम्ही मागासलेल्या जातीचे नसाल तर ह्यात समाज किती ढवळाढवळ करतो? आणि किती ते तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे? सरकारने त्याची जबाबदारी का घ्यावी? हां आता सरकार गरीब कुटुंबांसाठी इतर योजना आणू शकते. शालेय स्तरावर मुलांना सोयी देता येतील. स्कॉलरशिप देता येतील. पण आरक्षण नाही. तुम्ही जे 50% assumed म्हणताय ते कोर्टाने ठरवलं आहे. कुणी असंच मनात ठरवलं नाहीये. लोकसंख्या आधारित असावं ही तुमच्या डोक्यातली एक कल्पना आहे. बाकी त्याहून अधिक सध्या काही नाही. ती तुम्हाला पटतेय म्हणून बरोबर असेलच असं नाही.

In reply to by पिलीयन रायडर

प्रतिनिधित्व कायद्यानुसार कुणालाही नाकारलेले नाही. आता कागदोपत्री जातीभेद अस्तित्वात नाही. तेव्हा त्यासाठी आरक्षण कसे असेल? -> काही कळले नाही.... === आरक्षण हे मागे पडलेल्या जातींना इतर पुढारलेल्या जातींशी निव्वळ गुणवत्तेवर लढता येणार नाही कारण त्यांच्याकडे आवश्यक ते वातावरण , सोयीसुविधा वगैरे गोष्टी नाही. मग आरक्षण काही सीट्स राखीव ठेवते ज्यात ह्या अटी शिथिल केलेल्या आहेत. ह्यामुळे अशा जातींना प्रतिनिधित्व मिळवणे सोपे जाईल, अन्यथा हा प्रवास त्यांच्यासाठी खडतर आहे. -> अरे बापरे :O जाऊदेत... असला मोठेपणा स्वतःकडे/ स्वतःच्या जातिकडे घेणे मला जमणार नाही _/\_

In reply to by एमी

मोठेपणा स्वतःच्या "जातिकडे" घेणे????? बाब्बो! काय काय अर्थ काढतात लोक. आपण तात्विक म्हणून बोलत बसतो. तरी बरं संविधान वगैरे आहे अजून =)) माझ्याकडून साष्टांग घ्या. _/\_

In reply to by पिलीयन रायडर

काय अर्थ काढणे अपेक्षित आहे "मागे पडलेल्या जातींना इतर पुढारलेल्या जातींशी निव्वळ गुणवत्तेवर लढता येणार नाही", "हा प्रवास त्यांच्यासाठी खडतर आहे." असल्या वाक्यांमधून?

In reply to by एमी

मी काहीही सांगून काय उपयोग? तुम्ही मनाशी ठरवलं आहे ना. संपला की मग विषय. ह्याच धाग्यावर सुस्पष्ट लिहिलेलं असताना त्याचा अगदी विपरीत अर्थ निघताना दिसतोय. एकदा आपण पूर्वग्रह ठेवूनच बोलायचं ठरवलं की असं होणारच. तेव्हा तुम्हाला नाही जरी कळलं मला काय म्हणायचं आहे तरी मला काहीही फरक पडत नाही. आणि ह्याहून जास्त तपशिलात घुसून माझा मुद्दा आणि त्याहुन महत्वाचं माझा हेतू समजावत बसण्याची मला गरज वाटत नाही. वाट्टेल ते अर्थ काढा. डोन्ट केअर! धन्यवादच!