जकार्ता येथे तीन चांगली भारतीय भोजनगृहे आहेतः
१. क्वीन्स,"सुंतर" तलावाच्या किनार्यावर (आमच्या भाषेत "दानाउ सुंतर") फोन नं. ६५०-९९६९. त्यांचेच थामरिन रोडवरही एक भोजनगृह आहे.
२. गणेश, एक संस्कृती (सुदिरमान रोड-सुब्रोतो रोड क्रॉसिंग) फोन नं. ५७१३५६७
३. जयपूर (रसूना सईद रोड) फोन नं. ०८५८८०९४३०४३
जकार्ताला सुंतर या विभागात भारतियांची वस्ती बरीच आहे. तिथे "मेहफिल" नावाचे छान जेवण मिळणारे पण 'डेकोर' जरा उडिपीस्टाईलचे असलेले छान भोजनगृह आहे.
आपण दिलेल्या भोजनगृहांचे फोन नं. दिल्यास उपकार होतील!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
पुणे-मुंबई जुन्या हायवेवर कासरवाडी (नाशिक फाटा) रेल्वे स्टेशन च्या आधी एक पेट्रोल-पंप आहे त्याच्या शेजारीच आहे हे विकास लंच होम. कोंकणी स्टाइल चे मासे खूप छान मिळतात पण आधी ऑर्डर देऊन जावे लागते. बसायला जागा खूप कमी आहे पण जेवण खूप छान असते.
नंबर: ९८५००२९९८०
नगर रस्त्यावरील विमाननगर-कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागाला जवळ काही झणझणीत भोजन स्थळे
यलो चिली - कोरेगाव पार्क मधील सातव्या गल्लीच्या टोकावर पाककला विशारद संजीव कपूरचे कबाब लाजबाब.
नॉर्दर्न फ्रॉन्टीयर - नगररस्त्यावरील आगाखान पॅलेसच्या जरा पुढे. पेशावरी व अमृतसरच्या कुकडूकूच्या चवीसाठी प्रसिद्ध
बारबेक्यू - नगर रोडवरील दास शोरुमच्या मागे - डायनिंग टेबलावर मध्यात शेगडी आणून त्यावर अनेक कबाब भाजायचे व अनेक सॉसेस रंगवून गट्टम करायचे त्यातून भूक राहिली तर नेहमीचे मेनूतील पदार्थांचा आस्वाद घ्यायचा. यासाठी लठ्ठ बिलाची तयारी हवी.
आणि
दी वेस्टर्न रॉयल टर्फ क्लब हाऊस - सोलापूर हायवेच्यालगत कॅम्पाच्या टोकाला - एका बाजूला घोडे जीव खाऊन पळतायत तर दुसरीकडे काही लोक निराश तर काही एकदम खुष असे चित्र दिसणारे एकटेच स्थळ. रेस कोर्स.
तिथली आदब, चव विलायती आवडीची. जवानीतील धाक दाखवणारी, गालभर मिशांची, रुपेरी केसांची मिलिटरीतील व्यक्तिमत्वे बियरचे घुटके घेत, रेसिंगची अंदाजपत्रके काळजीपुर्क वाचताना दिसली, की क्लबला आल्याचे समाधान लाभते व दारुची झिंग काही और येते. पण तेथे आत पाऊल ठेवायला आमच्या सारख्या क्लबची मेंबरशिप असलेल्यांशी सलगी नसेल तर मग कठीण आहे.
शशिकांत
काका,, ऐकलं होतं की बंद होणार आहे. पुण्यात नसल्याने गेली ३ वर्षं समजलं नाही.
मालवणी /मराठा चिकन आणि भाकरी, पापलेट तंदूर, सुरमई गोवन करी / मालवणी करी अशा अनेक पदार्थांसाठी येत्या वर्षात भेट द्यायचा पक्का प्लॅन होता.
काही अतिशय युनिक व्हेज डिश पण खूप आवडल्या होत्या ...
इतरत्र कुठे शाखा किंवा इतर पद्धतीचे काही नवीन उपहारगृह सुरु केले आहे / करणार आहात का?
म्हणजे येत्या डिसेंबर / जानेवारीत आस्वाद घेता येईल..
इतरत्र कुठे शाखा किंवा इतर पद्धतीचे काही नवीन उपहारगृह सुरु केले आहे / करणार आहात का?
म्हणजे येत्या डिसेंबर / जानेवारीत आस्वाद घेता येईल
नजिकच्या भविष्यात, भारतात, कुठलीही योजना नाही. सध्या मस्कत एके मस्कत. पावभाजी, पंजाबी चाट आणि बरोबर कांही खास मराठी पदार्थ (जसे, कांदेपोहे, झुणका-भाकर, साबुदाणा खिचडी, मिसळ-पाव, भाकरी भरीत इ.इ.)असा भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले दुसरे उपहारगृह, दसर्याच्या मुहुर्तावर, सुरु करीत आहे.
आणि पूर्णब्रह्म देखील :)
मित्रा "जी"द्वय, मोगलांच्या घोड्यांनी तुला पाण्यात बघितलं नसेल तेव्हढं मी तुला येता एक आठवडा प्रत्येक घासात बघणार... पण प्रेमाने बरं का.
अर्धवटराव
माहितीबद्धल धन्यवाद, संताजी धनाजी.
पिस्ता हाउसचा उल्लेख केल्याशिवाय हैदराबाद मधील हॉटेलांची यादी पूर्ण होणार नाही.
१. चारमिनारचे पिस्ता हाउस आणि २. मेहदीपट्टणमचे सर्वी रेस्तरों ही हॉटेले हलीमसाठी (आणि हैदराबादच्या पेटंट चिकन दम बिर्याणीसाठी देखील) प्रसिद्ध आहेत. तथापि, इथे हलीम केवळ रमजानच्या महिन्यातच मिळते.
चिकन दम बिर्याणीसाठी माझी प्रथम पसंती केवळ आणि केवळ शाह गौस हॉटेललाच! इथली बिर्याणी खाऊन पहावीच.
चारमिनारहून फलक्नुमा पलेस (आता ताज ग्रुपचे फलक्नुमा हॉटेल) कडे जाताना लाल दरवाजाच्या किंचित पुढे असलेले शाह गौस हे हॉटेल पर्यटकांना फारशे माहित नसले तरी, हैदराबादी खवय्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे.
इथे दररोज नाहारी पाया आणि शनिवारी अप्रतीम चिकन नाहारी (निहारी नव्हे!) मिळते.
("ओल्डसिटी" मध्ये असल्यामुळे की काय) या हॉटेलात चकचकीतपणाचा अभाव आहे.
"लवंगी मिरची"
कोल्हापुरी चिकन आणि मटन थाळी, काळे मटन उत्तमच, पांढरा रस्सा एक नंबर आणि quantity ला सुट्टी नाही.
city pride कोथरूड जवळ, गांधी लौंस समोर, seed च्या बिल्डिंग मधेच
बंगलोर मधील काही ठिकाणे:
ग्रामीण हॉटेल,रहेजा आर्केड, कोरमंगला.
अम्मीज बिर्याणी कोरमंगला.
हॉटेल झरोका ,एच एस आर.
BBQ आहेच
शिव सागर आणि त्याच्या काही ब्रान्चेस मध्ये पण छान मिळते.
९९ डोसा हा पण प्रकार इकडे आल्यावर नक्की ट्राय करायला हवा. मस्तच असतो.तो गाड्यावर मिळतो.एच एस आर मध्ये मेक डी समोर असतो हा गाडा.
(मी व्हेज आहे.हि थोडीफार माहितीची ठिकाणे.)
अल्सूर चा हा धाबा अतिशय टुकार आहे. मी दोन वेळा ट्राय केलं पण...
बंगलोर ला पंजाबी खायच असेल तर "द व्हिलेज" नावाचं रेस्त्रो आहे इन्दिरानगर मधे. ट्राय करा.
बाकि बंगलोर मधे ट्राय कराविच अशी ठिकणे:
१) हैदराबाद हाउस, कोरमंगला- अप्रतिम बिर्याणी.
२) अण्णाची, इंदिरानगर- जर तुम्हि अजुन चेट्टिनाड फूड ट्राय केलं नसेल तर जरुर करा. चेट्टिनाड फूड इज जस्ट अमेझिन्ग!
३) नंदिनी, बर्याच शाखा- इथे दोन गोष्टी ट्राय करा. चीकन बिर्याणी आणी आंध्रा मिल्स. मस्ट ट्राय.
४) चीकन कौन्ट्यी, बनेरगट्टा रोड- इथे ग्रील्ड चीकन ट्राय करा. मस्त!
५) नलपका, राजाजी नगर- इथे भाकरि आणी वांग्याची भाजी मिळते. नोर्थ करनाटका स्पेशलिटी!
चेंबूरच्या काही प्रसिद्ध उपहार गृहांची माहिती
स्टेशन च्या बाहेर आल्यावर प्रसिद्ध पावभाजी साठी सद्गुरू हॉटेल
त्याची एक शाखा ५ मिनिटावर बाजूच्या गल्लीत मुंबई महानगर पालिकेच्या कार्यालयाच्या बाजूला आहे.
सद्गुरू च्या समोर आंबेडकर गार्डन आहे . तेथे दाक्षिणात्य जेवणासाठी प्रसिद्ध गीता भवन आहे.( राज कपूर येथे डोसा चापायचा यायचा.
चेंबूर चे प्रसिद्ध डायमंड गार्डन जवळ सरोज हे जुने प्रसिद्ध दाक्षिणात्य उपहार गृह आहे.
चेंबूर ची खाऊ गल्ली म्हणजे सिंधी केंप
येथे जामा नावाचे प्रसिद्ध मिष्टान्न भांडार आहे. त्याची गोड बिर्याणी प्रसिद्ध आहे. समोरच स्वस्त आणि मस्त पराठे वाल्याचा धाबा आहे.
फाळणी नंतर पंजाबी व सिंधी लोकांनी येथे येऊन आपली खाद्य संस्कृती येथे रुजवली.
आहे.
सिंधी जेवणासाठी प्रसिद्ध विग
रात्रीची मौज मजा करून झाली की सकाळी येथे सिंधी नाश्ता करावयास अनेक वेळा आलो आहे.
दाल पकवान ही सिंधी न्याहारी ची खासियत ( हे मुंबई मध्ये नंबर १ आहे ) झकास
येथे पितळ्याच्या पेल्यातील खरे ताक प्यायलो की
रात्रीची .......
२४ तास मद्यपींचा सेवा करणारा व बिर्याणी साठी प्रसिद्ध असलेला राज बार
ही सिंधी केंप ची खासियत
मध्य रात्री नंतर राजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या राहतात. आणि काळ्या पिशवीतून चढ्या भावाने ..........
माझ्या माहितीत अशी २४ तास ग्राहकांच्या सेवेस सज्ज एक राज
व दुसरा बार म्हणजे गोकुळ बार जो ताज हॉटेल च्या मागे
बडे मिया च्या बाजूला आहे.
ताज आणि ओबेराय व हॉटेल मधील तमाम कष्टकरी वर्ग रात्री काम संपले की गोकुळ मध्ये अड्डा जमवतात.
मग चर्चा , गॉसिप त्याच बरोबर कुणाला आखतात , क्रुझ वर नोकरी किंवा परदेशी शिकायला जाण्याचे बेत सगळे येथे रंगतात.
सिंधी केंप वरून बाहेर पडलो की चेंबूर नाक्याच्या सर्कल जवळ भटांची झणझणीत मिसळ
प्रसिद्ध आहे
तिचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी सहापासून तेथे गर्दी असते.
राम प्रहरी ती मुखी पडली की रात्रीची उरली सुरली नशा झटकन खाली येते.
बंगरुळुमध्ये इलेक्ट्रॉनिक शिटी फेज १ मध्ये अय्यर मेस म्हणून एक उत्तम खाणावळ होती (२००६-२००९, आता माहीत नाही :() तिथं सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ७ ते १० पर्यंत फक्त इडली, रवा इडली, प्लैन (इथं उच्चार असाच कारायचा असतो) डोसा, पोडी डोसा, सेट डोसा आणि उपमा मिळतो. वर्षभर जवळजवळ रोज केळीच्या पानात वाढलेला गरम-गरम उपमा त्यावर सांबार (आणि मी लोणचं मागून घ्यायचो :) ) खात होतो. मी आयुष्यभर रोज हेच खायला तयार आहे.
कुणितरी बंगळुरुतल्या खादाडीच्या ठिकांणांनी अपडेटवा रे धागा!
सेट डोसा आजकाल माझा फेवरेट झालाय.अजून बिसिब्याले भात आणि सोबत खारी बुंदी..झरोका मध्ये परवा झुकीनीचे सूप ट्राय केले. अप्रतिम स्वाद.आणि रागी डोसा कुठे उत्तम मिळतो?
1. इन्दिरा नगरचे bbq nation बफे महाग आहे पण quality food आहे
२. the dhaba: outer ring road, marathalli पासून kartik नगर ला जाणारा road
माराथाल्ली पासून 500C बस पकडली तर ती the dhaba चा stop घेते..५ मीन च्या अंतरावर आहे
non-veg साठी famous.
3.hydrabadi cuisine: सर्व प्रकारच्या biryani साठी नि non-veg साठी
kundalahlli gate पासून whitefield ला जाणार्या रोड वर आहे,shell petrol pump नंतर
स्वस्त नि मस्त
4.Biryani zone: कुन्दलहल्लि गेट जवळच, non veg..
माराथाल्ली मध्ये पण एक आहे पण ते जास्त चांगले नाहीये
5. Singhs Punjabi:कुन्दलहल्लि गेट पासून ३ मिनटाच्या अंतरावर आहे.. गेट जवळ असाल तर कुणाला तरी विचारून घ्या
non-veg चांगले आहे पण veg बकवास आहे
6.Gowlkonda chimney: मी पहिल्यांदा कलमी कबाब इथे खाल्ले, मस्त आहे, पण महाग आहे रेस्त्रो थोडेसे
कुन्दलहल्लि गेट पाशीच
7. मस्त कलंदर : टोटल veg पण जेवण छान आहे. माराथाल्ली नि(कॉस्मोस mall)च्या शेजारी.. खूप साऱ्या शाखा आहेत.
8.राजधानी : फोरम value mall , whitefield बफे ३५० मध्ये मिळतो, टोटल veg .
पण रोज एक specilaity थाळी असते,गुजराती, राज्श्तानी नि मराठी पण इतके पदार्थ पानात येतात कि बास..
ऑफिस मधले वेज लोक उपास सोडायला इथेच जातात
9. नंदिनी : इंदिरा नगर चेच, BBQ Nation च्या समोरच आहे..
बाकी cobey सिझ्झ्लेर्स पण छान आहे..
99 डोसा तर गाड्या वरच तरी करा..
अजून भर.
पुर्वी 'लड्डूज' आणि 'घर का खाना' मधले पदार्थ आवडायचे पण नंतर मला तरी आवडेनासे झाले.
बिटीएम सेकंड स्टेज मध्ये स्वीट चॅरियट समोर एक बिहारी माणूस गाडा लावतो. तिथं आलू टिक्की, वेज क्रिस्पी आणि चीझ रोल अफलातून मिळतात. मी कमिशन न घेता त्याची गिर्हाईकं वाढवलियेत.
बेंगलोर मधील काही ठिकाणे:
चेत्तीयार्स (इंदिरा नगर)
तमिळ पद्धतीच्या जेवणासाठी प्रसिध्द
चिकन कोत्तू परोठा हा खास वेगळा पदार्थ(चिकन, अंड आणि कोत्तू ही चटणी घालून केलेली फोडणीची पोळी)
जर मिळत असेल तर खेकडा सुध्धा must try... मस्त असतो...
कूर्ग (इंदिरा नगर)
इथे शुक्र-शनि-रवी ला बुफे असतो. खास कुर्गी पद्धतीचे जेवण मिळते.
जर पोर्क खात असाल तर इथले पोर्क फ्राय लई म्हणजे लैच भारी!
(शाकाहारी लोकांनी जाऊ नये :P... पैसे वाया जातील)
MTR (लालबाग जवळ/Forum Mall, Whitefield )
MTR मसाले वाल्याची ही खानावळ.
कर्नाटका पद्धतीची थाळी मिळते. भाजी, कोशिंबीर, चटणी, बिसिबेली भात, पोंगल, पुरी/डोसा, डाळवडा, मैसूरपाक, खीर, fruitsalad with icecream, विडा असा भरगच्च मेनू असतो. पण किमान १ तास waiting ची तयारी हवी.
लालबाग जवळच्या शाखेत गेल्यास सकाळी लालबाग आणि दुपारी MTR मध्ये जेवून वामकुक्षीसाठी घरी परत असा छान बेत करता येतो.
या पेक्षा कोरमंगलाच्या कृष्णा काफे मध्ये कमी गर्दीत चांगले जेवण मिळते म्हणतात...!(इथे मी अजून गेलो नाही)
कामत(बसवन्गुडी) ...
बसवन्गुडीच्या बुल टेम्पल जवळच हे ठिकाण आहे.
इथे मस्त उत्तर कर्नाटका पद्धतीचे जेवण मिळते. त्यामध्ये "ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी" हे हासिल-ए-मैफिल असते!
इथे सुध्धा वीकांत गर्दीचा असू शकतो. पण गर्दीच्या मनोरंजनासाठी कर्नाटकी शास्त्रीय संगीताचा live performance सुरु असतो!
विद्यार्थी डोसा (गांधी बझार)
इथला डोसा खूप प्रसिध्द आहे म्हणून गेलो होतो... पण आमच्या कोल्हापूरचा लोणी डोसा जर तेलात केला तर कसा लागेल तशी चव होती! :(
मूडच गेला राव...
(वर लिहिलेले कामत हॉटेल यापासून जवळच आहे... त्यामुळे तुमचाही आमच्यासारखाच मूड गेला तर तो backup option म्हणून ठेवता येईल :) )
अल्सूरचा धाबा
इथल्या परोठ्याबद्दल ऐकून गेलो होतो. पण काय खास नाय.
पण लस्सी आणि/किंवा ताक must try आहे. नुसते ते पिण्यासाठी तिथे गेलात तरी चालेल.
मुळात त्या पेल्याचा आकारच एवढा असतो की पुढे परोठा खायला पंजाबी पिंडच पाहिजे.
भोजोहारी मन्ना (कोरमंगला)
कृष्णा काफे पासून जरा पुढे गेल्यावर हे ठिकाण आहे. बंगाली पद्धतीचे खाणे ही खासियत!
आम्हाला काही खास आवडले नाही. पण तिथे आलेली बाकीची बंगाली मंडळी खाण्यावर ताव मारत होती त्यामुळे कदाचित आम्हाला बंगाली चवच आवडली नसेल असे समजून आम्ही बाहेर पडलो.
राजवर्धन (जयनगर)
खास मराठी खाणे... साबुदाणा खिचडी, वडापाव, मिसळ, थालीपीठ!
कोर्नर होऊस
खूप ठिकाणी आहे.
लई भारी ice cream आणि sundaes
Death By Chocolate आणि Dry Fruit Sundae एकदा तरी खायलाच हवे.
आंब्याच्या मोसमात Mango with Cream... कमाल पदार्थ आहे.
हायदराबादी हाउस (फोरमजवळ, कोरमंगला)
बिर्याणीसाठी प्रसिध्द. पाया सूप पण छान असते.
ईदच्या महिन्यात हलीम मिळते. हे चुकवू नका!
याशिवाय
राहम बिर्याणी सेन्टर(कमनहळ्ली), नंदना, एम्पायर(फेझेर टाऊन), भगिनी, अम्मी इ. ठिकाणच्या बिर्याण्या आहेतच!
ओशन ट्रीट(बानसवाडी)
मेंगालोरी सी फूड खास करून प्रोन्स घास्सी आणि त्यासोबत अप्पम... क्या बात है!
कोकोनट ग्रोव (मारथल्ली)
इथेही केरळी सी फूड कमाल भारी मिळायचे. करी मीन आणि boiled rice!
मी २ वर्षांपूर्वी त्याजवळ राहायचो तेंव्हा खुपदा गेलो आहे. सध्याची कल्पना नाही.
माजेस्टिक जवळच्या कामत मध्ये रागी डोसा आणि व्हीट डोसा देखील मिळतो कधी कधी... वेगळा प्रकार आहे.
आणि हो ९९ डोसा तर आहेच!
पुण्यात कोरेगाव पार्कात ५व्या(की ७व्या) गल्लीत कोयला नामक प्युअर हैद्राबादी हॉटेल आहे, नुकताच गेलो होतो तिथे. अॅम्बियन्स एक नंबर, अगदी नबाबी स्टाईल. जेवणदेखील तसेच. मटका बिर्यानी विशेष मस्त. मडक्यावर कणकेचे आवरण लावलेली बिर्यानी आणि इतर काही डिशेस लय भारी.
त्याचीच शाखा एफ.सी रोड ला आहे....ग्रिल तंदूर वगैरे प्रकारासाठी मस्त आहे....
सातारा रोड वरच्या नातूबाग जवळची 'गीतांजली' ची मटन बिर्याणी खल्लास...एकदम गावरान चव !
पण मेन तिरंगा पुणे गावात आहे आणि ते सर्वात ब्येस्त आहे...
पिंपळे सौदागर (पुणे)मधलं शिवर गार्डन पन मस्त आहे.
ईराणी चहा अन ऑम्लेट साठी जहांगिर जवळचं वहुमन्'स कॅफे १नंबर...
झालाच तर बर्गर किंग पण लै भारीये (कॅम्प, एम जी रोड)
अरबी डिशेससाठी कल्याणीनगरात मरकेश बेष्टाय. फालाफेल, श्वार्मा, इ.इ. अनेक डिशेस मस्त. शिवाय वातावरणदेखील मस्त. फर्स्ट फ्लोअरवर लहानशीच जागा आहे, तिथे मस्त दिवे आणि टेबल अगदी अरबी पद्धतीप्रमाणे, शिवाय सोबत अरबी/फारसी गाणी आणि हाटलात येणारा म्लेंछ-यवन (एतद्देशीय न्हवे खरेच) क्रौड पाहून मजा येते.
प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या बाहेर...
जकार्ता
बेंगळुरु
विकास लंच होम (मासे)
रत्नागिरी(मासे)
आणखी काही झणझणीत भोजन स्थळे
अक्षर खूण साठवली आहे.
ह्या लेखाला वाचन खूण केल्या
दुर्दैव...
:(
सध्या तरी मस्कत एके मस्कत....
भरगच्च मेन्यू घेऊन मस्कतमधले
छान बातमी. अभिनंदन काका.
अभिनंदन काका !
धन्यवाद मैत्र, प्रभो, रेवती
शुभेछ्छा
अभिनंदन काका.....
अजी मी ब्रह्म पाहिले...
माझी प्रथम पसंती
आयला हा लेख कसा काय नजरेतून
+१
+११
लवंगी मिरची
आनंद जाहला.
बंगलोर
बंगलोर ला..
ओवर रेटेड!
चेंबूरच्या काही प्रसिद्ध
आठवण!
सेट डोसा आजकाल माझा फेवरेट
शादाब विसरलात का? हेइदराबादला
सॉरी हं!
बंगळुरु
धन्यवाद!
मस्त उप्योगी लीस्ट.
बेंगलोर मधील काही ठिकाणे:
कॉर्नर हाउस
निसर्ग नळ स्टोप जवळ
हा धागा इतका जुना आहे???
पुण्यात कोरेगाव पार्कात ५व्या
त्याचीच शाखा एफ.सी रोड ला आहे
जातोच थांब तिथे आता आधी
पुणे
येस
कॅम्प आझम कॉलेज जवळ मदिना
अरबी डिशेससाठी कल्याणीनगरात
चांदणी चौकातल्या ओअसिस मध्ये
बोहेमियन...डोसक्यात अॅडवल्या
मस्तच...
पुण्यातील काही विसरलेलि ठिकाणे......