Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आफ्रिका!!! आफ्रिका!!!

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
गुरुवार, 01/01/2009 - 04:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13502 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

अ
अनामिक गुरुवार, 01/01/2009 - 05:46 नवीन

खुप छान

खुप छान झालाय लेख बिपिन दा! आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. नक्किच!! (अफ्रिका याच देही याच डोळा एकवेळ पहायची इच्छा असलेला) अनामिक.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 01/06/2009 - 20:50 नवीन

प्रतिक्रिया

लेख आवडला. खूप उशीरा प्रतिक्रिया देतोय , पण बेटर लेट द्यान नेव्हर. लेखकाची प्रवाही , चित्रदर्शी शैली आता चांगलीच परिचयाची झाली आहे. नवीन दुनियेचे समृद्ध अनुभव उत्तम टिपले गेलेत. आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. या विधानाच्या मागे केवळ आशावाद आहे का त्याला काही तर्काची, सत्याची जोड आहे ? कारण तशी नसल्यास मला हे विधान काही पटलेले नाही. जगात न्युक्लिअर विंटर आला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा सर्वंकश सुनामीमुळे वगैरे सर्व प्रगत , अत्याधुनिक यंत्रणा कोसळली तरच आफ्रिका ही तिच्यातील नैसर्गिक साधनांमुळे "शिखरावर" असलेली दिसेल - कारण बाकी काहीच शिल्लक असणार नाही. या पर्यायाशिवाय , येत्या १०० वर्षात अफ्रिका (एकवेळ प्रगतीपथावर असेल , पण ) "शिखरावर" येईल यावर माझा विश्वास सध्याच्या घडीला बसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 01/06/2009 - 22:46 नवीन

थ्यांक्स...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. या विधानाच्या मागे केवळ आशावाद आहे का त्याला काही तर्काची, सत्याची जोड आहे ? कारण तशी नसल्यास मला हे विधान काही पटलेले नाही. जगात न्युक्लिअर विंटर आला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा सर्वंकश सुनामीमुळे वगैरे सर्व प्रगत , अत्याधुनिक यंत्रणा कोसळली तरच आफ्रिका ही तिच्यातील नैसर्गिक साधनांमुळे "शिखरावर" असलेली दिसेल - कारण बाकी काहीच शिल्लक असणार नाही. या पर्यायाशिवाय , येत्या १०० वर्षात अफ्रिका (एकवेळ प्रगतीपथावर असेल , पण ) "शिखरावर" येईल यावर माझा विश्वास सध्याच्या घडीला बसत नाही.
खरं सांगायचं तर माझ्या विधानाला खूप तर्काचा असा वगैरे आधार नाही किंवा मी अभ्यासपूर्ण लिहिलंय असं नाहिये. हा केवळ आशावाद आहे असं थोडंसं म्हणता येईल. पण त्याला थोडा आधार आहे. प्रथम हे स्पष्ट करतो की आफ्रिकेच संभाव्य उत्थान हे १००-२०० वर्षात होईल असं मला म्हणायचं नाहिये. किंबहुना तो कधी होईल हा मुद्दा नाहीच. पण जे काही थोडंफार जागतिक इतिहासाबद्दल मला माहित आहे त्यावरून मला नेहमीच असं वाटतं की 'कालचक्र' हे अव्याहत आणि निष्ठूर आहे. जगातील प्रत्येक संस्कृति, समाज, भूभाग इ. कधी भरभराटीत असतात. पण काही काळाने पार रसातळाला जातात. परत काही काळाने वर येतात. आफ्रिकेचा भूतकाळ प्रचंड नसला तरी बर्‍यापैकी सशक्त होता. मोठमोठी साम्राज्य होती. लोक तुलनेने सुखी समाधानी होते. मग दैन्यावस्था आली. आणि मी ज्या काही आफ्रिकनांना भेटलोय त्यातले बरेच चांगले शिकलेले पण स्वेच्छेने मायदेशी परत येऊन देशासाठी काही तरी करत होते. म्हणून मला असं वाटलं कदाचित ही सुरूवात असेल. अर्थात १०-१००-१००... किती वर्षं लागतील ते काही माहित नाही. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विकास गुरुवार, 01/01/2009 - 05:55 नवीन

मस्त लेख

लेख आणि आत्मकथन आवडले... त्या निमित्ताने मला देखील लहानपणी पाहीलेल्या हातारीची चित्रपटाची आठवण करून दिलीत :-)
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 01/01/2009 - 06:12 नवीन

सुरेख !

बिपीनदा, आफ्रिके बद्दल सुंदर लिहिले आहेस. :) >>>तर अशी ही आफ्रिका. माझ्या 'डोक्यातली' आणि 'खर्‍यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला. :)
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 01/01/2009 - 06:43 नवीन

फारच छान

लेख फारच छान. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/01/2009 - 08:11 नवीन

पुन्हा एकदा सिक्सर.

सुंदर. खरोखर सुंदर. फार आवडले. काढलेला फोटोही फार सुंदर. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/01/2009 - 13:58 नवीन

फोटो मी नाही काढलेला!!!

श्रीमंत, तो फोटो आंतरजालावरून घेतलेला आहे. तशी तळटीप टाकायची राहिली होती. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 01/01/2009 - 09:19 नवीन

छान

छान लेख आता आशियाचे दिवस चालु आहेत. काही दिवसांनी अफ्रीकेचे दिवस येतील. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 01/01/2009 - 09:19 नवीन

छान

छान लेख आता आशियाचे दिवस चालु आहेत. काही दिवसांनी अफ्रीकेचे दिवस येतील. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/01/2009 - 09:21 नवीन

'जगाच्या पाठीवर' नव्हे.

शनिवारी संध्याकाळी (तेव्हा मराठी सिनेमे शनिवारी आणि हिंदी सिनेमे रविवारी संध्याकाळी अशी विभागणी असायची) टीव्हीवर 'जगाच्या पाठीवर' हा सिनेमा चालू होता. त्यात राजा परांजपे एका आफ्रिकेमधून आलेल्या माणसाची भूमिका करतात. हा माणूस 'झांझिबार'ला स्थायिक झालेला असतो. आणि त्या सिनेमात एक वेड्यांचे गाणे आहे, त्यात एक वेडा 'झांझिबार, झांझिबार' असं म्हणत असतो.
'पेडगावचे शहाणे'. - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 01/01/2009 - 10:01 नवीन

ममाक्ष - बासंच !!!

बिपीण भाव !! आपण तर बॉ एका फोटूतच खल्लास झालो !!! ते सुर्य मावळतो णा , तेंव्हा आम्ही फारच भावूक झालेलो असतो ... आणि तो फोटू "के व ळ अ ति अ प्र ति म " आहे ... तोडच णाही !! अफ्रिका आपल्या लेखणीतून प्रसवली आम्ही ती तशीही अणुभवली आहे ! एकदम एक्ग्जाक्टली सांग्या आपणे !! लेखाची लांबी योग्य होती , आपल्या ओघावत्या भाषेचे आम्ही खोबारापासूनच (चालणारे)फैन आहोत , आपल्या बोटांमधून असंच बरंच काही प्रसवो !! आम्ही मात्र पुण्हा 'मसाईमारा' बघायला जाणार हे णक्की !! लाष्ट टाईम "नाकुरू" वर समाधाणी होतो. इट्स अफ्रिका ब्वाना !! सेबो यू पुट द फिंगर ऑण रेड बटण (हे आपलं काहिहि) - (मुइंडी कम मुझुंगू) टारझन आम्ही मच्छर मारणारे क्षत्रिय आहोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमाक्ष
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/01/2009 - 13:54 नवीन

अरे हो खरंच की !!!

योग्य ती सुधारणा केली आहे. चुकून मिष्टिक झाल्याली. नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमाक्ष
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/01/2009 - 09:53 नवीन

तर अशी ही

तर अशी ही आफ्रिका. माझ्या 'डोक्यातली' आणि 'खर्‍यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला. मस्त रे बिपिनभौ! :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 01/01/2009 - 10:14 नवीन

आज आफ्रिका

आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. क्या बात है !!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 01/01/2009 - 10:56 नवीन

बोटे

चांगलीच प्रसवताहेत.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 01/01/2009 - 12:32 नवीन

छान

लहानपणापासुन तुमच्या मनात बसलेल्या अफ्रिकेचा लेख आवडला. भविष्यात अफ्रिकेचे उज्वल दिवस येतीलच! तुमच्याकडूनच द अदर साईड ऑफ अफ्रीका वाचायला आवडेल [सोमालिया, सुदान, कॉंगो, रवांडा, लायबेरिया,झिंब्बावे, आयव्हरी कोस्ट]
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/01/2009 - 13:59 नवीन

प्रयत्न

प्रयत्न करतो नक्की!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
न
नंदन Fri, 01/02/2009 - 07:08 नवीन

सहमत

आहे, लेख अतिशय आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/01/2009 - 12:37 नवीन

अफ्रिकन सफारी

अफ्रिकन सफारी एकदम मस्त्त वाटली. मस्तच केले आहे एकुण वर्णन. सुंदर लेख. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 01/01/2009 - 13:58 नवीन

मस्त..

मस्त.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 01/01/2009 - 16:41 नवीन

मस्त

लेख आवडला.. आटोपशीर आणि नेमका!.. मस्त! - ऋषिकेश
  • Log in or register to post comments
श
शाल्मली गुरुवार, 01/01/2009 - 16:52 नवीन

मस्त लेख!

तुमच्या मनातील लाहानपणापासूनचे आफ्रिकेचे आकर्षण, तुम्ही पाहिलेल्या आफ्रिकेचं वर्णन सगळेच मस्त जमले आहे. सुंदर वर्णन. आवडले. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/06/2009 - 22:19 नवीन

तुमच्या

तुमच्या मनातील लाहानपणापासूनचे आफ्रिकेचे आकर्षण, तुम्ही पाहिलेल्या आफ्रिकेचं वर्णन सगळेच मस्त जमले आहे. सुंदर वर्णन. आवडले.
सहमत. फार छान शब्दयोजना. वैमानिकाची हाक, पत्यक्षाहुनी प्रतिमाचा वापर. आवडले. आफ्रिका म्हटली की 'द घोस्ट अँन्ड द डार्कनेस' चित्रपटातील वेगवान पार्श्वसंगीत माझ्या मनात रुंजी घालायला लागते. आफ्रिकेबद्दल अजून लिहा. तिथल्या सामाजिक-अर्थिक-राजकीय परिस्थितीबद्दलसुद्धा लिहा. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली
प
प्रदीप गुरुवार, 01/01/2009 - 17:50 नवीन

सुंदर

लेख. खरे तर ह्याविषयावर अजून आपल्याकडून लिहीलेले वाचायला आवडेल. तेथील सर्मसामान्य लोकांचे जीवन, समाजातील प्रश्न इ. केवळ काही दिवसांच्या तेथील वास्तव्यात आपण आफ्रिकन लोकांचे चेहरे व शरीरयष्टीवरून ते कुठल्या प्रांतातून आले आहेत, ह्यावर अंदाज बांधू शकलात, हे आपल्या तीव्र निरीक्षण शक्तिचे द्योतक आहे, हे विशेष आवडले. तेथे चीन्यांनी भरपूर हातपाय पसरवले आहेत. एकतर त्यांच्याकडे जी आता अमाप परकिय चलनातील गंगाजळी आहे, त्याचा व्यवस्थित ठरवू, दूरदृष्टिने ते आफ्रिकेत वापर करत आहेत, कारण तेथील तेलसाठे त्यांना महत्वाचे वाटतात. चिनी कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल- संबंधित उद्योगांतच गुंतवणूक केली आहे असे नव्हे, तर तेथील काही देशांत त्यांनी 'मदतकार्ये' ही सुरू केली आहेत, हे इतक्या पद्धतशीरपणे चालू आहे, की खरोखरीच ते पाहिल्यावर आपले सरकार व नोकरशाही ह्या दृष्टिने काय करत आहे, असा प्रश्न तुम्ही विचारला आहे, तो मलाही पडतो. अवांतरः काही शहरांची, गावांची नावे भूल पाडणारी असतात, हे 'झांझिबार' बद्दल आपण जे म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. 'बंदर सेरि बेगावान' हे असेच एक दुसरे शहराचे नाव की जे ऐकल्यापासून मला थोडे चमत्कारिक वाटत आले आहे.
  • Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/01/2009 - 17:59 नवीन

'बंदर सेरि बेगावान'

'बंदर सेरि बेगावान' हे असेच एक दुसरे शहराचे नाव की जे ऐकल्यापासून मला थोडे चमत्कारिक वाटत आले आहे.
'बंदर सेरि बेगावान' हे शहराचे नाव 'बंदर श्री भगवान'वरून उद्भवलेले असावे. - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप गुरुवार, 01/01/2009 - 18:30 नवीन

कोण जाणे

ह्यात काहीतरी तथ्य असावे असे दिसते. मलेशियाच्या पूर्वेकडे असलेल्या ब्रूनेईच्या सुलतानाच्या राजधानीचे हे नाव आहे. विकीपेडिया ह्या नावाबद्दल अशी माहिती देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमाक्ष
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/01/2009 - 19:04 नवीन

टिंबक्टूचं काय?

मला टिंबक्टू या नावाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. बिका, लेख उत्तम हे.वे.सां.न.ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमाक्ष
प
प्रदीप गुरुवार, 01/01/2009 - 21:12 नवीन

मलाही...

आणि ह्या नावावरून किशोरचं एक धमाल गाणंही लगेच आठवतं: " घे घे घे, घे घे जरा टिंबक्टू, काठमांडू अरे काठमांडू..." असो, हे सगळे फाजिल अवांतर झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
श्रावण मोडक Tue, 01/06/2009 - 15:00 नवीन

सुंदर लेख.

सुंदर लेख. खरे तर ह्याविषयावर अजून आपल्याकडून लिहीलेले वाचायला आवडेल. तेथील सर्मसामान्य लोकांचे जीवन, समाजातील प्रश्न इ. याविषयी सहमत. कधी लिहिताय असं? एक (आगाऊ) सूचना - लेखाला राऊंड-अपचा फॉर्म नका ठेवू. टॉकेटिव्ह होऊ द्या, अनुभव लिहा, घटना-प्रसंग येऊ द्या. अशा घटना-प्रसंगातून तुमच्यासमोर व्यक्त होणारी आफ्रिका समजून घेणंही अधिक आवडेल. म्हणून म्हणतो राऊंड-अपचा फॉर्म नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
र
रामदास गुरुवार, 01/01/2009 - 19:07 नवीन

रहस्यमय आफ्रीका

आमच्या ओळखीचे एक गृहस्थ डेंकाली इथे रहायचे.त्यांना शहरात आल्यावर मि.वॉकर म्हणायचे.त्यांच्या बायकोचे नाव डायना.घरगड्याचे नाव गुर्रन्.त्यांच्याबरोबर नेहमी आफ्रीकेत जायचो.आफ्रीका फार आवडायची.पण एक दिवस माझ्या एका मित्रानी आफ्रीकेचा एक नवा फोटो पाठवला.त्याला या फोटोचे खूप सारे पैसे मिळाले म्हणे. हा फोटो पाह्यल्यावर डेंकाली ,वॉकर, वाघ्या, गुर्रन सगळं काही विसरलो.सापडला तर टाकतो तो फोटो. बिपीन तुमचा लेख आवडला .सुंदर आहे. नेहेमीचे यशस्वी कलाकाराच्या यादीत तुमचं नाव आता झळकायला लागलं आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/01/2009 - 19:21 नवीन

योगायोग!!!

काय योगायोग बघा. हा वॉकर आपला कॉमन फ्रेंड निघाला की हो. :) हा फोटो बघितला होता. खरंच अतिशय भयंकर आहे. पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा मी पण हादरलो होतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
सुनील गुरुवार, 01/01/2009 - 19:26 नवीन

भयंकर

हा फोटो आणि त्यावर झालेली चर्चा आठवली. मरणासन्न मुलाला थोडे पाणी / अन्न देण्याऐवजी त्याचा फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्याची हाव असणे चांगले का, अशी काहीशी ती चर्चा होती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/01/2009 - 19:52 नवीन

बाप रे...

ह्या फोटो बद्दल थोडे गूगलवले. धक्कादायक माहिती कळली. केविन कार्टर नावाच्या पत्रकाराने हा फोटो काढला आणि नंतर हे दृश्य सहन न झाल्याने २ महिन्यांनी आत्महत्या केली. :( http://realchoice.blogspot.com/2008/09/vultures.html बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
च
चित्रा गुरुवार, 01/01/2009 - 20:16 नवीन

भयंकर

लेख आवडला, पण या छायाचित्राने एका भागातील वास्तवाची जाणीव करून दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रदीप गुरुवार, 01/01/2009 - 21:18 नवीन

असेच

मीही हा फोटो पाहिला होता, पण हेही त्याचबरोबर वाचलेले आठवते की त्या फोटोग्राफरने फोटो काढल्यावर गिधाड हुसकावून लावले आणि मुलाला सुरक्षित स्थानी हलवले. कदाचित माझा काहीतरी गोंधळ होत असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
च
चतुरंग गुरुवार, 01/01/2009 - 22:14 नवीन

आफ्रिका!

आत्मकथनाच्या धाग्यांची रेशमी वीण असलेला तुझा लेख सुंदरच झालाय. आफ्रिकेत जायची इच्छा आणखीनच प्रबळ झालीये. (काय योगायोग आहे बघ बिपिनदा! कालच माझ्या एका मित्राला नवीन वर्षानिमित्त शुभेच्छांचा फोन केला आणि त्याच्या बायकोने सांगितले की तो कैरोला गेलाय आणि आजच निघालाय परतीच्या प्रवासाला, त्यावेळी मला पिरॅमिड्स, ईजिप्त आणि त्यामुळे एकूणच आफ्रिका प्रकर्षाने बघायची इच्छा झाली आणि आज बघतो तर तुझा हा लेख!) चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 01/01/2009 - 23:00 नवीन

लेख आवडला.

मुद्देसूद झालाय. अगदी लहानपणापासून असलेली इच्छा आणि खरच तिथे जाण्यापर्यंतचा प्रवास छान लिहिला आहे. (खरंतर आपल्या मनानं प्रवासाला लहानपणापासूनच सुरूवात केली होती असं वाटलं.) रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/02/2009 - 00:03 नवीन

अतिशय मुद्देसूद आणि ओघवता लेख.

लहानपणापासून आलेले आफ्रिका या नावाशी संबंध.. आणि नंतर प्रत्यक्षात पाहिलेली आफ्रिका.. मस्तच लिहिले आहेस. खासक्रून विमान प्रवास वर्णन एकदम खास. माझे बाबा एक वर्ष होते आफ्रिकेमध्ये. टांझानिया मध्ये होते. एक एक अनुभव मस्त होते बाबांनी सांगितलेले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 01/02/2009 - 08:26 नवीन

+१

लेख आवडेच ..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 01/02/2009 - 08:35 नवीन

मस्त

खुप आवडले. बाहेर शिकून परत मायदेशी येणारे किती तरी लोक मी पाहिले आहेत. हे विशेष वाटले
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Fri, 01/02/2009 - 11:09 नवीन

खूप

खूप छान...! नकाशापासून प्रत्यक्षापर्यंत पोहोचायची ष्टाईल लै भारी...! पण.. अजून डिट्टेल मध्ये आफ्रिका फिरवून आणा की... -झेल्या
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sat, 01/03/2009 - 07:16 नवीन

हेच...

लेखाचा विषय आणि मांडणी सगळेच आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेल्या
स
सुरेख Fri, 01/02/2009 - 19:55 नवीन

नाईजेरीया

नाईजेरीया येथे एक हवा आहे Financial Controller स्म्पर्क करा: nach_sam@yahoo.com. पश्चिम आफ्रिकेसंबंधी काही विशिष्ट माहिती हवी आहे का, चिन्य बद्द्ल लिहिलेले बरोबर आहे, आपले भारतीय बहुतांशी चित्रपटाबद्दल चर्चा करण्यात अधिक उत्सूक असलेले आढळ्ले. चिन्य बद्द्ल चुकले आहे, क्षमस्व. तसे पाहिले तर आफ्रिका फार सुंदर ही आहे आणि गरीब ही. पण चिक्कार अंतर्गत व न वापरलेली क्षमता असलेली. भारताविषयी त्यांना फार आपुलकी आहे. पूर्व आणि पश्चिम प्रदेशात फार फरक आहे. पण त्यांची गावे आणि शहरे ( गावे विशेष करून ) म्हणजे मी पाहिलेली तरी आपल्यापेक्षा अधिक नेटकी आहेत, कारण तिथे परका टोळीवाला किंवा पर प्रांताताला कोणी जाऊन सहजा सहजी अनावश्यक ढवळाढवळ करू शकत नाही; मारला जाईल. इथे बरीच क्षेत्रे अविकसित आहेत, आणि त्यात फार प्रगती होऊ शकेल असे आहे असे चित्र दिसत आहे. हुशार लोकांना इथे चांगला वाव आहे, विशेष करून तांत्रिकी क्षेत्रात.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sat, 01/03/2009 - 00:09 नवीन

Circle of life

बिपिन, आफ्रिकेबद्दल मस्त लेख रे मित्रा.... 'आफ्रिका' म्हटलं की मला हमखास आठवतं ते म्हणजे 'लायन किंग' ह्या नितांत सुंदर ऍनिमेशनपटातले 'circle of life' गाणं (इतक्या सुरेख चित्रपटाला 'कार्टून' म्हणवत नाही !!) ह्या गाण्यातला सूर्योदय आहे ना तो तर खल्लासच आहे एकदम.... आणि हे गाणं जेव्हा प्रत्यक्षात साकार झालेलं ब्रॉड वे शो मधे पाहिले तेव्हा तर पार वेडाच झालो होतो :) गाण्याचा 'तू नळी' दुवा इथे देत आहेच. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 01/03/2009 - 00:26 नवीन

मस्तच...

अरे मस्तच क्लिप रे. हा सिनेमा एक बघायचा राहूनच गेलाय बघ. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
स
संदीप चित्रे Sat, 01/03/2009 - 02:03 नवीन

जरूर बघ

लहान मुलांना तर खूप आवडतोच पण मोठेही आवडीनं बघतात. बरं.. कथा म्हणशील तर एकदम थेट ७०/८० च्या दशकातल्या मसाला हिंदी सिनेमासारखी... म्हणजे दुष्ट काका वगैरे असं !! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चतुरंग Sat, 01/03/2009 - 04:59 नवीन

अतिशय सुंदर गाणे!

आत्ताच बघितले रे संदीप. हा सिनेमा मात्र राहून गेलाय आता नक्की बघणार पण. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
श
शशिधर केळकर Sun, 01/04/2009 - 21:48 नवीन

आफ्रिका

बिपिन भौ सुंदर लेख. थोडक्यात पण बरीच माहिती आहे यात. मी स्वतः सध्या टांझानिया मधे आहे. इथले काळे लोक नायजेरिया किंवा केनिया पेक्षा जरासे मवाळ आहेत. लहान पणापासून आफ्रिकेचे आकर्षण अशा तर्‍हेने प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे हा योग ही फार विलक्षण आहे. लिहित राहा. छान चालू आहे!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/05/2009 - 15:07 नवीन

बिपिनराव...

बिपिनराव, मला वाटतं डिसेंबरच्या १५-१६ तारखेस मी शारजात आलो होतो तेंव्हाही आपण आफ्रिकेच्या सफरीवर निघाला होता, त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही. असो. वरील लेख सुंदरच आहे. त्यात थोडी छायाचित्रांची रांगोळी असती तर अजून मजा आली असती. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा