✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सगळ्याना ओपन चॅलेंज........र ला ट न जुळवता चारोळी

व — विजुभाऊ, Fri, 03/14/2008 - 12:15

प्रतिक्रिया द्या
31066 वाचन

💬 प्रतिसाद (86)
च
चतुरंग Fri, 03/14/2008 - 23:30 नवीन

डांबिसकाका,

वरील चारोळीत आम्हाला गनिमी'काव्या'चा संशय मात्र आला!!:)) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Sat, 03/15/2008 - 04:12 नवीन

तुमच्या लक्षात आल्याबद्दल शाबासकी!

अहो मला काव्य म्हणायचं होतं! :)))) मराठी भाषा कशी समृद्ध आहे नाही! योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरले गेले तर काय काय काड्या करता येतात!! :)) खट्याळ, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विजुभाऊ Sat, 03/15/2008 - 11:52 नवीन

कालचा पाउस

कालचा पाउस आमच्या गावी आलाच नाही सदरहु आम्ही पीक आसवांवर काढले आहे. ( ही कविता मला १२ वी ला होती.कवी माहीत नाही)
  • Log in or register to post comments
स
सचिन Sat, 03/15/2008 - 16:55 नवीन

कालचा पाऊस

विजुभाऊ, कवी होते "यशवन्त मनोहर". संपूर्ण कविता येणेप्रमाणे : कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे कालपर्यन्त पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत झाडे करपली, माथी हरपली नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
र
रामदास Fri, 10/17/2008 - 21:19 नवीन

ही कविता मला १२ वी ला होती.कवी माहीत नाही)

या पुस्तकाला प्रस्तावना पुलंची होती.कवि श्याम मनोहर(??????)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Sat, 03/15/2008 - 11:55 नवीन

इथे भेटलास

इथे भेटलास वर भेटू नको.... प्राजु मस्त..... देता प्रतिसाद मला तुम्ही ; ......साद आली घरुन मेल्या लौकर ये......... सैपाक कोण करणार ..............बिचारा सैपाकी विजुभाऊ
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 03/15/2008 - 13:00 नवीन

मला टोचता

मला टोचता खडे... तुझ्या डोळा पाणी हा देश परका झाला पोरका झालो मी.......
  • Log in or register to post comments
स
स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला) Sat, 03/15/2008 - 13:45 नवीन

सुट्टी

सुट्टी च्या दीवशी, अन्घोळीला पण सुट्टी, काराण अन्घोळ केली की, कपडे ही धुवावे लगतात. आपला, स्वयंभू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/15/2008 - 15:21 नवीन

ही घ्या चारोळी!

तात्या मरतो अनुष्कावर तिच्यावर आहे जीव असेल मोठी ती हिरॉईन तर घरची तिच्या! विजुभाऊ, ह्या घ्या रे चार ओळी! लिहिल्या की नाही तत् माताय?! :) अवांतर - "यमकवाल्या किंवा 'र' ला 'ट' जुळवणार्‍या चारोळ्या" असं मी मुद्दामून म्हटलं होतं. र ला ट कोडल्याशिवाय किंवा यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं! मध्यंतरी उगाच पाडायच्या म्हणून पाडायच्या, या हेतूने मिपावर जे चारोळ्यांचं पीक आलं होतं त्यामुळे आपण तर साला पार हैराण झालो होतो. छ्या! त्यातील काहीकाही चारोळ्या एकापेक्षा एक फालतू अन् पाडायच्या म्हणून पाडलेल्या बेमतलब चारोळ्या होत्या! नुसत्या र ला ट जुळवलेल्या गोड नी गुडीगुडी प्रेम मुतणार्‍या! :) साला मिपाला काही ष्टँडर्ड आहे की नाही असंच त्या चारोळ्या वाचून एखाद्या मिपाबाहेरच्या परक्या माणसाला वाटलं असतं! बाय द वे, तात्या विन्चू या नांवाने वावतणारा प्राणी मी नाही! तो मी नव्हेच.. ! आपला, (अनुष्काचा प्रेमीपागल) तात्या.
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Sat, 03/15/2008 - 15:58 नवीन

र ला ट

पुण्यातल्या टरॅफिकमंदी फलक लावा स्मारट हितचिंतक म्हणाले आता ट्र र्ट बाद शरबुद्दीन जॉन फुलपुडीकर वाडीतील सर्व ख्रिश्वन, मुस्लिम, हिंदू बांधवांना गुड शुक्रवार, होली होळी आणि पवित्र ईदच्या हाद्रीक शुभेच्छा! शुभेच्छूक - तळहात, पंकज, तीरकमठा, घड्याळ, गजराज इ . इ. पक्षांचे निष्ठावान नगरसेवक (आजी, माजी, भावी)
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 03/15/2008 - 17:37 नवीन

सुरेल गीत

एरवी यमक जुळवायचं जुळवायचं म्हटल तरी जुळता जुळत नाही आणि आता ते जुळवायच नाही म्हटल की आपोआप शब्द सुचत होते आणि यमक जुळून जात होते. प्रयत्नपुर्वक टाळावे लागले. मी केलेला प्रयत्न--- तुझ्या न माझ्या जु ळल्या तारा, म्हणूनी हे जिवन सुरेल न संगीत.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/17/2008 - 16:10 नवीन

काही सुंदर रांगोळ्याही...........

यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं! तात्या खरे आहे....कविता लिहिणे तेही लोकाना आवडणार्‍या हे अवघड असते.यमकाशिवाय लिहिणे तर त्य्यहुन अवघड असते... नुसते लिहिणे दोन/चार ओळी खरडणे म्हणजए काव्य नव्हे या एक्ससाइझ मधुन काही खरेच चांगले प्रयत्न ही झाले सगळ्या चारोळ्या काही फक्त आरोळ्या नव्हत्या.........काही सुंदर रांगोळ्याही होत्या.. यमकामुळे एक प्रकरचा ताल्(र्हिदम) मिळतो.....पण अर्थ हा कवितेचा प्राण असतो र ल ट जोडण्याचा खेळ सुरु होता तेंव्हा मी सदस्य नव्हतो पण या थ्रेड वर्च्या काही कविता खरेच चांग्ल्या होत्या सगळ्याच काही प्रेम ठिबकवणार्‍या नव्हत्या....वात्रट , धमाल , वास्तविक , प्रामाणीक अशा सर्व प्रकरच्या कविता होत्या दोस्तानो....या खेळात मला मजा आली. कविता रचताना मी माझा राहीलो नाही कविता वाचतानाही मी माझा राहीलो नाही एक धागा गीत माझे मला तुला गुंफणारे.............. मी आता कशास चिंता करु.... तू सवे असताना स्वप्नांच्या मागे कशास लागू... मी स्वप्न माझे जगताना.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/17/2008 - 12:04 नवीन

माझीच सावली झाली

या इथे या सांजवेळी सूर्य मावळताना आकाशी माझीच सावली झाली माझ्याहून खूप मोठी
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/17/2008 - 14:27 नवीन

चॅलेंज घेणारे संपले का सगळे?

चॅलेंज घेणारे संपले का सगळे? धमाल्या थकलास का रे बाळ? हरला असे डीक्लेर करा............... तात्या सुधा विचार करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन दमले हुशशश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श....... असे असेल तर आपण धागा विसर्जीत करूया...........
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Mon, 03/17/2008 - 15:43 नवीन

अर्थपूर्ण असणारी पण तसे प्रथम दर्शनी ना वाटणारी एक "हायकू"

भारताची लोकसन्ख्या ....नारळाच्या झाडावर ....आणि, पण, परन्तु.....
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/17/2008 - 16:16 नवीन

आता बाआआआआआआआआआआआस

शब्दा ला शब्द जोडीले त्यांते काव्य म्हणीतले ऐशा उक्तीने ;गंज चढला उक्तितें वेळ जाय बुडोनी फक्त्; सांगे विजुभाऊ
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/17/2008 - 17:04 नवीन

त्रिवेणीच्या निमित्ताने

त्रिवेणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आस्वाद घेउयात या चारोळ्यांचा
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 10/17/2008 - 22:43 नवीन

ही चालेल

ही चालेल का विजूभाऊ? नातं उमलावं सुगंधी, ज्याला समर्पणाची जोड, मनी रुजावी कृष्णाच्या, प्रिय सखी राधेची ओढ...
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Sat, 10/18/2008 - 11:31 नवीन

माझा प्रयत्न

ते भिरभिरणारे सुंदर मनोहर अन मखमली गुलाबाच्या रोपावरचे फुलपाख्ररु..........!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 10/18/2008 - 18:02 नवीन

ज्याला

ज्याला त्याला आपले घर असते येणार्‍याचे स्वागत करणारे दार असते ......................यापुढच्या दोन ओळी कोणी ल्हिणार का?
  • Log in or register to post comments
क
कहर Fri, 04/24/2015 - 17:13 नवीन

सगळे प्रतिसाद नि चारोळ्या

सगळे प्रतिसाद नि चारोळ्या वाचून कॉमेडी एक्स्प्रेस चे 'नवकविता' फेम कवी महाशय (सतीश तावडे ) आणि 'एकेदिवशी काय जाहले' फेम इन्स्पेक्टर(कमलाकर सातपुते ) यांची आठवण झाली Challenge accepted बुडलो तेव्हा नव्हते डोक्यावर आकाश खाली नव्हते पाणी कसे असेल विचारात बुडल्यावर ? :) :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 04/24/2015 - 17:17 नवीन

हायला काय धागा आहे हा :)

हायला काय धागा आहे हा :)
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 06/30/2015 - 14:05 नवीन

माझा हि एक प्रयत्न! :)

पाहताच एकमेकां थोडी चलबिचल झाली सावरताच पुन्हा ती मी अनोखळी निघालो…
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 06/30/2015 - 14:16 नवीन

ससा म्हणाला सिंव्हाला

ससा म्हणाला सिंव्हाला मी तुला घाबरत नाही सिंह म्हणाला अच्छा? ये ना मग जवळ ये
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/01/2015 - 16:25 नवीन

ससा म्हणाला सिंव्हाला

ससा म्हणाला सिंव्हाला मी तुला घाबरत नाही सिंह म्हणाला अच्छा? ये ना मग जवळ ये =============== Image removed. =============== भानावर येण्यापूर्वी पावसात जळाया लागलो नंगा नाचेन मी एक दिवस पाऊस पडून गेल्यावर ... =================== Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
म
मूकवाचक Tue, 06/30/2015 - 14:21 नवीन

हम्म

भानावर येण्यापूर्वी पावसात जळाया लागलो नंगा नाचेन मी एक दिवस पाऊस पडून गेल्यावर ...
  • Log in or register to post comments
क
कहर Tue, 06/30/2015 - 15:24 नवीन

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
ब
बॅटमॅन Tue, 06/30/2015 - 14:53 नवीन

तुझ्यासाठी मी पाडलेल्या

तुझ्यासाठी मी पाडलेल्या जिल्ब्या जपून ठेवीन.... तू ये, तुला फुकट देईन...
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 06/30/2015 - 15:01 नवीन

=))

=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/01/2015 - 16:29 नवीन

हलकट खाटुक!

हलकट खाटुक! Image removed. -------------------------- अग्निबंदुकात्रुप्त-भाजक्ब्याटुकमॅन Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
त
तुडतुडी Wed, 07/01/2015 - 16:04 नवीन

घर असावे घरासारखे

घर असावे घरासारखे नकोत नुसती नाती ! तिथे असावी जाळ्या जळमटे नको स्वच्छता नुसती
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 07/01/2015 - 16:17 नवीन

फेल !

ती - ती जुळलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
त
तुडतुडी Wed, 07/01/2015 - 16:46 नवीन

पण र ला टनाही जुळला ना :-)

पण र ला टनाही जुळला ना :-)
  • Log in or register to post comments
ग
गरजू पाटिल. Wed, 07/01/2015 - 16:52 नवीन

......डोहात..

......डोहात.. पाण्यावरचा तवंग फोफावत जाणारा .... भला मोठ्ठा मिठाचा खडा ... नावेत बसलेला मी ..... आणि ती नसलेला माझा शेजार... श्रीमंत गरजू पाटिल. (धाकले) प प पाटलाचा. श श ती शेजारीण. ड ड त्या डोहात, डुबुक.... डुबुक.....
  • Log in or register to post comments
ग
गरजू पाटिल. Wed, 07/01/2015 - 21:25 नवीन

जुनाट रद्दीची काही पानं...

जुनाट रद्दीची काही पानं... रद्दीवाल्यानं नाकारलेली... पुसट झालेल्या काही ओळी... ..........'तुझीच'.....
  • Log in or register to post comments
ग
गरजू पाटिल. Wed, 07/01/2015 - 21:45 नवीन

माझ्या काही गुढ अगम्य कल्पना.

माझ्या काही गुढ अगम्य कल्पना..... तीची केविलवाणी दु:ख..... गरुड कि रेडा...... सताड उघडे डोळे......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा