✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रेकी करताना आलेले अदभुत्,अविश्वसनीय्,अनाकलनीय अनुभव.

श
शानबा५१२ यांनी
Wed, 07/05/2017 - 23:59  ·  लेख
लेख
मी रेकीची 'लेवल १' ही दीक्षा घेतली आहे.रेकी हे एक विज्ञान आहे असे मी मानतो,रेकीला मी कुठल्याच देवाशी कींवा धर्माशी जुळत/जोडत नाही.आता सरळ अनुभव लिहतो.ईथे मी फक्त प्राण्यांसंबधीत आलेले अनुभव लिहत आहे. १) सोनु व ढींगण्या : माझ्या पाळलेल्या पोपटांपैकी नर म्हणजे सोनु.त्याच्याकडे माझे दुर्लक्ष होतेय असे वाटले म्हणुन खुप दीवसांनी पिंज-याजवळ जाउन पिंज-यात हात टाकुन त्याच्यापाठीवर रेकी देउ लागलो.रेकी माझ्या ह्रदयातुन हातात व हातातुन त्याच्यापाठीवर जात आहे असे जाणवत होते.सोनु खुप दीवसाने मी हात फीरवत आहे म्हणुन मला ओळखीचे असे प्रेमळ आवाज काढत होता.अचानक मी पाहीले की त्याने मान पुर्ण खाली घातली व मध्येच जोरात वर केली,तेव्हा त्याच्या पोटाच्या भागातुन मला एक आगेची ढींगणी बाहेर पडताना दीसली.मी ती ढींगणी पाहुन "व्हॉट?" असे जणु काय ओरडलो. आजही मला ती ढींगणी काय होती ते नाही कळाले,पण 'ती खरच ढींगणी होती का?' असा प्रश्न कींवा शंका माझ्या मनात कधीच आली नाही,कारण मला पुर्ण खात्री होती मी काय पाहीले आहे. २) डोंगरावरच्या मंदीरातुन येताना भुंकणारा कुत्रा : मी सुट्टीचा दीवस म्हणून सकाळी वसईच्या एका डोंगरावर चालायला गेलो व तिथल्या मंदीरात जाउन परत होतो.डोंगर उतरुन खाली आलो,तेव्हा माझा ऑरा खुप वाढला आहे असे मला जाणवले,बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझे शरीर पुर्ण त्या ऑरामधे होते,त्या ऑराने वेढले गेले होते.थोडे पुढे आल्यावर, एक खुप रागीट कुत्रा दोन चार मुलांवर भुकंत होता.ती मुले खेळुन थकली असतनाही घाबरुन जीव हातात घेउन एकडे तिकडे पळत होती.तो कुत्रा रस्त्याच्या एका बाजुला व मुले दुस-या बाजुने पळत होती.कुत्रा बांधलेला असुनही मुलांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होता,त्याचा मालक त्यावर ओरडत होता,पण कुत्रा भुंकायचे थांबत नव्हता. मी कुत्रा ज्या बाजुला होता त्याच बाजुने चालत होतो.जेव्हा मी त्या भुंकणा-या कुत्र्यापासुन ७ ते ८ फुटाच्या अंतरावर आलो,तेव्हा तो कुत्रा भुंकणे बंद करावा,म्हणुन कदाचित नकळत मी माझ्या उजव्या हाताचा तळवा त्या कुत्राकडे केला व मनात 'शांत हो' 'कुल डाsssन' असे म्हणालो.व काय आश्चर्य!! मला माझ्या हातातुन माझा ऑरा एकत्र होउन त्या कुत्राच्या शरीरकडे जातोय असे 'दीसले' (ऑराचा वलय रंगहीन वायुसारखा दीसतो)....आणि जेव्हा तो ऑराचा प्रवाह माझ्या हातातुन त्या कुत्र्याच्या पुर्ण शरीरावर आदळला,तेव्हा तो कुत्रा अंगावर कोणी पाणी फेकावे असा दचकला व एका चुटकीशरशी शांत होउन मान खाली घालुन व जीभ बाहेर काढुन (कदाचित खुप भुंकल्यामुळे) तसाच उभा राहीला.त्याची एंकदर काया एकदम एक शिस्त असलेल्या कुत्र्याप्रमाणे दीसु लागली.मी त्याच्यापासुन ७-८ फुट पुढे गेल्यावर मला पुन्हा तोच कुत्रा भुंकण्याचा आवाज आला.पण ह्यावेळी थोडा हळु भुंकत होता. मी जेव्हा घरी पोहचलो व मला हा प्रसंग आठवला तेव्हा 'अ‍ॅ?' ते काय होते एवढेच मनात आले.व माझा ऑरा खुप कमी झालेला जाणवला. मला ४-५ कुत्र्यांनी घेरले आहे,माझ्यावर एक चावर कुत्रा भुंकत आहे असेही झाले आहे तेव्हाही रेकी देल्यावर तेच कुत्रे शॉक लागल्याप्रमाणे माझ्यापासुन लांब होतात. ३) भुतदया : एक कुत्री व तिचे पिल्लु ह्यांना एका बाईकने नाजुक धडक मारली,कुत्रीला थोडेच लागले पण पिल्लाच्या पायाला थोडे लागले व ते एका दगडावर आदळले.ते पाहील्यावर 'रक्त आले नसेल तर मुका मार वाढत्या शरीरबरोबर ठीक होईल' असे माझ्या मनात आले,म्हणुन जास्त घाई न करता आरामशीर त्या पिल्लाकडे गेलो.मी लगेच जाउन त्या पिल्लाने मला हात लाउ दीला नसता.पण ते पिल्लु वेदनेने जे केकाटत होते,ते ऐकुन मनात दया कमी व त्या बाईकवाल्याचा राग जास्त येत होता.रागाने रेकी कमी होते असे मी मानतो म्हणुन पिल्लावर लक्ष केंद्रीत केले.पिल्लाजवळ जाउन मी पिल्लाच्या दुखणा-या पायला स्पर्श केला,तेव्हा ते पिल्लु अजुन जोरात विव्हळु लागले.कुत्री गोंधळामध्ये फक्त त्या पिल्लाकडे पाहत होती व मध्ये मध्ये त्याचे शरीर चाटत होती.मी त्या कुत्रीला 'पारले जी' बिस्कीट दीले व त्या पिल्लाला पायवर रेकी दीली.पिल्लु विव्हळण्याचे कमी कमी होउन पुर्ण शांत झाले तेव्हा त्याचा पाय आतल्या आत फीरल्याचे जाणवले.व ते पिल्लु पुर्ण शांत होउन कुत्रीजवळ जाउन दुध पिण्याचा प्रयत्न करु लागले.खुप लहान असल्याने बिस्कीट खात नव्हते.मग कुत्रीने दुध पाजण्यास नकार दील्यावर माझ्याजवळ आले,मी खाली एका पायावर जोर देउन बसलो होतो.मी त्याला परत रेकी दीली तेव्हा ते पिल्लु लाडात जमीनीवर झोपुन माझ्याकडे बघत होते.फक्त पाच मिनीटापुर्वी वेदनेने विव्हळणारे पिल्लु हेच होते ह्या भावनेने मला हसायला आले.मी निघु लागल्यावर माझ्या मागे धावु लागले,मी दुर्लक्ष करुन पुढे जाउ लागलो व मध्येच मागे वळुन त्याच्या डोळ्यात पाहीले,तेव्हा ते पिल्लु अक्षरक्षा रडु लागले,तो रडण्याचा आवाज व ते गोंढस डोळे बघुन मला रडु येईल असे वाटले म्हणुन मी जोरात चालु लागलो,तर त्या पिल्लाचा रडण्याचा आवाज तसाच येत राहीला.राहवले नाही म्हणून मी त्याला पुन्हा रेकी दीली,पुन्हा जमीनीवर लोळणे व मी गेल्यावर परत रडणे सुरु! 'मी तुला सोडुन जातोय्,पण तुझी आठवण ठेउन मी कधीच कुत्रा पाळणार नाही' असे मी त्याला डोळ्यात बघुन बोललो. रेकीने मला असे प्रेम देणे शिकवले आहे,त्या रेकी आईला 'माझ्यावर असेच प्रेम आयुष्यभर करत रहा' ही विनंती.मला माझ्या कल्पनेत दीसणारे रेकी आईचे रुप काहीसे असे आहे : Reiki Mother
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
42876 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

अ‍ॅ

पैसा
गुरुवार, 07/06/2017 - 17:54 नवीन
अ‍ॅ
  • Log in or register to post comments

रंजक माहिती.

मराठी कथालेखक
गुरुवार, 07/06/2017 - 18:14 नवीन
रेकी म्हणजे नेमकं काय, कशी शिकायची/ करायची याबद्दल मराठीत एखादा लेख आहे का ?
  • Log in or register to post comments

रेकी शिकल्यावर वाईटसाईट सवयी

सिद्धेश्वर विल…
गुरुवार, 07/06/2017 - 20:23 नवीन
रेकी शिकल्यावर वाईटसाईट सवयी सोडता येतील का ? मला देशाचा पंतप्रधान बनता येईल का ? उत्तर हो असेल तर मलापण रेकी शिकायचंय ... या देशाला मावामुक्त करायचंय .... तंबाखूरहित आणि रेकीसहित सज्ज आपला देश .... मी फिरवेन झेंडा चहूकडे ... मिटेल सारा द्वेष ..... माझा पहिला प्रश्न एकदम प्रामाणिक होता ... साहेब ... बाकी चारोळी पावसामुळे सुचलीय
  • Log in or register to post comments

ते लेखकाची शिग्रेट सुटलिये

सुबोध खरे
गुरुवार, 07/06/2017 - 20:38 नवीन
ते लेखकाची शिग्रेट सुटलिये काय रेकीने ?
  • Log in or register to post comments

लेखकाचे लेखकाला माहीत पण मी

कविता१९७८
गुरुवार, 07/06/2017 - 21:59 नवीन
लेखकाचे लेखकाला माहीत पण मी नाॅनवेजीटेरीयन होते रेकी १ च्या पहिल्या दिवसापासुन म्हणजे २१ जानेवारी पासुन आज पर्यँत नाॅनवेज खाल्ले नाही. आधी मा.भो. अशा शिव्या द्यायचे गाडी चालवताना कुणी मधे आले पटकन तर तेही अगदिच सुटले आता "वेडा झालायस का रे?" असे अगदि सौम्य शब्दात बोलते. मी जिथुन रेकी शिकले तो एक वेगळा परीवार मिळाला. तिथे तुम्हाला माणसाला फक्त एक माणुस पाहायला शिकवले जाते. कुणीही कूणाला हसायचे नाही . कुणीही आपल्याला हीन लेखत नाही. पैशावरुन नाही , शिक्षणावरुन नाही की तुमच्या दिसण्यावरुनही नाही. अगदि कुणाच्या व्यंगावरही नाही. कुठल्याही प्रकारचे गाॅसिप करायचे नाही. गाॅसिप करणे जितके सोप्पे आहे त्याहुन जास्त कठीण गाॅसिप न करणे आहे पण त्यावर सध्या माझा बराच कंट्रोल आलाय अगदि घरची मंडळी गाॅसिप एक्सपर्ट असुनही. हे सगळं रेकीची स्वत:वर केलेली सततची प्रॅक्टीस यामुळे शक्य होतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रेकी शिकल्याने ''दुसऱ्यांच्या

सप्तरंगी
Fri, 07/07/2017 - 21:13 नवीन
रेकी शिकल्याने ''दुसऱ्यांच्या'' वागण्यात positive बदल होतात का हो ? प्लीज काही मिपाकरांवर रेकी करा आणि बघा ना बदल होतात का ते.. :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

कट्टे केल्याने होतात....

मुक्त विहारि
Fri, 07/07/2017 - 21:31 नवीन
पण काही मिपाकर त्या पलीकडे गेलेही असतील. बसत्या शंका-कुशंका काढणार्‍या मिपाकरांना कसल्याच उपायांनी सकारात्मक फरक पडत नाही.... असो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

"बसत्या"

मुक्त विहारि
Fri, 07/07/2017 - 21:32 नवीन
च्या ऐवजी "नसत्या" असे हवे होते... (स्वसंपादन नसल्याचा तोटा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अर्धी अर्धी झुरके मारत आपणच

सिद्धेश्वर विल…
गुरुवार, 07/06/2017 - 20:43 नवीन
अर्धी अर्धी झुरके मारत आपणच सम्पवूया ... रेकी शिकूया ...चला रेकी शिकूया ... या बाई या ... बकुळेच्या झाडाखाली रेकी शिकूया ... झिम पोरी झिम ... कपाळाचा झिम ... झिम गेला फुटून ... सिगरेट गेली सुटून ....
  • Log in or register to post comments

मनोरंजक धागा !

मितान
गुरुवार, 07/06/2017 - 22:32 नवीन
मनोरंजक धागा ! :)
  • Log in or register to post comments

हे खरंच सिरिअसली लिहिलंय ??

वीणा३
गुरुवार, 07/06/2017 - 22:42 नवीन
हे खरंच सिरिअसली लिहिलंय ?? मला आधी वाटलं होतं रेकी वाल्या लोकांच्या क्लेमस ना वैतागून लिहिलंय!!!
  • Log in or register to post comments

मला आधी वाटलं होतं रेकी

सतिश गावडे
Fri, 07/07/2017 - 00:27 नवीन
मला आधी वाटलं होतं रेकी वाल्या लोकांच्या क्लेमस ना वैतागून लिहिलंय!!!
असेलही किंवा नसेलही. मात्र वाचकांचे मनोरंजन करण्याचे जबरदस्त सामर्थ्य या धाग्यात आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

ते तर आहेच.

वीणा३
Fri, 07/07/2017 - 04:28 नवीन
ते तर आहेच. मला १-२ रेकी करणाऱ्या लोकांनी जे सांगितलं ते ऐकून मी पण असाच कायतरी लिहिलं असतं, एवढं डोकं भंजाळलं सगळं ऐकून. पत्राने कॅन्सर बरा करतात म्हणे . मी म्हणलं मग पत्र तरी कशाला लागतं, असाच बसल्या बसल्या सगळ्या जगातल्या लोकांचा कॅन्सर बरा करून टाकावा ना lol !!! मला आधी बुवा लोकांचा राग यायचा कि लोकांना का फसवतात म्हणून. पण हे सगळं (रेकी, एमवे) बघितल्यावर वाटतं की लोकांना थोडं आवडतं फसवून घ्यायला, ते शोधतच असतात कि आता कशामुळे भारावून जाऊ :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पत्राने कॅन्सर बरा करतात

कविता१९७८
Fri, 07/07/2017 - 05:59 नवीन
पत्राने कॅन्सर बरा करतात म्हणे . असे असेल तर खरेच फसवेगिरी आहे. पत्र पाठवुन आणि फोनवर बोलुन बरं करता येतं असं बरेच रेकी पाठवणारे म्हणतात जे अगदि चुक आहे. तुम्हाला रेकी शिकवणारा गुरु जर चांगला मिळाला तर याची माहीती नक्की देइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

बिचार्या शाबु काकांनी

जेनी...
गुरुवार, 07/06/2017 - 23:13 नवीन
बिचार्या शाबु काकांनी सिरियसली स्वताहाचे अनुभव शेअर केलेत आणि मिपावरचे लोक हे असे... रेकाई कोपणार आता मिपावर ...
  • Log in or register to post comments

रेकी मास्टर पदवी/दीक्षा

शानबा५१२
Fri, 07/07/2017 - 03:42 नवीन
रेकी मास्टर पदवी/दीक्षा/डीग्री घेतलेल्या व्यक्तीला दुस-यावर रेकी करता येते.मी एका अशा व्यक्तीला भेटलोय्,की त्याच्या सामर्थासमोर (?) कीत्येक बाबा महाराज्यांच्या सिध्दी तुच्छ वाटतील व मुळात त्या आहेतही.तो व्यक्ती मुंबईतच रहातो व बायको व मुल असणारा आहे. त्याने जेव्हा मला पहील्या भेटीत रेकीबद्दल संगितले तेव्हा मी खुप हसत होतो.हळुहळु मलाही खुप काही अनुभवायला आले.त्याने हातातुन काही कीरणासारखे माझ्या कपलावर फेकले तेव्हा मी जागच्याजागी दचकलो,एवढा की 'अरे हे काय आहे?!?!?!' असे मी जोरात ओरडायचे बाकी होते. रेकीबद्दल असे वाचुन कोणालाही हे सर्व खोटे व थोतांड वाटेल पण हे सर्व खरे आहे. मग तुम्ही 'आउट ऑफ बॉडी एक्सपेरिएन्स' बद्दल काय बोलाल? ह्यामध्ये थर्ड आय व सोलार प्लेक्ससचा सबंध येतो.युट्युब वर व्हीडीओ बघा व मधुकर दीघे ह्याची पुस्तके वाचा,नंतर स्वःता अनुभवा,मग मी जे वर लेखात लिहले आहे ते वाचुन बिल्कुल आश्चर्य वाटणार नाही ना त्यावर हसु येईल. :-))
  • Log in or register to post comments

रेकी मास्टर पदवी/दीक्षा

कविता१९७८
Fri, 07/07/2017 - 06:36 नवीन
रेकी मास्टर पदवी/दीक्षा/डीग्री घेतलेल्या व्यक्तीला दुस-यावर रेकी करता येते./code> रेकी करत नाही हो , स्वत: वर रेकी घेतात , टच थेरपी मधे दुसर्‍याला रेकी देतात आणि डिस्टंस रेकीमधे दुसर्‍याला रेकी पाठवतात. त्याने हातातुन काही कीरणासारखे माझ्या कपलावर फेकले तेव्हा मी जागच्याजागी दचकलो,एवढा की 'अरे हे काय आहे?!?!?!' असे मी जोरात ओरडायचे बाकी होते. हा काय प्रकार आहे?? हे मलाही न पटण्यासारखे आहे. आमचे रेकी ग्रँडमास्टर प्रसाद करमरकर हे जर्मनीला जाउन रेकी शिकुन आलेत आणि १९९८ पासुन रेकी शिकवतात. मेडीटेशनचा २२-२३ वर्षांचा अनुभव आहे . ते भारताबाहेरही रेकीचे क्लासेस घेतात. त्यांना पण हे कीरणे फेकणं असं कधीच कुणी पाहीलं नाही . ते स्वत: असले काही प्रकार करतही नाहीत. त्यांचा साधा सरळ फंडा आहे "लव , लाईट अँड रेकी"
  • Log in or register to post comments

आणि हो ते भारतात असतील तर

कविता१९७८
Fri, 07/07/2017 - 06:41 नवीन
आणि हो ते भारतात असतील तर गुरुवारी मेडीटेशन असतं . खुप छान असतं, यु ट्युब वर पाहता येत. काल झालय . युट्युबवर Thursday meditation of Prasad Karmarkar टाईपल तर पाहता येइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

रेकी हा प्रकार खरा आहे असे

समाधान राऊत
Fri, 07/07/2017 - 10:21 नवीन
रेकी हा प्रकार खरा आहे असे मान्य करु हो ,पण किरणे वैगरे निघतात हा कुठल्या पिक्चर चा भाग म्हणायचा.
  • Log in or register to post comments

किरणे वैगरे निघतात

सुबोध खरे
Fri, 07/07/2017 - 10:26 नवीन
किरणे वैगरे निघतात हे रेकी तील अतिरेकी भाग आहे
  • Log in or register to post comments

आज सर हवे होते.

मोदक
Fri, 07/07/2017 - 10:44 नवीन
आज सर हवे होते. ;)
  • Log in or register to post comments

अगदी अगदी..!!

विशुमित
Fri, 07/07/2017 - 11:35 नवीन
अगदी अगदी..!! माणूस गेल्यावरच त्याची किंमत कळते...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सर असते तर "हत्तेरेकी" केले

अभ्या..
Fri, 07/07/2017 - 12:03 नवीन
सर असते तर "हत्तेरेकी" केले असते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

मावेवाल्याच्या ढींगण्या :

सिद्धेश्वर विल…
Fri, 07/07/2017 - 13:39 नवीन
मावेवाल्याच्या ढींगण्या : माझ्या पाळलेल्या मावेवाल्यापैकी एक म्हणजे सोनु.त्याच्याकडे माझे दुर्लक्ष होतेय असे वाटले म्हणुन खुप दीवसांनी तुमचा लेख वाचल्यानंतर त्याच्याजवळ जाउन त्याच्यापाठीवर हात टाकुन रेकी देउ लागलो.रेकी माझ्या ह्रदयातुन हातात व हातातुन त्याच्यापाठीवर जात आहे असे जाणवत होते. मी बोललो ... एक १२० ३०० , इलायची, हरी पत्ती .. कच्ची पक्की आणि रेक्की.. काय आश्चर्य .. अहो झट के पट मावा तय्यार ... माझा आनंद गगनात मावेनासा झाला .... मला वाटलं कि रेकीचा पहिला टप्पा पार केला अचानक मी पाहीले की त्याने मान पुर्ण चुन्यात खाली घातली व मध्येच जोरात वर केली,तेव्हा त्याच्या पोटाच्या भागातुन मला एक माव्याची ढींगणी बाहेर पडताना दीसली.मी ती ढींगणी पाहुन "व्हॉट?" असे जणु काय ओरडलो. आजही मला ती ढींगणी काय होती ते नाही कळाले,पण 'ती खरच ढींगणी होती का?' असा प्रश्न कींवा शंका माझ्या मनात कधीच आली नाही,कारण मला पुर्ण खात्री होती मी काय पाहीले आहे.
  • Log in or register to post comments

ख्या ख्या ख्या .....

रंगीला रतन
Fri, 07/07/2017 - 13:55 नवीन
ख्या ख्या ख्या .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर

क्या ढासू अनुभव हैं बाप....

रंगीला रतन
Fri, 07/07/2017 - 14:07 नवीन
क्या ढासू अनुभव हैं बाप.... हस हस के मेरी तो मुरकुंडी वळ गयी हैं ... लैच विनोदी लिहिता कि राव तुम्ही... रच्याक अदभुत्,अविश्वसनीय इथपर्यंत ठीक आहे पण ''अनाकलनीय अनुभव''? हे म्हंजी कै च्या कैच ...
  • Log in or register to post comments

मदत करा

महेश हतोळकर
Fri, 07/07/2017 - 14:53 नवीन
आजही मला ती ढींगणी काय होती ते नाही कळाले,पण 'ती खरच ढींगणी होती का?' असा प्रश्न कींवा शंका माझ्या मनात कधीच आली नाही,कारण मला पुर्ण खात्री होती मी काय पाहीले आहे.
या वाक्याचा अर्थ काय?
  • Log in or register to post comments

ढींगणी चा अर्थ

सिद्धेश्वर विल…
Fri, 07/07/2017 - 15:04 नवीन
बहुतेक रेकीमध्ये ढुंगणातून बाहेर पडणाऱ्या वस्तूला ढींगणी म्हणत असतील ...
  • Log in or register to post comments

लोल

सरल मान
Fri, 07/07/2017 - 15:46 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर

एनर्जी बॉल म्हणतात त्याला.

शानबा५१२
Fri, 07/07/2017 - 20:09 नवीन
@कविता१९७८ त्याला कीरणे नाही तर एनेर्ग्य बॉल म्हणतात. प्लीज ह्या वेबसाईटवर वाचा : http://pjentoft.com/Energyball.html (लिंक शेअर केल्याबद्दल सॉरी) ......Many different subtle touch systems and many general spiritual healers and energy workers use energy balls. Place your energy ball down in front of you. Pass your hand across the area, including both the space where the ball is, and where it isn't.Do you feel a difference? Can you feel where the ball is? It may feel warmer, cooler, tingling, denser, etc. You could toss it at a person who agrees , or pet an animal with it and see if they can feel it.
  • Log in or register to post comments

हा लेख मी विनोदी लेख म्हणून

सप्तरंगी
Fri, 07/07/2017 - 20:53 नवीन
हा लेख मी विनोदी लेख म्हणून वाचला, आणि मग खालच्या सिरीयस प्रतिक्रिया पहिल्या. हा विनोदी लेखच आहे ना ??? आणि रेकी तर pseudoscience आहे.
  • Log in or register to post comments

Tuborg

वैभव पवार
Tue, 08/08/2017 - 10:33 नवीन
रिक्याईच्या हातात Tuborg बाटली आहे काय?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा