मदत हवी आहे - बाल्कनीतील शेती (फोटोंसह)
नमस्कार मंडळी,
शहरातील फ्लॅटला जोडून असलेल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये मिपाकरांनी शेतीचे प्रयोग केले आहेत का..? केले असल्यास आपले अनुभव कृपया या धाग्यावर द्या.
**** माझा अनुभव ****
फ्लॅटला जोडून दोन मोठी टेरेस मिळाल्याने.. चाफा, भरपूर प्रकारचे गुलाब, तगर, मोगरा, अनंत, जुई, पारिजातक, तीन प्रकारची आबोली, शेवंती वगैरे वगैरे वेगवेगळी फुलझाडे.. तुळस, कोरफड, कोथिंबीर, पुदीना, ओवा, कढीपत्ता, मिरची, टोमॅटो, गवती चहा आणि ऑलस्पाईस वगैरे झाडे लावली. मोठ्या आकाराच्या कुंड्या आणून त्यामध्ये पपई, लिंबू अशी झाडेही लावली. नीट जोपासना केल्याने ही झाडे अपेक्षेनुसार वाढत आहेत आणि उपयोगात येत आहेत.
नंतर टेरेसमधील एका भिंतीच्या आधाराने भोपळा, काकडी, दोडका, कारले, घोसावळे, पडवळ, दुधी, श्रावणघेवडा, साधा घेवडा, तूर, चवळी, मूग असे वेलही चढवले.
- या सर्व झाडांसाठी वेगवेगळ्या आकाराच्या मातीच्या कुंड्या वापरल्या.
- कुंडी विकणार्याकडे असते तीच माती वापरली.
- खत म्हणून सोसायटीने केलेले कंपोस्ट खत आणि एक प्रकारचे शेणखत वापरले
- कुंड्यांमध्ये मातीसोबत कोकोपिट वापरले.
- पाणी नियमीतपणे घातले जाते.
- झाडांना आणि वेलांना भरपूर ऊन मिळते.
- दुकानातून आणलेले बियाणे वापरले.
तर मला मदत पुढील बाबींमध्ये हवी आहे.
१) फुलझाडे आणि इतर झाडे नीट वाढत आहेत मात्र वेल एका सायकल नंतर मरून जातात. म्हणजे बियाणांपासून वेल तयार होतो, फुले आणि बर्यापैकी शेंगा लागतात. त्या शेंगा काढण्याची वेळ आली की वेलच मरून जातो. म्हणजे एकदा लावलेल्या बियाणांमधून एकदाच शेंगा / फळे मिळतात.
असे होण्याचे कारण काय असावे..?
२) टेरेसचा आकार पुढील प्रमाणे
टेरेस नंबर १ - १००० ते १२०० स्क्वेअर फूट - व्यवस्थीत ऊन येते आणि पाण्याचा निचरा होण्याची सोय आहे.
टेरेस नंबर २ - १०० ते १५० स्क्वेअर फूट - ऊन येत नाही आणि पाण्याचा निचरा होण्याची सोय आहे.
..तर या टेरेसवर माती, कोकोपिट आणि अन्य पूरक पदार्थ वापरून मी दिड ते दोन फुट शेतजमिनीसारखा थर तयार केला व वांगी, भेंडी, गवार अशी झाडे लावली तर काय काय काळजी घ्यावी लागेल..? (टेरेसमधून खाली पाणी गळणे थांबवण्यासाठी फ्लेक्स प्रिंटींगवाल्या शीटचा सर्वात खालचा थर देऊ शकतो.)
३) ऊन न येणार्या टेरेसवर कोणत्या प्रकारची झाडे लावावीत..? सध्या कोरफड लावली आहे. पण अगदीच कमी प्रमाणात.
४) टेरेसवरील शेतीची अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत - त्यांचा कितपत उपयोग होतो..?
५) मातीचा पोत सुधारावा यासाठी काय उपाययोजना करावी..? (वेली मरण्यामागे कदाचित हे कारण असू शकते, पण नक्की कल्पना नाही)
***** फोटो *****
भिंतीला मोठे मोठे खिळे मारून नायलॉनची दोरी बांधली आहे आणि त्याच्या आधाराने वेलीचा मांडव करायचा प्रयत्न सुरू आहे.
आणखी एक फोटो...
फुलझाडे
फुलझाडे आणखी एक व्हू..
रिकामी जागा..
**** अनुभव समाप्त ****
पुनश्चः - शहरातील फ्लॅटला जोडून असलेल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये मिपाकरांनी शेतीचे प्रयोग केले आहेत का..? केले असल्यास आपले अनुभव कृपया या धाग्यावर द्या.
आणखी एक - हे प्रयोग शेतीतील अज्ञानी आणि अडाणी माणसांनी केले आहेत त्यामुळे "आक्षरास हासू नये." ;)
वाचने
152222
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
झाडे किंवा वेली वगैरे
>>>मात्र वेल एका सायकल नंतर
In reply to >>>मात्र वेल एका सायकल नंतर by कंजूस
असेच म्हणतो.
४)>>मातीचा पोत सुधारावा
छान प्रयोग
क्रुपया सद्यस्थितीतले फोटो
In reply to क्रुपया सद्यस्थितीतले फोटो by खटपट्या
+1
मी पण असंच (ठरवुन नाही)
टरमिनेटर बियांण
In reply to टरमिनेटर बियांण by आनंद
टर्मिनेटर बियाणे हे एकदाच
In reply to टर्मिनेटर बियाणे हे एकदाच by पिंगू
ओके, मूळ वेलाचे आयुष्य तितकेच
In reply to ओके, मूळ वेलाचे आयुष्य तितकेच by मोदक
तस वाटतय!
कुंडी भरताना मी खालील क्रमाने
In reply to कुंडी भरताना मी खालील क्रमाने by पिंगू
उपयुक्त लिंक - धन्यवाद
चार महिन्यांपैकी अडीच महिने
वालाच्या शेंगा
१. वेलांच्या कुंडीत जी माती
In reply to १. वेलांच्या कुंडीत जी माती by जेम्स वांड
रशियन कशाला, अगदी आमच्या
In reply to रशियन कशाला, अगदी आमच्या by अभ्या..
अरे वा
Calling मितान!!
प्रिया आणि सुनिल भिडे यांंचा आदर्श घेऊया
छ्या....तुला काय जमणार शेती.
In reply to छ्या....तुला काय जमणार शेती. by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्वघोषित शेतकरी कैवारी एक भाग झालाच
In reply to स्वघोषित शेतकरी कैवारी एक भाग झालाच by जेम्स वांड
वांडाण्णा, गंमतीत प्रतिसाद
फोटो हवेतच!
१ ते ४ बद्दल चांगल्या सूचना
In reply to १ ते ४ बद्दल चांगल्या सूचना by मितान
तुमच्या शेतीचे फोटो टाका
स्तूत्य उपक्रम (उपद्व्याप)....
फोटो टाकले आहेत.
In reply to फोटो टाकले आहेत. by मोदक
फोटो टाकले आहेत.
विषमुक्त अन्नाची गरज आणि परस बाग
In reply to विषमुक्त अन्नाची गरज आणि परस बाग by अजित पाटील
चला पुन्हा निसर्गाकडे
In reply to चला पुन्हा निसर्गाकडे by अजित पाटील
लिंक बद्दल धन्यवाद...
माझे टेरर्स गार्डन चे इंग्लिश मधले प्रेसेंटेशन
In reply to माझे टेरर्स गार्डन चे इंग्लिश मधले प्रेसेंटेशन by अजित पाटील
मला फोटो दिसत नाही आहेत...
छान चर्चा.
हि कल्पना नुकतीच कळली आणि
काय झकास फोटो आहेत मोदकराव
ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर
In reply to ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर by तेजस आठवले
वा! टाळ्या…!
In reply to ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर by तेजस आठवले
प्रयत्न तरी करताय हे काय कमी
In reply to ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर by तेजस आठवले
वाह, भले शाब्बास!!!
In reply to ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर by तेजस आठवले
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by मोदक
तुमच्या बागेचे फोटो द्या की..!
In reply to धन्यवाद... by मोदक
मी माझ्या बागेचा पाठवू का रे
In reply to मी माझ्या बागेचा पाठवू का रे by दशानन
बाग असली तर दे... तुझ्यामुळे
In reply to बाग असली तर दे... तुझ्यामुळे by मोदक
गावाच्या बागेबद्दल म्हणतोय मी
In reply to ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर by तेजस आठवले
सही..
In reply to ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर by तेजस आठवले
सुंदर प्रतिसाद !
In reply to ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर by तेजस आठवले
मस्त माहिती.
कमळ आणि कोरफड याविषयी दोन
*टेरेसवर*
फेसबुकवरचे हे पेज उपयोगी पडु
In reply to फेसबुकवरचे हे पेज उपयोगी पडु by पिलीयन रायडर
टेस्टिंग
एक्काकाकांनी पद्धत
In reply to एक्काकाकांनी पद्धत by रेवती
काय पद्धत आहे म्हणे..?
घरातल्या-घरात मेथी पिकवायची
In reply to घरातल्या-घरात मेथी पिकवायची by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद काका.. मी याच धर्तीवर
In reply to घरातल्या-घरात मेथी पिकवायची by डॉ सुहास म्हात्रे
पुळणीच्या रेतीत रोपांनी शोषून
In reply to पुळणीच्या रेतीत रोपांनी शोषून by गवि
पुळणीच्या रेतीत असणारे घटक