✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खाऊगल्ली भाग २

र
रेवती यांनी
गुरुवार, 04/30/2015 - 19:45  ·  लेख
लेख
================================================================== खाऊगल्ली : भाग १ ================================================================== बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू------- वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी. नंतर तक्रार चालणार नाही. पहिल्या धाग्यावर आलेले नवे प्रतिसाद कळत नाहीत ही श्रीश्री पप्पू अदूबाळ यांची रिक्वेष्ट मान्य करून हा धाग्या त्यांच्या चरणी अर्पण करीत आहोत. चार ओळींच्यापुढे लेखन (ढापलेले का असेना) गेल्याने संमं मजवर क्रिपा करून हा धागा टिकू देतील अशा आशा! आज अपर्णाने सांगितलेल्या पाकृनुसार डाळ कांदा नावाची रेशिपी करून बघतिये. मला हरभरे, जे सुकवल्यावर तपकिरी दिसतात, जे भिजवल्यावर हळदीकुंकवाला ओटी भरण्यासाठी वापरतात त्याच्या उसळीची पाकृ हवी आहे. त्यात फोडणी करताना ओवा घालतात ती! सांगण्याची कृपा करावी. सवडीने पाकृ आली तरी चालेल, लगेच हरभरे आणलेले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
पाकक्रिया
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
मत
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत

प्रतिक्रिया द्या
28139 वाचन

💬 प्रतिसाद (94)

प्रतिक्रिया

शाब्बास!! एके काळी माझ्या

आनन्दिता
Tue, 05/05/2015 - 22:23 नवीन
शाब्बास!! एके काळी माझ्या पाकशास्त्रातल्या ज्ञानाला हसणार्या तुला आणि रंगा काकांना एकावेळी सुगरणीचा सल्ला द्यायच्या संधीचं मी सोनं केलं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

रंगाकाका कुठे दिसले आणि

सूड
Tue, 05/05/2015 - 22:28 नवीन
रंगाकाका कुठे दिसले आणि धाग्यावर? हल्ली संपादक लक्षुम्बाई तेवढ्या जास्त दिसतात. पंतांना का काका म्हणत्येस!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

तेरंगाकाकाच

आनन्दिता
Tue, 05/05/2015 - 22:43 नवीन
ते रंगाकाकाच्च आहेत. मला काका, आजोबा, काय वाट्टेल ते म्हणा असं छातीठोक पणे म्हणणारे एकमेव मिपाकर. ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बायो, एकदा काय लिहायचंय ते

सूड
Tue, 05/05/2015 - 22:46 नवीन
बायो, एकदा काय लिहायचंय ते ठरव. सतरांदा तो प्रतिसाद एडीट करु नकोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

आता फायनल. :)

आनन्दिता
Tue, 05/05/2015 - 23:07 नवीन
आता फायनल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मी बापडी तुला कधी हसले? हां

स्रुजा
Wed, 05/06/2015 - 00:17 नवीन
मी बापडी तुला कधी हसले? हां आता कणीक म्हणजे काय या निरागस प्रश्नावर एक आपलं उगाच स्मित दिलं तर मी हसले??? बाकी तुला कणकेपेक्षा मिरच्याच माहिती असणार. :P आणि बिचार्‍या रगाभाऊंनी तर तुला या प्रश्नावर लाडू देऊ केले होते. पण तुला मिरची मधुन लाडू आणि स्मित हास्य कुठुन बाई अपील होणार? ( स्वगतः एक गरीब नि:श्वास )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

लैच मिर्ची मिर्ची कराया लागली

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/06/2015 - 01:19 नवीन
लैच मिर्ची मिर्ची कराया लागली की सगळी.. ,आता येक मिर्ची माज्ज्याकडून... इशेषतः ज्यांणा हिरव्या मिर्च्या जेवनात कांद्यासारख्या कचाकचा हानायला आवाडतेत,थ्येंच्यासाटी!!! सात/आठ हिरव्या मिर्च्यांना सुरीने मधोमध ऑपरेशन करुन ठीवाव. णंतर त्येंच्या चीरलेल्या मद्दी बशेल एवडेच मीठ भराव. आनी मंग ग्यास जवळ जाऊण येक बारीक कढल्या मद्दी येक चमचाभर त्याल येकदम कडक मधी तापवाव. त्येच्या आदी त्ये मिठाळलेल्या मिर्च्या येका प्ल्येटात कडेला तयार ठिवने. आनी कडला आरदं फुलपात्र पानी पन ठिवाव,आनी न्हेमीचे ३ चमचे हळद पन! आनी कढल्याचं त्वांड बंद करेल अशी ताटली पन तयार ठिवाव..फुडं आता येकदम फायनल म्याचच्या शेवटच्या वोव्हरीसारकं सुप्परफाश्ट प्ल्ये होनारे..तवा आता फयल्यांन्दा नाकाला फडक लाऊण घ्याव. त्ये हल्ली स्कूटी चालवनार्‍या पोरी बांधतेत तसं! णायतर मिर्ची खान्या आदुगरच डोक्यात जाइल. तर.. त्याल चांगलं कडक तापलं..की अचानक घॅस बंद करुण त्या कढल्यात येकदम सगळ्या मिर्च्यांना समादी द्याव. मंग त्या बोंब माराया लागल्या रं लागल्या की लगीच त्येंच्या डोंबल्याव त्ये अर्दा फुलपात्र पानी टाकूण त्याच्याव तीन चम्चे हळदीनी मूठमाती द्याव.आनी कडईचं थंडगं ताटली टाकुन बंद करावं. ह्ये सगळं युद येका मिनटात जाल पायजेन. णायतर मग त्या मिर्च्यांचा आत्मा स्वर्गाला जात न्हाई,आनी णंतर आपल्या पन न्हेत नाई. मंग पाच मिनिटं त्या झाकल्येला कढल्याला घॅस वरच गार होऊ द्याव. आनी णंतर खाली काडून चमच्यानं झाकान मारलेया ताटलीचं त्वांड उचकटाव. आनी त्येच चमच्याणी कढल्यात उलथापालथ घडवून ,कुटची मिर्ची हळदीच्या ढीगार्‍यात कुटं जाऊन म्येली त्येचा शोध घ्याव. सगळ्या घावल्या की थांबाव. आनी मांग गरम गरम भाताव, सानशीच्या तोंडानं चांगली च्येचल्येल्या लसनाची फोडनी मारल्याली ,लसनाचा ठ्सका बसलेली गरम आमटी ओतूण भात कालवाव. आनी त्ये कढलं बी भुईला शेजारीच घ्यिऊन बसाव. आनी दोनचार मिर्च्या ताटाला घ्येऊन .. म्होट्यांन म्हनाव.. "सदानंदाचा येळकोट" आनी मांग भात आमटी संगाट हनायला घ्यावं. ही हळदीघाटाच्या लडाईत शहीद झाल्याली मिर्ची णंतर खाताणा स्वताची चव-दाखवूण ग्येलाबिगार र्‍हात न्हाई ..बर्का! मऊ हृदयाच्या मानसान आजाबात हिच्या वाटला जाऊ णये.. आनी बाकिच्यांण्णी पण येका ज्येवनाला चारा फेक्षा जास्त खाल्या तर ब्राम्मम्हुर्तापासूण कोंबड आरवायच्या आत कवा बी उटायची तयारी ठीऊणच खावं. ह्या ज्येवनाणंतर त्वांड लैच हळहळलं, आनी प्वाटात भट्टी प्येटल्या सारकं वाटलं,तर थंडाव्याला लागाल त्येवडं ताक माराव. आनी णंतर तासभर आपल्याला जो इषय आवाडतो,त्यात बेजान रमाव. णंतर धा मिनिटात येकदम टाइट झोप यील.. तवा मिर्ची प्रेमींण्णो... बगा चाखून येक डाव.. आवाडली तर अज्जुन येखादी अशीच मिर्ची द्यीण! बाय बाय , गुडणाइट! .. आनी फुड काय म्हनतेत त्ये ....... ;) बगा आपलं तुमचं तुम्मीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

क्या बात है

श्रीरंग_जोशी
Wed, 05/06/2015 - 01:49 नवीन
क्या बात है, बुवां एकदम समीधाच ओतली भस्सकन भूताच्या पिक्चरमधल्या ममांत्रिकावानी ;-) . या कृतीचं कुणी सुटसुटीत पुनर्लेखन करून देईल का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुर्जी झक्कास पाकृ!

जुइ
Wed, 05/06/2015 - 02:20 नवीन
गुर्जी झक्कास पाकृ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ठांकु! :)

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/06/2015 - 09:33 नवीन
ठांकु! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत ....

बहुगुणी
गुरुवार, 05/28/2015 - 10:27 नवीन
आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत: नुसत्या वाचनानेच एकदम स्वर्गवास! काय झॅन्टामॅटिक वर्णन आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

:-D :-D :-D

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 07:14 नवीन
:-D :-D :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अय्याया!!

स्पंदना
Sat, 05/30/2015 - 05:29 नवीन
अय्याया!! एका मिरचीचं एव्हढ पुराण? अन ते ही सांग्रसंगित?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सुक्या खोबर्‍याच्या चटणीची

रेवती
Wed, 05/27/2015 - 06:58 नवीन
सुक्या खोबर्‍याच्या चटणीची रेशिपी मिळेल का? मी एरवी जिरे, लाल तिखट, लसूण घालून करते. सध्या माझ्याकडे मोठ्या ३ वाट्या किसलेले खोबरे आहे जे संपवायचे आहे. कसे कोणास ठाऊक खोबर्‍याची बरणी दुर्लक्षीत राहिली. पदार्थ चांगल्या अवस्थेत आहे पण मी चुकून आणखी खोबरे आणलेय.
  • Log in or register to post comments

मीही अशीच करते. काही बनवायचे

रुपी
गुरुवार, 05/28/2015 - 02:04 नवीन
मीही अशीच करते. काही बनवायचे नाहीच सुचले तर फ्रिजमध्ये टिकेल बहुतेक खोबरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण

त्रिवेणी
गुरुवार, 05/28/2015 - 10:03 नवीन
मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण आणि लाल मिरची चटका लागेलस भाजून घेते आणि जाडसर चटणी वाटते. त्यातल्या त्यात थोडी वेगळी होईल. आणि फ्रीजमध्ये टिकते खोबरे. आणि अजून एक टीप आपल्या ईशीताने दिलेली- ओलं खोबरं नसतांना याच कीस मध्ये दूध घालून थोडावेळ ठेवायचे म्हणजे हे खोबरे ही संपेल आणि ओला खोबर नसेल तर अडणार नाही.
  • Log in or register to post comments

२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी

रुपी
Sat, 05/30/2015 - 00:07 नवीन
२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी काय पाकॄ करता येईल? निदान अर्धे संपले तरी चालेल. पुन्हा संपवायला दोघेच आहोत! कटलेट्स करावेत असा विचार आहे, पण अजून काही सुचवता येईल का? वेफर्स, कीस असे काही नको...
  • Log in or register to post comments

यापैकी काही

श्रीरंग_जोशी
Sat, 05/30/2015 - 00:17 नवीन
यापैकी काही उपयोगी वाटू शकेल...
  • मका बटाटा टोस्ट
  • पोहे बटाटा कटलेट
  • बटाटा वडा
  • बटाटा-सफरचंद खिर
  • डब्यातला बटाटा
  • शाक भाजी (वांगी,बटाटा चना भाजी )
  • बटाटा- मटार रोल
  • गवार बटाटा जवळा
  • बटाटा-मटार टिक्की
  • मसालेदार हरबरा बटाटा उसळ.
  • बटाटा हाईट्स
  • नेपाळी बटाटा
  • "कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा"
  • पोहे-बटाटा प्यटिस
  • उपवासाची बटाटा भाजी
  • कोलंबी-बटाटा मसाला*
*शाकाहारी लोकांनी कोलंबी न घालता करावी ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

जे ब्बात!

बहुगुणी
Sat, 05/30/2015 - 01:04 नवीन
नुसती पदार्थांची नावेच नव्हे तर प्रत्येकाचे दुवेही दिले आहेत श्रीरंगरावांनी! भले शाबास! (पुर्वी मिपावर असे दुवे देणारे एक जण होते [मला वाटतं 'नंदन' का?], त्यांना "लिंकाळ/ लिंकाळे" असं म्हंटलं जायचं...आता तो किताब श्रीरंग्_जोशींना द्यायला हवा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

माफ करा

श्रीरंग_जोशी
Sat, 05/30/2015 - 01:23 नवीन
माफ करा, वरच्या यादित अनावधानाने काही पाकृ राहून गेल्या...
  • दम आलू काश्मिरी
  • स्ट्फ्ड कांदा पूरी आणि जीरा-आलू
  • आलू पराठे
  • जीरा आलू (सिंपल)
  • दम आलू
  • आलू टिक्की ......
  • पोटॅटो स्ट्यू अँड रोटी जाला
  • शेझवान पोटॅटो विथ व्हेज हक्का नुडल्स
  • बेक्ड पोटॅटो वेजेस
  • आलू टिक्की ......
मला एकेरीतच हाक मारा अन मला कोणताही किताब नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

पॉईंट नोटेड, श्रीरंग

बहुगुणी
Sat, 05/30/2015 - 01:33 नवीन
पॉईंट नोटेड, श्रीरंग :-) दुव्यांबद्दल दुवा! (बाकी अशा उपयुक्त दुव्यांच्या प्रतिसादांसाठी वाचनखूण कशी साठवायची?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

काही तरी करायला हवे

श्रीरंग_जोशी
Sat, 05/30/2015 - 01:50 नवीन
थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित. मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हे घ्या

टीपीके
गुरुवार, 06/04/2015 - 20:56 नवीन
मिसळपाव सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq1y कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/04/2015 - 21:01 नवीन
या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले. मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

हो, सध्या तरी तसेच आहे.

टीपीके
गुरुवार, 06/04/2015 - 21:14 नवीन
हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मराठी सर्च इंजिन

टीपीके
गुरुवार, 06/04/2015 - 21:10 नवीन
मराठी सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते मिसळपाव मनोगत मायबोली उपक्रम ऐसी अक्षरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

अत्यंत उपयुक्त

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/04/2015 - 21:17 नवीन
एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

अत्यंत उपयुक्त

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/04/2015 - 21:17 नवीन
एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

हे आवडतं का बघा. यात आता tabs

टीपीके
Fri, 06/05/2015 - 15:46 नवीन
हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work marathishodh.tk
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

खरंच..

रुपी
Sat, 05/30/2015 - 01:50 नवीन
दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !! श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही! बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :) जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

बटाटा हाईट्स

श्रीरंग_जोशी
Sat, 05/30/2015 - 02:01 नवीन
एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) . यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे... दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

तो धागा चुकीच्या विभागात

रुपी
Sat, 05/30/2015 - 02:14 नवीन
तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:) पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कट वडा??????

स्पंदना
Sat, 05/30/2015 - 06:08 नवीन
कट वडा??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

भुजण

रमेश आठवले
Sat, 05/30/2015 - 07:14 नवीन
बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हे घ्या

पैसा
गुरुवार, 06/04/2015 - 10:54 नवीन
http://www.marathimati.net/batatyache-bhujane/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

धन्यवाद

रमेश आठवले
गुरुवार, 06/04/2015 - 21:17 नवीन
या माहिती साठी पैसाताई यांना धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

रंगण्णाना "लिंकहित" असा किताब

आदूबाळ
Sat, 05/30/2015 - 12:12 नवीन
रंगण्णाना "लिंकहित" असा किताब आणि खिलत आहे. अधिक माहितीसाठी (त्यांना) व्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

एवढ्या पाकृ मिळाल्याच तर

रुपी
गुरुवार, 06/04/2015 - 03:26 नवीन
एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ. उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोज

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/04/2015 - 04:27 नवीन
ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) . झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

ओवा घालून करतात ती पाकृ माहित नाही पण हरभरे ची सोपी आणि झटपट अशी

स्वीत स्वाति
गुरुवार, 06/04/2015 - 10:28 नवीन
हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता. हरभरे रात्री भिजवा . दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या. आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या. आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या. एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया. चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.
  • Log in or register to post comments

खुळा

स्वीत स्वाति
गुरुवार, 06/04/2015 - 10:42 नवीन
हो हो या रेसिपी चे नाव खुळा च आहे. सलाड मध्ये मोड्णारी साहित्य . मेथी निवडलेली . काकडी लिंबू कोथिंबीर मुळा मुळ्याची हिरवीगार पाने मिरची चवीनुसार मीठ चवीनुसार कृती: मेथी ची पाने , मुळ्याची पाने , कोथिंबीर धुवून निथळायला ठेवा. तोपर्यंत मुळा , काकडी बारीक चिरून घ्या. आता मेथी ची आणि मुळ्याची पाने , कोथिंबीर बारीक चिरून घ्या. सर्व साहित्य मिक्स करा . मिरची बारीक कापून टाका , मीठ चवीनुसार टाका आणि वरून लिंबू पिळून घ्या. टीप: आमच्याकडे उडीद पापड भाजून त्याच्या चुरा (एकदम बारीक नाही ह ) करतात आणि त्यामध्ये शेंगदाणा चटणी (जळगाव स्पेशल ) टाकून तेल टाकून खातात त्यालाही खुळाच म्हणतात आणि रसाबरोबर (आमरस ) तोंडी लावायला हाच खुळा असतो इतर कोणत्या सुक्या भाजी पेक्षा ..
  • Log in or register to post comments

अरे वा

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/04/2015 - 18:28 नवीन
पौष्टिक वाटत आहे ही पाकृ. आमच्याकडे जो मेथीचा घोळाणा करतात त्याच्याशी बरेच साधर्म्य आहे. घोळाणा म्हणजे प्रामुख्याने मेथी (पालेभाजी) व टोमॅटो - कांदा यांचे सॅलड. चवीपुरते मीठ व तिखट घालायचे व लिंबू पिळायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीत स्वाति

दोन तीन थेंब

इरसाल
गुरुवार, 06/04/2015 - 16:35 नवीन
दोन तीन थेंब माझेही. उथळ पॅनमधे बटर फिरवुन सालासहित किसलेला बटाटाव्यवस्थित अंथरुन घ्यायचा मग मंद आचेवर त्याला ठेवुन झाकण ठेवुन शिजवुन घ्यावा, शिजत आला की वरुन थोडे बटर सोडावे, खालच्या बाजुने कुरकुरीत-सोनेरी झाला की पलटुन घेवुन त्यावर ऑरेगेनो भुरभुरावे + मीठ, आवडत असल्यास एक अंडे फोडुन टाकावे. अंडे ज्यापद्धतीने शिजलेले आवडेल तसे शिजले की खावे. लहान मुलांना हा प्रकार खास आवडतो. बटाटे शिजवुन सालं काढुन त्याच्या इंचाच्या फोडी कराव्यात, परत पॅन मधे बटर किंवा तेल टाकुन त्या फोडी त्यात परतत असताना त्यात मीठ, ऑरेगॅनो, चीझ स्लाइस टाकुन मंदपणे ढवळावे आणी गरमागरम......हादडावे. किंवा बटाट्याची भाजी करुन, बटाटवडे किंवा त्या भाजीत उकडलेले चणे मिक्स करुन पाणीपुरी साठी वापरावे.किंवा तिच भाजी शिळ्या पोळीला थोडे तव्यावर तापवुन किंचीतसे मीठ टाकुन त्यात रोल करुन पुन्हा तव्यावर शेकुन खावी. भेंडी! हाय काय त्यात. बटाटा अपुन को बहुत प्रिये हय. अवर मंगताय तो दोन्तीन आय्ड्या फेकके मारेंगा.
  • Log in or register to post comments

मिसळपावर मिसळपावच्या पाकॄ

मदनबाण
Fri, 06/05/2015 - 16:07 नवीन
मिसळपावर मिसळपावच्या पाकॄ कोणी कोणी दिल्या आहेत का ? मागच्या आठवड्यात शोधत होतो... शेवटी चकली ताय ची पाकॄ त्यांच्या सायटीवर वाचली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा