हॉटेलात गाण्याच्या भेंड्याबिंड्या खेळून बोअर मारू नका! त्यापेक्षा मिसळ खा आणि आपापल्या घरी जा! त्या तात्याला नाही धंदा, म्हणून त्याने हे हॉटेल चालू केलंनीत! दुसरं काय? ;)
अवांतर - ए पोर्या फडका मार आणि एक कडक मिसळ घेऊन ये तर्री मारून! पावपण दे. पंखा चालू कर, आणि जरा तो पेपर दे वाचायला बघू!
राजीव भिडे.
अहो प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती का? ह्या अंताक्षरी खेळणार्या लोकांनी मिसळपावची ऑर्डर दिली आहे. ती यायला लय वेळ लागत आहे. म्हणुन बसले आहेत सगळे खेळत. काय?
- संताजी धनाजी
कुडता लालेलाल,त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल,त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवीत आला टांगेवाला !! हे गीत आम्हाला म्हणायचे होते आता आम्ही नाय खेळणार जा !
या गो दांड्यावरनं बोलतोय नवरा कुणाच येतो
त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक
त्यांनी नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या
पुढचं आठवतंय का कोणाला
नाही तर य घ्या.
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी
माफ करा सगळं गाणं देतोय. पण सर्ज्या चित्रपटातले हे खूप छान गाणे असल्यामुळे देत आहे.
"न" वरुन
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंझला रे
काला काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी मीच देते टाळी
फुलव पिसारा नाच
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच..
च घ्या च..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
चम चम करता है ये नशीला बदन
हय हय हय हय
करना चाहे हर कोई मुझसे मिलन
हय हय हय हय
मदभरे ये होट गुलाबी
करले अपनी रात शराबी
बेताबी है मनमे है मिठी चुभन
हय हय हय हय
मराठी चित्रपटः अगंबाई अरेच्चा मधील गाणे.
म्हणजे मराठीच! नाही का?
चल रे वाघ्या बीगी बीगी वाट कुणाची पाहू नको
दुनिया सारी जरी पलटली वाट कुणाची पाहू नको
माझा वाघ्या ! माझ्या वाघ्या !
( दादा कोंडके च्या पीच्चरमधलं झोकदार गाण हाये)
रात्रीस खेळ चाले
या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही
हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू
रवितेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा
अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी
हा दूत चांदण्यांचा
आभास सावली हा
असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते
असती नितांत भास
हसतात सावलीला
हा दोष आंधळयांचा
या साजीर्या क्षणाला
का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका
उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या
या धुंद जीवनाचा
हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
तेजी दिशा गेल्या आटून
कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे
ही वाट दूर जाते स्वप्नामधिल गावा
माझ्या मनांतला का तेथे असेल रावा
जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा
घे साउली उन्हाळा कवळून बाहुपाशी
लागून ओढ वेडी खग येती कोटरासी
एकेक चांदणीने नभदीप पाजळावा
स्वप्नामधिल गांवा स्वप्नामधून जावे
स्वप्नांतल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
स्वप्नांतल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा
वा घ्या वा.. डोक्यातल्या नव्हे.. :-))
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
प्रतिक्रिया