केळ्याच्या पूर्या
तर मंडळी झाल काय की सहज फिरायला म्हणुन २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात आलो होतो. आता सहकुटुंब अस बाहेर फिरणं काही सोप्प नसत हो. त्यात मुलबाळं बरोबर. मग अस फिरताना बरोबर थोडी फळ ठेवणं साहजिकच आहे नाहे का? तर ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टला मी अशीच एका सुपर मार्केट मध्ये शिरले. कुठं काय, कुठं काय, घेत घेत, आपल नेहमीचं, "गरिबांच फळ" केळी उचलली. आता केळी घेताना आपण ती कायमच घडाने घेतो ना? निदान डझनावर तरी! तशीच आपली उचलली अन चालले कॅश काउंटरकडे . तिथल्या एका हेल्परने मला मध्येच हटकलं अन विचारल, " हे! बाइंग सो मेनी बनानाज? हॅव यु चेक्ड द प्राइस?" च्यामारी! मी मनातल्या मनात त्याच्या सात पिढ्या उद्धरल्या. भारतिय दिसले म्हणुन काय अगदी केळी खरेदी करायचीपण लायकी नाही की काय? ऑ?
गेले तशीच ठुमकत कॅश काऊटरवर. तर कॅशियरला एऽऽव्हढी केळी बघुन घाम फुटला राव! म्हणतो, " डिअर, दिज बनानाज आर ट्वेल्व्ह डॉलर्स किलो! आर यु शुअर यु स्टिल वाँट टु बाय ?"
आता माझी अवस्था त्या गोष्टीतल्या गरिब ब्राम्हणासारखी झाली. एका ठगाने विचारलं," हे वासरु कुठे घेउन निघालाय?" दुसरा हटकतो, " कुत्रं का खांद्यावर घेतलय?" म्हंटल नक्की भानगड काय?
तर कळलं की ऑस्ट्रेलियाची सुपिक भुमी, म्हणजे ऑस्सी कोकण, पूरग्रस्त झाल्याने तिथेली सारी शेतं वाहुन गेली. अन केळ्याच्या बागा उध्वस्त झाल्याने, केळ्यांचे भाव आभाळाल भिडले आहेत.
म्हणजे हे गरिबांच फळ अगदी श्रीमंतांचेही डोळे पांढरे करायला निघालं होतं. " कालाय तस्मै नमः।"
सहजच मनात आलं, आपल्याकडे नव्या नवरी बरोबर शिदोरी म्हणुन बर्याचदा केळी पाठवली जातात. निदान गावाकडे तरी. बरं झाल पाश्च्यात्त देशात ही "शिदोरीची" भानगड नाही. नाहीतर काय द्यायच दरवेळी मुलगी निघाली तर; नाही का?
आता ही शेती पुन्हा भरभराटीला यायला जवळ जवळ दोन वर्षे गेली. अन तोवर आम्ही आमच बिर्हाड ऑस्ट्रेलियाला हलवलं होतं. मग नेहमी "केऽऽळी !" असं जरा कमी महत्त्व देउन उच्चारायचं फळ आता " कितीला आहे नेमकं?" असा भाव तपासून घेणे अंगवळणी पडलं.
त्यातूनच सुरु झाली, एव्हढं महागामोलाचं फळ टाकुन न देण्याची कसरत. केळ्यांच काय असतं, तर ती पिकली की काळी पडतात, अन साधारण मऊ होतात. असा काळपटपणा दिसला रे दिसला की बच्चे कंपणी नाक मुरडुन ती खायला तयार होत नाहीत. मग त्याचा शिरा करुन झाला. अहो पण एकावेळी चार माणसांच्या शिर्यात तुम्ही जास्तीत जास्त एक केळं मिसळु शकता! रव्यात केळ मिसळायच असत म्हंटल, केळ्यात रवा नाही. अशीच एकदा; साधारण काळी पडलेली केळी उचलुन टाकायला निघाले, पण माझ्यातली गृहीणी, अन कृषक कन्या, ( प्रत्येक भाताचा कण, शिजायला १५ मिनिटं लागत असतील पण तो शेतात चार महिने उभा असतो अस मी अगदी ठासुन सांगत असते मुलांना) काही; ती केळी तशी टाकायला तयार होइना. मग लढवल डोकं, अन केल्या त्याच्या पूर्या.
अगदी सोप्प्या! अजिबात गोड होत नाहीत, खुसखुशीत, अन चहाची लज्जत वाढवणार्या.
तर घ्या मंडळी घरातलेच चार जिन्नस घेउन करा पिकल्या केळ्यांच्या पूर्या!
चला साहित्य घ्या.
किती केळी आहेत काळपटलेली?
एका केळाला साधारण एक कप गव्हाचे पिठ म्हणजे कोरडी कणिक. मी दोन केळ्यांचे प्रमाण वापरलं आहे.
तर साहित्यः-
२ पिकुन काळपटलेली केळी
२ वाट्या कणिक.
१ टेबलस्पून घरच तूप.
१ टीस्पून मिठ.
तळायला तेल.
केळी हाताने कुस्करुन त्यात तूप अन मिठ मिसळुन घ्या.
आता त्यात मावेल तेव्हढी कणिक घाला. वरुन अजिबात पाणी घालायचं नाही. छानसा गोळा तयार करुन घ्या.
मी साधारण चहा करताना या पूर्या तळते, तोंवर हे तयार केलेलं पिठ फ्रिज मध्ये अगदी दोन तिन दिवस छान रहात.
आता एक चपातीच्या आकाराची पात लाटा अन वाटीने पूर्या कातून घ्या.
तळा.
हां हां हां! इथे जरा जपून हं. कारण हे पिठ इतकं हलक असत की पूर्या लगेच तांबूस होउन जळायची शक्यता असते, म्हणुन जरा लक्ष देउन ! बाकि काही नाही.
चला! या खायला!
__/\__
अपर्णा.
केळी हाताने कुस्करुन त्यात तूप अन मिठ मिसळुन घ्या.
आता त्यात मावेल तेव्हढी कणिक घाला. वरुन अजिबात पाणी घालायचं नाही. छानसा गोळा तयार करुन घ्या.
मी साधारण चहा करताना या पूर्या तळते, तोंवर हे तयार केलेलं पिठ फ्रिज मध्ये अगदी दोन तिन दिवस छान रहात.
आता एक चपातीच्या आकाराची पात लाटा अन वाटीने पूर्या कातून घ्या.
तळा.
हां हां हां! इथे जरा जपून हं. कारण हे पिठ इतकं हलक असत की पूर्या लगेच तांबूस होउन जळायची शक्यता असते, म्हणुन जरा लक्ष देउन ! बाकि काही नाही.
चला! या खायला!
__/\__
अपर्णा.
वाचने
66290
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
मस्त!!
एका कल्पक पाककृतीची रोचक जन्मकहाणी आवडली.
फोटोज झकास आहेत.
काय सुंदर लिहीतेस ग!!
पाक्रु पण आवडली अन पुर्यांचे आकार सुद्धा!!
शेवटच्या फोटोतली रेड डीश आहे ना ती माझ्या लहानपणापासुनच्या लाडक्या डीश सारखीच आहे.. ती मी इथे येतानाही सोबत आणलीय.
In reply to काय सुंदर लिहीतेस ग!! by आनन्दिता
पाक्रु आवडली.
आणि अपर्णातै छान लिहीतात या बद्दल वादच नाही, पण त्या खुप कमी लिहीतात हि तक्रार आहे.
In reply to काय सुंदर लिहीतेस ग!! by आनन्दिता
ठिक आहे आनंदिता, आजपासुन ती डिश आनंदिताताईची अस म्हणायला लागते, म्हणजे मुलं फॉलो करतील. तेव्हढीच एक सोय डिश ओळखायची. म्हणजे कस, लग्नातली कढई, दुधाचे पातेले, तसं आनंदिताची डिश.
In reply to ठिक आहे आनंदिता, आजपासुन ती by स्पंदना
जोरदार अनुमोदन!!! :)
पुर्या आणि फोटू आवडले. निळ्या वाट्या आवडल्या. कांगारूंच्या देशातील वाहून गेलेल्या केळ्याच्या बागेची कहाणी ऐकून आता मीही घडाचे दर बघणार, एरवी जितकी हवी तितकी उचलली जातात. ;)
:)
मस्त.
मस्तच :)
अवांतरः सद्ध्याच तुमच्या तिथे आऑमसं झालं त्याला गेला होतात का?
In reply to मस्तच by यशोधरा
अऑमस सिडनीत होतं.
मी राह्यले मेल्याबर्नात.
गेले होते काहिजण, पण मी इकडे ममत हजेरी लावलीय. आता नविन टिम बनते आहे, त्यामुळे, ममत व्यस्त आहे. अर्थात आमच्या तर्फे दोन नाटक पाठवली होती. बरी झाली.
In reply to अऑमस सिडनीत होतं. by स्पंदना
भारी की! नाटकवाल्या बै झाल्यात तुम्ही :) संहिता कोणत्या? की तुमच्यापैकीच लिहिली?
सही लिहिल्येस ग
यम्मी दिसतायेत पुर्या :)
व्वा! पिकलेल्या केळ्यांची कहाणी मस्त.
कांही बेकरीवाले, जास्त पिकलेली केळी स्वस्तात विकत घेऊन 'कप केक' मध्ये वापरतात. त्यामुळे साखर कमी लागते.
मस्त पाककृती! अगदी मऊ केळाच्या पुर्या असूनही छान फुगल्या आहेत.
छान!
लिहिण्याची शैली विशेष आवडली!
ती लिहिण्याची शैली सगळच आवडेश. पण कणिक हातानी का मळली नाहि?
पिकलेल्या केळ्याचे काय करायचे हा प्रश्न सुटला !
बादवे, अपर्णा, कणकेत चिमुटभर पिस्ता कलर टाकला तर भारी दिसतील नै ?
पाकृ बरोबरच तुझ्या खुमासदार शैलीतलं लेखनही आवडलं. :)
अरे व्वा उपयुक्त पाककृती !
आवडले!
छान दिसतायेत पुर्या.
मस्त लिहीले आहे.
त्या हार्ट शेप पुऱ्या पाहून आश्चर्य वाटले. हल्ली अश्याच असतात की हा एक तुमच्या कल्पकतेचा भाग ?
मस्त झाल्यायत. :)
मस्त पाकृ. पण वाटी किंवा कोणताही साचा वापरुन केलेल्या पुर्या अज्जिबात आवडत नाहीत.
दिल शेप पुर्या बघून दिल खुश हो गया अपर्णाताई :)
पाक्रु आणि तुमचे लेखन दोन्हि मस्त :)
काय ऊत आलाय नुसता एकेकीला पाकृ करायला! ;)
चांगली झाली आहे पुरी. ह्ह्ह्ह!
ह्या पुर्या सुद्धा तिखट - गोड होतील व चहाचा लुफ्त अजुन वाढेल......हा फक्त माझा अंदाज
सार्यांना धन्यवाद.
दिपक.कुवेत मी हाताने मळत बसले कणिक तर फोटो कसे काढायचे?
प्रपे काका आयडीयाची कल्पना मस्त.
तर्री काका अहो लहान मुलांच घर आहे, आकार बदलला की चव बदलते त्यांची. माझ्याकडे तर शंकरपाळेपण कुठ बदक, ट्री, कप अश्या शेपमध्ये असतात.
आणि सुड भाऊ, नका हो असा सूड घेऊ. जरा कमी काम लागत आम्हाला. स्वयंपाक हा आवडीचा अन सवडीचा नसतो, सगळ्या बाहेरच्या कामानंतर येउन घरचा घास मिळावा सर्वांना या आस्थेपोटी असतो. तेंव्हा मारला थोडा शॉर्टकट तर चालावा.
स्नेहांकिता पिस्ता कलर घालुन पहाते.
बाकि अन्न हे पूर्णब्रह्मच्या मृणालिनी, सानिका, अन रेवती यांचे आभार.
चवीचे जावू देत , पण आकार आंइ लेखनशैलीवर फुल्ल टु फिदा :)
मस्त दिसतायत पुर्या.. पुर्यांचा आकारही आवडला.
मी असेच केळ्याचे गोड पराठेही करते.. छान लागतात.
पुरी मस्तच. पण, पुरीचा पूर्वार्ध मला आवडला. ऑष्ट्रेलियातबी द्ष्काळ पडलाय, केळीच्या बागांची वाट लागली तेव्हा मह्या मनात विचार आला. माणसं कुठवर बी जाऊ दे. लोकांचं सुकदुक जिकडं तिकडं सेमच असतं असं वाटलं.
>>>माझ्यातली गृहीणी, अन कृषक कन्या, ( प्रत्येक भाताचा कण, शिजायला १५ मिनिटं लागत असतील पण तो शेतात चार महिने उभा असतो अस मी अगदी ठासुन सांगत असते मुलांना.
व्वा. इथं मी तुमच्या पायावर डोकं ठेवलंय असं चित्र डोळ्यासमोर आणा. :)
-दिलेप बिरुटे
माझी आई खूपदा करायची या पुय्रा, शाळेतून आल्यावर चहाबरोबर खायला!! ती पण ह्या पुय्रा वाटीनेच छोटे गोल करून तळायची, बिस्कीटांच्या आकारात!!
छान हो अपर्णातै.
अगदी छान पुर्या झाल्यात. पिझ्झा पुरीसारख्याच इनोव्हेटीव्ह.
चवीला कशा लागल्या? जरा जरा सत्यनारायणाच्या प्रसादाची आठवण आली काय? ;)
मस्तच ग. पण आमच्याकडॅ केळी एवढी पिकेस्तोवर टिकतच नैत ना!!!
गेल्याच आठवड्यात केल्या होत्या. ( आणि खरं तर पाकृ देण्याचाही विचार केला होता २ क्षण )!
पण मी या पुर्या नेहमी तिखटाच्याच करते. नेहमीच्या तिखट मीठाच्या पुर्यांच्या कणकेमध्ये शिजवलेली केळी घालून... खूपच आवडता पदार्थ. :)
नविन प्रकार...अजुन कधी खाल्ला नाहीय...पण करुन पाहीन.
अरे वा... वेगळीच पाकॄ. :)
ते मोठी राजेळी केळी असतात ना...त्याची ती भरलेलीकेळी करतात ती तर शॉलिट्ट लागतात ! :)
बाप रे! क्षुल्लक केळी ती काय अन इतकी महाग? : (
पुर्यांचा आकार मस्तच. पाकृ ही आवडली.
अपर्णाताई बनाना कपकेक्स करत्ताना ह्या पुर्यांचीही कल्पना डोक्यात आली होती पण वाटले होते की पुर्यांना आंबुसपणा येईल की काय, पण तुमचा प्रयोग पाहुन आता करायलाच घेते.
केल्या. खाल्या.
मुख्य म्हणजे जास्त पिकलेली केळी वाया न गेल्याचे समाधान मिळाले :-)
"च्यामारी! मी मनातल्या मनात त्याच्या सात पिढ्या उद्धरल्या. भारतिय दिसले म्हणुन काय अगदी केळी खरेदी करायचीपण लायकी नाही की काय? ऑ?"
च्यामारी! मी मनातल्या मनात त्याच्या सात पिढ्या उद्धरल्या. भारतिय दिसले म्हणुन काय अगदी केळी खरेदी करायचीपण लायकी नाही की काय? ऑ?
मस्त.
मला पुर्या त्या माशाच्या प्लेट सहित हव्यात.
मी काही दिवसांपूर्वी खूप पिकी केळी संपवण्यासाठी मिपा आणि फेसबुकवरच्या लोकांची डोकी खाऊन या पुर्या आणि केळ्याच्या हलव्याच्या पाकृ मिळवल्या होत्या, त्याची आठवण झाली!
पुर्यांची कहाणी नेहमीप्रमाणे अपर्णा इश्टाईल!
मस्त!!