वा वर्षा!
तू उत्तम पाककृती करतेस हे मला माहीत होतं. परंतु तू एवढी उत्तम चित्रकारही आहेस हे पाहून सुखद धक्का बसला! :)
क्या बात है, रेखाटन मस्तच काढलं आहेस..
मिसळपाववरील तुझ्या प्रथम रेखाटनाचं मनापासून स्वागत..
यापुढे इथे फक्त 'रीड ओन्ली' मोडात न राहता लेखनावरही भर दे, हीच विनंती...
तात्या.
माझी चित्रकला तीन डोंगर, त्यामधे दिसणारा सूर्य आणि उडणारे दोन चार पक्षी या उच्च् पातळीला संपली.
आमच्या सुर्याला डोळे असतात आणि तो हसरा असतो :-)
इतके छान चित्र पाहून मस्त वाटले!
रेखाटन छान झालंय यात शंका नाही.
आम्ही चित्रकलेच्या एलीमेंट्री आणि इंटरमेजीयट या चित्रकलेच्या परिक्षा, शाळेत पास झालेलो आहोत. पण, काय शिकलो आठवत नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रेखाटन छान झालंय यात शंका नाही.
--- सहमत आहे. पण आनंदयात्री म्हणतायत त्याप्रमाणे माऊ अगदी किंचित चकणी वाटली, हे खरे. तुमचा एरव्हीचा अनुभव माहीत नाही; पण प्राण्यांची फर या चित्रात तरी छानच जमली आहे, असे मला वाटले.
आम्ही चित्रकलेच्या एलीमेंट्री आणि इंटरमेजीयट या चित्रकलेच्या परिक्षा, शाळेत पास झालेलो आहोत.
--- आम्ही पण! :)
पण, काय शिकलो आठवत नाही.
--- वस्तुचित्र, स्मरणचित्र, निसर्गचित्र (एलिमेन्टरीला सूर्यफूल आणि इन्टरमिजिएटला अस्टर :)), मुक्तहस्तचित्र (फ्रीहॅन्ड), भूमिती, कॅलिग्राफी???
(चित्रकार)बेसनलाडू
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट मीपण दिल्या होत्या. सूर्यफूल, अस्टरचं फूल्..अगदी अगदी. छान आठवण झाली.:))
चकणी दिसतेय का? हं...मला कडेने दिसणारे चेहेरे काढताना नेहेमी तीच भिती वाटत असते :)
हे चारकोल आणि ग्रॅफाईट पेन्सिल वापरुन काढलंय, त्यामुळे आता खोडाखोड शक्य नाही. पुढच्या वेळेस काळजी घेईन.
प्रियाली, धन्यवाद. अगं पण लिहिण्याविषयी म्हणशील तर अजून बराच पल्ला गाठायचाय गं. माझं काही तंत्र किंवा पद्धत नाहीये. पण या बाबतीत जे. डी. हिलबेरी यांना मी फार मानते.
अभिजित, नाव आवडलं. :)
-वर्षा
दुसरं एखादं चित्र बघून काढलंय की थेट मांजरच पुढ्यात ठेवून काढलंय?
हिलबेरी बॉसच दिसतोय, पण तरीही थोडेसे कार्टूनिश प्रसंग उच्चप्रकारे कंपोझ करणारा नॉर्मन रॉकवेल आणि द्विमितीत त्रिमित फसवणूक करणारा एम. सी. एशर हे माझे लाडके आहेत.
फारच सुरेख चित्र.....
डोळे जमलेत :), थोडासा रागीट स्वभाव असलेली मांजर आहे असं वाटत आहे. :)
रागीट चेहरा नसलेलं मांजर किंवा प्रेमळ चेहरा असलेलं मांजर माझ्यातरी पाहण्यात नाही !!!.
मला तरी सगळीच मांजरं धूर्त, लबाड, आतल्या गाठीची असल्यासारखी दिसतात.
बोक्याचं वागणं तर एकदम राजेशाही! कूणाच्या बापाची भिती नसल्यासारखं!
माझ्या घराच्या कौलांवर खूप मांजरं आहेत. अचानक मध्यारात्री कधीतरी त्यांची तारस्वरातली भांडण सुरू होतात. अशावेळी झोपमोड झाल्यामूळे फार राग येतो त्यांचा. पण फक्त तेवढ्या पुरता.
एक दिवस एक बोका आमच्या कौलावर येऊन सकाळच्या उन्हाला येऊन बसला होता. मला भयंकर राग आला त्याचा. आता तुम्ही म्हणाल यात राग येण्यासारखं काय? ते बरोबर आहे हो. पण नवीनच विकत आणलेल्या कुंडीमधील माती उकरून त्या मातीत एखादं जनावर बसल्यावर राग येणार नाही तर काय? मी हळूच एक काठी घेतली आणि एक जोराचा फटका त्याच्या ढुंगणावर ठेवून दिला. मला वाटलं होतं असा मार मिळाल्यावर धूम ठोकेल लेकाचा. परत माझ्या कौलावर येताना दहावेळा विचार करेल. पण कसचं काय आणि कसचं काय ! पठठ्याने एकदा मान वर करून माझ्याकडे पाहीलं आणि परत निवांत झोपी गेला. जसा काय मी त्याला दिसलोच नाही.
आता मात्र माझं डोकं फिरलं. अरे एक दिड दमडीचा बोका एका मनुष्याच्या रागाला आणि माराला भिक घालत नाही म्हणजे काय?
अजुन एक पण किंचीतसा जोरात फटका परत एकदा लागावला. यावेळेला मात्र हा फटका त्याला लागला असावा. तो माझ्याकडे त्रासिक नजरेने पाहून थोडा गुरगुरला, एकदम हळूहळू निवांत पणे उठला, अंगाला आळोखे पिळोखे दिले आणी अगदी राजाच्या थाटात चालत चालत निघून गेला!! माझा राग गेला आणि हसू आलं.
एकदा आमच्या विभागतल्या उघड्यावर चालणार्या वाचनालयात वर्तमान पत्र वाचीत होतो. इतक्यात आमचे बंधूराज हातात झाडू घेऊन हळूच एका बोक्याच्या मागून त्याला मारण्यासाठी चोरपावलांनी जाताना दिसले. कुतूहल म्हणून मी ही त्यांच्या मागोमाग गेलो. बंधूराज त्या बोक्याला हाणणार तेवढ्यात बोक्याने धूम ठोकली.
असेल त्या दोघांचं काहीतरी जुन भांडण म्हणून मी परत आलो. बंधूराजही आले. आल्यावर मी काही विचारलं नाही पण माझ्या चेहेर्यावरील कुतूहल त्यांनी ओळखलं आणि स्वत:च म्हणाले,
"चांगला हाणणार होतो. पळून गेला."
"पण का?", माझा मूळ प्रश्न.
"शांतपणे पेपर वाचत पायरीवर बसलो होतो, तर तो बोका आला आणि माझ्या पायावर मुतून गेला साला!!!"
मला मांजरासारखं फस्स् करून हसायला आलं.!!
रम्या
अप्रतिम रेखाटन.
वर्षा,
मांजर हा माझा विक पॉईंट आहे. कसंही असलं तरी मला ते आवडतं आणि चित्रातलं मांजर रागीट दिसत नाहिये... ते तर खोडकर.. खट्याळ दिसते आहे...
अशीच अजूनही येऊदेत...
तुझी हरकत नसेल तर मी हे चित्र माझ्या पी.सि. वर सेव्ह करून घेऊ का?
- प्राजु.
धन्यवाद. प्राजु, कर की सेव्ह, काही हरकत नाही.
रम्या, बोकोबांचे अनुभव वाचून खूप हसू आलं.
कोंबडी, रॉकवेल आणि एशर माहित नव्हते..धन्यवाद. रॉकवेलचं सेल्फ पोर्ट्रेट जबरदस्त आहे!
-वर्षा
अतिशय उत्कृष्ट चित्र!
मी मांजरप्रेमी नाही तरीही चित्र इतके सुरेख काढलंय की दाद द्यावीच लागली.
मांजरप्रेमी लोकांसाठी इथे हवी तितकी मांजरे आहेत. घ्या, मजा करा.
चित्रावरुन तो बोका आहे कि मांजर याचा "बोध" होत नाही. आता डावा डोळा तिरळा वाटण हा त्या बोका/ मांजराचा दोष आहे कि चित्र काराचा हे समजून येत नाही.मी चित्रकार नाही पण विचित्रकार आहे. त्यामुळे आपल्याला ज्यात गती नाही अशा विषयावर "तज्ञ" व्यक्तीचा आव आणून काहीही बकण्याचा अधिकार मला स्वयंघोषित आहे.
मी एक कथा ऐकली होती. एका राजाचा एक डोळा आंधळा असतो. त्याच्या दरबारी एक विख्यात चित्रकार येतो. राजाचे एक भव्यदिव्य पोर्ट्रेट बनवण्याचे फर्मान निघते. आता चित्रकाराची पंचाईत वास्तववादी चित्र काढावे तर राजा एका डोळ्याने आंधळा आहे हे दाखवावे लागणार. मग तो असे भव्य दिव्य चित्र काडतो कि राजा त्याला भव्यदिव्य बिदागी देतो. ते चित्र असते शिकारी राजा धनुष्यबाणाने मृगाचा वेध घेत आहे. अर्थातच वेध घेताना त्याचा आंधळा डोळा मिटलेला येतो. राजा खूष होतो.
निष्कर्ष- १) ती मांजर जर "स्त्री" बोका असेल तर तो तिरळेपणा हे सौंदर्य समजावे.
२) ती मांजर जर "पुरुष" बोका असेल तर तो तिरळेपणा ही मांजरीसाठी नेत्रपल्लवी आहे असे समजावे
(विचित्रकार)
प्रकाश घाटपांडे
म्हणजे काय?
मार्जार जातीतील मादीला मांजर आणि नराला बोका म्हणतात असा आमचा समज होता.
पण बोका आणि बोकी आणि मांजरी आणि मांजर असं काही असतं हे माहित नव्हतं.
> मार्जार जातीतील मादीला मांजर आणि नराला बोका म्हणतात असा आमचा समज होता.
म्हणजे 'बोका' हे फक्त मार्जारजातीतल्या नरालाच म्हणतात हे बरोबर. परंतु 'मांजर' ही संज्ञा मुळात लिंगनिरपेक्ष (जेंडर-न्यूट्रल) आहे.
मार्जारजातीतल्या मादीला 'भाटी' असे म्हणतात. 'मांजरी' असाही प्रवाद ऐकू येतो. 'ती मांजर' असे क्वचित्प्रसंगी ऐकूही येते, परंतु ही बहुधा नंतरची भर असावी. मुळात 'तो बोका, ती भाटी (मांजरी?), ते मांजर'.
बोका आणि भाटी हे बरोबर. पण मांजर हे स्त्रीलिंगीच वापरले जाते जास्त करून.
मुळात 'तो बोका, ती भाटी (मांजरी?), ते मांजर'.
ह्यावरून विनोद आठवला.
एक मुलगा शाळेतून आल्या आल्या आईला म्हणाला, "गुरूजींनी आज मला मारले."
आई: "का रे? तूच काहीतरी केले असशील."
मुलगा: "नाही ग. आज गुरूजी आम्हाला शिकवत होते. त्यांनी लिंग दर्शविताना तो, ती, ते चा वापर करायला सांगितला. मी म्हणालो- तो फळा, ती छडी, ते मास्तर."
चित्र छान आहे.
ती मांजर एखादयाकडे रागाने बघत असे दिसतेय. पण तो रागीट चेहरा नाही तर, एखाद्याला आपण त्रास दिला तर त्याची खोड कशी मोडावी ह्या प्रकारचा राग वाटतो. किंवा त्या मांजरीला एखादे उंदीर नाही मिळाला तर बहुधा अशी बघत असेल ;)
ती रुसून रागवल्यासारखी आहे. पण मुख्य म्हणजे मांजराच्या चेहेर्यावर दिसणार्या अनेक भावांपैकी हा एक भाव मस्त टिपला आहे. (कोणत्याहि भावाचा अभाव असण्यापेक्षा हे फार फार आवडलं)
माउ थोडी चकणी वाटते का ? - हो मलाही :)
छानच रेखाटन. अजून येऊ देत.
अवांतर: हे रेखाटन पाहून आठवले. शांताबाईंच्या एका पुस्तकात मांजरांवर मस्त लेख आहे. त्यात त्यांनी लिहिलयं...
इंग्लंडमध्ये एकाने तिथल्या मार्जार प्रेमाला वैतागून मेलेल्या मांजराचे हजार उपयोग हे पुस्तक
लिहिले. त्यात मेलेले मांजराचे उताणे चित्र आणि त्याच्या वाळलेल्या पायांना लोकर गुंडाळून आजीबाई स्वेटर विणत आहेत अश्या प्रकारची रेखाटने काढली होती.
त्याला उत्तर म्हणून एका मार्जारप्रेमीने मेलेल्या माणसाचे एक हजार उपयोग असे पुस्तक काढले ज्यात वाळलेल्या प्रेताचा होडीसारखा उपयोग करून एक मांजर नदी ओलांडत आहे अश्या प्रकारची रेखाटने काढली होती.
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
वस्तूवर नजर एकाग्र केल्यास समोर डोळे असलेला कोणताहि प्राणी तिरळाच दिसणार. मला हे मांजर संधीची वाट पाहात टपून बसलेले वाटते. सोंगटी वा नाणे चाकासारखे सोडल्यास पिल्लू मस्त खेळते. तसेच एका दो-याच्या टोकाला छोटे वजन बांधून नाचविल्यास ते मस्त खेळते. त्या वेळी त्याची नजर पाहा. अशीच दिसते.
असो. चित्र सुरेख आहे. स्वतःच्या चित्राचे भोचक परीक्षण जरूर करावे. पण न्यूनगंड नसावा. कोणताहि कलावंत सुरुवातीला अपूर्णच असतो. परिपूर्णता कधीच येत नाही. तिचा आपल्याला असलेला ध्यास आवडला.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
प्रयत्न मस्तच आहे.
फक्त चित्र three dimensional वाटत नाही.
(माझी चित्रकला दैदिप्यमान असल्यामुळे खरं तर मला चुका काढायचा अधिकार नाही. तरी क्षमस्व!)
ठणठणपाळ
वर्षा,
खूप चांगला प्रयत्न आहे. मला वाटते हे चित्र, तू चित्र समोर ठेवून काढले असावे. पेन्सिल स्ट्रोक्समध्ये आणखी ताकद हवी. अर्थात ती सवयीने येईलच. एकूण तुझी धडपड पाहून खूप आनंद वाटला. (मला हे सांगण्याचा अधिकार आहे की नाही माहित नाही, कारण मी अजून एकही माझे रेखाटन पाठवले नाही.)
राजमुद्रा :)
सुंदर चित्र आहे.
हे चित्र एका छायाचित्रावरून काढले आहे त्या मुळे छायाचित्रकाराने एवढ्या जवळ कॅमेरा आणल्यावर जो अविश्वास, नैसर्गिक सावधपणा मांजराच्या चेहर्यावर आला आहे त्यामुळेच ते किंचित चिडके (कोणाकोणाला) वाटते आहे. तसेच, ज्या अँगलने कॅमेरा धरला आहे त्या अँगलला मांजराचे दोन्ही डोळे पाहण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे ते 'चकणे' वाटत आहे. जसे लहान मुले बशीने दूध प्यायला शिकतात तेंव्हा बशीतल्या दुधावर 'नजर' रोखल्यामुळे 'चकणमल्हार' दिसतात. असो.
वा!
छान!
डोळे
चिडकी
हो ना!
फार सुंदर
असेच
वा!
हसर्या सुर्याला डोळे..
हाहा!:):)
असेच
मस्त !!!
सहमत
अरे वा !! हेच
सुंदर आहे
सर्वांना
चित्र छान आहे
- रॉकवेलचं गॉसिप आणि सेल्फ पोर्ट्रेट
- एशरचं ड्रॉइंग हँड्स आणि पर्पेच्युअल स्टेअरकेस
- कोंबडी.चित्र आवडले
फारच सुरेख चित्र
प्रेमळ मांजर?
वा!!!
धत तेरीकी..
धन्यवाद
खूपच छान!
बोका - चित्ररसभंगांकन
स्त्री बोका?
किंचित चूक
बोका आणि
चित्र छान
चित्र आवडले
आवडले
रागीट भाव
अरे वा!
जवळच्या ...........
प्रयत्न
अवांतर....
छान!
माजर
धन्यवाद
चुकून
सुंदर...