Skip to main content

फोटो ओळखा.

लेखक खंडेराव यांनी गुरुवार, 05/03/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

वाचने 111167
प्रतिक्रिया 303

प्रतिक्रिया

In reply to by नांदेडीअन

अगदी बरोब्बर काढलात शोधुन हा मारुती. पंजाबमध्ये अम्रुतसरहून कटर्‍याला जाताना हायवेवर गुरुदासपूरच्या पलीकडे उजव्या हाताला लागतो हा मारुती, हे मंदिर रस्त्यापासुन साधारणपणे १५० ते २०० मिटर लांब आहे. अगदी अप्रतिम मुर्ती आहे, जो कोणी ती पाहील तो निदान २ मिनिटे तरी थांबलाच पाहिजे. अगदी पंजाबी ढंगाची भव्यदिव्य मजबूत मुर्ती आहे. प्रत्यक्षात ती फारच छान दिसते. तुम्हाला धन्यवाद.

In reply to by नांदेडीअन

मारुतीच्या अंगाचे कट्स बघून अरनॉल्ड शिवाजीनगर पण घाबरला असता ;)

In reply to by अन्या दातार

आपल्या इथला आकुर्डीचा मारुती माहिती आहे ना रे तुला?

In reply to by अन्या दातार

हो ना! नाकपुडीच्या खालचे कट्स शिवाजीनगरला नाहीयेत!

मारुतीच्या बोटावर कोणता पक्षी बसला आहे ते पण ओळखा. पैजारबुवा,

In reply to by त्रिवेणी

मैनाच आहे ती, हा फोटो अंदाजे १५० ते २०० मिटर इतक्या अंतरावरून घेतल्यामुळे ती तितकीशी स्पष्ट आलेली नाही.

In reply to by खंडेराव

खालील दुवा असावा असा अंदाज आहे. http://i.imgur.com/S1jygh7.jpg उत्तम संकल्पना. संधी मिळाली की मी पण काही फटू टाकीन.

In reply to by असंका

ती जाहिरात आहे, तेथे त्यावेळी चालू असलेल्या प्रदर्शनाची . बांधणीवरून हिमाचलप्रदेश्/लद्दाख्च्या बाजूचं बांधकाम वाटतं. लेह पॅलेस..

In reply to by तुषार काळभोर

:-) मीपण गुगललं होतं...पण उत्तर सांगणं मंजे कॉपी केल्यासारखं वाटत होतं म्हून कायतरी टैम्पास लिवलं...

In reply to by असंका

:) असु द्या हो... @गूगलः जरी बाप सार्‍या जगाचा तरी तू आम्हा लेकरांची सर्च माउली...

क्र. ३ हा दिल्लि मधिल असावा... मेट्रो च्या आसपास पाहिल्या सारखा वटतो....

@ विनोद१८ मला असे वाटतय की फोतो क्र ३ मधला हनुमान पंजाबमधल्या पठाणकोट च्या जवळपास कुठेतरी आहे. पैजारबुवा,

In reply to by श्रीरंग_जोशी

अखिलविश्वाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या विश्वविख्यात ऐतिहासिक पुणे शहरातला सुप्रसिध्द तळ्यातला गणपती असलेल्या सारसबागेजवळचे, सावरकर पुतळ्याच्या पाठीमागे, मित्रमंडळ चौकातुन थोडे पुढे आले की लागणार्‍या मुठा उजव्या कालव्याच्या बाजूला पुणे महानगर पालिकेने विकसीत केलेले नाला पार्क आहे हे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

एकदम बरोबर, पैजारबुवा. पुणे मनपाने केलेल्या सौंदर्यीकरणाला 'नाला' पार्क असे म्हणणे जरा बरोबर वाटत नाही पण चालायचेच.

In reply to by श्रीरंग_जोशी

काय बरोबर ते तरी सांगा मग जोडीला... बागुल उद्यान, सहकारनगर, पुणे ९ (पण सगळं जग त्याला नाला पार्कच म्हणतं. बाकी तीन वर्ष तिथं शेजारी राहून मला नाला पार्क नाय वळखता आली म्हण्जे लानत हाय राव.... )

पश्चिम महाराश्त्रातील किल्ला आहे? पन्हाळगड?

In reply to by खंडेराव

पश्चिम महाराष्ट्रातील किल्ला आहे पण पन्हाळगड नाही.

In reply to by प्रचेतस

२००७ साली मनोगतावरील हा लेख वाचून लगेच मल्हारगडाचा ट्रेक केला होता.

In reply to by श्रीरंग_जोशी

मल्हारगड खूप पूर्वी पाहिला असल्याने अतिशय पुसटसा असा लक्षात होता.

In reply to by प्रचेतस

हे मंजे फार मंजे फारच अति जालं....ते टीवीवाले करतात तसं...सिरीयल बघा आणि आम्ही इंटरवल मध्ये विचारू त्या प्रश्नांची उत्तरे द्या.... :-)) अहो आपल्याच एका धाग्यातल्या आपल्याच एका प्रतिसादातला फोटो आहे हा... लिंक ही देणार होतो..पण शोध्णार्‍यांना शोधू द्या म्हणून देत नै...

In reply to by कपिलमुनी

बरोबर मुनिवर.:) ह्या गुहा अगदी अलिकडच्या काळापर्यंत कुणालाच माहित नव्हत्या. ह्यांना उजेडात आणण्याचे श्रेय दामोदर कोसंबींचे.

In reply to by कपिलमुनी

माझ्यासाठी खूपच सोपं दिलंय. सुरसुंदरी शालभंजिका - गोंदेश्वर मंदिर, सिन्नर :)

मधली ३ ठिकणे आठवतात १ गोराईअच्या टे़कड्या २. बोरीवली नॅशनल पार्क ३. पवई पण असे उत्तर योग्य नाही सो माझा पास !

In reply to by कपिलमुनी

२ क्रमांकाचे उत्तर बरोबर आहे. न्याशनल पार्कातल्या कान्हेरी लेणीसमूहाच्या डोंगरावरुन दिसणाऱ्या बोरीवतील इमारती.

In reply to by प्रचेतस

तरी म्हटलं की वल्ली आणि असा फोटो ??? पण लेण्याचा नसला तरी लेण्यातून घेतलेला फोटो आहे... त्यामुळे माफ आहे ;)