✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १)

म
मोदक यांनी
Sun, 03/03/2013 - 03:31  ·  लेख
लेख
"मोदक, तू कॉमर्स बॅकग्राऊंडचा असूनही आयटी कंपनी मध्ये कसे काय..?" या प्रश्नाचे नेमके उत्तर काय द्यावे हा क्रायसीस बरीच वर्षे मागे लागला आहे. नेमके (म्हणजे समोरच्याला अपेक्षीत!) उत्तर दिले गेले नाही तर, "हल्ली काय, कुणीही आयटीमध्ये भरती होतात!" असे बोचरे टोमणे बसतात ;-) असे टोमणे बर्‍याचदा ऐकून सध्या अवलंबलेला मार्ग म्हणजे "मी एक्सेल वर काम करतो" हे सांगायचे. 'एक्सेल' चे नाव काढले की लोकांच्या दोन प्रकारच्या प्रतिक्रिया असतात, एक म्हणजे, "एक्सेलवर काय असते काम करण्यासारखे..?" यातल्या बर्‍याच जणांना 'एक्सेल = डेटा एन्ट्री' असेही का वाटते देव जाणे. दुसरी प्रतिक्रिया म्हणजे, "एक्सेल..???" कित्ती भारी ना..? सगळे फॉर्मुले येतात..?" टाईप्स. या सर्व प्रकारात असे लक्षात येते आहे की लोकांच्या मनामध्ये एक्सेलबद्दल अनेक गैरसमज आहेत, मायक्रोसॉफ्ट ऑफीस ज्या ज्या कॉम्प्यूटरवर असते त्या त्या सर्व कॉम्प्यूटरवर एक्सेल असते त्यामुळे 'अतिपरिचयात अवज्ञा' या न्यायाने एक तर एक्सेल वापरले जात नाही किंवा वापरले तरी साधी कामे पार पाडण्यासाठी साधे सोपे मार्ग उपलब्ध असूनही केवळ माहिती नसल्याने असूनही आपण तेच काम करण्यात प्रचंड वेळेचा अपव्यय करतो. नमनाला घडाभर तेल घालून इथून पुढे मला जे थोडेफार एक्सेल येते ते टप्प्या टप्प्याने शिकवण्याचा प्रयत्न करतोय. बर्‍याच एक्सेल संज्ञा या इंग्रजीमध्ये वापरल्या आहेत व त्याअनुषंगाने आजूबाजूचे शब्द आलेले आहेत, त्यामुळे "मराठी सेंटेन्समध्ये इंग्लीश वर्डस यूज केले" या सबबीखाली धाग्याला अवांतराचे ग्रहण लागू नये अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत लिहिलेल्या विविध विषयांवरच्या धाग्यांपेक्षा हा थोडा वेगळा प्रयत्न आहे.. सांभाळून घ्यालच! आणखी एक - सर्व वाचकांना एकाच पातळीवर आणण्यासाठी सुरूवातीचे धागे माहितीपर आहेत. दैनंदिन कामात एक्सेल वापरणार्‍यांना हे सर्व 'खूप बेसीक' वाटू शकेल, आपण हळूहळू नवीन फंक्शन्स शिकत जावूया - एकत्र! एक्सेल - अतिसंक्षिप्त ओळख. (मी मुद्दाम एक्सेलच्या जन्मापर्यंत जात नाहीये; एकतर त्याचा या धाग्यामध्ये फारसा उपयोग नसणार आहे आणि ती माहिती अंतर्जालावर सहज उपलब्ध आहे!) एक्सेल म्हणजे एक स्प्रेडशीट आहे, ज्यामध्ये टॅब्यूलर फॉरमॅटमध्ये डेटा मेंटेन केलेला असतो. बाजारात एक्सेलप्रमाणे अनेक अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहेत परंतु मायक्रोसॉफ्टशी संलग्नता, त्यामुळे जवळजवळ सर्वच कॉम्प्यूटरमध्ये असलेली उपलब्धता आणि अत्यंत साधे स्वरूप यांमुळे एक्सेल बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. मिनिटॅब, IBM SPSS वगैरे अ‍ॅप्लीकेशन बर्‍याच बाबींमध्ये एक्सेलपेक्षा जास्ती उपयोगी असूनही त्यांचा वापर कमी आहे याचे कारण हेच. (तसेच या अ‍ॅप्लीकेशन्स साठी पैसे मोजावे लागतात!) एक्सेल व्हर्जन्स. सध्या एक्सेल २०१० हे अद्ययावत व्हर्जन असून एक्सेल २००७, एक्सेल २००३ आणि एक्सेल २००० ही या आधिची व्हर्जन्स आहेत. (एक्सेल २००० वर कुणी मिपाकराने काम केले असल्यास एक्सेल २००० ते एक्सेल २०१० चा प्रवास लिहून काढावा ही आग्रहाची विनंती - एक रोमहर्षक कहाणी आहे ती!) मी एक्सेल २०१० वरती काम करतो त्यामुळे सर्व स्क्रीनशॉट एक्सेल २०१० चे आहेत. आपण आता एक्सेलशीटकडे वळूया. एक्सेलशीट ओपन करण्यासाठी Start --> All Pragrams --> Microsoft Office --> Microsoft Excel 2010 असा मार्ग वापरावा. (एक्सेल २००३, एक्सेल २००७ साठी हाच मार्ग आहे) आता तुमच्यासमोर बर्‍याच उभ्या आडव्या रेषा आणि त्यांपासून बनलेले अनेक चौकोन दिसत असतील. हीच एक्सेल शीट. . १) Name Box - या ठिकाणी; सद्यस्थितीला कर्सर कोणत्या Cell मध्ये आहे ते समजते. २) Formula Bar - फॉर्म्यूला बारमध्ये Cell मध्ये असलेला नंबर किंवा माहिती किंवा जे असेल ते दिसते. वरील स्क्रीनशॉटमध्ये Cell L9 मध्ये असलेला स्टँडर्ड डेव्हीएशन चा फॉर्म्यूला दिसत आहे. ३) Quick Access Toolbar - या टूलबार मध्ये आपल्याला हवे असणारे महत्वाचे शॉर्टकट्स साठवून ठेवता येतात व हवे त्या वेळी लगेचच वापरता येतात. ४) Column Name - एक्सेल शीटवर दिसणारे A, B, C पासून XFD पर्यंत दिसणारे उभे चौकोन म्हणजे Columns आहेत. ५) Ribbon Menu and Tabs - रिबन मेन्यू २००७ व्हर्जन पासून अस्तित्वात आला. २००७ च्या आधिच्या एक्सेलमध्ये एखाद्या फंक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी बराच क्लिकक्लिकाट करायला लागायचा. तो टाळण्यासाठी २००७ पासून या प्रकारचा मेन्यू डिझाईन केला गेला. ६) Workbook Name - सध्या वापरात असलेले वर्कबूक कोणते आहे ते इथून ओळखता येते. ७) Row Number - एक्सेल शीटवर दिसणारे १, २, ३ पासून १०,४८,५७६ पर्यंत दिसणारे आडवे चौकोन म्हणजे Rows आहेत. ८) Cell - सद्यस्थितीला कर्सर कोणत्या चौकोनात आहे तो चौकोन म्हणजे Cell. Column चे नाव आणि Row चा नंबर मिळून Cell Reference तयार होतो. (या उदाहरणार L9) ९) Vertical Scrollbar - एक्सेलशीटमध्ये उभे; वरखाली स्क्रोल करण्यासाठी हा स्क्रोलबार वापरतात. १०) Range - ज्यावेळी आपण एकावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्ती Cells सिलेक्ट करतो त्यावेळी तो Cell समुह म्हनजेच रेंज. ११) Worksheet Name - Excel Workbook मध्ये असलेल्या वेगवेगळ्या Excel Sheet चे नाव इथे वाचता येते. १२) Range Stats - आपण माऊसच्या सहाय्याने सर्वच्या सर्व नंबर्स सिलेक्ट केले असतील तर सिलेक्ट केलेल्या आकड्यांच्या संबंधीत पुढील गोष्टी विनासायास या ठिकाणी समजतात. अ‍ॅव्हरेज, आकड्यांची संख्या, लहान आकडा (Minimum within Range), मोठा आकडा (Maximum within Range), आकड्यांची बेरीज. १३) Horizontal Scrollbar - एक्सेलशीटमध्ये आडवे; डावीकडून उजवीकडे स्क्रोल करण्यासाठी हा स्क्रोलबार वापरतात. १४) Page View - सध्या एक्सेल शीट कोणत्या फॉरमॅटमध्ये दिसत आहेत ती इथे कळते. तसेच एक्सेल शीट 'पेज लेआऊट' आणि 'पेजब्रेक' फॉरमॅटमधून बघता येते. १५) Zoom - एक्सेल शीट ची झूम लेव्हल किती आहे ते इथे कळते. क्रमशः ********************************************** हा धागा मुद्दाम लहान ठेवला आहे, सुरूवातीचे दोन तीन धागे अशाच माहितीवर आधारित असतील. सूचनांचे स्वागत आहे, पुढील धाग्यांमध्ये त्याप्रमाणे बदल करता येतील. Vlookup, Pivot Table वगैरे गोष्टी आपण शिकणार आहोत परंतु सध्या सर्वांना एका पातळीवर आणूया नंतर एकत्र शिकायला जास्ती मजा येईल असे वाटते. महत्त्वाचे - धाग्यामधल्या कोणत्याही गोष्टीसंदर्भात काही कळाले नाही तर शंकासमाधान होईपर्यंत प्रश्न विचारले तरी हरकत नाही. मात्र एखादा भाग आत्ता कळाला नाही तर नंतर त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या इतर बाबी न कळण्याची दाट शक्यता आहे! अतीमहत्वाचे - 'Microsoft Certified Excel Specialist' असूनही मला एक्सेल संपूर्णपणे येते हे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल, तस्मात्; माझ्याकडून एखादी चूक झाल्यास अवश्य नजरेस आणून द्यावी. आनंदाने सुधारणा करून घेण्यात येईल. **********************************************
  • चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells
  • धनु राशीचा शुक्र
  • चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग ४) - Filter, Conditional Formatting आणि Text to Columns

Book traversal links for चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १)

  • चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
69268 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

क्या बात, मोदकसाहेब, क्या बात

आदूबाळ
Sun, 03/03/2013 - 03:44 नवीन
क्या बात, मोदकसाहेब, क्या बात!
Microsoft Certified Excel Specialist
__/\__
  • Log in or register to post comments

शाळेत नाव घातले आहे

दीपा माने
Sun, 03/03/2013 - 04:50 नवीन
तुमच्या उदार शिकवणीचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

मस्तरे मोदका!

दादा कोंडके
Sun, 03/03/2013 - 05:11 नवीन
एक्सेल या टूल साठी मायक्रोसॉफ्टचे सगळे गुन्हे माफ आहेत. अगदी डेटा एंट्री ऑपरेटर ते शास्त्रज्ञापर्यंत उपयोगी असं दुसरं कोणतही टूल दुसरं नसेल. म्याथ्स जर चांगलं असेल आणि वीबी येत असेल तर कुठल्याही एडवान्सड सिम्युलेशन टूलच्या तोंडात मारेल इतके चांगले रिझल्ट एक्सेल मधून येतात. पावरफूल ब्याक एंड आणि उत्तम गुइ. याची मोठ्ठी त्रुटी म्हणजे ६५५३५ क्वालम्सचं लिमिट होती पण २००७ नंतर ते लिमिट २^२४ झाल्याने कितीतरी इंजिनीअरींग टूलचा धंदा बसला. :) पुढच्या भागाची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

+१

नन्दादीप
Sun, 03/03/2013 - 07:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

एक सुधारणा..

मोदक
Sun, 03/03/2013 - 12:21 नवीन
एक्सेल २००३ मध्ये ६५५३६ Columns नसून ६५५३६ Rows होत्या व २५६ Columns होते. या ६५५३६ पण एक मजा होती, २५६ (Row Count) चा वर्ग म्हणजे ६५५३६. :-) मात्र हे असोसिएशन नंतरच्या व्हर्जनमध्ये नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

अ र्र र्र र्र

मोदक
Sun, 03/03/2013 - 12:23 नवीन
अ र्र र्र र्र या ६५५३६ पण एक मजा होती, २५६ (Row Count) चा वर्ग म्हणजे ६५५३६. इथे Row Count ऐवजी Column Count असे वाचावे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हो.

दादा कोंडके
Sun, 03/03/2013 - 17:39 नवीन
बरोबर. प्रतिसाद प्रकाशीत केल्यावर लगेच चुक लक्षात आली. नंतर १०२४^२ एव्हडी झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

चांगले रिझल्ट

लॉरी टांगटूंगकर
Sun, 03/03/2013 - 12:18 नवीन
एडवान्सड सिम्युलेशन टूलच्या तोंडात मारेल इतके चांगले रिझल्ट एक्सेल मधून येतात. +१०० या केपेब्लीटीज उशिरा कळल्या, मी मॅटलॅबवर केलेलं काम पण एकानी एक्सेलवर करून दाखवल्यावर गोट्या कपाळात गेलेल्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हा हा..

दादा कोंडके
Sun, 03/03/2013 - 17:45 नवीन
खरंय. एक्सेल मध्ये म्याट्रीक्स म्यानिप्युलेशनसाठी काहीच फ्वार्म्युली उपलब्ध आहेत पण बहुतेक वेळी ते चालून जातात. ऑफीसमधला एक एक्सेल चांपिअन म्याथक्याड वगैरे टूलले डेमो द्यायला आलेल्यांच्या तोंडाला फेस आणत असे. ;) पण म्याटल्याबच्या टूल ब्वाक्सेसमुळे क्वाम्प्लेक्स प्रश्न सोडावला सोपे जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

:-D

मोदक
Sun, 03/03/2013 - 17:53 नवीन
ऑफीसमधला एक एक्सेल चांपिअन म्याथक्याड वगैरे टूलले डेमो द्यायला आलेल्यांच्या तोंडाला फेस आणत असे खर्र खर्र सांगतो दादानू.. अशी एखाद्याची टोपी उडवायला लै लै मजा येते. :-D आणि व्हिक्टीम जर क्लायंट साईडचा असेल तर आपले जीएम / AVP लोकंसुद्धा गालातल्या गालात हसत मजा बघत बसतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

मनोज सर

लीलाधर
Sun, 03/03/2013 - 07:19 नवीन
हजर बरं का. एक लंबर धागा काढलाय राव पुढील भाग येउद्यात लौकर.
  • Log in or register to post comments

अरे वा!, शिकवणीला आम्ही आलं

रेवती
Sun, 03/03/2013 - 07:39 नवीन
अरे वा!, शिकवणीला आम्ही आलं तर चालेल का गुरुजी? लिलाधरा, थांब की! लगेच दुसर्‍या यत्तेत जायला आम्हाला जमणार नै! तुझं काम लै फाष्ट!
  • Log in or register to post comments

थांब की

लीलाधर
Sun, 03/03/2013 - 08:30 नवीन
थांब की @ रेवती आज्जे मी थांबलेलोच आहे. मी जरी घाई केली तरी मनोज सर माझं ऐकणार कुठे आहेत ? त्यांचा अजेंडा फिक्स आहे की :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

HLOOK UP , VLOOKUP या बद्दल

नन्दादीप
Sun, 03/03/2013 - 07:42 नवीन
HLOOK UP , VLOOKUP या बद्दल शिकायला आवडेल.
  • Log in or register to post comments

मास्तर,

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 03/03/2013 - 12:04 नवीन
मास्तर, मॅक्रो पण कसे वापरायचे ते शिकवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

+१

प्रसाद गोडबोले
Sun, 03/03/2013 - 21:29 नवीन
व्ही बी ए म्यॅक्रो वरील लेखाची आतुरतेने वाट पहात आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

शाळेत नाव घातले आहे.

नीलकांत
Sun, 03/03/2013 - 08:02 नवीन
मोदक मास्तर , लेख उत्तम झाला आहे. आता नियमीत पुढचे लेख येऊ द्या. तुमच्या शाळेत नाव घातले आहे. :)
  • Log in or register to post comments

धन्स

पप्पु अंकल
Sun, 03/03/2013 - 08:18 नवीन
आता तरी व्यवस्थित शिकेन म्हणतो
  • Log in or register to post comments

हजर आहे. गृहपाठ पण द्या रोज.

पुष्करिणी
Sun, 03/03/2013 - 08:35 नवीन
हजर आहे. गृहपाठ पण द्या रोज.
  • Log in or register to post comments

मस्त....

मन१
Sun, 03/03/2013 - 08:43 नवीन
उपयुक्त...... आभार.
  • Log in or register to post comments

धडपडत रडत पडत एक्सेल वापरतो

पिंपातला उंदीर
Sun, 03/03/2013 - 09:11 नवीन
धडपडत रडत पडत एक्सेल वापरतो पण त्यात काय राम नाही. फारच उपयुक्त धागा. बुकमार्क करून ठेवला आहे. आन् दो.
  • Log in or register to post comments

स्सही रे स्सही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/03/2013 - 09:15 नवीन
मोदका मस्त रे, शिकायला आणि समजून घ्यायला आवडतंच. लेखनाचं स्वागत. पुभाप्र. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रत्येकाला आलेच पाहिजे

चौकटराजा
Sun, 03/03/2013 - 09:15 नवीन
मी लहान असताना, मुलाना काय काय आले पाहिजे याचा एक अभ्यासक्रम होता. भीमरूपी, रामरक्षा, गीतेचा १५ वा अध्याय. नक्षत्रांची नावे वगैरे. तरूण झालो. नोकरी साठी करायचा अर्ज, बॅक खात्याची विम्याची ओळख असे त्या अभ्यास क्रमाचे स्वरूप झाले. आता माझे असे मत आहे की ( ठाम) मुलाना स्तोत्रे वगैरे शिकविण्यात वेळ दवडू नका. जनरल नॉलेज ( जगातील सर्वात लांब प्लाटफॉर्म खरगपूर हे उदाहरण )हे सर्वात कमी उपयुक्त असते असा माझा अनुभव आहे. मग काय हवे शिकवायला. आरोग्य, कायदा, संगणक वापर व अर्थ व्यवहार हे चार खांब त्याच्या मनात घट्ट रोवावयास हवेत. आजच्या जगात हे खरे " संस्कार" ठरणार आहेत. सुदृढ,सभ्य,व सम्यक पिढी घडू शकेल. त्यात हे एक्सेल चे ज्ञान आले. आपले घरगुती कामात, अर्थव्यवहारातही एक्सेल सारख्या साधनांचा खूप उपयोग होतो. असा अनुभव आहे. सॉर्ट हे यातील एक बलस्थान आहे. याची स्क्रिप्ट शिकल्यास सोनेपे सुहागा. मोदक - जे आपणासी ठावे ......शहाणे करावे सकळजन या उक्तीची अंमलबजावणी आल्याबद्द्ल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

धन्या
Sun, 03/03/2013 - 18:41 नवीन
काळानुरुप संस्कारांची व्याख्या बदलायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

छान.

चित्रगुप्त
Mon, 03/04/2013 - 07:10 नवीन
छान. छान. शिकायला हवे एक्सेल असा विचार करता करता वर्षे उलटली. आता तुम्ही शिकवत आहात तर शिकायलाच हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

धन्यवाद

अभ्या..
Sun, 03/03/2013 - 12:23 नवीन
मला एमेस ऑफीस मधले एकही अ‍ॅप्लीकेशन नीट वापरायला येत नाही. आता ट्राय करीन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान!

संजय क्षीरसागर
Sun, 03/03/2013 - 12:36 नवीन
संकेतस्थळाचा एक सुयोग्य वापर!
  • Log in or register to post comments

प्रचंड सहमत!!!!!!!! :)

मोदक
Sun, 03/03/2013 - 12:37 नवीन
संकेतस्थळाचा एक सुयोग्य वापर! प्रचंड सहमत!!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एक्सेलबरोबर जास्त काही करायला

बॅटमॅन
Sun, 03/03/2013 - 12:58 नवीन
एक्सेलबरोबर जास्त काही करायला जमत नाही. या लेखमालेच्या माध्यमातून बरेच काही कळेल ही आशा..मस्त उपक्रम हो मोदूगुर्जी!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मोदक मास्तर !

सस्नेह
Sun, 03/03/2013 - 13:13 नवीन
आमची एक शेणखा.., आपलं शंका ! एका सोम्यागोम्याने मला वर्कशीट दिलंय त्यात VLOOKUP वापरलंय. आता मला त्याची रेंज कशी शोधायची ते सांगाल का ?
  • Log in or register to post comments

गूड क्वेश्चन..

मोदक
Sun, 03/03/2013 - 13:57 नवीन
=Vlookup(Lookup_Value,Table_Array,Column_Index_Number,Range_Lookup) यातील "टेबल अ‍ॅरे" म्हणजेच रेंज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

यातून रेंजचे नाव दिसते पण

सस्नेह
Sun, 03/03/2013 - 20:47 नवीन
यातून रेंजचे नाव दिसते पण लोकेशन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

Vlookup फॉर्म्यूला इथे पेस्ट

मोदक
Sun, 03/03/2013 - 20:51 नवीन
Vlookup फॉर्म्यूला इथे पेस्ट कर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

संपूर्ण वर्कशीटच तुला मेल

सस्नेह
Sun, 03/03/2013 - 22:06 नवीन
संपूर्ण वर्कशीटच तुला मेल करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ओके...

मोदक
Sun, 03/03/2013 - 23:04 नवीन
ओके... त्या फॉर्म्यूलामध्ये रेंजला नाव देवून ("Name Function" पाथ- Formulas Tab --> Name Manager) table_array म्हणून वापरली आहे. वरती एकमेव डायग्राममध्ये जो नेमबॉक्स आहे (क्रमांक १), त्या नेमबॉक्सच्या उजव्या बाजूच्या छोट्या बाणाला क्लिक करून तिथे हवे ते नाव सिलेक्ट केल्यास कर्सर आपोआप रेंजच्या ठिकाणी जाईल. ही रेंज नेम फंक्शनमधूनच बदलता येते. (आणि हो.. तुम्ही पाठवलेल्या फाईलमधील रेंज गंडलेली आहे, असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. :-D) एक काळजीपूर्वक सल्ला - मला एक्सेलशीट्स / डेटा व्यनी करताना आपापल्या कंपनीची डेटा शेअरींग आणि सिक्यूरीटी पॉलिसी तपासून मगच शक्य असेल तर फाईल्स पाठवा. अन्यथा डमी डेटा तयार करून पाठवावा, आपण Real Life Scenarios 'Replicate' करून पाहू. अनऑथोराईज्ड डेटा शेअरींग ही खूप जोखमीची बाब आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अगदी अगदी

धन्या
Sun, 03/03/2013 - 23:13 नवीन
एक काळजीपूर्वक सल्ला - मला एक्सेलशीट्स / डेटा व्यनी करताना आपापल्या कंपनीची डेटा शेअरींग आणि सिक्यूरीटी पॉलिसी तपासून मगच शक्य असेल तर फाईल्स पाठवा. अन्यथा डमी डेटा तयार करून पाठवावा, आपण Real Life Scenarios 'Replicate' करून पाहू. अनऑथोराईज्ड डेटा शेअरींग ही खूप जोखमीची बाब आहे!
ऑफीसचं किंवा क्लायंटचं ईमेल अकाऊंट वापरुन या भानगडी करुच नयेत. अगदी अनावधानाने झालेली छोटीशी चूक नोकरी घालवू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

खरे आहे..

मोदक
Sun, 03/03/2013 - 23:19 नवीन
खरे आहे.. हे बघितलेल्या अनुभवाचे बोल आहेत. आमच्या एका परममित्राकडून अनावधानाने ही चूक झाली. दहा ठिकाणी "सॉरी! परत असे करणार नाही" चा मेल पाठवावा लागला त्याला. आणि एच आर ने गंभीरतेचा आव आणून दम दिला तो वेगळाच! सर्वजण काळजी घ्या हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

धन्यवाद्स.

सस्नेह
Mon, 03/04/2013 - 13:53 नवीन
ही रेंज नेम फंक्शनमधूनच बदलता येते. existing name function edit करायचे की नवीन name function बनवायचे ? कृपया सोदाहरण स्पष्ट करावे. काळजीपूर्वक सल्ल्याबद्दल अधिक धन्यवाद. आपल्या व सर्वांच्या माहितीसाठी : आपणास पाठवलेले वर्कशीट सँपल डेटा वापरून बनवलेले होते ज्या माहितीचा प्रत्यक्ष आकडेवारीशी काहीही संबंध नाही ! मूळ मुद्दल सुरक्षित आहे ..!Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मोदक, तुला ह्याबद्दल बोलणारच

पिंगू
Sun, 03/03/2013 - 13:47 नवीन
मोदक, तुला ह्याबद्दल बोलणारच होतो. लेखमालिका वाचून सर्व सराव लिबरऑफिसच्या एक्सेलवर करण्याचा प्रयत्न करेन. बघूया लिबरऑफिस एक्सेल किती पॉवरफुल आहे.
  • Log in or register to post comments

मला एक्सेलमध्ये काही अडलं की

आदूबाळ
Sun, 03/03/2013 - 14:04 नवीन
मला एक्सेलमध्ये काही अडलं की मी चंदूला विचारतो. आता मोदकरावांना पण त्रास देणार...
  • Log in or register to post comments

चंदू एक्सेलमधला बाप माणूस आहे

धन्या
Sun, 03/03/2013 - 19:08 नवीन
चंदू एक्सेलमधला बाप माणूस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अतिशय उपयोगी धागा !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 03/03/2013 - 17:52 नवीन
मायक्रोसॉफ्टची एक्सेल ही सर्वोत्तम देण आहे. अशा बहुगुणी टूलची सुगम शास्त्रीय ओळख करून देण्याचा हा तुमचा उपक्रम खचितच स्तुतीपात्र आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
Sun, 03/03/2013 - 17:52 नवीन
दहा एक वर्षे एक्सेल हापिसात सतत वापरलं आहे. अगदी त्या १९९७ का काय त्या जुनाट एडिशनपासून. पण बारकाईने शिकायला आवडेल. तसंच त्यातले किती प्रयोग ओपन ऑफिसच्या कॅल्क मधे करता येतात हे तपासायचे आहे.
  • Log in or register to post comments

तसंच त्यातले किती प्रयोग ओपन

धन्या
Sun, 03/03/2013 - 19:13 नवीन
तसंच त्यातले किती प्रयोग ओपन ऑफिसच्या कॅल्क मधे करता येतात हे तपासायचे आहे.
पैसातै, करीयरच्या सुरुवातीला बँकेत न जाता आयटीत गेली असतीस तर आज एखादया बडया आयटीची कंपनीची रीटायर्ड सीईओ असतीस. तुला सांगतो, आज आयटीमधल्या बहूतांशी पोरापोरींमध्ये याच्या दहा टक्केही नविन काही जाणून घेण्याची उत्सुकता नसते. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खरे आहे रे. पैसाताई आता थोडे

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/04/2013 - 00:57 नवीन
खरे आहे रे. पैसाताई आता थोडे programming शिकल्या तर मिपाच्या तांत्रिक समितीत जरूर हातभार लावू शकतात. (No sarcasm at all)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

किती चेष्टा कराल!

पैसा
Mon, 03/04/2013 - 10:35 नवीन
पण हरकत नाही. ते सुद्धा शिकावे म्हणते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१

दादा कोंडके
Mon, 03/04/2013 - 16:09 नवीन
सहमत. म्हणजे मिपा जे वारंवार बंद तरी पडणार नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

माहितीपुर्ण लेख.

धन्या
Sun, 03/03/2013 - 18:57 नवीन
प्रचंड क्षमता असलेल्या परंतू तितकंच दुर्लक्षिलेल्या या गुणी अ‍ॅप्लिकेशनबद्दल तुमच्यासारख्या या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीकडून वाचायला मिळण्यासारखं दुसरं भाग्य ते कोणतं? एरव्ही सी शार्प या प्रोग्रामिंग लॅग्वेजचे गोडवे गाणारा मी. दोन महिन्यांसाठी बेंचवर आलो. बरेच दिवस रिकामा आहे हे पाहून एका मॅनेजरने पकडलं आणि एक एक्सेल शीट चिपकवून दिली. म्हणे या एक्सेल शीटमधले ग्राफ वापरुन असं असं प्रेझेंटेशन बनवण्यासाठी मॅक्रो लिही. बिलेबल प्रोजेक्टवर असतो तर "असली फडतूस कामं मी करत नाही" असं म्हणून मी त्या मॅनेजरला फाटयावरच मारला असता. बेंचवर असल्यामुळे जनाची नाही पण मनाची लाज वाटून मी हो म्हटलं. व्हीबीए (व्हिज्युअल बेसिक फॉर अ‍ॅप्लिकेशन्स) नावाची संगणक भाषा वापरुन मला एक्सेल मॅक्रो लिहायचा होता. सुरुवात जरी नाखुशीने केली होती तरी तो प्रकार प्रचंड आवडला. मी लिहिलेला कोड एक्सेल शीटमधून चार्ट उचलून ते पीपीटीवर ठेवत होता. एक्सेल शीटमधल्या सेल्समधून टेक्स्ट उचलून त्याचे बुलेट पॉइंटस बनवत होता. अमेझिंग !!! सध्या मॅक्रो या प्रकारात माझे विविध प्रयोग चालू आहेत. तुर्तास एव्हढेच. एक्सेल मॅक्रोबद्दल सविस्तर असे मोदुराव लिहीतीलच. ;)
  • Log in or register to post comments

मॅक्रो..

चौकटराजा
Mon, 03/04/2013 - 09:08 नवीन
धन्या , मी आता मॅक्रो कसा करायचा हे विसरून गेलो आहे. व्ही आरेस घेऊन दहा वर्षे झाली. पण पीसी ला " मायला गुलाम आहेस आमचा तू लेका ! " असे बजावून सांगायला मॅक्रो हे एक मस्त साधन होते यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

इंटरेष्टिंग !!

विटेकर
Mon, 03/04/2013 - 12:34 नवीन
पपट. म्हणजे वैताग ! त्यापेक्शा एक्सेल म्हन्जे होम्पीच ! जरा सविस्तर sangal या मक्रो बद्दल ? मेल केली तरी चालेल vitekar@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा