Skip to main content

फोटो ओळखा.

लेखक खंडेराव यांनी गुरुवार, 05/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

वाचने 110944
प्रतिक्रिया 303

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

मला सुद्धा गोवळकोंडाच वाटते.

In reply to by कपिलमुनी

धन्स. ही दोन्ही ठिकाणे पाहिलेली आहेत. सुरुवातीला फोटोतील भाग गोवळकोंड्याच्या बालेकिल्ल्यातील महालासमान वाटला.

परफेक्ट! कुतुबशाही कबर परिसरात १ सोडुन बाकी सर्व कुतुबशहा व कुटुम्बियान्च्या कबरी आहेत.

In reply to by _मनश्री_

शेगाव चे मंदीर ??

याच धाग्यात फोटो आणि त्याची उत्तरं येऊ द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by कपिलमुनी

गुवाहाटीतील ब्रम्हपुत्रेच्या मधे असलेल्या बेटावर असलेले उमानंद मंदीर.. कामाख्या देवीच्या मंदीरापासून जवळच आहे.. गुवाहाटीच्या सर्कीट हाऊसमधून सुंदर दिसतं..

In reply to by चिगो

मस्त जागा आहे. काही दुर्मिळ सोनेरी माकड आहेत या बेटावर

धन्यवाद. तुम्ही कसे केले हे सांगा कधीतरी! ही नदीही प्रसिद्ध आहे अगदी..

In reply to by खंडेराव

नाही. आता आजपुरते थांबा तुम्ही. दुसरा गेस उद्या करा. :P

सहस्त्रकुंडच आहे. नांदेडचा म्हणा हो. खरं तर मराठवाडा (नांदेड) आणि विदर्भाच्या (यवतमाळ) सीमेवर आहे हा धबधबा. पण आमच्यासाठी नांदेडचाच !

नाही

बनेश्वर आहे की :-)

क्र. १ तेथील कार्यालयाचा घुमट व क्र. २ सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वाराचे सोन्याचे तख्त आहे. ......आता हे सांगा ???

क्र. ३ :-

Foto1

क्र. ४ :-

Foto1

In reply to by विनोद१८

हरियाणातल्या मारुतिची शेपटी डोक्यापर्यंत वरती नाहिये.. गुगलने मला जम्मूच्या जवळपास आणून सोडलंय. आणखी शोधावं लागेल.

In reply to by चिगो

हे ठिकाणसुद्धा उत्तर टोकालाच असलेल्या एका मंदिरातील आहे. जेथुन दरवर्षी एक यात्रा निघते. ओळखा पाहु. ??

In reply to by विनोद१८

Hanuman गुगलवर या हनुमानजींच्या दोन फोटो मिळाल्या, पण मंदिर कुठले आहे याची माहिती मिळाली नाही.

In reply to by नांदेडीअन

अगदी बरोब्बर काढलात शोधुन हा मारुती. पंजाबमध्ये अम्रुतसरहून कटर्‍याला जाताना हायवेवर गुरुदासपूरच्या पलीकडे उजव्या हाताला लागतो हा मारुती, हे मंदिर रस्त्यापासुन साधारणपणे १५० ते २०० मिटर लांब आहे. अगदी अप्रतिम मुर्ती आहे, जो कोणी ती पाहील तो निदान २ मिनिटे तरी थांबलाच पाहिजे. अगदी पंजाबी ढंगाची भव्यदिव्य मजबूत मुर्ती आहे. प्रत्यक्षात ती फारच छान दिसते. तुम्हाला धन्यवाद.


मारुतीच्या बोटावर कोणता पक्षी बसला आहे ते पण ओळखा. पैजारबुवा,

1

2

In reply to by त्रिवेणी

मैनाच आहे ती, हा फोटो अंदाजे १५० ते २०० मिटर इतक्या अंतरावरून घेतल्यामुळे ती तितकीशी स्पष्ट आलेली नाही.

In reply to by खंडेराव

खालील दुवा असावा असा अंदाज आहे. http://i.imgur.com/S1jygh7.jpg उत्तम संकल्पना. संधी मिळाली की मी पण काही फटू टाकीन.