✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

परतून ये तू घरी

ग — गंगाधर मुटे, Sun, 07/31/2016 - 20:43
परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी
राजसा! परतून ये तू घरी॥

               - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
8108 वाचन

💬 प्रतिसाद (20)

व्वाह!

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/31/2016 - 21:43 नवीन
व्वाह!
  • Log in or register to post comments

आवडेश...

अमितदादा
Sun, 07/31/2016 - 21:48 नवीन
आवडेश...
  • Log in or register to post comments

क्या बात है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/31/2016 - 22:04 नवीन
रचना आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त

धनावडे
Sun, 07/31/2016 - 22:42 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

व्वा!

संदीप डांगे
Sun, 07/31/2016 - 22:50 नवीन
व्वा!
  • Log in or register to post comments

व्वा! रचना आवडली.

किसन शिंदे
Sun, 07/31/2016 - 23:01 नवीन
व्वा! रचना आवडली.
  • Log in or register to post comments

छान कविता!

चतुरंग
Mon, 08/01/2016 - 00:03 नवीन
अगदी नादमय झाली आहे! :) कविता इतकी सुंदर आहे की अधिक चांगली व्हावी असे वाटल्याने छिद्रान्वेष - नाग, चिचुंद्री बिळात घुसले पक्षी पिंपळावरती बसले इथे दुसर्‍या ओळीत मात्रा १६ असल्या तरी लय जाते आहे, विहग पिंपळावरती बसले असा किंचित बदल केलात तर कसे राहील? शिवार भिजले, तरूवर निजले अश्रू पिऊनी बुबुळं थिजले तसेच इथेही किंचित लय जाते आहे अश्रू पिऊनी लोचन थिजले असा बद्ल कसा वाटेल? (किंचितकवी)रंगा
  • Log in or register to post comments

क्या बात है!

चांदणे संदीप
Mon, 08/01/2016 - 05:52 नवीन
मूळ कविता आणि छिद्रान्वेष, दोन्हीही उत्तम! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

छान कविता आणी चतुरंग ह्यांनी

अभिजीत अवलिया
Mon, 08/01/2016 - 03:21 नवीन
छान कविता आणी चतुरंग ह्यांनी सांगितलेले बदल देखील उत्तम.
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Mon, 08/01/2016 - 09:18 नवीन
कवीता अर्थवाही आहे आणि सकारात्मक आहे म्हणून फारफार आवडली. नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

सकारात्मक आहे म्हणून सहमत

मोदक
Tue, 08/02/2016 - 17:53 नवीन
सकारात्मक आहे म्हणून
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

छान आहे कविता. कोणाला

सतिश गावडे
Mon, 08/01/2016 - 09:23 नवीन
छान आहे कविता. कोणाला उद्देशून लिहीली आहे?
  • Log in or register to post comments

छान आहे

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 08/01/2016 - 09:29 नवीन
नादमय कविता आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

सुंदर कविता !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/01/2016 - 11:01 नवीन
सुंदर कविता !
  • Log in or register to post comments

कविता आवडली

पैसा
Mon, 08/01/2016 - 11:11 नवीन
कविता आवडली. पण सगळ्या रोमँटिक वातावरणात बुरुज, चिचुंद्री, बुबुळ या शब्दांनी जरा रसभंग होतो आहे.
  • Log in or register to post comments

राजसा हेबांना उद्देशून आहे का

अभ्या..
Mon, 08/01/2016 - 11:16 नवीन
राजसा हेबांना उद्देशून आहे का दादुसाहेबांकडून? मग बुरुज पक्षी कावळे येणारच.
  • Log in or register to post comments

आवडली.

प्रमोद देर्देकर
Mon, 08/01/2016 - 13:08 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

अतिशय

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 08/01/2016 - 19:37 नवीन
अतिशय नादमय आणि देखणी रचना...
  • Log in or register to post comments

सुरेख!

जव्हेरगंज
Mon, 08/01/2016 - 19:54 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

खूप आवडली.

ज्योति अळवणी
Tue, 08/02/2016 - 17:37 नवीन
खूप आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा