✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

असह्य हा उकाडा...

ब
बाप्पू यांनी
Wed, 03/25/2015 - 22:37  ·  लेख
लेख
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न - १ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ? २ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ? ३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ? ४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ? ५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल ६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
40486 वाचन

💬 प्रतिसाद (209)

प्रतिक्रिया

बाकी नंतर बोलूच।

यसवायजी
Wed, 03/25/2015 - 22:50 नवीन
बाकी नंतर बोलूच। पण,फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) हे कसं केलंत ते सांगा. ("दार उघडून" अशी उत्तरें फाट्यावर मारण्यात येतील)
  • Log in or register to post comments

कुठलं एसी आणि कूलर घेवून

पॉइंट ब्लँक
Wed, 03/25/2015 - 22:55 नवीन
कुठलं एसी आणि कूलर घेवून बसलाय. रातच्याला छतावर पाणी शिंपडा, थंड पाण्यानं आंघोळ करा आणि द्या ताणून. आन पाणी कमी असल तर छतावर आंघोळ करून टाका, एका दमात दोन्ही थंड ;)
  • Log in or register to post comments

मी पहिल्या मजल्यावर राहतो

बाप्पू
Wed, 03/25/2015 - 23:27 नवीन
मी पहिल्या मजल्यावर राहतो शेवटच्या नाही.. त्यामुळे छतावर पाणी शिंपडणे, आंघोळ करणे :)) किंवा कुंड्या लावणे शक्य नाहीये :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

(लग्न/ बायका पोरं वगैरे गोष्टीन्चा विचार करून)

यसवायजी
गुरुवार, 03/26/2015 - 21:45 नवीन
छतावर झोपायला जाऊ शकत असाल तर बेष्ट. चैतन्यनगरात रहायचो तेंव्हा असेच करायचो. मस्त वारे असते कात्रज घाटातून येणारे. पहाटे तर थंडी वाजायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

जाड चादर पाण्यामधे भिजवून,

खटपट्या
Wed, 03/25/2015 - 23:13 नवीन
जाड चादर पाण्यामधे भिजवून, पिळून त्याने खिडक्या झाकण्याचा प्रयत्न करा. बाजारात वाळाचे पडदे मिळतात, ते वापरा. तुम्ही एकदम वरच्या माळ्यावर राहात असाल तर छतावर कुंड्या ठेवुन त्यात झाडे लावा (पाणि देताना सावधान. छत गळके असल्यास त्रास होईल.) बाकी एसी, कुलर साठी मान्यवरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

?

आजानुकर्ण
Wed, 03/25/2015 - 23:15 नवीन
८-१० सेल्सिअस
पत्र्याचे वगैरे छत आहे काय? कौलारू घर असेल तर घराच्या आत प्लायवूड वा तत्सम सीलिंग केले तर उन्हाचा त्रास थोडा कमी होतो. अर्थात सर्व घराला असे सीलिंग करुन घेणे खर्चिक प्रकार आहे.
  • Log in or register to post comments

नाही हो .

बाप्पू
Wed, 03/25/2015 - 23:31 नवीन
नाही हो . सिमेंट बिल्डिंग मध्येच राहतो. पण बिल्डींग च्या चार हि बाजूला इतर बिल्डींग फार जवळ असल्याने हवा खेळती राहत नाही. आणि घराला फक्त एकाच खिडकी आहे आणि दरवाजा पण अर्थातच एकच आहे. त्यामुळे ताजी हवा येण्याचे हे दोन च मार्ग आहेत. आणि रात्री ते बंद करावे लागतात. खिडकी उघडी ठेवू शकतो पण त्यामुळे जास्त काही फरक नाही पडत .. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

आता ज्या भींतीमधे खिडकी आहे

खटपट्या
गुरुवार, 03/26/2015 - 01:00 नवीन
आता ज्या भींतीमधे खिडकी आहे त्याच्या समोरच्या भिंतीला खिडकी करुन घ्या, शक्य असल्यास. हवा खेळाती राहील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

डोंबिवलीला राहता का? नाही

टीपीके
गुरुवार, 03/26/2015 - 02:39 नवीन
डोंबिवलीला राहता का? नाही म्हणजे 'बिल्डींग च्या चार हि बाजूला इतर बिल्डींग फार जवळ असल्याने' म्हणता म्हणून विचारले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

नाही हो .. पुण्यात राहतो..

बाप्पू
गुरुवार, 03/26/2015 - 19:35 नवीन
नाही हो .. पुण्यात राहतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

घर कुठे आहे

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/26/2015 - 19:38 नवीन
तुम्ही लिहिलेल्या वर्णनावरून तुमचे घर धनकवडी, बालाजीनगर भागात असण्याची शक्यता वाटते. कुठलेही नियम न पाळता एकमेकांच्या अत्यंत जवळ इमारती बांधल्या आहेत तिथे. अनेक इमारतींमध्ये शिरतानाच एकदम कोंदट वास येतो. बर्‍याच इमारतींच्या बहुतांश भागाला उन कधीच मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

उत्सुकता आहे

श्रीरंग_जोशी
Wed, 04/01/2015 - 18:43 नवीन
या उत्तराची उत्सुकता आहे... :-) किंवा खाजगी प्रश्न वाटत असल्यास त्यामुळे उत्तर देत नाही असे तरी लिहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

पंत, बाप्पूंनी उगा पिल्लू

सूड
Wed, 04/01/2015 - 18:59 नवीन
पंत, बाप्पूंनी उगा पिल्लू सोडलेलं दिसतंय पुण्याचं!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अहो हा माझा पहिलाच शतकी धागा

बाप्पू
Wed, 04/01/2015 - 20:18 नवीन
अहो हा माझा पहिलाच शतकी धागा झाल्यामुळे बर्याच प्रतिसादांना मी उत्तर नाही देऊ शकलो exact बालाजीनगर किंवा धनकवडी मध्ये नाही राहत. पण तेहून जवळच असलेल्या कात्रज मध्ये राहतो. इथे पण काही भागात हीच परिस्थिती आहे. पण आपण म्हणल्याप्रमाणे बालाजीनगर धनकवडी परिसरात अश्या असंख्य इमारती आहेत जिथे हवा आणि सूर्यप्रकाश अपवादानेच येतो हे मी पाहिलेले आहे . मी राहतो तिथे देखील अशीच परिस्थिती आहे. पण त्यांच्या इतकी भीषण नाही. आणि पहिल्या मजल्यावर राहत असल्याने मला इतका त्रास होत नाही. पण बालाजीनगर धनकवडीमधील लोकांचा विचार केला कि अंगावर काटा येतो. खरच अशक्य आहे. कोंबड्यांची खुराडी च जणू ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Wed, 04/01/2015 - 20:18 नवीन
हरकत नाही. मी स्वतः ६ महिने पुण्याईनगर मध्ये राहिलोय मित्रांबरोबर शेअरींगमध्ये. नंतर पद्मावतीमध्ये राहू लागलो तेव्हा खूप बरे वाटत असे. भारती विद्यापीठाच्या मागे अन पिआयसिटीच्या बाजूलाही भाड्याचे घर शोधण्याचा प्रयत्न केला होता पण तो भाग राहायला म्हणून अजिबात आवडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

मला बालाजीनगर मध्ये २ दिवस

बाप्पू
Wed, 04/01/2015 - 20:36 नवीन
मला बालाजीनगर मध्ये २ दिवस राहण्याचा अनुभव आहे, कॉट बेसिस वर एका होस्टेल मध्ये राहत होतो. परंतु तेथील वेगवेगळ्या अडचणींमुळे २ च दिवसात थेथून पळ काढला., ६००० रुपये दिले होते दोन महिन्यांचे भाडे व दिपोसिट म्हणून. त्यावर पाणी सोडून जावे लागले. तेथून मुक्काम हलवला तो आंबेगाव ला काकांकडे. पण ते दोन दिवस अत्यंत भयाण होते. त्या अनुभवावर एक लेख लिहिवा असे मनात आलेय.. लवकरच वाचायला मिळेल आपणा सर्वांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हाहाहा

कपिलमुनी
Mon, 04/06/2015 - 14:13 नवीन
३ वर्षे काढली आहेत भारतीला .. भयाण अनुभव एंजॉय करायचे ओ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

हायला. मी पण. डिप्लोमा तिकडुन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 14:35 नवीन
हायला. मी पण. डिप्लोमा तिकडुन केला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

डिप्लोमा

कपिलमुनी
Mon, 04/06/2015 - 14:42 नवीन
मी पण डिप्लोमालाच होतो १९९९-२००० ते २००३ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यनि करतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 14:47 नवीन
व्यनि करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कात्रज गावठानात जाम दाटीवाटी

ग्रेटथिंकर
Mon, 04/06/2015 - 17:27 नवीन
कात्रज गावठानात जाम दाटीवाटी झाली आहे.गेलाबाजार लवासात एखादे घर घेऊन टाका असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

साहेबांकडुन ५०% डिस्काउंट

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 17:54 नवीन
साहेबांकडुन ५०% डिस्काउंट साठी वशिला लावाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर

:-)

श्रीरंग_जोशी
Mon, 04/06/2015 - 17:56 नवीन
उरलेले ५०% तुम्ही गुंतवू शकताय म्हणजे तुम्ही मोठी असामी दिसताय ;-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नै ओ. तुमच्यासाठीच बघत होतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 17:58 नवीन
नै ओ. तुमच्यासाठीच बघत होतो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:-(

श्रीरंग_जोशी
Mon, 04/06/2015 - 18:04 नवीन
थट्टा करताय गरिबाची. पाटील इस्टेटमध्ये झोपडीपण परवडणार नाही गरिबाला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्वॉर्र्र्र्र!!! ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 18:10 नवीन
ब्वॉर्र्र्र्र!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सुट्टे पैसे बाळगणे न

बॅटमॅन
Fri, 04/10/2015 - 18:30 नवीन
सुट्टे पैसे बाळगणे न परवडल्यामुळे १०००/- च्या नोटाच फक्त घेऊन फिरणार्‍यांची आठवण झाली. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

द्विरुक्ती

श्रीरंग_जोशी
Mon, 04/06/2015 - 18:43 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

फुलफॉर्म काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 18:49 नवीन
फुलफॉर्म काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

प्रकाटाआ

श्रीरंग_जोशी
Mon, 04/06/2015 - 18:51 नवीन
प्रकाटाआ - प्रतिक्रिया काढून टाकली आहे. स्वसंपादन परतल्यामुळे पुनर्वापर होऊ शकला :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रकाटाआ

कपिलमुनी
Mon, 04/06/2015 - 18:51 नवीन
प्रतिसाद काढून टाकला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

टीपीके

सतीश कुडतरकर
Fri, 03/27/2015 - 10:46 नवीन
उगीच आमच्या डोंबिवलीला बदनाम करू नका. आम्हाला शेजारांच्या घरात काय 'शिजतंय' हे पाहायाची भारी हौस, म्हणून एकमेकाला खेटून राहतो. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

अहो कोंडून घेतेले....

बाप्पू
Wed, 03/25/2015 - 23:24 नवीन
अहो कोंडून घेतेले म्हणजे आगदी शब्दश: अर्थ घेऊ नका. तर झाले असे कि त्यादिवशी खूप च जास्त गरम होत होते आणि पंखा चालू केल्यानंतर देखील गरम हवा येत असल्यामुळे मी घामाघूम झालो होतो. गार पाणी पिण्यासाठी म्हणून फ्रीज जवळ गेलो आणि हि आयडिया सुचली. त्यावेळी होम मिनिस्टर घरी नव्हत्या, आणि फ्रीज मध्ये देखील काही विशेष समान ठेवलेले नव्हते. मी फ्रीज मधले सगळे ट्रे बाहेर पटापट काढले. फ्रीज मध्ये आता बर्यापैकी रिकामी जागा झाली असल्याने मी थोडा वेळ तिथे बसलो होतो. विचित्र वाटत असले तरी मी तो उकाड्यामुळे वैतागून हा विचित्रपणा केला होता. हे काहीसे असे दिसले असेल चित्र जालावरून साभार . Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

यसवायजी
गुरुवार, 03/26/2015 - 06:32 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

.

सस्नेह
गुरुवार, 03/26/2015 - 09:51 नवीन
+))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

आपल्या धारीष्ट्याला _/\_

असंका
गुरुवार, 03/26/2015 - 19:22 नवीन
आपल्या धारीष्ट्याला _/\_ (मंजे इथे जाहीर रीतीने सांगण्याबद्दल हां...) :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

बरं तुमच्याकडे डीप फ्रिजर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 14:48 नवीन
बरं तुमच्याकडे डीप फ्रिजर नव्हता. नैतर थंडगार कॉफिनसारखं दिसलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

पण कॉफिन तर कॉफीत असतं!! ;)

सूड
Mon, 04/06/2015 - 17:02 नवीन
पण कॉफिन तर कॉफीत असतं!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तु मास्तर हैस काय रे? चुकीची

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 17:53 नवीन
तु मास्तर हैस काय रे? चुकीची माहिती केवढ्या आत्मविश्वासानी सांगतोय्स ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मलाही पंखा सहन होत नाही. हात

रेवती
Wed, 03/25/2015 - 23:28 नवीन
मलाही पंखा सहन होत नाही. हात व पाय असह्य दुखतात याचा अनुभव आहे. त्यातल्यात्यात उपाय म्हणून जरा जास्त पाणी पिऊन, पंखा लावून झोपणे. पांघरुणाशिवाय न झोपणे वगैरे. तुम्ही म्हणताय तो गडगडाटी कूलर खूप जुन्या पद्धतीचा भारतातल्या घरी आहे. तो असण्यापेक्षा नसलेला बरा! पण आता नवीन प्रकारचे कुलर्स असतील ना, ते इतका आवाज करणारे नसतील असे वाटते. माझ्या सासरी एसी ला पर्याय म्हणून जो कुलर घेतला होता त्याचा आवाज बराच कमी येत असे त्यावरून म्हणातिये. शिवाय आमच्या घरातील त्यावेळच्या बाल मंडळींनी पाणी ओतण्याच्या ठिकाणातून पेन, पेन्सिली, स्टिकर्स, मोडक्या खेळन्यांची चाके वगैरे बहुमुल्य प्रकारही त्यावरील ऑन ऑफ च्या स्टिकरसहित आत टाकले होते तरी तो चालू होता. नंतर मग एसी लावून घेतला.
  • Log in or register to post comments

मला सुचलेले उपाय

श्रीरंग_जोशी
Wed, 03/25/2015 - 23:29 नवीन
मला सुचलेले काही उपाय
  • संध्याकाळी गार पाण्याने आंघोळ करा.
  • झोपण्यापूर्वी कांदा फोडून त्याचे बारीक तुकडे तळपायावर घासा (हा पारंपारिक उपाय आहे).
  • गार ताक पिणे हेही लाभदायक ठरू शकते.
यावरून आठवले - या गरमीला काय करावे बॉ?
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....

बाप्पू
गुरुवार, 03/26/2015 - 19:39 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.... सांगितलेले उपाय करून पाहीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

४-५ हजारात चांगले कुलर मिळतात

नांदेडीअन
Wed, 03/25/2015 - 23:41 नवीन
४-५ हजारात चांगले कुलर मिळतात बाजारात. मी वर्षभरापूर्वी बजाज टॉर्क हे कुलर घेतले होते. मस्त आहे, एकदम हलके आणि जास्त आवाज न करणारे. पण कुलरची मागची बाजू खिडकी किंवा बाथरूमच्या दरवाज्याकडे राहील असे बघा, नाहीतर रूममध्ये दमटपणा येतो.
  • Log in or register to post comments

दमटपणा म्हणजे नेमके काय हो..?

बाप्पू
गुरुवार, 03/26/2015 - 19:42 नवीन
दमटपणा म्हणजे नेमके काय हो..?? नेमके काय होते..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

मुंबई किंवा चेन्नइ

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/26/2015 - 19:44 नवीन
मुंबई किंवा चेन्नइ येथे बाहेरचे लोक गेल्यावर त्यांना दमटपणाचा जो अनुभव मिळतो तो शब्दांत वर्णन करता येणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

कलकत्ताही अ‍ॅडवा त्यात.

बॅटमॅन
गुरुवार, 03/26/2015 - 19:51 नवीन
कलकत्ताही अ‍ॅडवा त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

beer

कपिलमुनी
गुरुवार, 03/26/2015 - 00:47 नवीन
drink chilled beer
  • Log in or register to post comments

+१

मोहनराव
गुरुवार, 03/26/2015 - 18:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

या उपायाने नक्की फायदा होईल.

बाप्पू
गुरुवार, 03/26/2015 - 19:49 नवीन
या उपायाने नक्की फायदा होईल. कारण मी जर हा उपाय केला तर मला घराबाहेर च झोपावे लागेल.. आणि बाहेर उकाड्याचा काहीच त्रास होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

beer ने थंडावा येत नाही,

सतीश कुडतरकर
Fri, 03/27/2015 - 10:49 नवीन
beer ने थंडावा येत नाही, उकाड्याचा 'विसर' पडतो. अर्थात प्रमाण थोड वाढवायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा