✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मांजर (रेखाटन)

व — वर्षा, Fri, 11/16/2007 - 00:34

प्रतिक्रिया द्या
20868 वाचन

💬 प्रतिसाद (41)
व
विसोबा खेचर Fri, 11/16/2007 - 00:40 नवीन

वा!

वा वर्षा! तू उत्तम पाककृती करतेस हे मला माहीत होतं. परंतु तू एवढी उत्तम चित्रकारही आहेस हे पाहून सुखद धक्का बसला! :) क्या बात है, रेखाटन मस्तच काढलं आहेस.. मिसळपाववरील तुझ्या प्रथम रेखाटनाचं मनापासून स्वागत.. यापुढे इथे फक्त 'रीड ओन्ली' मोडात न राहता लेखनावरही भर दे, हीच विनंती... तात्या.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 11/16/2007 - 00:40 नवीन

छान!

>> मऊ केस,पिसं वगैरे तंतोतंत कागदावर उतरवणे मला नीटसं जमत नाही .. पण डोळे मात्र मस्त जमले आहेत! छान!!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 11/16/2007 - 09:51 नवीन

डोळे

पण डोळे मात्र मस्त जमले आहेत! छान!! असेच वाटले. (पण माउ थोडी चकणी वाटते का ??)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 03/23/2008 - 19:57 नवीन

चिडकी

चित्र एकदम उत्तम. पण मांजर थोडी चिडकी वाटत आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 12:31 नवीन

हो ना!

हो ना! अगदी सदाशिव पेठी चित्पावन च जणु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ध
धनंजय Fri, 11/16/2007 - 01:03 नवीन

फार सुंदर

>> मऊ केस,पिसं वगैरे तंतोतंत कागदावर उतरवणे मला नीटसं जमत नाही .. पण यातच जे तंत्र वापरले आहे तेही आवडले.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 11/16/2007 - 19:36 नवीन

असेच

असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सुवर्णमयी Fri, 11/16/2007 - 01:21 नवीन

वा!

माझी चित्रकला तीन डोंगर, त्यामधे दिसणारा सूर्य आणि उडणारे दोन चार पक्षी या उच्च् पातळीला संपली. वर्षा , हे चित्र खूप सुरेख झाले आहे. .. शुभेच्छा
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 11/16/2007 - 02:22 नवीन

हसर्‍या सुर्याला डोळे..

माझी चित्रकला तीन डोंगर, त्यामधे दिसणारा सूर्य आणि उडणारे दोन चार पक्षी या उच्च् पातळीला संपली. आमच्या सुर्याला डोळे असतात आणि तो हसरा असतो :-) इतके छान चित्र पाहून मस्त वाटले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
प
प्रियाली Fri, 11/16/2007 - 02:39 नवीन

हाहा!:):)

चला इथे बरेचजण माझ्यासारखे आहेत. वर्षा, चित्र खूप सुरेख आहे. कधीतरी ते कसं काढतेस याबद्दलही लिहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
न
नंदन Fri, 11/16/2007 - 04:08 नवीन

असेच

म्हणतो. सुरेख रेखाटन. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/16/2007 - 09:53 नवीन

मस्त !!!

रेखाटन छान झालंय यात शंका नाही. आम्ही चित्रकलेच्या एलीमेंट्री आणि इंटरमेजीयट या चित्रकलेच्या परिक्षा, शाळेत पास झालेलो आहोत. पण, काय शिकलो आठवत नाही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 11/16/2007 - 10:01 नवीन

सहमत

रेखाटन छान झालंय यात शंका नाही. --- सहमत आहे. पण आनंदयात्री म्हणतायत त्याप्रमाणे माऊ अगदी किंचित चकणी वाटली, हे खरे. तुमचा एरव्हीचा अनुभव माहीत नाही; पण प्राण्यांची फर या चित्रात तरी छानच जमली आहे, असे मला वाटले. आम्ही चित्रकलेच्या एलीमेंट्री आणि इंटरमेजीयट या चित्रकलेच्या परिक्षा, शाळेत पास झालेलो आहोत. --- आम्ही पण! :) पण, काय शिकलो आठवत नाही. --- वस्तुचित्र, स्मरणचित्र, निसर्गचित्र (एलिमेन्टरीला सूर्यफूल आणि इन्टरमिजिएटला अस्टर :)), मुक्तहस्तचित्र (फ्रीहॅन्ड), भूमिती, कॅलिग्राफी??? (चित्रकार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/16/2007 - 10:14 नवीन

अरे वा !! हेच

वस्तुचित्र, स्मरणचित्र, निसर्गचित्र (एलिमेन्टरीला सूर्यफूल आणि इन्टरमिजिएटला अस्टर :)), मुक्तहस्तचित्र (फ्रीहॅन्ड), भूमिती, कॅलिग्राफी??? बेला, क्या बात है !!! आठवणी ताज्या केल्या.(आमच्याकडे एलिमेन्टरीला चाफ्याचं आणि इन्टरमिजिएटला कन्हेरीचं फुलं ) असे होते. बाकी सीलॅबस सेम होता. :))) माऊ अगदी किंचित चकणी (आमच्या गावाकडच्या भाषेत बांगी-तीरळी ) वाटली. सहमत !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ज
जुना अभिजित Fri, 11/16/2007 - 10:02 नवीन

सुंदर आहे

चित्राला संशयकल्लोळ नाव शोभून दिसेल. :) अभिजित
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 11/16/2007 - 10:37 नवीन

सर्वांना

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट मीपण दिल्या होत्या. सूर्यफूल, अस्टरचं फूल्..अगदी अगदी. छान आठवण झाली.:)) चकणी दिसतेय का? हं...मला कडेने दिसणारे चेहेरे काढताना नेहेमी तीच भिती वाटत असते :) हे चारकोल आणि ग्रॅफाईट पेन्सिल वापरुन काढलंय, त्यामुळे आता खोडाखोड शक्य नाही. पुढच्या वेळेस काळजी घेईन. प्रियाली, धन्यवाद. अगं पण लिहिण्याविषयी म्हणशील तर अजून बराच पल्ला गाठायचाय गं. माझं काही तंत्र किंवा पद्धत नाहीये. पण या बाबतीत जे. डी. हिलबेरी यांना मी फार मानते. अभिजित, नाव आवडलं. :) -वर्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
क
कोंबडी Fri, 11/16/2007 - 14:39 नवीन

चित्र छान आहे

दुसरं एखादं चित्र बघून काढलंय की थेट मांजरच पुढ्यात ठेवून काढलंय? हिलबेरी बॉसच दिसतोय, पण तरीही थोडेसे कार्टूनिश प्रसंग उच्चप्रकारे कंपोझ करणारा नॉर्मन रॉकवेल आणि द्विमितीत त्रिमित फसवणूक करणारा एम. सी. एशर हे माझे लाडके आहेत.
  • रॉकवेलचं गॉसिप आणि सेल्फ पोर्ट्रेट
  • एशरचं ड्रॉइंग हँड्स आणि पर्पेच्युअल स्टेअरकेस
- कोंबडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा
च
चित्रा Sat, 11/17/2007 - 18:44 नवीन

चित्र आवडले

तुम्ही पाठवलेली ही पण चित्रे छान आहेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी
ध
ध्रुव Fri, 11/16/2007 - 12:26 नवीन

फारच सुरेख चित्र

फारच सुरेख चित्र..... डोळे जमलेत :), थोडासा रागीट स्वभाव असलेली मांजर आहे असं वाटत आहे. :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
र
रम्या Fri, 11/16/2007 - 14:19 नवीन

प्रेमळ मांजर?

फारच सुरेख चित्र..... डोळे जमलेत :), थोडासा रागीट स्वभाव असलेली मांजर आहे असं वाटत आहे. :) रागीट चेहरा नसलेलं मांजर किंवा प्रेमळ चेहरा असलेलं मांजर माझ्यातरी पाहण्यात नाही !!!. मला तरी सगळीच मांजरं धूर्त, लबाड, आतल्या गाठीची असल्यासारखी दिसतात. बोक्याचं वागणं तर एकदम राजेशाही! कूणाच्या बापाची भिती नसल्यासारखं! माझ्या घराच्या कौलांवर खूप मांजरं आहेत. अचानक मध्यारात्री कधीतरी त्यांची तारस्वरातली भांडण सुरू होतात. अशावेळी झोपमोड झाल्यामूळे फार राग येतो त्यांचा. पण फक्त तेवढ्या पुरता. एक दिवस एक बोका आमच्या कौलावर येऊन सकाळच्या उन्हाला येऊन बसला होता. मला भयंकर राग आला त्याचा. आता तुम्ही म्हणाल यात राग येण्यासारखं काय? ते बरोबर आहे हो. पण नवीनच विकत आणलेल्या कुंडीमधील माती उकरून त्या मातीत एखादं जनावर बसल्यावर राग येणार नाही तर काय? मी हळूच एक काठी घेतली आणि एक जोराचा फटका त्याच्या ढुंगणावर ठेवून दिला. मला वाटलं होतं असा मार मिळाल्यावर धूम ठोकेल लेकाचा. परत माझ्या कौलावर येताना दहावेळा विचार करेल. पण कसचं काय आणि कसचं काय ! पठठ्याने एकदा मान वर करून माझ्याकडे पाहीलं आणि परत निवांत झोपी गेला. जसा काय मी त्याला दिसलोच नाही. आता मात्र माझं डोकं फिरलं. अरे एक दिड दमडीचा बोका एका मनुष्याच्या रागाला आणि माराला भिक घालत नाही म्हणजे काय? अजुन एक पण किंचीतसा जोरात फटका परत एकदा लागावला. यावेळेला मात्र हा फटका त्याला लागला असावा. तो माझ्याकडे त्रासिक नजरेने पाहून थोडा गुरगुरला, एकदम हळूहळू निवांत पणे उठला, अंगाला आळोखे पिळोखे दिले आणी अगदी राजाच्या थाटात चालत चालत निघून गेला!! माझा राग गेला आणि हसू आलं. एकदा आमच्या विभागतल्या उघड्यावर चालणार्‍या वाचनालयात वर्तमान पत्र वाचीत होतो. इतक्यात आमचे बंधूराज हातात झाडू घेऊन हळूच एका बोक्याच्या मागून त्याला मारण्यासाठी चोरपावलांनी जाताना दिसले. कुतूहल म्हणून मी ही त्यांच्या मागोमाग गेलो. बंधूराज त्या बोक्याला हाणणार तेवढ्यात बोक्याने धूम ठोकली. असेल त्या दोघांचं काहीतरी जुन भांडण म्हणून मी परत आलो. बंधूराजही आले. आल्यावर मी काही विचारलं नाही पण माझ्या चेहेर्‍यावरील कुतूहल त्यांनी ओळखलं आणि स्वत:च म्हणाले, "चांगला हाणणार होतो. पळून गेला." "पण का?", माझा मूळ प्रश्न. "शांतपणे पेपर वाचत पायरीवर बसलो होतो, तर तो बोका आला आणि माझ्या पायावर मुतून गेला साला!!!" मला मांजरासारखं फस्स् करून हसायला आलं.!! रम्या
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 11/16/2007 - 18:55 नवीन

वा!!!

अप्रतिम रेखाटन. वर्षा, मांजर हा माझा विक पॉईंट आहे. कसंही असलं तरी मला ते आवडतं आणि चित्रातलं मांजर रागीट दिसत नाहिये... ते तर खोडकर.. खट्याळ दिसते आहे... अशीच अजूनही येऊदेत... तुझी हरकत नसेल तर मी हे चित्र माझ्या पी.सि. वर सेव्ह करून घेऊ का? - प्राजु.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/16/2007 - 19:11 नवीन

धत तेरीकी..

तुझी हरकत नसेल तर मी हे चित्र माझ्या पी.सि. वर सेव्ह करून घेऊ का? धत तेरीकी, कर की! कुणाला कळणार आहे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
वर्षा Fri, 11/16/2007 - 23:49 नवीन

धन्यवाद

धन्यवाद. प्राजु, कर की सेव्ह, काही हरकत नाही. रम्या, बोकोबांचे अनुभव वाचून खूप हसू आलं. कोंबडी, रॉकवेल आणि एशर माहित नव्हते..धन्यवाद. रॉकवेलचं सेल्फ पोर्ट्रेट जबरदस्त आहे! -वर्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्रमोद देव Sat, 11/17/2007 - 12:42 नवीन

खूपच छान!

अतिशय उत्कृष्ट चित्र! मी मांजरप्रेमी नाही तरीही चित्र इतके सुरेख काढलंय की दाद द्यावीच लागली. मांजरप्रेमी लोकांसाठी इथे हवी तितकी मांजरे आहेत. घ्या, मजा करा.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 11/17/2007 - 13:15 नवीन

बोका - चित्ररसभंगांकन

चित्रावरुन तो बोका आहे कि मांजर याचा "बोध" होत नाही. आता डावा डोळा तिरळा वाटण हा त्या बोका/ मांजराचा दोष आहे कि चित्र काराचा हे समजून येत नाही.मी चित्रकार नाही पण विचित्रकार आहे. त्यामुळे आपल्याला ज्यात गती नाही अशा विषयावर "तज्ञ" व्यक्तीचा आव आणून काहीही बकण्याचा अधिकार मला स्वयंघोषित आहे. मी एक कथा ऐकली होती. एका राजाचा एक डोळा आंधळा असतो. त्याच्या दरबारी एक विख्यात चित्रकार येतो. राजाचे एक भव्यदिव्य पोर्ट्रेट बनवण्याचे फर्मान निघते. आता चित्रकाराची पंचाईत वास्तववादी चित्र काढावे तर राजा एका डोळ्याने आंधळा आहे हे दाखवावे लागणार. मग तो असे भव्य दिव्य चित्र काडतो कि राजा त्याला भव्यदिव्य बिदागी देतो. ते चित्र असते शिकारी राजा धनुष्यबाणाने मृगाचा वेध घेत आहे. अर्थातच वेध घेताना त्याचा आंधळा डोळा मिटलेला येतो. राजा खूष होतो. निष्कर्ष- १) ती मांजर जर "स्त्री" बोका असेल तर तो तिरळेपणा हे सौंदर्य समजावे. २) ती मांजर जर "पुरुष" बोका असेल तर तो तिरळेपणा ही मांजरीसाठी नेत्रपल्लवी आहे असे समजावे (विचित्रकार) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विकेड बनी Sat, 11/17/2007 - 20:36 नवीन

स्त्री बोका?

म्हणजे काय? मार्जार जातीतील मादीला मांजर आणि नराला बोका म्हणतात असा आमचा समज होता. पण बोका आणि बोकी आणि मांजरी आणि मांजर असं काही असतं हे माहित नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Sat, 11/17/2007 - 21:53 नवीन

किंचित चूक

> मार्जार जातीतील मादीला मांजर आणि नराला बोका म्हणतात असा आमचा समज होता. म्हणजे 'बोका' हे फक्त मार्जारजातीतल्या नरालाच म्हणतात हे बरोबर. परंतु 'मांजर' ही संज्ञा मुळात लिंगनिरपेक्ष (जेंडर-न्यूट्रल) आहे. मार्जारजातीतल्या मादीला 'भाटी' असे म्हणतात. 'मांजरी' असाही प्रवाद ऐकू येतो. 'ती मांजर' असे क्वचित्प्रसंगी ऐकूही येते, परंतु ही बहुधा नंतरची भर असावी. मुळात 'तो बोका, ती भाटी (मांजरी?), ते मांजर'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
द
देवदत्त Sat, 11/17/2007 - 23:15 नवीन

बोका आणि

बोका आणि भाटी हे बरोबर. पण मांजर हे स्त्रीलिंगीच वापरले जाते जास्त करून. मुळात 'तो बोका, ती भाटी (मांजरी?), ते मांजर'. ह्यावरून विनोद आठवला. एक मुलगा शाळेतून आल्या आल्या आईला म्हणाला, "गुरूजींनी आज मला मारले." आई: "का रे? तूच काहीतरी केले असशील." मुलगा: "नाही ग. आज गुरूजी आम्हाला शिकवत होते. त्यांनी लिंग दर्शविताना तो, ती, ते चा वापर करायला सांगितला. मी म्हणालो- तो फळा, ती छडी, ते मास्तर."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
द
देवदत्त Sat, 11/17/2007 - 23:09 नवीन

चित्र छान

चित्र छान आहे. ती मांजर एखादयाकडे रागाने बघत असे दिसतेय. पण तो रागीट चेहरा नाही तर, एखाद्याला आपण त्रास दिला तर त्याची खोड कशी मोडावी ह्या प्रकारचा राग वाटतो. किंवा त्या मांजरीला एखादे उंदीर नाही मिळाला तर बहुधा अशी बघत असेल ;)
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Sun, 11/25/2007 - 17:48 नवीन

चित्र आवडले

:)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 11/26/2007 - 20:11 नवीन

आवडले

ती रुसून रागवल्यासारखी आहे. पण मुख्य म्हणजे मांजराच्या चेहेर्‍यावर दिसणार्‍या अनेक भावांपैकी हा एक भाव मस्त टिपला आहे. (कोणत्याहि भावाचा अभाव असण्यापेक्षा हे फार फार आवडलं) माउ थोडी चकणी वाटते का ? - हो मलाही :)
  • Log in or register to post comments
व
वर्षा Mon, 11/26/2007 - 23:43 नवीन

रागीट भाव

धन्यवाद सर्वांना. मला स्वतःलाही हे मांजर जरा रागीट वाटतं :) -वर्षा
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 10:05 नवीन

अरे वा!

छानच रेखाटन. अजून येऊ देत. अवांतर: हे रेखाटन पाहून आठवले. शांताबाईंच्या एका पुस्तकात मांजरांवर मस्त लेख आहे. त्यात त्यांनी लिहिलयं... इंग्लंडमध्ये एकाने तिथल्या मार्जार प्रेमाला वैतागून मेलेल्या मांजराचे हजार उपयोग हे पुस्तक लिहिले. त्यात मेलेले मांजराचे उताणे चित्र आणि त्याच्या वाळलेल्या पायांना लोकर गुंडाळून आजीबाई स्वेटर विणत आहेत अश्या प्रकारची रेखाटने काढली होती. त्याला उत्तर म्हणून एका मार्जारप्रेमीने मेलेल्या माणसाचे एक हजार उपयोग असे पुस्तक काढले ज्यात वाळलेल्या प्रेताचा होडीसारखा उपयोग करून एक मांजर नदी ओलांडत आहे अश्या प्रकारची रेखाटने काढली होती. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 21:02 नवीन

जवळच्या ...........

वस्तूवर नजर एकाग्र केल्यास समोर डोळे असलेला कोणताहि प्राणी तिरळाच दिसणार. मला हे मांजर संधीची वाट पाहात टपून बसलेले वाटते. सोंगटी वा नाणे चाकासारखे सोडल्यास पिल्लू मस्त खेळते. तसेच एका दो-याच्या टोकाला छोटे वजन बांधून नाचविल्यास ते मस्त खेळते. त्या वेळी त्याची नजर पाहा. अशीच दिसते. असो. चित्र सुरेख आहे. स्वतःच्या चित्राचे भोचक परीक्षण जरूर करावे. पण न्यूनगंड नसावा. कोणताहि कलावंत सुरुवातीला अपूर्णच असतो. परिपूर्णता कधीच येत नाही. तिचा आपल्याला असलेला ध्यास आवडला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ Sun, 03/23/2008 - 21:54 नवीन

प्रयत्न

प्रयत्न मस्तच आहे. फक्त चित्र three dimensional वाटत नाही. (माझी चित्रकला दैदिप्यमान असल्यामुळे खरं तर मला चुका काढायचा अधिकार नाही. तरी क्षमस्व!) ठणठणपाळ
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत Mon, 03/24/2008 - 01:30 नवीन

अवांतर....

हे पहा....
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Mon, 03/24/2008 - 10:56 नवीन

छान!

वर्षा, खूप चांगला प्रयत्न आहे. मला वाटते हे चित्र, तू चित्र समोर ठेवून काढले असावे. पेन्सिल स्ट्रोक्समध्ये आणखी ताकद हवी. अर्थात ती सवयीने येईलच. एकूण तुझी धडपड पाहून खूप आनंद वाटला. (मला हे सांगण्याचा अधिकार आहे की नाही माहित नाही, कारण मी अजून एकही माझे रेखाटन पाठवले नाही.) राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
स
सकेत विचारे Mon, 03/24/2008 - 17:48 नवीन

माजर

हे, चित्र खुप सुन्दर आहे. अजुन कहि चित्र पोस्त करना. सन्केत.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 03/25/2008 - 05:14 नवीन

धन्यवाद

सर्वांना धन्यवाद. नाही, हे चित्र प्रत्यक्ष मांजर पुढ्यात ठेवून काढलेलं नाही. (मांजर एवढं कुठलं शांत बसायला!) फोटोवरुन काढलंय. :) -वर्षा
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 03/25/2008 - 05:30 नवीन

चुकून

रेखाटन चुकून इथे प्रतिक्रियांच्यात चढवलं. तात्या, प्लीज हे इथून डिलीट करता येईल का? मी नव्याने पोस्ट टाकून ते चढवेन. -वर्षा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/27/2008 - 14:14 नवीन

सुंदर...

सुंदर चित्र आहे. हे चित्र एका छायाचित्रावरून काढले आहे त्या मुळे छायाचित्रकाराने एवढ्या जवळ कॅमेरा आणल्यावर जो अविश्वास, नैसर्गिक सावधपणा मांजराच्या चेहर्‍यावर आला आहे त्यामुळेच ते किंचित चिडके (कोणाकोणाला) वाटते आहे. तसेच, ज्या अँगलने कॅमेरा धरला आहे त्या अँगलला मांजराचे दोन्ही डोळे पाहण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे ते 'चकणे' वाटत आहे. जसे लहान मुले बशीने दूध प्यायला शिकतात तेंव्हा बशीतल्या दुधावर 'नजर' रोखल्यामुळे 'चकणमल्हार' दिसतात. असो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा