Skip to main content

वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

लेखक सरपंच यांनी रविवार, 24/02/2008 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघून
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ? काही प्रश्नांचे दुवे. १) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही. २) टंकलेखन साहाय्य ३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? ४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा ५)काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे ७) वाचनखुणा कशा साठवाव्या? ८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

वाचने 711646
प्रतिक्रिया 364

प्रतिक्रिया

१. आपण लिहिलेल्या धाग्यातील मजकूर संपादन कसा करावा. २. आपण लिहिलेल्या प्रतिक्रियेतील मजकूर संपादन कसा करावा.

In reply to by सचिन काळे

१) धाग्यातील मजकूर संपादन करण्यासाठी या धाग्यात लिहिल्याप्रमाणे साहित्य संपादक मदत करतात. 'साहित्य संपादक' आयडीला व्यनि करून बदल कळवा. २) प्रतिक्रियेतील मजकूर आपल्याला संपादन करता येत नाही. ते संपादक लोक करू शकतात. पण तेवढ्यासाठी त्याना विनंती करण्यापेक्षा तिथेच उपप्रतिसाद लिहिणे सोयीचे आहे.

अहो साहेब , ह्ये काय होऊन राहिलंय. एव्हढ्या कविता पोस्ट केल्या कालपासून , लेटेस्ट फक्त एकच उरलीय ... अंधारी आली बघा भर पावसात . आधीच छत्री नाय आणलीय , आणि जी पण कविता टाकलीय ती कुणीतरी खाल्लीय , आता फक्त एकच उरलीय . मदत करा नाथ मिपा, मदत करा नाथ ... द्या थोडी साथ मिपा द्या थोडी साथ .... पसरतो मी हात मिपा पसरतो मी हात .... का मारलीत लाथ मिपा का मारलीत लाथ ... मदत करा नाथ मिपा , मदत करा नाथ .......द्या थोडी साथ मिपा द्या थोडी साथ

In reply to by सिद्धेश्वर विल…

तुम्हाला आलेला व्यक्तिगत संदेश वाचा. (उजवीकडच्या "लेखन करा" बटणाखलील "आवागमन" सदरातील "व्यक्तिगत संदेश" वर क्लिक करा.)

In reply to by सिद्धेश्वर विल…

या काव्यमय 'परती' सादाबद्दल आमच्या 'बास्केट' ब्रिजावर तुम्हाला एक कडक चहाची ऑफर... पण एका अटीवर... तिथे येऊन कविता नाही वाचायची! ;) Sandy

In reply to by सिद्धेश्वर विल…

खूप कविता आहेत तुमच्याकडे सिद्धेश्वर~~ त्या एकाच लेखात ( एका भागात वीस वीस वगैरे )देता येतील का?

In reply to by कंजूस

महोदय , आपण जे नाव या मिपावर धारण केले आहे, त्या नावाच्या विरुद्धार्थी शब्दाएवढा वेळ आहे का ? असला तर सांगा , मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन मग ....

दुसर्‍या पानापसुन पुढल्या कोणत्याही पानावरचे नवे प्रतिसाद दाखवण्यास इथली प्रणाली कधी सक्षम बनेल ?

पिकासा नाहीये. छायाचित्रे डकविण्यासाठी पर्याय आणि कृती कळवावी.

नमस्कार, मी मिपा वर नवीन आहे आणि मला नवीन लेखन करायचे आहे पण योग्य पद्धत समजत नाहीये. कुणी मदत करेल का? नवीन लेखन कसे करावे ?

In reply to by प्रशांत बच्छाव

नमस्कार. उजव्या स्तंभात "लेखन करा" अशी लिंक आहे. त्यावर क्लिक करा. तुम्हाला जे काही लिहायचं आहे (उदा० लेख, चर्चा, वगैरे) त्यानुसार पुढे क्लिक करा. मग त्यातून उघडणार्‍या पानावर तुम्हाला लिहिता येईल. काही शंका असल्यास 'साहित्य संपादक' या आयडीला व्यक्तिगत संदेश करा. (उजव्या स्तंभात 'व्यक्तिगत संदेश' अशी लिंकही आहे.)

मी नविन सभासद आहे. प्रश्नास हासू नये ही विनंती. माझ्या नावाखाली खरडवही आणि खरडायचा फळा आसे दोन वेगळे शब्द दिसत आहेत. हे दोन एक आहेत का वेगळे आहेत हे कळत नाही. तिथं जायच झाल्यास मालकांकड वेगळा अर्ज करायला पाहिजे का, त्यासाठी काही वेगळ्या अटी आहेत का हे कस समजेल.

In reply to by यशवंत पाटील

नमस्कार यशवंत. तुमचं स्वागत आहे. खरडवही म्हणजे तुमची स्वतःची जागा, जिथे इतर सदस्य येऊन तुमच्यासाठी संदेश लिहू शकतात. (तुम्ही त्यांच्या खरडवहीत जाऊन त्यांना उत्तर देऊ शकता.) हे सगळे संदेश पब्लिक असतात, कोणीही वाचू शकतं. खरडफळा म्हणजे मिपागावाची चावडी. त्यावर कोणीही सदस्य येऊन लिहू शकतो, गप्पा मारू शकतो. खरडफळा पाहिलात तर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा चालू आहेत असं दिसेल.

माझ्या खात्यातील काही जुने [ २०१३ चे] व्यक्तिगत संदेश दिसत नाहीत. ते डिलिट झाले असतील का? महत्वाचे संदेश परत मिळवता येतील का?

तसदी बद्दल क्षमस्व!! पहिल्यांदाच लिहायचा प्रयत्न व पोस्ट करायची घाई या नादात ४ वेळा तोच लेख अपलोड झाला आहे; कृपया तो काढून कसा टाकायचा यावर मदत हवी आहे.

Your admin@misalpav.com does not work. Inconsistent log in. Need clear instructions how and where to post under new write up. Marathi part and writing in Marathi seems workable.

मी टाकलेली कलादालनातील चित्रे दिसत नाही. ‘माझे लेखन’मध्ये जावूनच पहावे लागते. असे का? कलादालनात नविन पोस्ट प्रथम दिसायला हव्यात तशा मला दिसत नाही.

In reply to by शाली

कलादालनात हे पूर्वीही दिसत नव्हते, का ते माहिती नाही. मला फोटो कोणत्याही प्रकारे अपलोड करता येत नाहीये, पूर्वी आला होता. फोटो कसा डकवायचा याची प्रश्न उत्तरेवली लिंक सुद्द्धा काहीच दाखवत नाहीये. काय करावे. कृपया सांगावे कसे करू ते. ipad, डेस्कटॉपवरून करून पाहिले.

In reply to by सप्तरंगी

https झाल्यामुळे जुन्या धाग्यांच्या लिंकस् चा घोळ होत असावा. इथे डॉ. म्हात्र्यांचा फोटो टाकण्याविषयीचा धागा आहे. मला तरी त्या कृतीने भटकंतीच्या धाग्यात फोटो टाकता येतायत. कलादालनाबद्दल मात्र कल्पना नाही.

In reply to by निशाचर

आभार निशाचर, आणि म्हात्रेसर , त्यांच्या धाग्याचा निश्चितच उपयोग झाला. मी काहीतरी गडबड करत होते, आता करू शकले अपलोड.

या धाग्यात दिलेल्या इतर माहितीपर धाग्यांचे दुवे दुरुस्त करण्याची गरज आहे. जुन्या दुव्यांत https नसून http असल्याने असा दुवा उघडला की त्या धाग्याऐवजी मुख्य पानाकडे redirect होत असावं. (ब्राउझरमध्ये जुने बुकमार्क असल्यासही हे होतं.) मुख्य पानाकडे redirect होण्याऐवजी आवश्यक धाग्यावर जाण्यासाठी काही configuration करता आल्यास उत्तम होईल.

In reply to by ज्योति अळवणी

१. आपण मजकूर लिहितो त्या खिडकीच्या (एडिट बॉक्सच्या) वरचे दोन क्रमांकाचे बटण (Insert/edit link) वापरा. २. Link URL समोर निवडलेला दुवा टाका. ३. दुव्याऐवजी इतर मजकूर दिसावा (उदा : बातमीचे/माहितीचे शीर्षक, इत्यादी) असे वाटत असल्यास, तो मजकूर Link text समोर टाका. ४. Link title समोर काहिही लिहिले नाही तरी चालेल. ५. OK बटण दाबा... काम झाले !

In reply to by चामुंडराय

स्केच स्कॅन करून फोटो साठवणार्‍या एखाद्या संस्थळावर साठवा. त्या स्कॅन्सचा दुवा (इमेज अ‍ॅड्रेस) वापरून (इतर कोणतेही चित्र मिपावर टाकतात तसेच) ते मिपावर टाकता येईल. मिपावर चित्रे टाकण्याची कृती हा दुवा उपयोगी होऊ शकतो.

मिपा उघडल की प्रथम शिफारस हा भाग येतो. त्यानंतर सगळे ग्रुप दिसायला लागून प्रत्येक ग्रुपमधील पहिले पाच लेख दिसतात. त्याच्या शेवटी आणखी पहावर टिचकी मारली की, सगळे लेख दिसायला लागतात. यामधे प्रत्येक लेखाचे नाव व लेखाच्या पहिल्या काही ओळी वगैरे दिसायला लागतात. त्याच्या खाली जी पट्टी असते त्या पट्टीवर उजवीकडे प्रतिसादांची संख्या दिसते. पण त्याच पट्टीवर डाव्या बाजूला एक डोळ्याचे चिन्ह व एक आक्डा दिसतो. व त्यापुढे आणखी एक चिन्ह व एक आकडा दिसतो. त्याचा अर्थ काय हे कुणी सांगेल काय?

विमानाचा वक्रोक्ति मार्ग ? याबाबत एक चांगला लेख मिपावर आला होता. त्यावेळी नेमकी वाचनखुण साठविता आली नव्हती. क्रुपया तो लेख मला पुन्हा कसा वाचावयास मिळेल याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

In reply to by जयन्त बा शिम्पि

https://www.misalpav.com/node/37435 हा घ्या. स्वीट टॉकर यांचा लेख होता हे आठवत होते, त्यामुळे त्यांचे सर्व लेखन पाहिल्यावर लगेच सापडला.

मी पाठवलेली apk file ? 1) मुळात मिपा अॅप आता स्टोरवरून काढले आहे, २) apk extracter ची बरीच अॅप्स आहेत, ३) जी अॅप्स आता आहेत त्याचे प्रथम ट्राइअल घ्यावे लागेल. ४) settings >> apps>>security>>download from external source ON करावे लागते. एक वॅार्निंग मेसेज येतो. त्याबद्दल खात्री नाही. ५) तरी आता खटपट करू नका. धन्यवाद.

इथे टिचकी मारून डाउनलोड करू शकता. जुने व्हर्जन आहे पण चालते आहे व्यवस्थित. हा प्रतिसाद मी अॅप वरुन दिला आहे.

@सुमो, १) pure apk extracter App वापरले काय? २) माझ्या अगोदरच्या प्रतिसादातले क्र (४) करावे लागेल का?/अथवा थेट डाउनलोड होते? ३) कालच्या कट्ट्याला एका मिपाकरास हा प्रश्न विचारला तेव्हा टेम्प्लेट पद्धत सेफ आहे असं कळलं/. शक्यतो security bypass करू नये असं मत मिळालं.

In reply to by कंजूस

वरून अॅप घेतले आहे. आणि जीड्राइव लिंक दिली आहे. तुमच्या प्रतिसादातील क्र. ४ करावे लागेल. टेंप्लेट पद्धत अधिक सुरक्षित हे मात्र खरं . पण ज्यांना 'खतरों से खेलने का शौक है' त्यांच्यासाठी !

धन्यवाद सुमो. एपिके फाइलमधून डाउनलोड करताना गुगल ओएस, तुमचा मोबाइल एवढाच संबंध असतो. त्यात मिपा प्रशासनाचा काही संबंध नाही हे वाचकांनी ध्यानात घ्यायचं आहे. म्हणून लगेच सावध केले. टेम्प्लेटातून आपण अधिकृत ब्राउजरने शोध घेतो. शोध होईल अथवा नाही परंतू धोका अजिबात नाही.

मिसळपाववर एखादा धागा कसा शोधायचा? उदा. समजा मला श्रीलंका प्रवासाविषयी काही माहिती हवी आहे तर ह्या विषयावर मिसळपाववर आधी कुठे चर्चा झाली आहे का? असेल तर तो धागा मला कसा शोधता येईल? 'श्रीलंका प्रवास' हा कीवर्ड टाकुन सर्च करण्याची सोय मिपावर आहे का? असेल तर कुठे आहे? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

In reply to by मी कोण

गुगल सर्च करा. तुमचं सर्च इंजिन नक्की गुगल आहे का एकदा कन्फर्म करा. बऱ्याचदा नको ते सॉफ्टवेअर(संगणकावर) किंवा ऍप्स(मोबाईलवर) इन्स्टॉल करताना, किंवा नको त्या साईट्सवर फेरफटका मारताना सर्च इंजिन हायजॅक होते. तर गुगलवर असे सर्च करा- site:misalpav.com श्रीलंका भटकंती (मिपावर प्रवाससंबंधित धागे भटकंती कॅटेगरीमध्ये येतात म्हणून तो शब्द सुद्धा पोर्चमध्ये घेतलाय) म्हणजे असे रिजल्ट्स मिळतील. श्रीलंका सफरीवरील मिपावरील सर्वोत्तम लेखमालिका सिंहलव्दीपाची सहल श्रेय डॉ सुहास म्हात्रे

माझा पासवर्ड कधीच चालत नाही. अगदी browser मध्ये सेव्ह केला असला तरी. माझा तात्पुरता उपाय - कधीच logout न करणे. browser विंडो कधीच बंद ना करणे. हा उपाय १०/१५ दिवस चालतो. एक दिवस मी लॉग आऊट झालेलो असतो. मग परत forgot पासवर्ड .. ई-मेल लिंक , लॉगिन. हे सतत चालूच आहे. बाकी नेट बँकिंग , ई-मेल सर्व व्यवस्थित चालते. फक्त मिपा नाही. हे असं का होतंय ? आणि हे गेली ३/४ वर्ष चालले आहे. खरं तर माझा अकाउंट उघडल्या पासूनच.

In reply to by अभिजित - १

मला पासवर्ड कधीच टाकावा लागत नाही. नवीन फोन घेतल्यावर सुद्धा नाही. गुगलला माझा मिपाचा पासवर्ड माहिती आहे. ते काळजी घेतं.

फोटो प्रकाशित करण्याची प्रोसेस विसरलो आहे. ह्या मदत पानावरील कोणतीच लिंकही उघडत नाही, काय प्रॉब्लेम असावा ?

In reply to by C Ramarao

तुम्ही कॉम्पुटरवर मिपा वापरात असाल तर उजव्या बाजूला आवागमन असा एक मेनू आहे. मोबाईलवर पाहत असाल तर तळाला हा मेनू आहे. त्यात लेखन करा असा एक पर्याय आहे. त्यावर क्लिक करा. तिकडे लेख, चर्चा, काव्य असे पर्याय आहेत. समजा तुम्हाला काव्य या प्रकारात लेखन करायचंय, तर काव्य या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर योग्य असा काव्यरस व लेखनविषय निवडा. खाली पूर्वपरिक्षण लिहिलंय तिथं क्लिक करा. म्हणजे तुमचं लेखन प्रकाशित झाल्यावर कसे दिसेल, ते कळेल. अजून लेखन प्रकाशित झालेलं नाहीये. तेव्हा प्रकाशित करा वर क्लिक करा. तुमचं लेखन आता प्रकाशित झालंय.

मिपावर आपले स्वताचे नाव कसे बदलावे?

१) आपल्या मराठी संस्थळांबद्दल बोलायचं तर यामध्ये एक मोठा बदल हवा आहे. संस्थळं ड्रुपल या रेडी टेम्प्लेटाचा उपयोग करतात. यावर लिहिण्यासाठी वाचकांना सभासदत्व घ्यावे लागते. फक्त वाचनमात्र लोकांसाठी कुणा एका लेखकाचं लेखन आवडलं तर ते शोधता येत नाही हा मोठा दोष आहे. त्या लेखकाचा लेख जेव्हा अनुक्रमणिकेत दिसेल तेव्हाच वाचता येतो. "यांचे लेखन" च्या लिंकमध्ये युजर नंबर असतो तो बाहेरच्या वाचकांस मिळू शकत नाही. त्या ठिकाणी आइडीनाव कॅापीपेस्ट करून टाकल्यावरही लिंक चालायला हवी. २) शिवाय हाच धागा वारंवार वि जा प्र उलट क्रमाने -नवीन प्रतिसाद वरती असा चालायला हवा.

मि लिहलेली लिखाणे वगळली गेली कृपया त्याची कारणे कळतील का?

धन्यवाद सरपंच!