खुप छान झालाय लेख बिपिन दा!
आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल.
नक्किच!!
(अफ्रिका याच देही याच डोळा एकवेळ पहायची इच्छा असलेला) अनामिक.
लेख आवडला. खूप उशीरा प्रतिक्रिया देतोय , पण बेटर लेट द्यान नेव्हर. लेखकाची प्रवाही , चित्रदर्शी शैली आता चांगलीच परिचयाची झाली आहे. नवीन दुनियेचे समृद्ध अनुभव उत्तम टिपले गेलेत.
आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल.
या विधानाच्या मागे केवळ आशावाद आहे का त्याला काही तर्काची, सत्याची जोड आहे ? कारण तशी नसल्यास मला हे विधान काही पटलेले नाही. जगात न्युक्लिअर विंटर आला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा सर्वंकश सुनामीमुळे वगैरे सर्व प्रगत , अत्याधुनिक यंत्रणा कोसळली तरच आफ्रिका ही तिच्यातील नैसर्गिक साधनांमुळे "शिखरावर" असलेली दिसेल - कारण बाकी काहीच शिल्लक असणार नाही. या पर्यायाशिवाय , येत्या १०० वर्षात अफ्रिका (एकवेळ प्रगतीपथावर असेल , पण ) "शिखरावर" येईल यावर माझा विश्वास सध्याच्या घडीला बसत नाही.
आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल.
या विधानाच्या मागे केवळ आशावाद आहे का त्याला काही तर्काची, सत्याची जोड आहे ? कारण तशी नसल्यास मला हे विधान काही पटलेले नाही. जगात न्युक्लिअर विंटर आला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा सर्वंकश सुनामीमुळे वगैरे सर्व प्रगत , अत्याधुनिक यंत्रणा कोसळली तरच आफ्रिका ही तिच्यातील नैसर्गिक साधनांमुळे "शिखरावर" असलेली दिसेल - कारण बाकी काहीच शिल्लक असणार नाही. या पर्यायाशिवाय , येत्या १०० वर्षात अफ्रिका (एकवेळ प्रगतीपथावर असेल , पण ) "शिखरावर" येईल यावर माझा विश्वास सध्याच्या घडीला बसत नाही.
खरं सांगायचं तर माझ्या विधानाला खूप तर्काचा असा वगैरे आधार नाही किंवा मी अभ्यासपूर्ण लिहिलंय असं नाहिये. हा केवळ आशावाद आहे असं थोडंसं म्हणता येईल. पण त्याला थोडा आधार आहे. प्रथम हे स्पष्ट करतो की आफ्रिकेच संभाव्य उत्थान हे १००-२०० वर्षात होईल असं मला म्हणायचं नाहिये. किंबहुना तो कधी होईल हा मुद्दा नाहीच. पण जे काही थोडंफार जागतिक इतिहासाबद्दल मला माहित आहे त्यावरून मला नेहमीच असं वाटतं की 'कालचक्र' हे अव्याहत आणि निष्ठूर आहे. जगातील प्रत्येक संस्कृति, समाज, भूभाग इ. कधी भरभराटीत असतात. पण काही काळाने पार रसातळाला जातात. परत काही काळाने वर येतात. आफ्रिकेचा भूतकाळ प्रचंड नसला तरी बर्यापैकी सशक्त होता. मोठमोठी साम्राज्य होती. लोक तुलनेने सुखी समाधानी होते. मग दैन्यावस्था आली. आणि मी ज्या काही आफ्रिकनांना भेटलोय त्यातले बरेच चांगले शिकलेले पण स्वेच्छेने मायदेशी परत येऊन देशासाठी काही तरी करत होते. म्हणून मला असं वाटलं कदाचित ही सुरूवात असेल. अर्थात १०-१००-१००... किती वर्षं लागतील ते काही माहित नाही. :)
बिपिन कार्यकर्ते
बिपीनदा,
आफ्रिके बद्दल सुंदर लिहिले आहेस. :)
>>>तर अशी ही आफ्रिका. माझ्या 'डोक्यातली' आणि 'खर्यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला.
:)
शनिवारी संध्याकाळी (तेव्हा मराठी सिनेमे शनिवारी आणि हिंदी सिनेमे रविवारी संध्याकाळी अशी विभागणी असायची) टीव्हीवर 'जगाच्या पाठीवर' हा सिनेमा चालू होता. त्यात राजा परांजपे एका आफ्रिकेमधून आलेल्या माणसाची भूमिका करतात. हा माणूस 'झांझिबार'ला स्थायिक झालेला असतो. आणि त्या सिनेमात एक वेड्यांचे गाणे आहे, त्यात एक वेडा 'झांझिबार, झांझिबार' असं म्हणत असतो.
बिपीण भाव !! आपण तर बॉ एका फोटूतच खल्लास झालो !!! ते सुर्य मावळतो णा , तेंव्हा आम्ही फारच भावूक झालेलो असतो ... आणि तो फोटू "के व ळ अ ति अ प्र ति म " आहे ... तोडच णाही !! अफ्रिका आपल्या लेखणीतून प्रसवली आम्ही ती तशीही अणुभवली आहे ! एकदम एक्ग्जाक्टली सांग्या आपणे !! लेखाची लांबी योग्य होती , आपल्या ओघावत्या भाषेचे आम्ही खोबारापासूनच (चालणारे)फैन आहोत , आपल्या बोटांमधून असंच बरंच काही प्रसवो !! आम्ही मात्र पुण्हा 'मसाईमारा' बघायला जाणार हे णक्की !! लाष्ट टाईम "नाकुरू" वर समाधाणी होतो.
इट्स अफ्रिका ब्वाना !! सेबो यू पुट द फिंगर ऑण रेड बटण (हे आपलं काहिहि)
- (मुइंडी कम मुझुंगू) टारझन
आम्ही मच्छर मारणारे क्षत्रिय आहोत
आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल.
क्या बात है !!!
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
लहानपणापासुन तुमच्या मनात बसलेल्या अफ्रिकेचा लेख आवडला.
भविष्यात अफ्रिकेचे उज्वल दिवस येतीलच!
तुमच्याकडूनच द अदर साईड ऑफ अफ्रीका वाचायला आवडेल [सोमालिया, सुदान, कॉंगो, रवांडा, लायबेरिया,झिंब्बावे, आयव्हरी कोस्ट]
अफ्रिकन सफारी एकदम मस्त्त वाटली. मस्तच केले आहे एकुण वर्णन. सुंदर लेख.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
मस्त..
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
तुमच्या मनातील लाहानपणापासूनचे आफ्रिकेचे आकर्षण, तुम्ही पाहिलेल्या आफ्रिकेचं वर्णन सगळेच मस्त जमले आहे.
सुंदर वर्णन. आवडले.
सहमत.
फार छान शब्दयोजना. वैमानिकाची हाक, पत्यक्षाहुनी प्रतिमाचा वापर. आवडले.
आफ्रिका म्हटली की 'द घोस्ट अँन्ड द डार्कनेस' चित्रपटातील वेगवान पार्श्वसंगीत माझ्या मनात रुंजी घालायला लागते.
आफ्रिकेबद्दल अजून लिहा. तिथल्या सामाजिक-अर्थिक-राजकीय परिस्थितीबद्दलसुद्धा लिहा.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
लेख. खरे तर ह्याविषयावर अजून आपल्याकडून लिहीलेले वाचायला आवडेल. तेथील सर्मसामान्य लोकांचे जीवन, समाजातील प्रश्न इ.
केवळ काही दिवसांच्या तेथील वास्तव्यात आपण आफ्रिकन लोकांचे चेहरे व शरीरयष्टीवरून ते कुठल्या प्रांतातून आले आहेत, ह्यावर अंदाज बांधू शकलात, हे आपल्या तीव्र निरीक्षण शक्तिचे द्योतक आहे, हे विशेष आवडले.
तेथे चीन्यांनी भरपूर हातपाय पसरवले आहेत. एकतर त्यांच्याकडे जी आता अमाप परकिय चलनातील गंगाजळी आहे, त्याचा व्यवस्थित ठरवू, दूरदृष्टिने ते आफ्रिकेत वापर करत आहेत, कारण तेथील तेलसाठे त्यांना महत्वाचे वाटतात. चिनी कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल- संबंधित उद्योगांतच गुंतवणूक केली आहे असे नव्हे, तर तेथील काही देशांत त्यांनी 'मदतकार्ये' ही सुरू केली आहेत, हे इतक्या पद्धतशीरपणे चालू आहे, की खरोखरीच ते पाहिल्यावर आपले सरकार व नोकरशाही ह्या दृष्टिने काय करत आहे, असा प्रश्न तुम्ही विचारला आहे, तो मलाही पडतो.
अवांतरः काही शहरांची, गावांची नावे भूल पाडणारी असतात, हे 'झांझिबार' बद्दल आपण जे म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. 'बंदर सेरि बेगावान' हे असेच एक दुसरे शहराचे नाव की जे ऐकल्यापासून मला थोडे चमत्कारिक वाटत आले आहे.
ह्यात काहीतरी तथ्य असावे असे दिसते. मलेशियाच्या पूर्वेकडे असलेल्या ब्रूनेईच्या सुलतानाच्या राजधानीचे हे नाव आहे. विकीपेडिया ह्या नावाबद्दल अशी माहिती देतो.
सुंदर लेख.
खरे तर ह्याविषयावर अजून आपल्याकडून लिहीलेले वाचायला आवडेल. तेथील सर्मसामान्य लोकांचे जीवन, समाजातील प्रश्न इ.
याविषयी सहमत. कधी लिहिताय असं?
एक (आगाऊ) सूचना - लेखाला राऊंड-अपचा फॉर्म नका ठेवू. टॉकेटिव्ह होऊ द्या, अनुभव लिहा, घटना-प्रसंग येऊ द्या. अशा घटना-प्रसंगातून तुमच्यासमोर व्यक्त होणारी आफ्रिका समजून घेणंही अधिक आवडेल. म्हणून म्हणतो राऊंड-अपचा फॉर्म नको.
आमच्या ओळखीचे एक गृहस्थ डेंकाली इथे रहायचे.त्यांना शहरात आल्यावर मि.वॉकर म्हणायचे.त्यांच्या बायकोचे नाव डायना.घरगड्याचे नाव गुर्रन्.त्यांच्याबरोबर नेहमी आफ्रीकेत जायचो.आफ्रीका फार आवडायची.पण एक दिवस माझ्या एका मित्रानी आफ्रीकेचा एक नवा फोटो पाठवला.त्याला या फोटोचे खूप सारे पैसे मिळाले म्हणे.
हा फोटो पाह्यल्यावर डेंकाली ,वॉकर, वाघ्या, गुर्रन सगळं काही विसरलो.सापडला तर टाकतो तो फोटो.
बिपीन तुमचा लेख आवडला .सुंदर आहे. नेहेमीचे यशस्वी कलाकाराच्या यादीत तुमचं नाव आता झळकायला लागलं आहे.
काय योगायोग बघा. हा वॉकर आपला कॉमन फ्रेंड निघाला की हो. :)
हा फोटो बघितला होता. खरंच अतिशय भयंकर आहे. पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा मी पण हादरलो होतो.
बिपिन कार्यकर्ते
हा फोटो आणि त्यावर झालेली चर्चा आठवली.
मरणासन्न मुलाला थोडे पाणी / अन्न देण्याऐवजी त्याचा फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्याची हाव असणे चांगले का, अशी काहीशी ती चर्चा होती.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
ह्या फोटो बद्दल थोडे गूगलवले. धक्कादायक माहिती कळली. केविन कार्टर नावाच्या पत्रकाराने हा फोटो काढला आणि नंतर हे दृश्य सहन न झाल्याने २ महिन्यांनी आत्महत्या केली. :(
http://realchoice.blogspot.com/2008/09/vultures.html
बिपिन कार्यकर्ते
मीही हा फोटो पाहिला होता, पण हेही त्याचबरोबर वाचलेले आठवते की त्या फोटोग्राफरने फोटो काढल्यावर गिधाड हुसकावून लावले आणि मुलाला सुरक्षित स्थानी हलवले. कदाचित माझा काहीतरी गोंधळ होत असण्याची शक्यता आहे.
आत्मकथनाच्या धाग्यांची रेशमी वीण असलेला तुझा लेख सुंदरच झालाय. आफ्रिकेत जायची इच्छा आणखीनच प्रबळ झालीये.
(काय योगायोग आहे बघ बिपिनदा! कालच माझ्या एका मित्राला नवीन वर्षानिमित्त शुभेच्छांचा फोन केला आणि त्याच्या बायकोने सांगितले की तो कैरोला गेलाय आणि आजच निघालाय परतीच्या प्रवासाला, त्यावेळी मला पिरॅमिड्स, ईजिप्त आणि त्यामुळे एकूणच आफ्रिका प्रकर्षाने बघायची इच्छा झाली आणि आज बघतो तर तुझा हा लेख!)
चतुरंग
मुद्देसूद झालाय. अगदी लहानपणापासून असलेली इच्छा आणि खरच तिथे जाण्यापर्यंतचा प्रवास छान लिहिला आहे.
(खरंतर आपल्या मनानं प्रवासाला लहानपणापासूनच सुरूवात केली होती असं वाटलं.)
रेवती
लहानपणापासून आलेले आफ्रिका या नावाशी संबंध.. आणि नंतर प्रत्यक्षात पाहिलेली आफ्रिका.. मस्तच लिहिले आहेस.
खासक्रून विमान प्रवास वर्णन एकदम खास.
माझे बाबा एक वर्ष होते आफ्रिकेमध्ये. टांझानिया मध्ये होते. एक एक अनुभव मस्त होते बाबांनी सांगितलेले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
नाईजेरीया येथे एक हवा आहे Financial Controller स्म्पर्क करा: nach_sam@yahoo.com. पश्चिम आफ्रिकेसंबंधी काही विशिष्ट माहिती हवी आहे का, चिन्य बद्द्ल लिहिलेले बरोबर आहे, आपले भारतीय बहुतांशी चित्रपटाबद्दल चर्चा करण्यात अधिक उत्सूक असलेले आढळ्ले. चिन्य बद्द्ल चुकले आहे, क्षमस्व. तसे पाहिले तर आफ्रिका फार सुंदर ही आहे आणि गरीब ही. पण चिक्कार अंतर्गत व न वापरलेली क्षमता असलेली. भारताविषयी त्यांना फार आपुलकी आहे. पूर्व आणि पश्चिम प्रदेशात फार फरक आहे. पण त्यांची गावे आणि शहरे ( गावे विशेष करून ) म्हणजे मी पाहिलेली तरी आपल्यापेक्षा अधिक नेटकी आहेत, कारण तिथे परका टोळीवाला किंवा पर प्रांताताला कोणी जाऊन सहजा सहजी अनावश्यक ढवळाढवळ करू शकत नाही; मारला जाईल. इथे बरीच क्षेत्रे अविकसित आहेत, आणि त्यात फार प्रगती होऊ शकेल असे आहे असे चित्र दिसत आहे. हुशार लोकांना इथे चांगला वाव आहे, विशेष करून तांत्रिकी क्षेत्रात.
बिपिन,
आफ्रिकेबद्दल मस्त लेख रे मित्रा....
'आफ्रिका' म्हटलं की मला हमखास आठवतं ते म्हणजे 'लायन किंग' ह्या नितांत सुंदर ऍनिमेशनपटातले 'circle of life' गाणं
(इतक्या सुरेख चित्रपटाला 'कार्टून' म्हणवत नाही !!)
ह्या गाण्यातला सूर्योदय आहे ना तो तर खल्लासच आहे एकदम.... आणि हे गाणं जेव्हा प्रत्यक्षात साकार झालेलं ब्रॉड वे शो मधे पाहिले तेव्हा तर पार वेडाच झालो होतो :)
गाण्याचा 'तू नळी' दुवा इथे देत आहेच.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
लहान मुलांना तर खूप आवडतोच पण मोठेही आवडीनं बघतात.
बरं.. कथा म्हणशील तर एकदम थेट ७०/८० च्या दशकातल्या मसाला हिंदी सिनेमासारखी... म्हणजे दुष्ट काका वगैरे असं !!
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
बिपिन भौ
सुंदर लेख. थोडक्यात पण बरीच माहिती आहे यात.
मी स्वतः सध्या टांझानिया मधे आहे. इथले काळे लोक नायजेरिया किंवा केनिया पेक्षा जरासे मवाळ आहेत.
लहान पणापासून आफ्रिकेचे आकर्षण अशा तर्हेने प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे हा योग ही फार विलक्षण आहे.
लिहित राहा. छान चालू आहे!
बिपिनराव, मला वाटतं डिसेंबरच्या १५-१६ तारखेस मी शारजात आलो होतो तेंव्हाही आपण आफ्रिकेच्या सफरीवर निघाला होता, त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही. असो.
वरील लेख सुंदरच आहे. त्यात थोडी छायाचित्रांची रांगोळी असती तर अजून मजा आली असती.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
प्रतिक्रिया
खुप छान
प्रतिक्रिया
थ्यांक्स...
मस्त लेख
सुरेख !
फारच छान
पुन्हा एकदा सिक्सर.
फोटो मी नाही काढलेला!!!
छान
छान
'जगाच्या पाठीवर' नव्हे.
ममाक्ष - बासंच !!!
अरे हो खरंच की !!!
तर अशी ही
आज आफ्रिका
बोटे
छान
प्रयत्न
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अफ्रिकन सफारी
मस्त..
मस्त
मस्त लेख!
तुमच्या
सुंदर
'बंदर सेरि बेगावान'
कोण जाणे
टिंबक्टूचं काय?
मलाही...
सुंदर लेख.
रहस्यमय आफ्रीका
योगायोग!!!
भयंकर
बाप रे...
भयंकर
असेच
आफ्रिका!
लेख आवडला.
अतिशय मुद्देसूद आणि ओघवता लेख.
+१
मस्त
खूप
हेच...
नाईजेरीया
Circle of life
मस्तच...
जरूर बघ
अतिशय सुंदर गाणे!
आफ्रिका
बिपिनराव...