परतून ये तू घरी
लेखनविषय:
काव्यरस
परतून ये तू घरी
मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥
सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥
नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥
शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी
राजसा! परतून ये तू घरी॥
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥
सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥
नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥
शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी
राजसा! परतून ये तू घरी॥
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचने
8154
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
व्वाह!
आवडेश...
रचना आवडली.
-दिलीप बिरुटे
मस्त
व्वा!
व्वा! रचना आवडली.
अगदी नादमय झाली आहे! :)
कविता इतकी सुंदर आहे की अधिक चांगली व्हावी असे वाटल्याने छिद्रान्वेष -
नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
इथे दुसर्या ओळीत मात्रा १६ असल्या तरी लय जाते आहे,
विहग पिंपळावरती बसले
असा किंचित बदल केलात तर कसे राहील?
शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
तसेच इथेही किंचित लय जाते आहे
अश्रू पिऊनी लोचन थिजले
असा बद्ल कसा वाटेल?
(किंचितकवी)रंगा
In reply to छान कविता! by चतुरंग
मूळ कविता आणि छिद्रान्वेष, दोन्हीही उत्तम! :)
Sandy
छान कविता आणी चतुरंग ह्यांनी सांगितलेले बदल देखील उत्तम.
In reply to छान कविता आणी चतुरंग ह्यांनी by अभिजीत अवलिया
कवीता अर्थवाही आहे आणि सकारात्मक आहे म्हणून फारफार आवडली.
नितवाचक नाखु
In reply to +१ by नाखु
सकारात्मक आहे म्हणून
सहमतछान आहे कविता. कोणाला उद्देशून लिहीली आहे?
नादमय कविता आवडली
पैजारबुवा,
सुंदर कविता !
कविता आवडली. पण सगळ्या रोमँटिक वातावरणात बुरुज, चिचुंद्री, बुबुळ या शब्दांनी जरा रसभंग होतो आहे.
राजसा हेबांना उद्देशून आहे का दादुसाहेबांकडून? मग बुरुज पक्षी कावळे येणारच.
आवडली.
अतिशय नादमय आणि देखणी रचना...
सुरेख!
खूप आवडली.
व्वाह!