✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 09/04/2014 - 14:37  ·  लेख
लेख
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला नुकतीच १७५ वर्षे झाली. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला. मालिकेतील या दुसर्‍या स्पर्धेचा विषय "आनंद" हा आहे. या विषायानुरूप तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे ११ सप्टेंबरपर्यंत प्रत्येकी एक छायाचित्र इथे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे १८ सप्टेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. स्पर्धेचे अन्य नियमः १)प्रत्येकजण फक्त एकच चित्र अपलोड करू शकतो. २)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात. ३)यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात. ४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा. ५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, आदि माहिती चित्रासोबत शक्यतो द्यावी. ६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी. ७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल. ८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील. आणि ही छायाचित्रे मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये वापरण्यात येतील. ९) एकदा सादर केलेले छायाचित्र कोणत्याही कारणासाठी बदलता येणार नाही. १०) मते देताना कृपया 'सेल्फी' देऊ नयेत ही विनंती. स्पर्धक हे मतदार असल्याने टेक्निकली असे करणे चूक नाही. पण इतरांचाही विचार व्हावा. स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! पहिल्या स्पर्धेच्या नियमात बदल म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला फक्त एक छायाचित्र सादर करता येईल. गुण देण्याची पद्धत पहिल्या स्पर्धेप्रमाणेच राहील. पहिल्या स्पर्धेत ज्यांची चित्रे विजेती ठरली नाहीत त्यांनी निराश न होता या स्पर्धेत पुन्हा चांगली छ्याचित्रे सादर करावीत ही विनंती. प्रत्येकाचा आवडता विषय वेगवेगळा असतोच! पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि या तसेच पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
76180 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

उत्तमोत्तम !

वेल्लाभट
Sun, 09/07/2014 - 13:26 नवीन
उत्तमोत्तम फोटोज !

आंबा

असंका
Tue, 09/09/2014 - 09:00 नवीन
Image removed. हातात मिळालेला हा पहिला आंबा! आनंद चेहेर्‍यावर मावतोय का पहा...! (बाकी exif म्हणजे काय ते काय मला माहित नाही. हा पॉइंट आणि शूट कॅमेर्‍यावर काढलेला फोटो आहे. इतर लोकांनी जसं टाकलंय, तशी माहिती properties मध्ये दिसतीये- कॅमेरा- सॅमसंग L730, फोकल लेन्ग्थ-12mm, एक्स्पोजर-1/60, f number- f/4.2, ISO - ISO100)

हेहेहे!

पैसा
Tue, 09/09/2014 - 09:05 नवीन
असा आनंद आपल्याला पण व्यक्त करता आला असता तर!
↩ प्रतिसाद: असंका

मsssस्त ! भन्नाट आहेत छ्कुली,

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/09/2014 - 09:10 नवीन
मsssस्त ! भन्नाट आहेत छ्कुली, तिचा आनंद आणि फोटो !
↩ प्रतिसाद: असंका

आनंदी आनंद चहूकडे.

कंजूस
Tue, 09/09/2014 - 13:14 नवीन
आनंदी आनंद चहूकडे.

विक्रमार्क

प्रसाद गोडबोले
Wed, 09/10/2014 - 10:47 नवीन
विक्रमार्क Image removed. Date Apr 16, 2014, 5:28:28 AM Width 2560 Height 1920 File Size 430993 Camera Lenovo Model Lenovo A3000-H ISO 60 Exposure 1/30 sec Aperture 2.8 Focal Length 35mm Flash Used false Orientation 1 White Balance 0 Metering Mode 2 Exposure Program 0 Exposure Bias 0.0 Date and Time (Original) 2014:04:16 12:28:28 Color Space 1 X-Resolution 72.0 Y-Resolution 72.0 Resolution Unit 2 Software Lenovo Date and Time 2014:04:16 12:28:28 YCbCr Positioning 2 Date and Time (Digitized) 2014:04:16 12:28:28 Light Source 255 Exposure Mode 0 Digital Zoom Ratio 1.0 Scene Capture Type 0 Interoperability Index R98

स्पर्धेसाठी नाही ...

प्रसाद गोडबोले
Wed, 09/10/2014 - 11:04 नवीन
आनंद ... तुकाराम समजुन घेतानाचा वृक्षवल्ली आम्हा सोयरी | वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती | येणे सुखे होय एकांताचा वास | नाही गुण दोष अंगा येत | आकाश मंडप पृथिवी आसन | रमे जेथे मन क्रिडा करी | कथा कमंडलु देह उपचारा | जाणवितो वारा अवसरु | तुका म्हणे होय मनाशी संवाद | आपुलाचि वाद आपणासी || पांडुरंग || पांडुरंग || पांडुरंग || Image removed.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आमचा सातारा !!!! लै भारी!!

आनन्दिता
गुरुवार, 09/11/2014 - 04:09 नवीन
आमचा सातारा !!!! लै भारी!! हा " आनंद" अगदी समजु शकते! :)
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अर्णव

प्रशांत
Wed, 09/10/2014 - 11:34 नवीन
अर्णव... Image removed.

एक अपला असाच

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/10/2014 - 13:50 नवीन
Image removed.

इमेज

सह्यमित्र
Wed, 09/10/2014 - 15:26 नवीन
इमेज कशी टाकतात हो?

आई ग्गं

सविता००१
Wed, 09/10/2014 - 15:40 नवीन
सगळेच फोटो भारी. अत्यंत सुरेख. पण आपली पसंती छ्कुली च. तिचा आनंद केवळ कहर आलाय आंबा मिळाल्यावर. मी खलास..

सगळ्या लहान मुलांचे फोटू

रेवती
Wed, 09/10/2014 - 17:16 नवीन
सगळ्या लहान मुलांचे फोटू अत्यंत गोड आलेत. तीट लावून फोटू चढवा आता!

सुट्टी !!

सह्यमित्र
Wed, 09/10/2014 - 17:18 नवीन
Image removed. वाई जवळील मेणवली येथे ही मुले शूटिंग बघायला आली होती. शूटिंग संपल्या नंतर त्यांनी केलेला हा जल्लोष. EXIF: Nikon D3100 Nikkor f/1.8 G 50mm, at f/2.8 Shutter Interval: 1/200 ISO: 100 WB: Auto Metering : Matrix Adjusted WB & levels in post processing.

धुनकी

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/10/2014 - 23:14 नवीन
Image removed. कॅनन टी३, १८-५५ मिमी, f/4.0, 1/30 sec, ISO 800 जिंपमध्ये किंचित रंग आणि कॉंट्रास्ट बराच वाढवला आहे.

आनंदी युवती

सानिकास्वप्निल
गुरुवार, 09/11/2014 - 00:55 नवीन
ट्युलिपच्या बागेत हसतमुख, आनंदी युवती Image removed. Camera - Canon EOS 550D F-stop - f/5.6 Exposure Time - 1/320sec ISO speed - ISO-320 Focal length - 250mm ह्या फोटोवर कुठलेही पोस्ट प्रोसेसींग केलेले नाही.

कानगोष्टी

इशा१२३
गुरुवार, 09/11/2014 - 08:43 नवीन
Image removed. छोट्यांचा कानगोष्टी करतानाचा आनंद...(कुणी ऐकत तर नाहि ना?)

माझ्याकडून..

चिगो
गुरुवार, 09/11/2014 - 11:51 नवीन
हा फोटो ह्यापुर्वीपण मिपावर कलादालनात टाकला होता.. चालत असल्यास बघा.. Image removed. साभार : बायको ;-)

अहा!

पैसा
गुरुवार, 09/11/2014 - 11:53 नवीन
किती सुंदर! खरे तर आतापर्यंतचे सगळेच फोटो बघून मस्त वाटतंय अगदी!
↩ प्रतिसाद: चिगो

या वेळी निवड इंपॉसिबल होणार!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 09/11/2014 - 12:15 नवीन
काय एकसोएक फोटो टाकतंय पब्लिक. सर्वांच अभिचंदन!!

मस्त

सौंदाळा
गुरुवार, 09/11/2014 - 13:39 नवीन
मस्त वोटींग लाइन्स कल से चालु हो रहा हय, हम हमारे नंबर्स के साथ वोट करनेको तयार हय.

स्पर्धेसाठी नाही

स्पा
गुरुवार, 09/11/2014 - 13:47 नवीन
आनंद : लेकराला खांद्यावर बसून जग दाखवण्याचा Image removed.

अरे, हां आधी टाकायांस काय

सूड
गुरुवार, 09/11/2014 - 14:33 नवीन
अरे, हां आधी टाकायांस काय झाले होतें तुस?
↩ प्रतिसाद: स्पा

हा नंतर टिपला

स्पा
गुरुवार, 09/11/2014 - 14:50 नवीन
हा नंतर टिपला :D
↩ प्रतिसाद: सूड

मला तर आधीचा (फुगे) जास्त

सौंदाळा
गुरुवार, 09/11/2014 - 14:59 नवीन
मला तर आधीचा (फुगे) जास्त आवडला. तो आहेच माझ्या नंबरात.
↩ प्रतिसाद: स्पा

अशी बातमी फोडू नये.

सूड
गुरुवार, 09/11/2014 - 15:13 नवीन
अशी बातमी फोडू नये.
↩ प्रतिसाद: सौंदाळा

:)

किल्लेदार
गुरुवार, 09/11/2014 - 16:38 नवीन
:)
↩ प्रतिसाद: सूड

मला तर आधीचा (फुगे) जास्त

मदनबाण
गुरुवार, 09/11/2014 - 16:50 नवीन
मला तर आधीचा (फुगे) जास्त आवडला. सुंदरच आहे तो फोटो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण
↩ प्रतिसाद: सौंदाळा

सुरेख

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/11/2014 - 21:36 नवीन
फोटो आवडला. पार्श्वभूमीमुळे अधिकच जास्त आवडला. (एक उगाच सूचना - एक चित्र हजार शब्दांचं काम करतं. तुझे फोटोही कल्पक आणि सुरेख असतात. त्याबद्दल फार शब्द खर्च करून चित्राच्या अर्थनिर्णयनावर मर्यादा आणू नयेत असे वाटतं.)
↩ प्रतिसाद: स्पा

हम्म हे लक्षात नव्हतं आलं

स्पा
Sat, 09/13/2014 - 13:08 नवीन
हम्म हे लक्षात नव्हतं आलं ठांकु
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

या दोघांचा ( नवरा आणि मुलगा

आरोही
गुरुवार, 09/11/2014 - 17:20 नवीन
या दोघांचा ( नवरा आणि मुलगा )आनंद असा असा टिपता आलाय हाच माझा आनंदाचा क्षण ... Image removed.

(No subject)

सुहास..
गुरुवार, 09/11/2014 - 21:15 नवीन
Image removed.

मिपा बंद असल्यानं स्पर्धेची मुदत वाढवावी

संजय क्षीरसागर
Sat, 09/13/2014 - 12:46 नवीन
असं सुचवतो.

हो

पैसा
Sat, 09/13/2014 - 12:48 नवीन
आणखी एक दिवस वाढवून देऊ. उद्या दुपारी १२.३० पर्यंत फोटो अपलोड करता येतील.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

स्पर्धकांतर्फे

संजय क्षीरसागर
Sat, 09/13/2014 - 15:47 नवीन
आभार्स!
↩ प्रतिसाद: पैसा

खेळातला आनंद !

मदनबाण
Sat, 09/13/2014 - 20:19 नवीन
Image removed. खरं तर हा फोटो देण्याआधी बराच विचार केला... कारण प्रत्येकाची आनंदाची कारण वेगळी असतात... माझ्या लहानपणा पासुन या फोटोतल्या मुलासारखी अनेक मुलं मी अशीच खेळताना आणि या खेळाचा आनंद घेताना पाहिली आहेत. हा एक पहिला प्रकार आहे,ज्यात एक सायकलचे किंवा असेच एक पूर्ण घासुन तुळतुळीत झालेले,किंवा थोडेबहुत तसेच टायर घेउन दुसर्‍या हातात काठी घेउन त्याला मारत मारत मागे मागे धावत रहायचे. दुसर्‍या प्रकारात हातात काढी किंवा सळी असते जिला एक तार बांधलेली असते व जिचे शेवटचे टोक जरासे वाकडे केलेले असते... त्यात वाकड्या टोकात एक धातुची गोल रिंग असते ती अडकवुन रस्त्यावर धावत फिरायचे. अत्यंत गरीब असलेल्या आणि पायाने अनवाणी खेळात धावणार्‍या मुलांचा हाच तो त्यांचा आनंदाचा क्षण टिपला आहे.त्यांच्यासाठी हा खेळ हाच त्यांचा आनंद ! कॅमेरा :- निकॉन डी-५१०० *रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mona Re Bombay Vikings

सहजच फोटो काढु का म्हाणालो तर

विलासराव
Sat, 09/13/2014 - 22:14 नवीन
सहजच फोटो काढु का म्हाणालो तर ही मुलगी भलतीच खुश झाली. Image removed. Image removed.

मित्रांसोबत

बोका
Sun, 09/14/2014 - 09:49 नवीन
मित्र, संगणकावर काही गमतीशीर , आणि जोडीला पेयही छान. Image removed. कॅमेरा - फुजी एस ९५००, १/४५ से., f २.८, आयएसओ २00
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा