Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कूटप्रश्न

प
प्रियाली यांनी
Sun, 09/16/2007 - 16:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49100 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 17:09 नवीन

आयला!

आहे खरा कूटप्रश्न! च्यामारी काय म्हणावं बरं?? :) जसं नाट्यकर्मी, रंगकर्मी असतं तसं मिसळकर्मी चालेल? :) बाय द वे, 'मिसळपावकर' ठीक वाटत आहे. 'मिसळपाववाले' पण बरं वाटतंय! असो, लोकशाही पद्धतीनेच काय ते ठरू द्या आणि होऊ द्या बारसं!:) आपला, मिसळपाववाला!
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 09/16/2007 - 17:06 नवीन

हाच प्रश्न

काल सतावत होता. मिसळकर्मी, मिसळधर्मी चालेल.
  • Log in or register to post comments
क
कौटील्य Sun, 09/16/2007 - 17:09 नवीन

मिसळ्या

मिसळ खात मिसळणारा तो मिसळ्या
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 09/16/2007 - 17:13 नवीन

मिसळे

मिसळ्या मस्त! पण त्याचे स्त्रीलिंगी रुप काय? मिसळकर्मीही बरं आहे पण नेहमीचं आहे. काहीतरी झक्कास येऊ दे. अरे देवा! कोणीतरी बायकांना मटकी आणि पुरुषांना फरसाण असे नाव नाही ना सुचवणार. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौटील्य
आ
आजानुकर्ण Sun, 09/16/2007 - 17:13 नवीन

मिस.

स्त्रियांना मिस असे म्हणता येईल. ;) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Sun, 09/16/2007 - 17:15 नवीन

झक्कास!

मिस म्हणायला तशीही कधीच हरकत नसावी स्त्रियांची. मिस. प्रियाली. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/16/2007 - 17:14 नवीन

गिर्‍हाईक

'गिर्‍हाईक' या शब्दाला अनेक छ्टा आहेत. हित बी 'गिर्‍हाईक 'तिथ बी 'गिर्‍हाईक'. पन हित 'बसनं' वायल 'तित 'बसनं' वायल, समदी गिर्‍हाईक सार्की न्हवं. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 09/16/2007 - 17:18 नवीन

बापरे

आहे खरा कूटप्रश्न. खरी ओळख तर खवय्ये आहे पण नाव काय? हं मिसळपाववर येणार्‍या चायनीज मूलीला काय म्हणाल? मिसली
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 09/16/2007 - 17:19 नवीन

आणि मुलाला

मसली ;)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 09/16/2007 - 17:20 नवीन

आणि सर्वांना मिळून?

सर्वांना मिळून काय म्हणावे? मसल्स आणि मिजल्स की मिसाईल्स? :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
न
नंदन Mon, 09/17/2007 - 02:19 नवीन

हम्म्म

सहज यांनी सुचवलेला 'खवय्या' माझ्याही डोक्यात आला होता. मिसळधर्मीही चालू शकेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 09/17/2007 - 13:34 नवीन

माझे काही पर्याय

माझे काही पर्याय मिसळ-पावभक्त मिसळ-पावकरी {यात मिसळचा रस्सा पण येतो} मिसळ-पावे मिसळ-पावी {अगदी मनोगती श्टाईल} मिसळपाव्या मिसळा-पावा {मिसळ-पाव वर एकत्र या आणि पुण्यवान व्हा .......कसे :)} तूर्तास इतके पुरे. अजुन काथ्याकूट करायला लागेल त्यावेळी अजून डोके खाजवायला लागेल. - (मिसळ-पाव भक्त) सागर
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Mon, 09/17/2007 - 14:02 नवीन

मिसळू

मिसळू कसे वाटते?
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Mon, 09/17/2007 - 14:53 नवीन

मिसाळ

आमचे एक गुर्जी व्हते मिसाळ म्हणून. त्येनी खरंतर येक मिसळीच हाटेल टाकलं असतं तर झ्याक चाललं असतं. आजून काही मिसळलेली नावे मिसळोजी, मिसळाबाई, मिसळावती, मिसळपंत मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/17/2007 - 15:04 नवीन

अधिकृत मिसळ

अधिकृत पणे केली तर ती "मिसळ" अनाधिकृत पणे केली तर ती 'भेसळ' प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Mon, 09/17/2007 - 16:41 नवीन

मिसळवर्मी

वर्मावर बोट ठूनारे मिसळवर्मी.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 09/17/2007 - 18:04 नवीन

मेंबरांपैकीचे शिक्षक सरमिसळ

काय म्हणता सर लोकं? हां - म्याडमांची सरमिसळ ही भेसळ नाही. ती स्पेशल.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 09/18/2007 - 14:47 नवीन

मिसळ

मिसळ खाउ हे कस आहे? :)
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/19/2007 - 10:31 नवीन

झकास!

अगदी समर्पक! (अवांतर: खूप विचार केला पण 'मिसळणाचा डबा' या काहीच्या काहीच पर्यायापुढे बुद्धीची झेप जात नव्हती...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
आ
आवडाबाई Wed, 09/19/2007 - 13:15 नवीन

मिसळप्रेमी

चालेल?
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 09/19/2007 - 14:56 नवीन

वा!व्वा!

मिसळप्रेमी सहीच! साधं सोपं आणि सुटसुटीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई
ट
टीकाकार-१ Wed, 09/19/2007 - 15:36 नवीन

ओर्कुत

ओर्कुत ग्रुप सारखा मिसळ प्रेमिन्चा ग्रुप वाट्तो आहे! :)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 09/19/2007 - 16:15 नवीन

मिसळ प्रेमी

ला माझा संपुर्ण पाठिंबा आमच्या तालुक्याची समदी मत "मिसळ प्रेमी " वरच.
  • Log in or register to post comments
अ
अप्पासाहेब Wed, 09/19/2007 - 16:25 नवीन

मिसळ्श्री

मिसळ्श्री ! मिसळ्पावी ! मिसळ्जन ! मिसळोबा !
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 09/19/2007 - 16:25 नवीन

आणि

मिसळस्त्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पासाहेब
व
विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 18:37 नवीन

आम्ही गोंधळी..आई देवी मिसळाबाईचे..

वा! वरील सर्व प्रतिसाद वाचून, मिसळीचे गोंधळी गं आई मिसळीचे गोंधळी...ऽऽऽ आहाऽऽऽ मिसळीचा गोंधळ मांडिला गं आम्ही मिसळीचे गोंधळी...ऽऽऽ आहाऽऽऽ आई अंबाबईच्या नावानं..ऽऽ चांगभलं..ऽऽऽ, ज्योतिबाच्या नावानं..ऽऽ चांगभलं..ऽऽऽ, मिसळीच्या नावानंऽऽऽ उदो उदो! असं म्हणावंसं वाटलं आणि धन्य झालो... आपला, तात्या सरपंच!
  • Log in or register to post comments
व
वाचक्नवी Sat, 09/22/2007 - 22:22 नवीन

मिसळारू, मिसळपावर...

मिसळपावर, मिसळारू, मिसळबाज, मिसळगीर, मिसळनीस, मिसळ्भाई, मिसळभैय्या, मिसळेन्द्र(नाथ), मिसळगीर, मिसळनवाज, मिसळमंत, मिसळमंद, मिसळपंत, मिसळशौकी(न), मिसळमुरारी, मिसळखान, मिसळमिजाज, मिसळपसंद..--वाचक्‍नवी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/22/2007 - 23:15 नवीन

वा ! काय सुंदर नावे शोधलीत !

सर्वच नावे खास आहेत. कधीतरी स्वाक्षरीत वापरण्यासाठी चांगली आहेत. मिसळपावर,मिसळनवाज,मिसळपंत,मिसळमंद,आणि मिसळमुरारी ही नावे आम्ही खरेदी केली आहेत, इतरांनी वापरण्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी :) ता.क. मिसळप्रेमी उत्तम नाव आहे. प्रा.डॉ.मिसळनवाज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक्नवी
व
वाचक्नवी Sun, 09/23/2007 - 22:15 नवीन

स्त्रीलिंगी नावे

वरच्या प्रतिसादात स्त्रीलिंगी नावे थोडी कमी पडली, म्हणून इथे देत आहे: मिसळबी, मिसळभाभी, मिसळखानम, मिसळखातुन, मिसळदीदी, मिसळवहिनी, मिसळकाकू, मिसळ‍आजी, मिसळीबेन, मिसळमाई, मिसळेश्वरी(देवी), मिसळेन्द्राणी, मिसळकौर, मिसळकुमारी, मिसळप्रिया(ली?). एक उभयलिंगी: मैसळीय किंवा पावमैसळीय.--वाचक्‍नवी
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 09/23/2007 - 22:31 नवीन

खादाड

वा..या बद्दल एक नाव सुचले होते ते तात्यांना सांगावे असे मनात होते पण कितपत बरे आहे याचा अंदाज नसल्याने कळवले नाही. आता हा चर्चाविषय दिसल्याने सोय झाली. :) मला खादाड असे नाव सुचले :) उभयलिंगी लागू आहे :) वाक्यात उपयोग - ५ खादाड आले आहेत, खादाड लिखाळ मिसळपावावर भटकतात :) (सहज यांनी सुद्धा खवय्ये असे सुचवले आहेच.) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 23:49 नवीन

धन्यवाद,

एक नाव सुचले होते ते तात्यांना सांगावे असे मनात होते पण कितपत बरे आहे याचा अंदाज नसल्याने कळवले नाही. आता हा चर्चाविषय दिसल्याने सोय झाली धन्यवाद लिखाळराव, कळवलेत ते बरे झाले. आपली सुचवण पंचायत समितीच्या कानावर घालतो! :) (आमाला येथेही पावर नाय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
द
देवदत्त Wed, 10/31/2007 - 12:01 नवीन

अहो...मिसळक

अहो... मिसळकर कसे वाटते देवदत्त (अर्जुनाचा शंख)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/31/2007 - 18:40 नवीन

हा हा हा..

मी सांगू का?... पुण्यात जसे जोशी वडेवाले आहेत ना.... तसेच.. मिसळकर पाववाले... काय कसे वाटते..? :) प्राजु.(मिसळकर पाववाली)
  • Log in or register to post comments
त
तो Sat, 11/03/2007 - 19:07 नवीन

मिसाळलेले

मिसळखोर, मिसाळलेले, धुसमिसळे
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 11/04/2007 - 03:35 नवीन

मिसाळलेले

मस्तच! म्हणजे वादावादी झाली तर पिसाळलेलेही म्हणता येईल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तो
ब
बेसनलाडू Sun, 11/04/2007 - 05:06 नवीन

मिसळखोर!!!

समस्त सदस्यांचे स्वभावविशेष लक्षात घेता (मस्तीखोर, दंगेखोर सारखे )मिसळखोर जास्त सयुक्तिक वाटते ;) (मिसळखोर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तो
व
विसोबा खेचर Sun, 11/04/2007 - 07:09 नवीन

'मिसाळलेले-पिसाळलेले', मिसळखोर..

हे तीनही शब्द मला अतिशय आवडले! :) आपला, ('एक नंबरचा हरामखोर' च्या चालीवर 'एक नंबरचा मिसळखोर!) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 19:58 नवीन

मिसळ

मिसळ वारकरी कसे आहे? ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सुहास. Mon, 01/12/2009 - 20:07 नवीन

मिसळप्रेमी

प्रियालीताइशी सहमत
  • Log in or register to post comments
व
व्यंकु Mon, 01/12/2009 - 20:24 नवीन

आणखी एक

मिसळेश्वर आणि मिसळेश्वरी कसं वाट्ट?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 01/12/2009 - 20:53 नवीन

कूटप्रश्न

मिपाच्या साइट ला हॉटेल म्हणतो. पुण्याच्या अनेक खाणावळीत मेंबरांना पॅसेंजर म्हटले जाते. तसे आपणही म्हणायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/12/2009 - 21:24 नवीन

'कूटप्रश्न'

हा शब्द चुकीचा आहे! 'कूट' हे दाण्याचे, फार तर तिळाचे वगैरे. मिसळीचे कोणी कूट करते काय? आणि प्रश्नाचे? काहीतरीच! - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
र
रविंद्र गायकवाड Tue, 11/15/2011 - 12:58 नवीन

आता हा जुना धागा वर काठला

आता हा जुना धागा वर काठला म्हाणुन हानु नका. मिसळपाव चा सदस्य तो असेल तर 'पाव' आनि ती असेल तर 'मिसळ' ह्य दोन शब्दांवर अर्थ अनर्थांचे बरेच वादंग होतील.. चला एक काडी टाकून बघतो.. मिसळ आणि पाव यांनी एकत्र येऊन सोशल नेट वर्किंग ला झणझणीत पणा आणला असे म्हणू हवे तर. पाव. रविंद्र गायकवाड. तो असेल तर पावतो. आणि ती मिसळते...
  • Log in or register to post comments
श
शाहिर Tue, 11/15/2011 - 17:14 नवीन

मिपाकर

हेच बेस्ट वाटते
  • Log in or register to post comments
अ
असंका Wed, 10/28/2015 - 13:33 नवीन

'मिपाकर' हे आता मान्य आहे

'मिपाकर' हे आता मान्य आहे नाही? सगळ्यात आधी कोणी वापरला हा शब्द?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर
य
योगप्रभू Tue, 11/15/2011 - 18:06 नवीन

मिसळोबा आन मिसळाई

कंच्याबी गावात जो द्येव आसतुया त्यो 'बा' आसतुया म्हंजी पिंपळोबा, रोकडोबा, म्हसोबा, शिंग्रोबा. आन ज्या देव्या आसत्यात त्या येकतर 'आई' आसत्यात न्हायतर 'बाई' आसत्यात म्हंजी सटवाई, भेकराई, मंगळाई तसंच जोगुबाई, काळुबाई तवा आपुनबी इथल्या बाप्यास्नी 'मिसळोबा' आन बायास्नी 'मिसळाई' किंवा 'मिसळाबाई' आसं म्हनलं तर?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा