✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खव्वयांसाठी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी आणि हैदराबाद मधिल हॉटेलांची यादी [त्यातल्या त्यात सामिश भोजन]

स
संताजी धनाजी यांनी
Sat, 11/22/2008 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
71651 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 09/03/2009 - 13:24 नवीन

महाराष्ट्राच्या बाहेर...

भोपाळला "बापु की कुटीया" मध्ये शाकाहारी जेवण खरच खुप छान असतं.इंदोरला "गुरुक्रुपा"मध्येही शाकाहारी स्वस्त आणी मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
स
सुधीर काळे गुरुवार, 09/03/2009 - 10:03 नवीन

जकार्ता

जकार्ता येथे तीन चांगली भारतीय भोजनगृहे आहेतः १. क्वीन्स,"सुंतर" तलावाच्या किनार्‍यावर (आमच्या भाषेत "दानाउ सुंतर") फोन नं. ६५०-९९६९. त्यांचेच थामरिन रोडवरही एक भोजनगृह आहे. २. गणेश, एक संस्कृती (सुदिरमान रोड-सुब्रोतो रोड क्रॉसिंग) फोन नं. ५७१३५६७ ३. जयपूर (रसूना सईद रोड) फोन नं. ०८५८८०९४३०४३ जकार्ताला सुंतर या विभागात भारतियांची वस्ती बरीच आहे. तिथे "मेहफिल" नावाचे छान जेवण मिळणारे पण 'डेकोर' जरा उडिपीस्टाईलचे असलेले छान भोजनगृह आहे. आपण दिलेल्या भोजनगृहांचे फोन नं. दिल्यास उपकार होतील! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 10/09/2009 - 11:13 नवीन

बेंगळुरु

१)हैदराबाद बिर्याणी हाउस्.(फोरम मॉल जवळ) २)दखनी देख्(जयनगर ४ ट साचा)-बिर्याणी कबाब. ३)नंदिनी-जयनगर्/कोरमंगला/.. आंध्र इश्टाईल ४)हळ्ळी माने- ३ छेद-संपिगे मार्ग- मल्लेश्वरम(कन्नड स्टाइल जेवण-रागी मुड्डे/कुंदापुर पत्रोडे मस्त असतात) शिवाय डोस्यांचे २०/२१ प्रकार मिळतात. ५)बेंगळुरुतले world famous- MTR उर्फ मावळ्ळी टिफिन रूम्.लालबागच्या जवळ्. जगातला सर्वात उत्तम डोसा,शिरा,कॉफी इकडे मिळतात. ६) मैय्याज(maiyya's)- जयनगर ४ साचा. अप्रतिम कन्नड शाकाहारी जेवण. ७)विद्यार्थी भवन- गांधी बाजार्-बसवनगुडी(शिरा/डोसा/कॉफी/वडा) ८)उपहार दर्शिनी- DVG Road बसवनगुडी(शेवगे भात्,शिरा,उपमा,सेट डोसा) ९)कॉफी हाउस- MG Road (ब्रेड ऑम्लेट्,कॉफी,बटाटा चिप्स) भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
Y
yadavrahul143 Fri, 10/09/2009 - 10:55 नवीन

विकास लंच होम (मासे)

पुणे-मुंबई जुन्या हायवेवर कासरवाडी (नाशिक फाटा) रेल्वे स्टेशन च्या आधी एक पेट्रोल-पंप आहे त्याच्या शेजारीच आहे हे विकास लंच होम. कोंकणी स्टाइल चे मासे खूप छान मिळतात पण आधी ऑर्डर देऊन जावे लागते. बसायला जागा खूप कमी आहे पण जेवण खूप छान असते. नंबर: ९८५००२९९८०
  • Log in or register to post comments
व
व्यंकु Fri, 10/09/2009 - 11:28 नवीन

रत्नागिरी(मासे)

मारुती मंदीर परिसरात आलं कि अय्यंगार बेकरीजवळचं हॉटेल गोपाळ आणि संगम स्विटमार्ट जवळचं हॉटेल शुभम. दोन्ही भोजनालये माशांसाठी एकदम उत्तम.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 10/16/2009 - 00:00 नवीन

आणखी काही झणझणीत भोजन स्थळे

नगर रस्त्यावरील विमाननगर-कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागाला जवळ काही झणझणीत भोजन स्थळे यलो चिली - कोरेगाव पार्क मधील सातव्या गल्लीच्या टोकावर पाककला विशारद संजीव कपूरचे कबाब लाजबाब. नॉर्दर्न फ्रॉन्टीयर - नगररस्त्यावरील आगाखान पॅलेसच्या जरा पुढे. पेशावरी व अमृतसरच्या कुकडूकूच्या चवीसाठी प्रसिद्ध बारबेक्यू - नगर रोडवरील दास शोरुमच्या मागे - डायनिंग टेबलावर मध्यात शेगडी आणून त्यावर अनेक कबाब भाजायचे व अनेक सॉसेस रंगवून गट्टम करायचे त्यातून भूक राहिली तर नेहमीचे मेनूतील पदार्थांचा आस्वाद घ्यायचा. यासाठी लठ्ठ बिलाची तयारी हवी. आणि दी वेस्टर्न रॉयल टर्फ क्लब हाऊस - सोलापूर हायवेच्यालगत कॅम्पाच्या टोकाला - एका बाजूला घोडे जीव खाऊन पळतायत तर दुसरीकडे काही लोक निराश तर काही एकदम खुष असे चित्र दिसणारे एकटेच स्थळ. रेस कोर्स. तिथली आदब, चव विलायती आवडीची. जवानीतील धाक दाखवणारी, गालभर मिशांची, रुपेरी केसांची मिलिटरीतील व्यक्तिमत्वे बियरचे घुटके घेत, रेसिंगची अंदाजपत्रके काळजीपुर्क वाचताना दिसली, की क्लबला आल्याचे समाधान लाभते व दारुची झिंग काही और येते. पण तेथे आत पाऊल ठेवायला आमच्या सारख्या क्लबची मेंबरशिप असलेल्यांशी सलगी नसेल तर मग कठीण आहे. शशिकांत
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Tue, 10/09/2012 - 01:49 नवीन

अक्षर खूण साठवली आहे.

अक्षर खूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Tue, 10/09/2012 - 01:53 नवीन

ह्या लेखाला वाचन खूण केल्या

ह्या लेखाला वाचन खूण केल्या गेली आहे. अजून माहिती येऊ दे . माझ्याकडून जमेल तशी देत जाईन.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 10/09/2012 - 01:55 नवीन

दुर्दैव...

पुण्याच्या यादीतील ४० क्रमांकाचे, य॑ज्ञकर्म उपहारगृह, आता दुर्दैवाने बंद झाले आहे. कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 10/09/2012 - 17:28 नवीन

:(

काका,, ऐकलं होतं की बंद होणार आहे. पुण्यात नसल्याने गेली ३ वर्षं समजलं नाही. मालवणी /मराठा चिकन आणि भाकरी, पापलेट तंदूर, सुरमई गोवन करी / मालवणी करी अशा अनेक पदार्थांसाठी येत्या वर्षात भेट द्यायचा पक्का प्लॅन होता. काही अतिशय युनिक व्हेज डिश पण खूप आवडल्या होत्या ... इतरत्र कुठे शाखा किंवा इतर पद्धतीचे काही नवीन उपहारगृह सुरु केले आहे / करणार आहात का? म्हणजे येत्या डिसेंबर / जानेवारीत आस्वाद घेता येईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Tue, 10/09/2012 - 17:55 नवीन

सध्या तरी मस्कत एके मस्कत....

इतरत्र कुठे शाखा किंवा इतर पद्धतीचे काही नवीन उपहारगृह सुरु केले आहे / करणार आहात का? म्हणजे येत्या डिसेंबर / जानेवारीत आस्वाद घेता येईल
नजिकच्या भविष्यात, भारतात, कुठलीही योजना नाही. सध्या मस्कत एके मस्कत. पावभाजी, पंजाबी चाट आणि बरोबर कांही खास मराठी पदार्थ (जसे, कांदेपोहे, झुणका-भाकर, साबुदाणा खिचडी, मिसळ-पाव, भाकरी भरीत इ.इ.)असा भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले दुसरे उपहारगृह, दसर्‍याच्या मुहुर्तावर, सुरु करीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
प
प्रभो Tue, 10/09/2012 - 18:12 नवीन

भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले

भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले दुसरे उपहारगृह, दसर्‍याच्या मुहुर्तावर, सुरु करीत आहे.
अभिनंदन हो काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
रेवती Tue, 10/09/2012 - 19:13 नवीन

छान बातमी. अभिनंदन काका.

छान बातमी. अभिनंदन काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
पप्पुपेजर Wed, 10/10/2012 - 12:22 नवीन

अभिनंदन काका !

जर कधी मस्कत आलो तर जरुर येउ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/10/2012 - 16:47 नवीन

धन्यवाद मैत्र, प्रभो, रेवती

धन्यवाद मैत्र, प्रभो, रेवती आणि पप्पूपेजर. जरूर या. कट्टा करू मस्कतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
C
chipatakhdumdum Wed, 10/10/2012 - 22:45 नवीन

शुभेछ्छा

काका, नव्या होटेलला शुभेछ्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
न
निलेश देसाई Fri, 05/23/2014 - 11:26 नवीन

अभिनंदन काका.....

अभिनंदन काका..... यज्ञकर्म बन्द केल्याचा उल्लेख निगडी कट्ट्यावेळी झाला होता. तरिही आमच्यासारखे जिभेचे चोचले करनारांसाठी पुण्याचं तेवढ मनावर घ्या ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अर्धवटराव Tue, 10/09/2012 - 04:17 नवीन

अजी मी ब्रह्म पाहिले...

आणि पूर्णब्रह्म देखील :) मित्रा "जी"द्वय, मोगलांच्या घोड्यांनी तुला पाण्यात बघितलं नसेल तेव्हढं मी तुला येता एक आठवडा प्रत्येक घासात बघणार... पण प्रेमाने बरं का. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 10/09/2012 - 11:21 नवीन

माझी प्रथम पसंती

माहितीबद्धल धन्यवाद, संताजी धनाजी. पिस्ता हाउसचा उल्लेख केल्याशिवाय हैदराबाद मधील हॉटेलांची यादी पूर्ण होणार नाही. १. चारमिनारचे पिस्ता हाउस आणि २. मेहदीपट्टणमचे सर्वी रेस्तरों ही हॉटेले हलीमसाठी (आणि हैदराबादच्या पेटंट चिकन दम बिर्याणीसाठी देखील) प्रसिद्ध आहेत. तथापि, इथे हलीम केवळ रमजानच्या महिन्यातच मिळते. चिकन दम बिर्याणीसाठी माझी प्रथम पसंती केवळ आणि केवळ शाह गौस हॉटेललाच! इथली बिर्याणी खाऊन पहावीच. चारमिनारहून फलक्नुमा पलेस (आता ताज ग्रुपचे फलक्नुमा हॉटेल) कडे जाताना लाल दरवाजाच्या किंचित पुढे असलेले शाह गौस हे हॉटेल पर्यटकांना फारशे माहित नसले तरी, हैदराबादी खवय्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. इथे दररोज नाहारी पाया आणि शनिवारी अप्रतीम चिकन नाहारी (निहारी नव्हे!) मिळते. ("ओल्डसिटी" मध्ये असल्यामुळे की काय) या हॉटेलात चकचकीतपणाचा अभाव आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 10/09/2012 - 16:12 नवीन

आयला हा लेख कसा काय नजरेतून

आयला हा लेख कसा काय नजरेतून सुटला??लय लय भारी बगा संताजीधनाजी!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 10/10/2012 - 14:31 नवीन

+१

भूकमार्क करून ठेवला आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मैत्र Wed, 10/10/2012 - 18:09 नवीन

+११

बेष्ट प्रतिसाद! भूकमार्क ... एक णंबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
म
मोग्याम्बो Wed, 10/10/2012 - 16:04 नवीन

लवंगी मिरची

"लवंगी मिरची" कोल्हापुरी चिकन आणि मटन थाळी, काळे मटन उत्तमच, पांढरा रस्सा एक नंबर आणि quantity ला सुट्टी नाही. city pride कोथरूड जवळ, गांधी लौंस समोर, seed च्या बिल्डिंग मधेच
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/10/2012 - 19:48 नवीन

आनंद जाहला.

अरे व्वा! अगदी घराशेजारीच आहे मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोग्याम्बो
प
प्रियाकूल Wed, 10/10/2012 - 16:27 नवीन

बंगलोर

बंगलोर मधील काही ठिकाणे: ग्रामीण हॉटेल,रहेजा आर्केड, कोरमंगला. अम्मीज बिर्याणी कोरमंगला. हॉटेल झरोका ,एच एस आर. BBQ आहेच शिव सागर आणि त्याच्या काही ब्रान्चेस मध्ये पण छान मिळते. ९९ डोसा हा पण प्रकार इकडे आल्यावर नक्की ट्राय करायला हवा. मस्तच असतो.तो गाड्यावर मिळतो.एच एस आर मध्ये मेक डी समोर असतो हा गाडा. (मी व्हेज आहे.हि थोडीफार माहितीची ठिकाणे.)
  • Log in or register to post comments
व
विटेकर Wed, 10/10/2012 - 17:47 नवीन

बंगलोर ला..

बंगलोर ला.. अल्सूर लेक जवळ, गुरुद्वाराला लागून एक टुकार ( हल्ली बरा केलाय म्हणे !) ढाबा आहे. अफलातून पंजाबी मिळते.. इतरत्र मिळते तसे.. सौदिन्डीयन पंजाबी नाही.. खरेखुरे पंजाबी.. सहस्त्रवेळा चेपले आहे.. शाकाहारी आणि अंडी मिळतात.. मालक पंजाबी आहे . त्याच्या आईच्या हाताला सोन्याची चव आहे.. १९९७ -२००५ मध्ये फारशी गर्दी नसायची .. वैयक्तिक लक्ष असायचे ..
  • Log in or register to post comments
अ
अन्तु बर्वा Wed, 10/10/2012 - 19:43 नवीन

ओवर रेटेड!

अल्सूर चा हा धाबा अतिशय टुकार आहे. मी दोन वेळा ट्राय केलं पण... बंगलोर ला पंजाबी खायच असेल तर "द व्हिलेज" नावाचं रेस्त्रो आहे इन्दिरानगर मधे. ट्राय करा. बाकि बंगलोर मधे ट्राय कराविच अशी ठिकणे: १) हैदराबाद हाउस, कोरमंगला- अप्रतिम बिर्याणी. २) अण्णाची, इंदिरानगर- जर तुम्हि अजुन चेट्टिनाड फूड ट्राय केलं नसेल तर जरुर करा. चेट्टिनाड फूड इज जस्ट अमेझिन्ग! ३) नंदिनी, बर्याच शाखा- इथे दोन गोष्टी ट्राय करा. चीकन बिर्याणी आणी आंध्रा मिल्स. मस्ट ट्राय. ४) चीकन कौन्ट्यी, बनेरगट्टा रोड- इथे ग्रील्ड चीकन ट्राय करा. मस्त! ५) नलपका, राजाजी नगर- इथे भाकरि आणी वांग्याची भाजी मिळते. नोर्थ करनाटका स्पेशलिटी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
न
निनाद मुक्काम … Wed, 10/10/2012 - 22:52 नवीन

चेंबूरच्या काही प्रसिद्ध

चेंबूरच्या काही प्रसिद्ध उपहार गृहांची माहिती स्टेशन च्या बाहेर आल्यावर प्रसिद्ध पावभाजी साठी सद्गुरू हॉटेल त्याची एक शाखा ५ मिनिटावर बाजूच्या गल्लीत मुंबई महानगर पालिकेच्या कार्यालयाच्या बाजूला आहे. सद्गुरू च्या समोर आंबेडकर गार्डन आहे . तेथे दाक्षिणात्य जेवणासाठी प्रसिद्ध गीता भवन आहे.( राज कपूर येथे डोसा चापायचा यायचा. चेंबूर चे प्रसिद्ध डायमंड गार्डन जवळ सरोज हे जुने प्रसिद्ध दाक्षिणात्य उपहार गृह आहे. चेंबूर ची खाऊ गल्ली म्हणजे सिंधी केंप येथे जामा नावाचे प्रसिद्ध मिष्टान्न भांडार आहे. त्याची गोड बिर्याणी प्रसिद्ध आहे. समोरच स्वस्त आणि मस्त पराठे वाल्याचा धाबा आहे. फाळणी नंतर पंजाबी व सिंधी लोकांनी येथे येऊन आपली खाद्य संस्कृती येथे रुजवली. आहे. सिंधी जेवणासाठी प्रसिद्ध विग रात्रीची मौज मजा करून झाली की सकाळी येथे सिंधी नाश्ता करावयास अनेक वेळा आलो आहे. दाल पकवान ही सिंधी न्याहारी ची खासियत ( हे मुंबई मध्ये नंबर १ आहे ) झकास येथे पितळ्याच्या पेल्यातील खरे ताक प्यायलो की रात्रीची ....... २४ तास मद्यपींचा सेवा करणारा व बिर्याणी साठी प्रसिद्ध असलेला राज बार ही सिंधी केंप ची खासियत मध्य रात्री नंतर राजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या राहतात. आणि काळ्या पिशवीतून चढ्या भावाने .......... माझ्या माहितीत अशी २४ तास ग्राहकांच्या सेवेस सज्ज एक राज व दुसरा बार म्हणजे गोकुळ बार जो ताज हॉटेल च्या मागे बडे मिया च्या बाजूला आहे. ताज आणि ओबेराय व हॉटेल मधील तमाम कष्टकरी वर्ग रात्री काम संपले की गोकुळ मध्ये अड्डा जमवतात. मग चर्चा , गॉसिप त्याच बरोबर कुणाला आखतात , क्रुझ वर नोकरी किंवा परदेशी शिकायला जाण्याचे बेत सगळे येथे रंगतात. सिंधी केंप वरून बाहेर पडलो की चेंबूर नाक्याच्या सर्कल जवळ भटांची झणझणीत मिसळ प्रसिद्ध आहे तिचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी सहापासून तेथे गर्दी असते. राम प्रहरी ती मुखी पडली की रात्रीची उरली सुरली नशा झटकन खाली येते.
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Wed, 12/12/2012 - 20:29 नवीन

आठवण!

बंगरुळुमध्ये इलेक्ट्रॉनिक शिटी फेज १ मध्ये अय्यर मेस म्हणून एक उत्तम खाणावळ होती (२००६-२००९, आता माहीत नाही :() तिथं सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ७ ते १० पर्यंत फक्त इडली, रवा इडली, प्लैन (इथं उच्चार असाच कारायचा असतो) डोसा, पोडी डोसा, सेट डोसा आणि उपमा मिळतो. वर्षभर जवळजवळ रोज केळीच्या पानात वाढलेला गरम-गरम उपमा त्यावर सांबार (आणि मी लोणचं मागून घ्यायचो :) ) खात होतो. मी आयुष्यभर रोज हेच खायला तयार आहे. कुणितरी बंगळुरुतल्या खादाडीच्या ठिकांणांनी अपडेटवा रे धागा!
  • Log in or register to post comments
प
प्रियाकूल Wed, 12/26/2012 - 18:48 नवीन

सेट डोसा आजकाल माझा फेवरेट

सेट डोसा आजकाल माझा फेवरेट झालाय.अजून बिसिब्याले भात आणि सोबत खारी बुंदी..झरोका मध्ये परवा झुकीनीचे सूप ट्राय केले. अप्रतिम स्वाद.आणि रागी डोसा कुठे उत्तम मिळतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
ब
बबन राव गुरुवार, 12/13/2012 - 10:40 नवीन

शादाब विसरलात का? हेइदराबादला

शादाब विसरलात का? हेइदराबादला चारमिनारजवलच आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 12/27/2012 - 16:49 नवीन

सॉरी हं!

शादाब हॉटेलला विसरलो नाहीय. पण अशात फारसं तिकडे गेलो नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन राव
झ
झुळूक Mon, 12/24/2012 - 14:15 नवीन

बंगळुरु

1. इन्दिरा नगरचे bbq nation बफे महाग आहे पण quality food आहे २. the dhaba: outer ring road, marathalli पासून kartik नगर ला जाणारा road माराथाल्ली पासून 500C बस पकडली तर ती the dhaba चा stop घेते..५ मीन च्या अंतरावर आहे non-veg साठी famous. 3.hydrabadi cuisine: सर्व प्रकारच्या biryani साठी नि non-veg साठी kundalahlli gate पासून whitefield ला जाणार्या रोड वर आहे,shell petrol pump नंतर स्वस्त नि मस्त 4.Biryani zone: कुन्दलहल्लि गेट जवळच, non veg.. माराथाल्ली मध्ये पण एक आहे पण ते जास्त चांगले नाहीये 5. Singhs Punjabi:कुन्दलहल्लि गेट पासून ३ मिनटाच्या अंतरावर आहे.. गेट जवळ असाल तर कुणाला तरी विचारून घ्या non-veg चांगले आहे पण veg बकवास आहे 6.Gowlkonda chimney: मी पहिल्यांदा कलमी कबाब इथे खाल्ले, मस्त आहे, पण महाग आहे रेस्त्रो थोडेसे कुन्दलहल्लि गेट पाशीच 7. मस्त कलंदर : टोटल veg पण जेवण छान आहे. माराथाल्ली नि(कॉस्मोस mall)च्या शेजारी.. खूप साऱ्या शाखा आहेत. 8.राजधानी : फोरम value mall , whitefield बफे ३५० मध्ये मिळतो, टोटल veg . पण रोज एक specilaity थाळी असते,गुजराती, राज्श्तानी नि मराठी पण इतके पदार्थ पानात येतात कि बास.. ऑफिस मधले वेज लोक उपास सोडायला इथेच जातात 9. नंदिनी : इंदिरा नगर चेच, BBQ Nation च्या समोरच आहे.. बाकी cobey सिझ्झ्लेर्स पण छान आहे.. 99 डोसा तर गाड्या वरच तरी करा..
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Mon, 12/24/2012 - 15:17 नवीन

धन्यवाद!

अजून भर. पुर्वी 'लड्डूज' आणि 'घर का खाना' मधले पदार्थ आवडायचे पण नंतर मला तरी आवडेनासे झाले. बिटीएम सेकंड स्टेज मध्ये स्वीट चॅरियट समोर एक बिहारी माणूस गाडा लावतो. तिथं आलू टिक्की, वेज क्रिस्पी आणि चीझ रोल अफलातून मिळतात. मी कमिशन न घेता त्याची गिर्हाईकं वाढवलियेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुळूक
स
सन्दीप Mon, 12/24/2012 - 14:47 नवीन

मस्त उप्योगी लीस्ट.

मस्त उप्योगी लीस्ट.
  • Log in or register to post comments
अ
अनुप कुलकर्णी Mon, 12/24/2012 - 15:46 नवीन

बेंगलोर मधील काही ठिकाणे:

बेंगलोर मधील काही ठिकाणे: चेत्तीयार्स (इंदिरा नगर) तमिळ पद्धतीच्या जेवणासाठी प्रसिध्द चिकन कोत्तू परोठा हा खास वेगळा पदार्थ(चिकन, अंड आणि कोत्तू ही चटणी घालून केलेली फोडणीची पोळी) जर मिळत असेल तर खेकडा सुध्धा must try... मस्त असतो... कूर्ग (इंदिरा नगर) इथे शुक्र-शनि-रवी ला बुफे असतो. खास कुर्गी पद्धतीचे जेवण मिळते. जर पोर्क खात असाल तर इथले पोर्क फ्राय लई म्हणजे लैच भारी! (शाकाहारी लोकांनी जाऊ नये :P... पैसे वाया जातील) MTR (लालबाग जवळ/Forum Mall, Whitefield ) MTR मसाले वाल्याची ही खानावळ. कर्नाटका पद्धतीची थाळी मिळते. भाजी, कोशिंबीर, चटणी, बिसिबेली भात, पोंगल, पुरी/डोसा, डाळवडा, मैसूरपाक, खीर, fruitsalad with icecream, विडा असा भरगच्च मेनू असतो. पण किमान १ तास waiting ची तयारी हवी. लालबाग जवळच्या शाखेत गेल्यास सकाळी लालबाग आणि दुपारी MTR मध्ये जेवून वामकुक्षीसाठी घरी परत असा छान बेत करता येतो. या पेक्षा कोरमंगलाच्या कृष्णा काफे मध्ये कमी गर्दीत चांगले जेवण मिळते म्हणतात...!(इथे मी अजून गेलो नाही) कामत(बसवन्गुडी) ... बसवन्गुडीच्या बुल टेम्पल जवळच हे ठिकाण आहे. इथे मस्त उत्तर कर्नाटका पद्धतीचे जेवण मिळते. त्यामध्ये "ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी" हे हासिल-ए-मैफिल असते! इथे सुध्धा वीकांत गर्दीचा असू शकतो. पण गर्दीच्या मनोरंजनासाठी कर्नाटकी शास्त्रीय संगीताचा live performance सुरु असतो! विद्यार्थी डोसा (गांधी बझार) इथला डोसा खूप प्रसिध्द आहे म्हणून गेलो होतो... पण आमच्या कोल्हापूरचा लोणी डोसा जर तेलात केला तर कसा लागेल तशी चव होती! :( मूडच गेला राव... (वर लिहिलेले कामत हॉटेल यापासून जवळच आहे... त्यामुळे तुमचाही आमच्यासारखाच मूड गेला तर तो backup option म्हणून ठेवता येईल :) ) अल्सूरचा धाबा इथल्या परोठ्याबद्दल ऐकून गेलो होतो. पण काय खास नाय. पण लस्सी आणि/किंवा ताक must try आहे. नुसते ते पिण्यासाठी तिथे गेलात तरी चालेल. मुळात त्या पेल्याचा आकारच एवढा असतो की पुढे परोठा खायला पंजाबी पिंडच पाहिजे. भोजोहारी मन्ना (कोरमंगला) कृष्णा काफे पासून जरा पुढे गेल्यावर हे ठिकाण आहे. बंगाली पद्धतीचे खाणे ही खासियत! आम्हाला काही खास आवडले नाही. पण तिथे आलेली बाकीची बंगाली मंडळी खाण्यावर ताव मारत होती त्यामुळे कदाचित आम्हाला बंगाली चवच आवडली नसेल असे समजून आम्ही बाहेर पडलो. राजवर्धन (जयनगर) खास मराठी खाणे... साबुदाणा खिचडी, वडापाव, मिसळ, थालीपीठ! कोर्नर होऊस खूप ठिकाणी आहे. लई भारी ice cream आणि sundaes Death By Chocolate आणि Dry Fruit Sundae एकदा तरी खायलाच हवे. आंब्याच्या मोसमात Mango with Cream... कमाल पदार्थ आहे. हायदराबादी हाउस (फोरमजवळ, कोरमंगला) बिर्याणीसाठी प्रसिध्द. पाया सूप पण छान असते. ईदच्या महिन्यात हलीम मिळते. हे चुकवू नका! याशिवाय राहम बिर्याणी सेन्टर(कमनहळ्ली), नंदना, एम्पायर(फेझेर टाऊन), भगिनी, अम्मी इ. ठिकाणच्या बिर्याण्या आहेतच! ओशन ट्रीट(बानसवाडी) मेंगालोरी सी फूड खास करून प्रोन्स घास्सी आणि त्यासोबत अप्पम... क्या बात है! कोकोनट ग्रोव (मारथल्ली) इथेही केरळी सी फूड कमाल भारी मिळायचे. करी मीन आणि boiled rice! मी २ वर्षांपूर्वी त्याजवळ राहायचो तेंव्हा खुपदा गेलो आहे. सध्याची कल्पना नाही. माजेस्टिक जवळच्या कामत मध्ये रागी डोसा आणि व्हीट डोसा देखील मिळतो कधी कधी... वेगळा प्रकार आहे. आणि हो ९९ डोसा तर आहेच!
  • Log in or register to post comments
झ
झुळूक Mon, 12/24/2012 - 16:44 नवीन

कॉर्नर हाउस

एक तर मराथल्लि ब्रिज पाशी पन आहे..spice garden शेजारी ..मस्त death by chocolate मिळते तिथे .. Roasted almonds तर माझे favorite आहे
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 12/24/2012 - 21:53 नवीन

निसर्ग नळ स्टोप जवळ

तिथे चिकन राजकुमार संतोषी फुल्ल बाजरीच्या भाकरी बरोबर खाल्ल्याशिवाय तुम्हाला चैन पडता काम नये...
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 12/24/2012 - 21:58 नवीन

हा धागा इतका जुना आहे???

लक्ष्यातच आले नाही...
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 12/26/2012 - 12:27 नवीन

पुण्यात कोरेगाव पार्कात ५व्या

पुण्यात कोरेगाव पार्कात ५व्या(की ७व्या) गल्लीत कोयला नामक प्युअर हैद्राबादी हॉटेल आहे, नुकताच गेलो होतो तिथे. अ‍ॅम्बियन्स एक नंबर, अगदी नबाबी स्टाईल. जेवणदेखील तसेच. मटका बिर्यानी विशेष मस्त. मडक्यावर कणकेचे आवरण लावलेली बिर्यानी आणि इतर काही डिशेस लय भारी.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Wed, 12/26/2012 - 12:51 नवीन

त्याचीच शाखा एफ.सी रोड ला आहे

त्याचीच शाखा एफ.सी रोड ला आहे....ग्रिल तंदूर वगैरे प्रकारासाठी मस्त आहे.... सातारा रोड वरच्या नातूबाग जवळची 'गीतांजली' ची मटन बिर्याणी खल्लास...एकदम गावरान चव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 12/26/2012 - 12:54 नवीन

जातोच थांब तिथे आता आधी

जातोच थांब तिथे आता :) आधी फर्गसन रोडवरती अन मग गीताञ्जली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मित्थु Wed, 12/26/2012 - 18:31 नवीन

पुणे

पौड रस्त्यावरील तिरंगा सुद्धा उत्तम आहे. त्यांची एक शाखा चिंचवड ला पण आहे बहुतेक.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Wed, 12/26/2012 - 18:57 नवीन

येस

पण मेन तिरंगा पुणे गावात आहे आणि ते सर्वात ब्येस्त आहे... पिंपळे सौदागर (पुणे)मधलं शिवर गार्डन पन मस्त आहे. ईराणी चहा अन ऑम्लेट साठी जहांगिर जवळचं वहुमन्'स कॅफे १नंबर... झालाच तर बर्गर किंग पण लै भारीये (कॅम्प, एम जी रोड)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्थु
म
मालोजीराव Wed, 12/26/2012 - 19:59 नवीन

कॅम्प आझम कॉलेज जवळ मदिना

कॅम्प आझम कॉलेज जवळ मदिना भारी आहे....आरबस्तानी डिश आणि कबाब मस्तच आहेत....चिकन कबाब २२ रु. प्लेट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
ब
बॅटमॅन Wed, 12/26/2012 - 20:07 नवीन

अरबी डिशेससाठी कल्याणीनगरात

अरबी डिशेससाठी कल्याणीनगरात मरकेश बेष्टाय. फालाफेल, श्वार्मा, इ.इ. अनेक डिशेस मस्त. शिवाय वातावरणदेखील मस्त. फर्स्ट फ्लोअरवर लहानशीच जागा आहे, तिथे मस्त दिवे आणि टेबल अगदी अरबी पद्धतीप्रमाणे, शिवाय सोबत अरबी/फारसी गाणी आणि हाटलात येणारा म्लेंछ-यवन (एतद्देशीय न्हवे खरेच) क्रौड पाहून मजा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मालोजीराव Wed, 12/26/2012 - 20:33 नवीन

चांदणी चौकातल्या ओअसिस मध्ये

चांदणी चौकातल्या ओअसिस मध्ये बोहेमियन म्हणू आहे....पण लय महाग हाये ट्राय नाय केला, ते कल्याणीनगर चं मरकेश आणि काफे अरेबिया एकच आहे का? लेबनीज बी मिळतंय म्हने ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 12/26/2012 - 20:52 नवीन

बोहेमियन...डोसक्यात अ‍ॅडवल्या

बोहेमियन...डोसक्यात अ‍ॅडवल्या गेले आहे. काफे अरेबिया अन मरकेश ची म्यानेजमेंट एकच की नै ते म्हैती नै. लेबनीज मोस्टलि मरकेशमध्येही मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
ब
ब़जरबट्टू Fri, 05/23/2014 - 10:38 नवीन

मस्तच...

धागा फारच कामाचा आहे..अद्यावत करावा.. ते नदीपलिकडचे काही हाटेलच नाहीये ईथे ?? :D
  • Log in or register to post comments
न
निलेश देसाई Fri, 05/23/2014 - 11:41 नवीन

पुण्यातील काही विसरलेलि ठिकाणे......

१. एसपी बिर्याणी - स.प.कॉलेज समोर उत्तम बिर्याणी २. आबाचा ढाबा - लक्ष्मि रोड, कुलकर्णी पेट्रोल पंपाशेजारी मालवणी चिकन आणि मातिच्या मडक्यातली तोंडाला कणिक लावलेली बिर्याणी ३. बाबा रामदेव ढाबा - भक्तीशक्ती च्या पाठीमागे, ट्रान्सपोर्ट नगर, निगडी पुण्यातली सर्वात भारी दाल-बाटी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा