✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपावर चित्रे टाकण्याची कृती

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
गुरुवार, 04/14/2016 - 00:14  ·  लेख
लेख
मिपावर चित्रे टाकताना बर्‍याच जणांना समस्या येतात असे दिसते आहे. या विषयावर अगोदर लिहीले गेले आहेच. परंतु सहजपणे ही माहिती समोर असावी यासाठी हा परत केलेला प्रपंच. खालील पायर्‍या वापरल्यास मिपावर चित्रे टाकणे सहजसाध्य होईल. इतकेच नव्हे तर ती योग्य आकारात व प्रमाणबद्ध दिसतील. १. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो, फ्लिकर किंवा तत्सम संस्थळावर चढवा. २. चित्रांचे तिथले स्टेट्स "पब्लिकली शेअर्ड" असे करा. चित्रे मिपावर दिसण्यासाठी हे आवश्यक आहे. असे केल्यावर तुमची चित्रे मिपावर टाकण्यायोग्य स्थितीत येतील. ३. त्या संस्थळावर चित्र पूर्णपणे (थंबनेल अथवा छोटी आवृत्ती नव्हे) उघडून त्यावर राईट क्लिक करा आणि "Copy image URL" पर्यायावर टिचकी मारा... आता ते चित्र मिपामध्ये टाकण्यासाठी त्याचा दुवा कॉपी केला गेलेला आहे. हे चूक आहे...  . हे बरोबर आहे...  आता मिपावर या आणि... ४. लेखन करण्याच्या चौकोनाच्या (टेक्टबॉक्सच्या) वर असलेल्या बटणांपैकी सर्वात डावीकडच्या (सुर्योदयाचे चित्र असलेल्या) बटणावर क्लिक करा. (त्या बटणावर कर्सर ठेवल्यास Insert/edit image असा मेसेज दिसेल व "Insert/edit image टेक्स्टबॉक्स" दिसू लागेल.) .  . ५. दिसू लागलेल्या Insert/edit image टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा: ......अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V) ......आ) Width X Height: कोरे ठेवा. ......इ) Alternate Text: इथे तुम्हाला हवे ते चित्राचे नाव टाका अथवा फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका. ६. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल. ७. चित्र "पूर्वपरिक्षण" करुन पहा: ......अ) चित्र लेखनाच्या चौकटीत योग्य जागी दिसत असल्यास टाकलेला कोड योग्य आहे. ......आ) चित्र लेखनचौकटीबाहेर जात असल्यास आणि/किंवा उजव्या बाजूच्या मिपासंबधीच्या माहितीवर आक्रमण करत असल्यास Width मध्ये ६६० ते ३०० यामधला एक पर्याय वापरून "पूर्वपरिक्षण" करुन पहा व योग्य तो पर्याय स्विकारा. (सर्वसाधारणपणे आडव्या (लॅड्स्केप) चित्रांना ६०० ते ६६० व उभ्या (पोर्ट्रेट) चित्रांना ३०० ते ४५० Width योग्य होते) ......इ) Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा तुम्ही स्विकारलेल्या Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते. (अंदाजे Height टाकण्याच्या प्रयत्नात बहुदा चित्र वेडेवाकडे दिसते, तेव्हा ते टाळा.) ८. पायरी क्रमांक ३ ते ७ परत परत वापरून पुढच्या प्रत्येक चित्राचा योग्य कोड लेखात अंतर्भूत करा. ९. लेखाचे सर्व चित्रांसह "पूर्वपरिक्षण" करून तो मनाजोगता दिसू लागला की मगच तो "प्रकाशित करा". कारण लेख प्रकाशित केल्यावर सर्वसामान्य लेखकाला त्यात बदल करता येत नाही. १०. लेख प्रसिद्ध केल्यावर लेखनात अथवा चित्रांत काही दोष आढळले तर ते सुधारण्यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क करा. .

खास सूचना :

मिपात टाकलेले फोटो (अ) साठवण केलेल्या जागी एडीट केले आणि / किंवा (आ) त्यांना दुसर्‍या अल्बममध्ये हलविले तर त्यांच्या दुव्यांच्या मजकूरात (लिंक्स) बदल होतो व त्यामुळे ते फोटो मिपातिल लेखात दिसणे बंद होते. असे फोटो लेखात परत दिसण्यासाठी त्यांचे बदलेले नवे दुवे मिपात टाकणे जरूर असते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
92793 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

माझाही एक प्रयत्न..

पाटीलभाऊ
गुरुवार, 08/25/2016 - 18:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

जमले ! चित्र अप्रतिम आहे !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/25/2016 - 22:47 नवीन
जमले ! चित्र अप्रतिम आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

धन्यवाद

पाटीलभाऊ
Fri, 08/26/2016 - 12:29 नवीन
धन्यवाद..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फ्लिकर वर राईट क्लिक केलं तर

महासंग्राम
Mon, 09/05/2016 - 11:55 नवीन
फ्लिकर वर राईट क्लिक केलं तर 'कॉपी इमेज ऍड्रेस' ऑप्शनच येत नाही. आणि मिपावर फोटो अपलोड करण्यासाठी .jpg असलेली लिंक पाहिजे असते ती मिळवायची.
  • Log in or register to post comments

कोणतेही चित्र दुसरीकडे

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/05/2016 - 18:12 नवीन
कोणतेही चित्र दुसरीकडे प्रसिद्ध करण्यासाठी ते चित्र पूर्ण आकारात पाहून मगच त्याचा "इमेज अ‍ॅड्रेस" मिळविणे जरूर असते... आल्बममधिल थंबनेल आकाराने कितीही मोठे दिसले तरी त्याचा इमेज अ‍ॅड्रेस या कामी येत नाही. अश्या योग्य इमेज अ‍ॅड्रेसचे एक्सटेन्शन कोणते आहे हे महत्वाचे नाही. इमेज स्टोअर करणारे संस्थळ मुळ इमेजचेच एक्सटेन्शन वापरतेच असे नाही. उदा : मूळ इमेजचे एक्सटेन्शन काहीही असले तरी हल्ली गुगल फोटो .no हे स्वतःचे एक्सटेन्शन वापरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

ओके.. धन्यवाद डॉक. काका :)

महासंग्राम
Mon, 09/12/2016 - 12:50 नवीन
ओके.. धन्यवाद डॉक. काका :) ट्राय करतो आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नेहमी फोटो चढवतानाच माशी

सपे-पुणे-३०
Tue, 09/06/2016 - 11:58 नवीन
नेहमी फोटो चढवतानाच माशी शिंकते. परत वर सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करून पाहते.
  • Log in or register to post comments

कोणतीही पायरी न वगळता सर्व

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/06/2016 - 12:21 नवीन
कोणतीही पायरी न वगळता सर्व पायर्‍या योग्य क्रमाने पार केल्या तर समस्या येऊ नये. ही प्रक्रिया सुरुवातीच्या एकदोन प्रयत्नांत जरा कठीण वाटते, पण सवय झाली की सहजपणे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सपे-पुणे-३०

(No subject)

सपे-पुणे-३०
Tue, 09/06/2016 - 12:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

चित्र दिसत नाही. चित्राला

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/06/2016 - 13:55 नवीन
चित्र दिसत नाही. चित्राला पब्लिक अ‍ॅक्सेस दिला आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सपे-पुणे-३०

(No subject)

सपे-पुणे-३०
Mon, 09/12/2016 - 12:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

जमलं की ! सुंदर चित्र !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/12/2016 - 14:55 नवीन
जमलं की ! सुंदर चित्र ! फक्त एक छोटी सूचना. चित्र टाकताना फक्त width टाका, height रिकामी ठेवा. असे केल्याने मिपा तुम्ही दिलेल्या width ला योग्य ती height निवडून (आस्पेट रेशो कायम राहिल्याने) चित्र उभे किंवा आडवे ताणल्यासारखे/चेपल्यासारखे डिस्टॉर्टेड) न दिसता मूळ चित्रासारखे वास्तविक दिसेल. तुमचेच चित्र वरच्याप्रमाणे टाकल्यावर दिसणारा फरक पहा : Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सपे-पुणे-३०

हो, फरक स्पष्टपणे दिसतोय. आता

सपे-पुणे-३०
Tue, 09/13/2016 - 08:20 नवीन
हो, फरक स्पष्टपणे दिसतोय. आता ही height ची टिप नक्की लक्षात ठेवीन. थँक्यू काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बहुदा चित्र टाकायला जमलं...

सपे-पुणे-३०
Mon, 09/12/2016 - 14:52 नवीन
बहुदा चित्र टाकायला जमलं... तिकडे पैसाताईंचा उकडीच्या मोदकाच्या फोटोवर प्रतिसाद आलाय. तसं असेल तर उकडीच्या मोदकांपेक्षा जास्त आनन्द झालाय.
  • Log in or register to post comments

जमतंय आम्हाला पन :)

फेदरवेट साहेब
Mon, 09/12/2016 - 20:40 नवीन
Image removed. (आमचा एका मित्रानं हौसेनं काढल्याला फटू)
  • Log in or register to post comments

उपयुक्त माहिती .

सिरुसेरि
Wed, 11/02/2016 - 15:59 नवीन
उपयुक्त माहिती . कॄपया , व्हिडीओ अपलोड कसा करावा त्याचीही माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments

व्हिडिओ टाकण्यासाठी खालील

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/13/2018 - 16:09 नवीन
व्हिडिओ टाकण्यासाठी खालील कृती करा : चालू व्हिडिओवर राईट क्लिक करा व "copy embed code" निवडा आणि तो कोड मिपात चिकटवा (पेस्ट करा)... बस झाले काम ! उदा: वर टाकलेला कोड असा आहे (कोड एक्झेक्युट होऊ नये यासाठी कोडाच्या दोन्ही टॉकाच्या सगळ्यात बाहेर अँग्ल्ड ब्रॅकेट्सच्या ऐवजी गोल ब्रॅकेट्स वापरल्या आहेत)... (iframe width="854" height="480" src="https://www.youtube.com/embed/OoI57NeMwCc" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

माझा मार्ग

अरविंद कोल्हटकर
Sat, 01/13/2018 - 04:54 नवीन
हा धागा वर काढण्याचे कारण असे की मी जे करतो ते सर्वांना सांगावे. ज्यांना तसे करावेसे वाटेल त्यांना लाभ होईल कारण मी करतो ते अत्यंत सोपे आहे. मी स्वतः अगदीच टेक्नोमंद आहे म्हणून ही automated पद्धत वापरतो. प्रथम गूगलमध्ये स्वतःचा एक ब्लॉग सुरू करा आणि एक New Post सुरू करा. मिपाकडे पाठवायचे चित्र तेथे आणा, ज्यासाठी तेथेच लिंक आहे. पान सेव करून राइट क्लिकने Copy image address निवडा. आता चित्राचा URL तुमच्या क्लिपबोर्डावर येऊन बसला आहे. पुढील HTML Code मी आपल्यापाशी तयार ठेवलेले आहे. Image removed. तयार कोड ह्या कोडिंगमध्ये चित्राची रुंदी ५०० पिक्सेल्स, चित्र आणि आणि शीर्षक मध्यावर येणे आणि इटॅलिक्समध्ये येणे हे घातलेले आहे. २ अथवा अधिक चित्रे घालायची असल्यास पहिले चित्र घालून त्याचे पूर्ण कोडिंग कॉपी करून खाली चिकटवा आणि केवळ URL बदला आणि वर्णन बदला. ह्या ब्लॉगवर कितीहि चित्रे चढविता येतील. पुढेमागे एखादे चित्र कोठे आहे हे शोधायची वेळ आली तर सोपे जावे म्हणून मी प्रत्येक महिन्यासाठी वेगळी New Post उघडून तिला त्या महिन्याचे नाव देतो. सवय झाली की ह्या मार्गाने कितीहि चित्रे वेगाने लेखामध्ये घालता येतात. पानाच्या डाव्या/उजव्या बाजूस चित्र चिकटविणे, टेबलमार्गे अनेक चित्रे चिकटवणे असले प्रकार मी टेक्नोमंद असल्यामुळे सहसा टाळतोच पण त्याचेहि असे कोडिंग एकदाच करून जवळ ठेवून देता येईल.
  • Log in or register to post comments

उत्तम कल्पना !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/13/2018 - 15:59 नवीन
उत्तम कल्पना ! पण, खास यासाठीच ब्लॉग बनवायची गरज नाही. (अ) मी वारंवार वापरत असलेल्या चित्रांच्या आकारमानांची आणि (आ) फॉर्मॅट्सची (उदा, सेंटरिंग, एकाच ओळीत अनेक चित्रे... त्यातही ती चित्रे एकाच उंचीची / रूंदीची असलेले, इ) कोड टेम्प्लेट्स (इमेज अ‍ॅड्रेसची जागा रिकामी ठेवून) मी वर्ड फाईलमध्ये ठेवले आहेत. मिपावरचे लेखन करताना ती वर्ड फाईल उघडी ठेवतो आणि तिच्यातून जरूर ती टेंप्लेट लेखात कॉपी करतो. आता त्या टेंप्लेटमध्ये हव्या त्या चित्राचा/चे इमेज अ‍ॅड्रेस टाकला की चित्र हवे त्या आकारात, पानावर हवे तेथे चपखल बसते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर

एक विनंती हा धागा फार लांबला

कंजूस
Tue, 01/16/2018 - 15:14 नवीन
एक विनंती हा धागा फार लांबला आहे आणि फोटोंमुळे जड झाला आहे - दुसरा भाग काढावा. # अरविंदरावांची आइडिया बरोबर आहे कारण १) ब्लॅागरपोस्ट पब्लिकच असतात, २) ब्लॅागरच्या लिंकस गुगलवाले बदली करत नाहीत, ३) गुगलमध्ये पिकासो, सर्कल,प्लस, फोटो असे नवनवे प्रकार बदलत राहिल्याने त्यातल्या लिंकस गंडलेल्या आहेत पण ब्लॅागरच्या तशाच आहेत. प्राब्लेम फक्त विंडोज मोबाइलवाल्यांचा झाला. अगोदर सपोर्ट होता तो गुगलने काढून घेतल्याने ब्लॅागर बंद पडले. पुर्वी वेबसाइट वापरायचो पण नंतर ते अॅप डाउनलोड करा सांगतात आणि ते अँड्राइड नसल्याने चालत नाही. फेसबुक हा सर्वोत्तम उपाय आहे.
  • Log in or register to post comments

टेस्ट

साबु
Tue, 06/26/2018 - 19:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

iframe insert करू शकतो का मिपावर ?

टर्मीनेटर
Tue, 06/26/2018 - 19:26 नवीन
iframe insert करू शकतो का मिपावर ? जर करता येत असेल तर खूपच सोपं पडेल image Gallery टाकायला.
  • Log in or register to post comments

सद्याच्या व्यवस्थेत मिपावर

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/26/2018 - 22:41 नवीन
सद्याच्या व्यवस्थेत मिपावर प्रत्येक चित्र स्वतंत्रपणे टाकावे लागते. गॅलरीचा फक्त दुवा देता येईल, पण तिच्यातील फोटो वाचकांना मूळ संस्थळावर पहावे लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

हो, iframe वापरून मी लेखांत

निशाचर
Wed, 06/27/2018 - 03:40 नवीन
हो, iframe वापरून मी लेखांत गुगल मॅप जोडले आहेत. पण इमेज गॅलरीसाठी iframe वापरलेली नाही; बहुतेक गुगल फोटो सपोर्ट करत नाही. तुम्ही प्रयत्न केलात तर जमतंय का ते अवश्य सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

स्केचेस कसे टाकायचे?

चामुंडराय
Wed, 06/27/2018 - 06:37 नवीन
.
  • Log in or register to post comments

हे चालेल का टर्मिनेटर?

कंजूस
Wed, 06/27/2018 - 06:44 नवीन
हे चालेल का टर्मिनेटर? तुमच्याच आताच्या धाग्यातले सहा फोटोंचा स्लाइडशो करून विडिओ प्लेअर केला आहे. फोटोंचे स्क्रिनशॅाट्स घेतल्याने कमी रेझलुशन/साइजचे झाले आहेत आणि विडिओची साइजही लहान राहिली. प्लेअर न देता फक्त युट्युब विडिओची लिंक देण्याचा पर्याय आहेच. समुद्र, सेरापियम, किल्ला, काटकोंब यांचा एकेक फोटो लेखात देऊन एकेका जागेचे अधिक फोटोंचे विडिओ प्लेअर/ लिंक देऊ शकता. प्रत्येक भागात नकाशा हवा आहे.
  • Log in or register to post comments

मोबाइल फोनमधून (Android) गुगल

कंजूस
Mon, 07/02/2018 - 10:28 नवीन
मोबाइल फोनमधून (Android) गुगल फोटो फेल्डरमध्ये असलेल्या फोटोची मिपासाठी इमेज लिंक काढणे - तयारी - जो फोटो लेखासाठी घ्यायचा आहे तो प्रथम फोन मेमरीमधून इंटरनेटवर - google photos वर अपलोड करण्याचे गरजेचे आहे. फोटो उघडल्यावर वरती वर दिशेकडे दाखवणारा बाण /किंवा छोट्याशा ढगात वर जाणारा बाणाचे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक केल्यावर फोटो अपलोड होणे सुरू होईल. नंतर - - - १) गुगल फोटो app उघडा, २) हवा असलेल्या फोटोवर क्लिक केल्यावर फोटो मोठा दिसेल. वरच्या बाजूस शेअरिंगची खूण दिसेल त्यावर क्लिक करा. एका चौकोनात एक छोटीशी लिंक येईल ती "कॅापी लिंक" करून घ्या. आणि "share with anyone/ public " ok करा. ३) ctrlq dot org/google/photos ( CTRLQ dot org ) ही साइट उघडा, एका चौकोनात "paste link here" दिसेल तिथे वरची लिंक पेस्ट करून पुढच्या चौकोनातल्या " generate code" buttonवर टिचकी मारा. आता पेजच्या खाली दोन चौकोनात दोन लिंक्स येतात -- पहिला -direct link - ही कॅापी करून मिपा लेखाच्या फोटोसाठी वापरा. दुसरी लिंक - embed code असते. ( या साइटमधून लिंक्स निघाल्या नाहीत तर तुमचा फोटो पब्लिक शेअरिंगसाठी रेडी नाही हे आपोआपच कळते हा एक फायदा आहे. )
  • Log in or register to post comments

जमलं व्हिडो एम्बेड करायला.

चौथा कोनाडा
Tue, 03/05/2019 - 12:45 नवीन
ट्रायल म्हणून प्रिन्टेड रेन्बो ही एक अप्रतिम शॉर्ट फिल्म एम्बेड करून बघितलीय....... जरूर पहा खुप सुंदर अहीआहे.
  • Log in or register to post comments

प्रयत्न केला

धर्मराजमुटके
Sun, 07/14/2019 - 18:52 नवीन
Image removed. जम्पशेअर वर प्रयत्न केला, जमतेय बहुतेक. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा

धर्मराजमुटके
Sun, 07/14/2019 - 18:56 नवीन
Image removed. चित्र लहान करुन बघितले.
  • Log in or register to post comments

बादवे, हे कोणतं ठिकाण आहे?

गवि
Sun, 07/14/2019 - 19:15 नवीन
बादवे, हे कोणतं ठिकाण आहे? धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

प्लिटविस -क्रोएशिया

धर्मराजमुटके
Sun, 07/14/2019 - 20:18 नवीन
भटकंती विभागात प्लिटविस -क्रोएशिया वर चा लेख पाहिला. तिथे चित्रे डकविण्याची समस्या होती लेखिकेला. मलाही चित्र डकवून पाहायचे होते एकदा म्हणून गुगलवर शोध घेऊन ह्या ठिकाणाचा फोटो टाकला. बहुधा तिथलं नॅशनल पार्क आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चलचित्र मिपावर चढविणे - एक प्रयत्न

धर्मराजमुटके
Sun, 07/14/2019 - 19:01 नवीन
ये दिल और उन की निगाहों के साये !
  • Log in or register to post comments

अजुन एक प्रयत्न करुन पाहतो चलचित्र टाकण्याचा उजळणी म्हणून

धर्मराजमुटके
Sun, 07/14/2019 - 20:25 नवीन
अजुन एक प्रयत्न करुन पाहतो चलचित्र टाकण्याचा उजळणी म्हणून
  • Log in or register to post comments

धर्मराजमुटके, छान सराव

चौथा कोनाडा
Wed, 07/17/2019 - 14:24 नवीन
धर्मराजमुटके, छान सराव केलाय ! फिल्म्स देखिल सुरेख आहेत !
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

धर्मराजमुटके
Wed, 07/17/2019 - 20:27 नवीन
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद ! मी मिपावर तब्बल १० वर्षे इतका काळ आहे. खरं तर हे अगोदरच शिकायला पाहिजे होतं. मी तंत्रमंद आहे असे ही नाही. पण कंटाळा ! खरं तर जास्त काही लिखाण / प्रतिसाद दिलेले नाहित मिपायुष्यात. पण दिवसातून २-४ वेळा तरी इथें आल्याशिवाय राहवत नाही. नवीन असताना लेख लिहावेत, प्रतिसाद द्यावेत असे सतत वाटते, अगदी व्यक्त व्हायला हात शिवशिवत असतात. पण कालांतराने आपण बरेचजण थंड होत जातो. वाचनमात्र राहिलो तरी पुरे असे वाटते. याला मी काळ बदलला, मिपा बदलले असे नाही म्हणणार, पण आपणच बदलत असतो हळुहळू ! माझा पुर्वीचा बॉस मला नेहमी म्हणायचा, " कमॉन धर्मराज, यु कॅन डू इट, बट यु शुड हॅव दॅट फायर इन द बेली !" पण आता फायर बेलीच्या बराच खाली, बुडा खाली सरकलाय :) असो ! भटा ला दिली ओसरी, भट हातपाय पसरी असा झाला हा प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

नवीन असताना लेख लिहावेत,

यशोधरा
Wed, 07/17/2019 - 21:13 नवीन
नवीन असताना लेख लिहावेत, प्रतिसाद द्यावेत असे सतत वाटते, अगदी व्यक्त व्हायला हात शिवशिवत असतात. पण कालांतराने आपण बरेचजण थंड होत जातो. वाचनमात्र राहिलो तरी पुरे असे वाटते. याला मी काळ बदलला, मिपा बदलले असे नाही म्हणणार, पण आपणच बदलत असतो हळुहळू !
मस्त लिहिलं आहेत. आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

तुमच्या कोडमध्ये width ="80%"

कंजूस
Wed, 07/17/2019 - 22:25 नवीन
तुमच्या कोडमध्ये width ="80%" केली आणि height काढून टाकल्यावर आटोपशिर झालं
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

धर्मराजमुटके
Wed, 07/17/2019 - 22:32 नवीन
आपण गायकीचे मर्म अचूक पकडले आहे. प्रसिद्धीसाठी गाणार्‍याचे मुख दिसणे उचित. पोटासाठी गाणार्‍याचे पोट दिसणे उचित. तद्वतच मनापासून गाणार्‍याचे केवळ ह्रदय आणि गळा दिसणे उचित होय. आपण प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगले शिकू शकतो . धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

(No subject)

अभिरुप
Wed, 01/08/2020 - 20:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

.

अमरेंद्र बाहुबली
Sun, 10/11/2020 - 02:26 नवीन
.
  • Log in or register to post comments

.

अमरेंद्र बाहुबली
Sun, 10/11/2020 - 02:27 नवीन
.
  • Log in or register to post comments

(No subject)

Sanjay Uwach
Sun, 10/18/2020 - 10:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आणखी एक महत्वाचे :

चौथा कोनाडा
Sun, 10/18/2020 - 20:29 नवीन
कंजूस साहेबांनी सुचवलेले करावे. आणि ट्रायल घेताना आणखी एक महत्वाचे : १. "शेअर टू एव्हरीवन / ऑल " करून लिंक सेव्ह (नोटपॅड वर वै). करुन ठेवावी २. गुगल / गुगल फोटोज / गुगल ड्राइव्ह वरून लॉग ऑऊट करावे ३. मग, ती मिपावर टाकून पुर्वपरिक्षणात दिसते का याची ट्रायल घ्यावी ४. इमेज पुर्वपरिक्षणात दिसत नसेल तर शेअर झालेली नाही हे समजते. ५. परत "शेअर टू एव्हरीवन / ऑल " करून पुन्हा वरील प्रमाणे ट्रायल घ्यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach

मी शेअर टू ऑल हा स्टेटस

Sanjay Uwach
Sun, 10/18/2020 - 20:53 नवीन
मी शेअर टू ऑल हा स्टेटस सेटिंग मधून काढतो. तिथले वरडीग माझ्या ल्यापटोप वर कांहीं वेगळेच आहे तर हा स्टेटस कुठून काढायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

चित्र लॅपटॉप वर दिसते मात्र

Sanjay Uwach
Sun, 10/18/2020 - 21:03 नवीन
चित्र लॅपटॉप वर दिसते मात्र फोन वर नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach

ओके

चौथा कोनाडा
Sun, 10/18/2020 - 22:06 नवीन
लिन्क व्यनि करा (किंवा इथे चिटकवा ) मोबाईलवर आणि लॅपटॉप वर तपासतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach

https://lh3.googleusercontent

Sanjay Uwach
Sun, 10/18/2020 - 22:48 नवीन
https://lh3.googleusercontent.com/rUZ97Uv-9-NH9nmj7DSctu02PO1IYodUfBULy4aT_Wfo6dzkPwJSkHTtK7SRhvuIgDtseGCOoofWML25NVK3mgL5dIzdDtIoCnl0aP9Z6bSii98q959cZ5mdrK7HooFtPV9xjJjgFSzF6FyxX2dg85QTJc2NgOcLFKU24K2l87ZFy54o_TmR9Ov1VBgyK_w0jkgypvM3SHyuQrUO4zgj1bKL9sHlVPtsvWAOgsx28Xn8To6IRtbLmLdwK5dFyXG5rHzJFq7o65OpeUHBuZ1esHBAqn-l4pqG0QCp-DYvssxKmp_tw4OIQ6PAqbyjgqm2ae6Iy8WNQAMBRO5b9zc7VDdt4h6ZpTBIrId3QH2UuyNu0F8IgyBqcs9Gi-Dsk2uckK5kOh2u4f9AfpTIyi3TNeCVLrBqA-HenP5Za2viQYrhYOuFqSz3wh0ZgneMyoPZr-ZWHu54VRb0hTur1UBZOBkB-_vkGKozX-ZBbPYTdz2QySd5KxqrlpnkLoCgvX3kEy1a-FXdxy8ojvipvI8-w1J2_-DrT61kTCJm5Pg9KfxZN32TPpv9P7sofA_2_ausvA0Ke8rv9TmLu8ZFqf9ZBDHiAYsTYtiLoHVPfF4M3ObIDXhGo2MgHRFFIaTk1ebXduEBfCNKmUZF-xxkVR17r6mJFwx5Wgz4rZhWRsCcuNc4FPzHhGuyR_2upUno=w247-h186-no?authuser=0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

हे लॅपटॉप वर दिसत नाहीय.

चौथा कोनाडा
Mon, 10/19/2020 - 10:12 नवीन
हे लॅपटॉप वर दिसत नाहीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach

आणि मोबाईल वर देखील दिसत

चौथा कोनाडा
Mon, 10/19/2020 - 12:23 नवीन
आणि मोबाईल वर देखील दिसत नाहिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा