पैसे सोडून बोल...
पंधरा दिवसांपुर्वीची गोष्ट.
लोकेश, माझा क्युबिकलमेट मला अचानक म्हणाला, "सरजी थोडा हेल्प चाहीये."
लोकेश आणि मी गेले वर्षभर एकाच क्युबिकलमध्ये बसतोय. दोघांचंच क्युबिकल. त्यामुळे आम्ही फक्त कलीग न राहता बर्यापैकी मित्र झालो आहोत. माझ्याच वयाचा आहे तो. लग्नाला तीन वर्ष झालेली. एक छोटी मुलगीही आहे त्याला. त्यामुळे अधूनमधून पाच दहा हजार मागायचा माझ्याकडे. आठवडयाभरात परतही करायचा.
आताही त्याने असेच पैसे मागितले. पण थोडे जास्त. तीस हजार.
"क्यूं रे इतना? कुछ प्रॉब्लेम हैं क्या?"
"अरे नही सरजी. एक दोस्त को बहुत जरुरत हैं. आप दे दो. मैं पक्कासे ये मंथ एंड को दे देता हुं आपका पैसा."
"बस क्या दोस्त, मैंने वैसा कुछ कहा क्या. दे देता हुं मैं. लेकीन थोडा संभालके यार. आजकल लोग पैसे के मामले बे बहूत अजीब हो गये हैं."
मी त्याच्या बँक अकाऊंटमध्ये तीस हजार टाकले. लोकेशच्या मित्राला ते पैसे तिसर्याच मित्राच्या अकाऊंटमध्ये हवे होते. असेल काही अडचण. त्यानूसार लोकेशने ते तीस हजार त्या तिसर्या मित्राच्या अकाऊंटमध्ये विशेष ओळख नसताना पैसे टाकले. ते पैसे त्याच्या मित्राला मिळालेही.
महिना संपला. लोकेशने न विसरता मला पैसे ट्रान्स्फर केले. पण एक मोठा लोचा झाला. पैसे ट्रान्सफर करण्याच्या अकाऊंट लिस्टमध्ये माझ्या नावाच्या खाली लोकेशच्या मित्राच्या मित्राचे नाव होते. लोकेशने माझे नाव सिलेक्ट केले. पण माऊसला स्क्रोल बटन असल्यामुळे चुकूण स्क्रोल झाले आणि त्या तिसर्या मित्राचे नाव सिलेक्ट झाले. नेक्स्ट बटन दाबले. पुढचं पान पैसे ट्रान्सफरसाठी दिलेल्या माहितीच्या कन्फरमेशनसाठी असतं. काही चुकीची माहिती असेल तर ते डीटेल्स बदलता येतात. इथे मात्र सवयीने लोकेशने डोळेझाक केली आणि तीस हजार लोकेशच्या मित्राच्या त्या अकाऊंटवाल्या मित्राला ट्रान्सफर झाले...
पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर लोकेशला चूक कळली. त्या अकाउंटवाल्या मित्राला फोन केला. त्यानेही आता मिटींगमध्ये आहे, मीटींग संपली की पाहतो असं म्हणून फोन ठेवून दिला. त्यानंतर मात्र ते साहेब लोकेशचा फोनही उचलेनात आणि मेसेजला रीप्लायही देईनात. लोकेशने आपल्या मित्राला हे सारं सांगितलं. पण हे अकाऊंटवाले महाशय मित्रालाही दाद देईनात. बँकेला फोन केला. बँकवाले म्हणाले, बँक याच्यात काहीच करु शकत नाही. ऑनलाईन मनी ट्रान्सफरच्या वापरासाठीच्या नियमावलीत असं क्लियर लिहिलं आहे की अशा चुकांना बॅंक जबाबदार नाही. फार तर आम्ही तुम्हाला त्या ट्रान्सॅक्शनचे डीटेल्स लेखी देऊ.
बँकेने त्या मित्राचे खाते चेक केले. साहेबांनी ते तीस हजार त्याच दिवशी खात्यातून काढले होते.
ते अकाउंटवाले साहेब चेन्नईला एका नामांकीत कंपनीत संगणक अभियंता आहेत...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
परेश माझा चुलत चुलत भाऊ. मूंबईला एका मेडीकल सर्जिकल इक्विपमेंट बनवणार्या कंपनीत टेक्निशीयन. एक दिवस अचानक त्याचा फोन आला.
"दादा, मी आणि माझे मित्र भागीदारीत एक सर्जीकल एक्विपमेंटची कंपनी विकत घेतोय. माझ्या हिश्श्याचे पैसे उभे करण्यासाठी मला तुझ्याकडून मदत हवी आहे."
"किती हवेत?"
"पन्नास हजार."
आधी पैशांच्या बाबतीत वाईट अनुभव असल्यामुळे मी एव्हढे पैसे त्याला देणे शक्यच नव्हतं. पण लहान भाऊ काहीतरी करतोय म्हणून त्याला नाही म्हणणं माझ्या जीवावर आलं होतं. शेवटी मी मनाचा हिय्या करुन पंचवीस हजार दिले त्याला. गणपतीत दिलेले पैसे दिवाळीत परत करायचे असं ठरलं. दिवाळी आली आणि गेली. शिमगा आला. शिमग्यानंतर त्याचं लग्न झालं. साहेब मला पैसे परत करण्याचे नाव काढीनात. मी फोन केला की उचलायचाच नाही. दोन तीन वेळा सलग कॉल केला की फोन स्विच ऑफ करायचा असे प्रकार साहेबांनी सुरू केले. एकदा कधीतरी फोन उचलला त्याने. दादा मी अमुक अमुक तारखेला पुण्याला येतोय तेव्हा पैसे देईन. त्या तारखेनंतर दोन महिने गेले तरी साहेबांचा पत्ता नाही. पुढच्या वर्षीचे गणपती आले. दिवाळी आली. त्याच्या छोटया भावाचंही लग्न झालं. माझी कुठे भेट झाली की साहेब बेशरमसारखे हवापाण्याच्या गप्पा मारायचे. पण पैसे देण्याचे नाव काढायचे नाहीत. आमचा हा पैशाचा व्यवहार त्याच्या बाबांना म्हणजे माझ्या काकांनाही माहिती होता. पण ते ही सोयिस्करपणे डोळेझाक करत होते. त्यांच्याकडे दोन दोन मुलांची लग्न करायला पैसे होते. पण मी त्यांना गरजेच्या वेळी दिलेले पैसे परत करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. शेवटी मी काकांच्या छोटया मुलाला हे सारं सांगितलं. तो बर्यापैकी सेन्सिबल आहे. त्याने साडे बारा साडे बारा असे दोन टप्प्यात पैसे दिले. अर्थात ते पैसे त्याने घरातूनच घेऊन दिले असणार.
मी त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी पैसे दिले ही माझी चुकच झाली होती....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी अमेरिकेत असतानाची गोष्ट. सप्टेंबर महिना असावा. एका सकाळी सकाळी अश्विनचा, माझ्या मित्राचा फोन आला.
"अरे मी अशा अशा अडचणीत आहे. मला पन्नास हजार रुपये दे. दिवाळीत माझे बोनस आणि अॅरीयर्सचे पैसे मिळणार आहेत. ते मिळाले की मी तुझे पैसे तुला परत करेन."
अश्विन खुपच जवळचा मित्र होता. मी भारतात असताना त्याच्या घरी येणं जाणं होतं. त्याची बायको मला भाऊ मानायची. पैसे नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. पण पन्नास हजार जरा जास्तच वाटत होते. नाही दिले तर काय करणार असाही प्रश्न होताच.
"हे बघ माझे पैशाचे सारे व्यवहार सध्या बाबा पाहतात. मी माझ्या भारतातल्या अकाउंटमधून ऑनलाईन पन्नास हजार काढले तर ते बाबांना लगेच कळेल. आता मी तुला वीस हजार रुपये देतो. बाबांना काहीतरी सांगेन मी. बाकीचं नंतर बघू."
मी त्याला अशा पद्धतीने वीस हजार दिले.
यथावकाश मी भारतात आलो. दिवाळी झाली. माझे पैसे देणे बाजूलाच राहिलं, माझ्या मित्राच्या बायकोने घरची परिस्थिती कशी वाईट आहे, अश्विनला एक कोर्स करायचा आहे म्हणून तू पाच हजार दे असं म्हणून पुन्हा एकदा पैसे घेतले.
या गोष्टीला आता तीन वर्ष झाली. अश्विनचं बाकी सारं व्यवस्थित चालू आहे. मला कधीतरी अचानक पैशाची गरज पडते. मी आपले पैसे अश्विनकडे आहेत म्हणून फोन करतो. त्याचं रडगाणं सुरु होतं. "अरे तू पाहतोयस ना मी किती वाईट परिस्थितीतून जातोय. माझ्याकडे पैसे असते तर मी दिले नसते का?"
मी हताशपणे फोन ठेवून देतो. माझे ते पंचवीस हजार बुडाल्यात जमा आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही सुद्धा मी अमेरिकेत असतानाचीच गोष्ट. माधव माझा खुप जुना मित्र. मी बारावी झाल्यानंतर मेडीकलच्या सीईटीच्या कोचिंगसाठी कोल्हापूरला गेलो तेव्हा त्याच्याशी ओळख झाली. तो तेव्हा मराठीतून एम ए करत होता. मी काही मेडीकलला गेलो नाही. इंजिनीयरींगला असताना मी त्याला निळं अंतर्देशीय पत्र पाठवत असे. तो ही उत्तरं देत असे. मी अमेरिकेला जाणार आहे हे कळल्यावर तो मला भेटायला मुंबईला आला. आम्ही माझ्या गावी गेलो. मला आमच्या या पत्रातून टिकलेल्या मित्रीचं खुप अप्रुप वाटायचं.
एक दिवस त्याचा फोन आला. म्हणे मला दहा हजार रुपये हवेत. एक डॉलर म्हणजे पन्नास रुपये. दहा हजार काही विशेष नव्हते. कधी परत करणार वगैरे काहीही न विचारता मी तेव्हढे पैसे त्याला दिले. पुढे भारतात आल्यावर एकदा सहज म्हणून पैसे कधी परत करणार आहेस म्हणून विचारलं. देतो लवकरच म्हणाला.
आणि त्यानंतर कधीही त्याने माझा फोन उचलला नाही. फक्त रिंग होऊ दयायचा. मी कंटाळून फोन करणं बंद केलं. मला ते पैसे परत हवेच होते असं काही नव्हतं. पण पैसे मागितल्यानंतर मात्र खुप विचित्र वागला तो. पुन्हा पंधरा दिवसांनी वगैरे फोन केला तेव्हा लक्षात आलं की त्याने फोन नंबर बदलला आहे. मी त्या दहा हजारांसाठी कुठे कोल्हापूरला जाणार होतो. आणि त्याहीपेक्षा म्हणजे त्याने त्याचा जो काही प्रॉब्लेम होता तो मोकळेपणाने सांगायला हवा होता.हे असं फोन न उचलणं आणि नंतर नंबर बदलणं या गोष्टीचं खुप वाईट वाटलं.
सहा सात वर्ष अंतरदेशीय पत्रातून टिकलेली आमची मैत्री त्याने अशा पद्धतीने संपवली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता मात्र मी शहाणा झालोय. कुणी म्हटलं की अरे थोडी मदत हवीय की त्यानं पुढचं काही म्हणायच्या आधीच मी म्हणतो, "पैसे सोडून बोल". मग तो कुणीही, कितीही जवळचा असो. पैसे देण्यास नाही म्हटलं तर नातं दुरावेल, हरकत नाही. जे नंतर होणार आहे ते आता होईल...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
ए काय चाललंय रे..??
राग वैग्रे कसला हो
अबे.. तुला एकट्याला उत्तर नाहीये ते..
अबे.. तुला एकट्याला उत्तर
सोडा प्यायला भेटशील ना..? तिथेच साखरेची साल काढूया..
भेटूयात की आज १० वाजता तिथं.
लक्ष आहे बरं का माझे.
वल्लीसाहेब, द्या टाळी! मला
हॅहॅहॅ. मलाही आधी पुलंच लिखाण
हे पण तुला भावणार नाही का रे..?
पुलंच्या एकूण सर्वसाधारण
मोदकाला पण हार्दिक
हम्म्.......फार काही
संवेदनशीलतेची दारे कृपया बंद करु नका...
+१
इतरांसारखी माझी पण फसवणुक
नक्किच वाईट वाटत, छोटी जरी
+१
मी दिले
धोतराचा किस्सा आवडला. असे धडा
+१
आम्हीसुद्धा +१
आनंद आहे, यावर अतिशय चांगला
सेम टू सेम !!!!!