आहे खरा कूटप्रश्न! च्यामारी काय म्हणावं बरं?? :)
जसं नाट्यकर्मी, रंगकर्मी असतं तसं मिसळकर्मी चालेल? :)
बाय द वे, 'मिसळपावकर' ठीक वाटत आहे. 'मिसळपाववाले' पण बरं वाटतंय!
असो, लोकशाही पद्धतीनेच काय ते ठरू द्या आणि होऊ द्या बारसं!:)
आपला,
मिसळपाववाला!
मिसळ्या मस्त! पण त्याचे स्त्रीलिंगी रुप काय?
मिसळकर्मीही बरं आहे पण नेहमीचं आहे. काहीतरी झक्कास येऊ दे.
अरे देवा! कोणीतरी बायकांना मटकी आणि पुरुषांना फरसाण असे नाव नाही ना सुचवणार. :(
माझे काही पर्याय
मिसळ-पावभक्त
मिसळ-पावकरी {यात मिसळचा रस्सा पण येतो}
मिसळ-पावे
मिसळ-पावी {अगदी मनोगती श्टाईल}
मिसळपाव्या
मिसळा-पावा {मिसळ-पाव वर एकत्र या आणि पुण्यवान व्हा .......कसे :)}
तूर्तास इतके पुरे. अजुन काथ्याकूट करायला लागेल त्यावेळी अजून डोके खाजवायला लागेल.
- (मिसळ-पाव भक्त) सागर
सर्वच नावे खास आहेत. कधीतरी स्वाक्षरीत वापरण्यासाठी चांगली आहेत.
मिसळपावर,मिसळनवाज,मिसळपंत,मिसळमंद,आणि मिसळमुरारी ही नावे आम्ही खरेदी केली आहेत, इतरांनी वापरण्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी :)
ता.क. मिसळप्रेमी उत्तम नाव आहे.
प्रा.डॉ.मिसळनवाज
वरच्या प्रतिसादात स्त्रीलिंगी नावे थोडी कमी पडली, म्हणून इथे देत आहे:
मिसळबी, मिसळभाभी, मिसळखानम, मिसळखातुन, मिसळदीदी, मिसळवहिनी, मिसळकाकू, मिसळआजी, मिसळीबेन, मिसळमाई,
मिसळेश्वरी(देवी), मिसळेन्द्राणी, मिसळकौर, मिसळकुमारी, मिसळप्रिया(ली?).
एक उभयलिंगी: मैसळीय किंवा पावमैसळीय.--वाचक्नवी
वा..या बद्दल
एक नाव सुचले होते ते तात्यांना सांगावे असे मनात होते पण कितपत बरे आहे याचा अंदाज नसल्याने कळवले नाही.
आता हा चर्चाविषय दिसल्याने सोय झाली. :)
मला खादाड असे नाव सुचले :) उभयलिंगी लागू आहे :)
वाक्यात उपयोग - ५ खादाड आले आहेत, खादाड लिखाळ मिसळपावावर भटकतात :)
(सहज यांनी सुद्धा खवय्ये असे सुचवले आहेच.)
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
एक नाव सुचले होते ते तात्यांना सांगावे असे मनात होते पण कितपत बरे आहे याचा अंदाज नसल्याने कळवले नाही.
आता हा चर्चाविषय दिसल्याने सोय झाली
धन्यवाद लिखाळराव, कळवलेत ते बरे झाले. आपली सुचवण पंचायत समितीच्या कानावर घालतो! :)
(आमाला येथेही पावर नाय! :)
आता हा जुना धागा वर काठला म्हाणुन हानु नका.
मिसळपाव चा सदस्य तो असेल तर 'पाव' आनि ती असेल तर 'मिसळ'
ह्य दोन शब्दांवर अर्थ अनर्थांचे बरेच वादंग होतील..
चला एक काडी टाकून बघतो..
मिसळ आणि पाव यांनी एकत्र येऊन सोशल नेट वर्किंग ला झणझणीत पणा आणला असे म्हणू हवे तर.
पाव. रविंद्र गायकवाड.
तो असेल तर पावतो. आणि ती मिसळते...
प्रतिक्रिया
आयला!
हाच प्रश्न
मिसळ्या
मिसळे
मिस.
झक्कास!
गिर्हाईक
बापरे
आणि मुलाला
आणि सर्वांना मिळून?
हम्म्म
माझे काही पर्याय
मिसळू
मिसाळ
अधिकृत मिसळ
मिसळवर्मी
मेंबरांपैकीचे शिक्षक सरमिसळ
मिसळ
झकास!
मिसळप्रेमी
वा!व्वा!
ओर्कुत
मिसळ प्रेमी
मिसळ्श्री
आणि
आम्ही गोंधळी..आई देवी मिसळाबाईचे..
मिसळारू, मिसळपावर...
वा ! काय सुंदर नावे शोधलीत !
स्त्रीलिंगी नावे
खादाड
धन्यवाद,
अहो...मिसळक
हा हा हा..
मिसाळलेले
मिसाळलेले
मिसळखोर!!!
'मिसाळलेले-पिसाळलेले', मिसळखोर..
मिसळ
मिसळप्रेमी
आणखी एक
कूटप्रश्न
'कूटप्रश्न'
आता हा जुना धागा वर काठला
मिपाकर
'मिपाकर' हे आता मान्य आहे
मिसळोबा आन मिसळाई