✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण

व
विवेकपटाईत यांनी
गुरुवार, 10/06/2016 - 21:29  ·  लेख
लेख
(रूपक कथा) नुकताच गेलेल्या पितृपक्षातली गोष्ट. बर्याच महिन्यांनी मला माझा एक जुना मित्र भेटला. डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव. नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा मरगळलेला होता. मी विचारले कसली चिंता करतो आहे. तो म्हणाला तुला माहितच आहे, दरवर्षी मी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हणाला घरी जेवायला बोलवितो, दान-दक्षिणा देतो. मी म्हणालो, त्यात एवढे उदास असण्याचे कारण काय. तो म्हणाला, गेल्या वर्षी हा ब्राम्हण पितृपक्षात घरी आला होता, जेवण झाले, दक्षिणा दिली. त्या वर त्याचे समाधान झाले नाही. जाताजाता माझ्या ५ वर्षाच्या मुलाच्या नाकावर मुक्का मारला आणि म्हणाला या वर्षी तुझ्या मुलाचे नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या मुलाची तंगडी तोडणार आहे. मी म्हणालो, एक मुस्कटात का नाही लावली त्याला? तो उतरला, एक तर अतिथी आणि त्यात ब्राम्हण. कसा मारणार त्याला. मुलाला हॉस्पिटलला घेऊन गेलो, नाकाचे हाड तुटले होते, सर्जरी करावी लागली. मी म्हणालो, झाले गेले विसरून जा. आता त्या ब्राम्हणाला पुन्हा घरी बोलवू नको, इतरांना हि तसे करायला सांग. चांगली अद्दल घडव त्याला. त्या वर तो म्हणाला, असे कसे करू शकतो, जुने संबंध आहेत, त्याच्या सोबत. त्याला वाळीत टाकणे केंव्हाही उचित नाही. येत्या रविवार मी त्यालाच घरी बोलविणार आहे. आता काय म्हणणार, अश्या उच्च शिक्षित विद्वान माणसाला. मी कपाळावर हात मारला, डोळ्यांसमोर, पायाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत त्याच्या मुलाचा चेहरा डोळ्यांसमोर तरळला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
7871 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

काय?????

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/06/2016 - 21:33 नवीन
काय????? नाकावर मुक्का मारला? नाक फोडलं ५ वर्षाच्या मुलाचं??? आणि तरी मायबाप ओके आहेत?!!! ही सत्यकथा आहे?
  • Log in or register to post comments

ऐकावे ते नवलंच...

खटपट्या
गुरुवार, 10/06/2016 - 21:34 नवीन
ऐकावे ते नवलंच... रच्याकने, मला त्या डॉक्टरच्या नाकावर ठोसा मारावासा वाटतोय...पितरांना प्रसन्न करतोय मेला....
  • Log in or register to post comments

रुपक समजले नाही.

यशोधरा
गुरुवार, 10/06/2016 - 21:34 नवीन
रुपक समजले नाही.
  • Log in or register to post comments

हे बहुतेक भारत-पाकिस्तान

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/06/2016 - 21:41 नवीन
हे बहुतेक भारत-पाकिस्तान संबंधांवर रूपक आहे :)
  • Log in or register to post comments

अच्छा, ओके.

यशोधरा
गुरुवार, 10/06/2016 - 22:26 नवीन
अच्छा, ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

युती बद्दल तर नाही ना?

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 10/13/2016 - 11:26 नवीन
सेना भाजप बद्दल तर नाही ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अशा लबाड ब्राह्मणांच कशाला

कायरा
गुरुवार, 10/06/2016 - 21:59 नवीन
अशा लबाड ब्राह्मणांच कशाला समाधान करायच. द्या सोड़ून!मित्र वर्णन केल्याप्रमाणे खरोखरच हुशार आहे का शंका वाटते.काय तर म्हणे त्याला वाळीत टाकणे उचित नाही. मग इथे काय उचित आहे?
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर मित्र हुशार आहे पण

llपुण्याचे पेशवेll
Fri, 10/14/2016 - 11:05 नवीन
अगदी बरोबर मित्र हुशार आहे पण चाकोरीबाहेर जाऊन त्या ब्राम्हणाला वाळीत टाकयला धजत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कायरा

खिक्क...इतके सोपे रुपक समजत

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/06/2016 - 22:10 नवीन
खिक्क...इतके सोपे रुपक समजत नसेल तर औघड आहे =))
  • Log in or register to post comments

+10000000

संदीप डांगे
Fri, 10/07/2016 - 00:04 नवीन
+10000000 सारक्याजमचे काही खरे नाही राहिले राव!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्याला लागणारी तीक्ष्ण

पिलीयन रायडर
Fri, 10/07/2016 - 00:46 नवीन
त्याला लागणारी तीक्ष्ण बुद्धिमत्ता कुठंय हो आमच्याकडे!! तुम्हीच सांगा समजावुन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

दोन: रूपक भारत पाक संबंध व

संदीप डांगे
Fri, 10/07/2016 - 01:00 नवीन
दोन: रूपक भारत पाक संबंध व बॉलिवूड पाकिस्तानी आर्टिस्ट वर आहे एक: रूपक अंमळ हुकले आहे मतितार्थ: आमची बुद्धी क्षीण आहे, सारक्याजमचं खरे नाही राहिले हे दोन्ही अर्थाने होते हे नमूद करायचे इसरलो! ;) संबंधितांनी हलके घ्यावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हं मग ते अंमळ हुकलंय म्हणुनच

पिलीयन रायडर
Fri, 10/07/2016 - 02:37 नवीन
हं मग ते अंमळ हुकलंय म्हणुनच समजत नाहीये पटकन! असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नक्की का?

टवाळ कार्टा
Fri, 10/07/2016 - 01:25 नवीन
नक्की का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण

जयन्त बा शिम्पि
गुरुवार, 10/06/2016 - 22:11 नवीन
या वर्षी तुझ्या मुलाचे नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या मुलाची तंगडी तोडणार आहे. काय कारण ? आणि बाप म्हणून नुसता बघत बसला ? कै च्या कै वाटले. भारत-पाक वर रुपकच लिहायचे होते तर अधिक विस्ताराने चांगले खुलविता आले असते.
  • Log in or register to post comments

काही कळलं नाही. असं कसं असू

रेवती
गुरुवार, 10/06/2016 - 23:19 नवीन
काही कळलं नाही. असं कसं असू शकेल? आपल्या पोराचे नाक तोडल्यावर असं गप्प कसं बसले ते!
  • Log in or register to post comments

तेच ना...

खटपट्या
Fri, 10/07/2016 - 00:36 नवीन
तेच ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव

सचु कुळकर्णी
Fri, 10/07/2016 - 01:16 नवीन
डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव. नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा मरगळलेला होता.
  • Log in or register to post comments

हे रुपक असेल तर कहानी कुछ और

सचु कुळकर्णी
Fri, 10/07/2016 - 01:28 नवीन
हे रुपक असेल तर कहानी कुछ और हि है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी

???

संदीप डांगे
Fri, 10/07/2016 - 08:35 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी

संदिप भौ मले तर ते केजरीवाल

सचु कुळकर्णी
Fri, 10/07/2016 - 16:55 नवीन
संदिप भौ मले तर ते केजरीवाल वर वाटल पन तरी बी गंडलेल हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ओ डांगे बुआ, ओ सचिन भाऊ

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 10/07/2016 - 17:16 नवीन
ओ डांगे बुआ, ओ सचिन भाऊ लावाचे का बेटींग आकडे "रुपक पहचानो मिलन महा आकडा २०१६" म्हणुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी

रुपक पहचानो मिलन महा आकडा २०१६"

सचु कुळकर्णी
Fri, 10/07/2016 - 17:44 नवीन
चालते ना बाप्पु. थांबा जरा मांगच्या हप्त्याचे ओपन अन क्लोज चे रीजल्ट पाहु द्या गेशींग साठी ;) डांगे बॉ निरा घाबरवते राजा आता आमच्या हल्याच्या मस्तकात नाय घुसली ते रुपक का व्हय ते म्हनुन का ईतले प्रश्न चीन्ह टाकाव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

(रूपक कथा)

सतिश गावडे
Fri, 10/07/2016 - 01:42 नवीन
(रूपक कथा)
चुकून विनोदी च्या ऐवजी रुपक लिहीले का?
  • Log in or register to post comments

चुक ते चुकच आहे. माझ्या

औरंगजेब
Fri, 10/07/2016 - 08:53 नवीन
चुक ते चुकच आहे. माझ्या बाबतीत हे झाले आसते तर थेट कोपच्यातच घेतला असता.
  • Log in or register to post comments

रुपक कथा असल्याचा दाट संशय

औरंगजेब
Fri, 10/07/2016 - 08:54 नवीन
रुपक कथा असल्याचा दाट संशय येतोय
  • Log in or register to post comments

What exactly is this..

जव्हेरगंज
Fri, 10/07/2016 - 12:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आता कस आता कस अं, आम्हाला पण

राजाभाउ
Fri, 10/07/2016 - 17:53 नवीन
आता कस आता कस अं, आम्हाला पण तुमच्या काही ष्टोर्या वाचुन असच विचारात पडायला होत मग ह.घ्या प्लीज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

अगदी अगदी!!

पिलीयन रायडर
Fri, 10/07/2016 - 20:33 नवीन
अगदी अगदी!! आणि ह्यांना पण कळालं नाही तर मला काहीच कळालं नाही ह्याचं दु:ख जरा कमी झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

ए . आर .

सिरुसेरि
Fri, 10/07/2016 - 12:43 नवीन
ए . आर . रहमान आणी ए . आर . मुरुगाडॉस तेवढे माहिती आहेत .
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Fri, 10/07/2016 - 17:13 नवीन
=))
  • Log in or register to post comments

श्या, कुनाला काय्बी कल्ला नाय.

आनंदी गोपाळ
Sat, 10/08/2016 - 10:37 नवीन
अवो, पतंजलीची अ‍ॅड आहे ती! कितीपण खराब प्रॉडक्ट विकले, त्याने नाक फुटलं, पुढे तोंड हात पाय तुटले तरी तेच घेणार अशी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

छ्या असा

नाखु
Sat, 10/08/2016 - 10:56 नवीन
रहस्य्भेद नाही करायचा किमान पन्नास होईपर्यंत तरी धीर धरायचा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ (निश्चितच हे खरे

विवेकपटाईत
Tue, 10/11/2016 - 07:13 नवीन
आनंदी गोपाळ (निश्चितच हे खरे नाव नाही), तुम्हास्नी गोष्ट कळली नाही, त्याला माझा इलाज नाही. वृतपत्र वाचत असता तर निश्चित गोष्ट कळली असती). बाकी काहीही म्हणा तुम्ही मला एक मौका दिला. आटा नूडल बाजारात मिळतात कि नाही म्हणून पतंजलीचे नाव दिले होते. त्या वरून इथल्या विद्वानांनी मला पतंजलीचा प्रचारक ठरविण्यास कमी केले नाही. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, पतंजलीचे प्रोडक्ट निकृष्ट असतात हे विधान करायला किती मिळाले (रागावू नका). बाकी कुठल्या हि मार्केटिंग वाल्याला विचार एका निश्चित किमतीत पतंजली जी गुणवत्ता देऊ शकते दुसरे देऊ शकत नाही. कारण सुद्धा तो सांगू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

मार्केटिंग व गुणवत्ता यांचा काय संबंध?

आनंदी गोपाळ
Tue, 10/11/2016 - 22:03 नवीन
पटाईतजी, पतंजलीचे प्रॉडक्ट उत्कृष्ट असतात, हे विधान करायला किती मिळतात? (रागावा) बाकी माझ्या खरे नसलेल्या नावाला उत्तर द्यायची इतकी निकड का भासली, याबद्दल काही लिहिणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

बाप रे काय हिंसक धागा आहे ...

चौथा कोनाडा
Sat, 10/08/2016 - 17:57 नवीन
बाप रे काय हिंसक धागा आहे ...... नाकावर मुक्का, नाक तोडले, तंगडी तोडणार .... ! नुकताच बापुंचा वाढदिवस झाला अन दोन चार दिवसात लगेच एवढी हिंसा ? भावना दुखावल्या ना आमच्या ! या वरुन एक आठवलं, कायप्पावर पण एक रुपककथा सध्या फिरत आहे: जंगलात रानडुक्कर माजलंच होतं सिंहाने काही दिवस सहन केलं मग घातली झडप, केला खातमा आणि सहज एक डरकाळी फोडली तर, कोल्हा म्हणाला.. पुरावा काय लांडगा म्हणाला... सिंह खोटं बोलतोय गाढव म्हणालं... भांडवल करतोय कहर म्हणजे उंदीर म्हणाला, माझ्या लग्नापूर्वी मीही सिंह होतो आणि मी तर तेव्हा चार रानडुकरं मारली होती ... पण जंगलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मी नाही ब्वा डरकाळी फोडली..... !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा