Skip to main content

छापू का?

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 06/04/2017 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू. मुद्दा हा की अशा पंचलाईन्स मस्त कॅलिग्राफीत करुन शर्टावर प्रिंटल्या तर काय चीज बनेल बावा... बाकी सब है, शर्ट है, डिझायनर है, कॅलिग्राफर है...बस्स पंचेस अन आयड्या होना.. संजयजी, लीमाऊ, स्पावड्या, सूडक्या, मोदक्या, डांगे, आदूबाळासारखे बॉक्सर आणि मिपाकरांसारखे फायटर असताना पंच नाहीत म्हणजे काय? अब आन दो भाई एकेक. आता हेच बघा की अजरामर काही पंचेस. ऑ..अच्चं जालं तर.. संपादकमंडळी इकडं लक्ष देतिल काय? व्हा फुडं बशिवला टेंपोत ब्वार्र.. तर असे काही असतील तर पटापटा हाणा बरं. प्रिंटायला निवडल्या गेलेल्या पंचेसना तो शर्ट मिळणारे बरका बक्षीस म्हणून. ;) . हाणताय न्हवं?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36802
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

विवियन वायडर आशा परेरा सूप्रभात सुसकाळ कोनाडा टंच माझा झोका टांगा पलटी घोड़े फरार खबोजाप ताकाला जावून भांड लपवू स्पान्डु बा मिपाहिता

In reply to by प्रमोद देर्देकर

स्पान्डु बा
हा टी-शर्ट फक्त बुवाच विकत घेतील, कारण स्पावड्यापुढे या सगळ्या गोष्टी अगदी तुच्छ आहेत. =))

किंचित अवांतरः 'छापणारे काय, द्याल ते छापतील!' हे छापलेला शर्ट हे सेल्फ-रेफरेन्शियल विनोदाचे एक गंमतीशीर उदाहरण होऊ शकेल :) (मनमिळावू, प्रेमळ, धर्मपरायण)

In reply to by नंदन

कोट्या करताहात, "श्रीवर्धन-मनरंजन"ची कथा आठवली !!!

ते जौंदे माझा ज्याक स्पॅरो वाला टी-शर्ट दे पहिल्यांदा. त्यावर मागे फ्लाइंग डचमन म्हणुन आंग्लभाषेत हवं.

"विद्वत्ता कमी पडत्येय" -गा.पै.

{ जिथे भेळ तिथे खेळ }

बंदुकीची औलाद हे पण टीशर्टवर आले पाहिजे.. पण कसे आणणार..?

In reply to by मोदक

शर्टाच्या पाठीवर (लहान अक्षरांत) तुम्ही (मोठ्या अक्षरांत) बंदुकीची औलाद (लहान अक्षरांत) आहात का? पुढच्या बाजूला: एक मोठी बोफोर्स गन, आणि त्या गनच्या पायथ्याला टेकून छोट्या १२ पौंडी तोफेचं वर बघणारं रेखाचित्र.

भिउ नकोस हे मागे आणि मी तुझ्या पाठिशी आहे हे पुढे!

+१ काय ठरलं मग? यत्ता दुशलि ब

मिपाकर 'मि. राँर्बट' ला विसरले इतक्यात ? एक मिपाकर म्हणून शरम वाटली. मि. राँर्बटला वर आणले पाहिजे आता खोदकाम करून.