छान लेख आहे. वाचुन आनन्द मिलाला.
खुप दिवसानि मराथी लेख वाचायला मिलालेत.
बन्गुलुरु मधे राहुन मराथी विसरल्या सारखी होते...
तुमचे लेख वाचुन पुन्हा घरी आल्या सारखे वातते.
धन्यवाद.
तीशीतली दोन पोरांची आई असलेली ओळखीतली बाई, जेव्हा तुम्हाला सर्वांसमोर काका म्हणून बोलावते, तेव्हा तिला काय सांगायचे असते? तुम्ही माझे (वयस्कर) काका, म्हणजे मी आपोआपच तरूण, असे ते व्यस्त गणीत असते.
ही आयडिया लई बाया वापरत्यात. आता काही मान्स वयानी कमी असली तरी अंगाने थोराड दिसत्यात तर काही वयाने जास्त असले तरी अंगाने तरुण दिसतात. प्रथम दर्शनी तुमचा देह च दिसतो ना वय नाही. तारुण्य हातातून निसटायला लागले की माणुस ते धरुन ठेवायचा प्रयत्न करतो. स्त्रियांना तरुण व आकर्षक दिसण्याची मूलतः आवड असते. (अपवाद फारच कमी) स्त्रियांना वय ;) आणि पुरुषाला पगार विचारु नये असे म्हणतात.
शारिरिक वय ,मानसिक वय आणि बौद्धिक वय यातील संतुलन हे फारच मजेशीर असते. वय वाढले म्हणजे अक्कल वाढली असे नव्हे.
(ज्योतिषाचा विषय असला कि वय ७०
आरोग्याचा, कायदा, व्यवहार विषय असला कि ४५ (उद्यापासुन ४६)
मिपावर कुचाळक्या करताना वय २५
भुभु लोकांशी खेळताना वय १०
बायकोकडून गुदगुल्या करुन घेताना वय ५
गाढ झोपल्यावर वय ० असणारा)
There is hidden child in every adult
[जरठकुमार]
प्रकाश घाटपांडे
(ज्योतिषाचा विषय असला कि वय ७०
आरोग्याचा, कायदा, व्यवहार विषय असला कि ४५ (उद्यापासुन ४६)
मिपावर कुचाळक्या करताना वय २५
भुभु लोकांशी खेळताना वय १०
बायकोकडून गुदगुल्या करुन घेताना वय ५
गाढ झोपल्यावर वय ० असणारा)
मध्यमवयीन लोकांना म्हणजे साधारण ४०ते६० च्या दरम्यान असणार्या पुरुषांना 'काका' आणि स्त्रियांना मावशी म्हणवून घ्यायला का संकोच वाटतो हे मला अजूनपर्यंत कळलेले नाही.
मला माझ्यापेक्षा वयाने लहान असलेले लोक जसे काका म्हणतात तसेच माझ्याच वयाचे काही लोकही काका म्हणतात. हे त्यांचे काका म्हणणे मनापासून असो अथवा खोटे('मामा' बनवण्यासाठी) असो मला त्यात काहिच वावगे वाटते नाही. माझ्या दृष्टीने काका हे एक आदरार्थी संबोधन आहे. मध्यमवयीन पुरुषांना काका/मामा आणि स्त्रीयांना काकू/काकी/मावशी वगैरे संबोधनं वापरणं हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे असे मला वाटते.
मात्र हल्ली बर्याच जणांना वय वाढले तरी आपण अजूनही तरूणच(शरीराने) आहोत असेच वाटत असते आणि ते तसे दाखवण्यासाठी केस काळे करणे,सौंदर्यप्रसाधने वापरून चेहरा तुकतुकीत दिसावा म्हणून प्रयत्न करणे अशा लटपटी खटपटी कराव्याश्या वाटतात. तसे करायला हरकत नाही पण वाढलेले वय तर कमी नाही करता येत ना?
ह्यातल्या पुरुषांना विशेष करून तरूण मुलींनी काका आणिस्त्रियांना तरूण मुलांनी मावशी म्हटलेलं खपत नाही. हल्ली स्त्रिया तर चक्क सगळ्यांनी आपल्याला मॅडम म्हणावे अशीच अपेक्षा ठेवतात. मावशी/काकू/काकी/आंटी वगैरे म्हटलेलं चालत नाही.
माझ्या माहीतीतले एक गृहस्थ आहेत की जे गेली जवळ २५ वर्षे आपला पस्तिसावा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना अगदी त्यांच्या मुलीच्याच (जी विवाहीत आहे)वयाच्या एखाद्या मुलीने काका म्हटलेलेही आवडत नाही. आता बोला!
महाजालावरच्या समस्त तरूण पुतण्या/पुतणींचा आवडता/नावडता ५६पावसाळे पचवलेला एकमेव काका
प्रमोदकाका
खुप बरं वाटलं तुमचं मत वाचून...
हल्ली जालावर अगदी तुमच्या उलट मत असणारे "काका" पाहायला मिळतात... त्यांना म्हणे पुतण्यांनी काका म्हणून हाक मारली की त्यांना लाज वाटते...
चालायचंच...
आपला पुतण्या,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
प्रतिक्रिया
अंतर्मुख
वयम मोथम खोतम
स्वीकृती..
ह्म्म..
चांगला लेख
हे बेस्टच!
का? का?
एकमेव?
हाहाहा!
धन्यवाद काका !!!
काका,
खरे
सुरेख लेख
खरंच छान आहे लेख.
लेख आवडला.
छान लेख
समवयस्क
धन्यवाद
लेख सुंदर