✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पैसे सोडून बोल...

ध
धन्या यांनी
Mon, 05/07/2012 - 13:40  ·  लेख
लेख
पंधरा दिवसांपुर्वीची गोष्ट. लोकेश, माझा क्युबिकलमेट मला अचानक म्हणाला, "सरजी थोडा हेल्प चाहीये." लोकेश आणि मी गेले वर्षभर एकाच क्युबिकलमध्ये बसतोय. दोघांचंच क्युबिकल. त्यामुळे आम्ही फक्त कलीग न राहता बर्‍यापैकी मित्र झालो आहोत. माझ्याच वयाचा आहे तो. लग्नाला तीन वर्ष झालेली. एक छोटी मुलगीही आहे त्याला. त्यामुळे अधूनमधून पाच दहा हजार मागायचा माझ्याकडे. आठवडयाभरात परतही करायचा. आताही त्याने असेच पैसे मागितले. पण थोडे जास्त. तीस हजार. "क्यूं रे इतना? कुछ प्रॉब्लेम हैं क्या?" "अरे नही सरजी. एक दोस्त को बहुत जरुरत हैं. आप दे दो. मैं पक्कासे ये मंथ एंड को दे देता हुं आपका पैसा." "बस क्या दोस्त, मैंने वैसा कुछ कहा क्या. दे देता हुं मैं. लेकीन थोडा संभालके यार. आजकल लोग पैसे के मामले बे बहूत अजीब हो गये हैं." मी त्याच्या बँक अकाऊंटमध्ये तीस हजार टाकले. लोकेशच्या मित्राला ते पैसे तिसर्‍याच मित्राच्या अकाऊंटमध्ये हवे होते. असेल काही अडचण. त्यानूसार लोकेशने ते तीस हजार त्या तिसर्‍या मित्राच्या अकाऊंटमध्ये विशेष ओळख नसताना पैसे टाकले. ते पैसे त्याच्या मित्राला मिळालेही. महिना संपला. लोकेशने न विसरता मला पैसे ट्रान्स्फर केले. पण एक मोठा लोचा झाला. पैसे ट्रान्सफर करण्याच्या अकाऊंट लिस्टमध्ये माझ्या नावाच्या खाली लोकेशच्या मित्राच्या मित्राचे नाव होते. लोकेशने माझे नाव सिलेक्ट केले. पण माऊसला स्क्रोल बटन असल्यामुळे चुकूण स्क्रोल झाले आणि त्या तिसर्‍या मित्राचे नाव सिलेक्ट झाले. नेक्स्ट बटन दाबले. पुढचं पान पैसे ट्रान्सफरसाठी दिलेल्या माहितीच्या कन्फरमेशनसाठी असतं. काही चुकीची माहिती असेल तर ते डीटेल्स बदलता येतात. इथे मात्र सवयीने लोकेशने डोळेझाक केली आणि तीस हजार लोकेशच्या मित्राच्या त्या अकाऊंटवाल्या मित्राला ट्रान्सफर झाले... पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर लोकेशला चूक कळली. त्या अकाउंटवाल्या मित्राला फोन केला. त्यानेही आता मिटींगमध्ये आहे, मीटींग संपली की पाहतो असं म्हणून फोन ठेवून दिला. त्यानंतर मात्र ते साहेब लोकेशचा फोनही उचलेनात आणि मेसेजला रीप्लायही देईनात. लोकेशने आपल्या मित्राला हे सारं सांगितलं. पण हे अकाऊंटवाले महाशय मित्रालाही दाद देईनात. बँकेला फोन केला. बँकवाले म्हणाले, बँक याच्यात काहीच करु शकत नाही. ऑनलाईन मनी ट्रान्सफरच्या वापरासाठीच्या नियमावलीत असं क्लियर लिहिलं आहे की अशा चुकांना बॅंक जबाबदार नाही. फार तर आम्ही तुम्हाला त्या ट्रान्सॅक्शनचे डीटेल्स लेखी देऊ. बँकेने त्या मित्राचे खाते चेक केले. साहेबांनी ते तीस हजार त्याच दिवशी खात्यातून काढले होते. ते अकाउंटवाले साहेब चेन्नईला एका नामांकीत कंपनीत संगणक अभियंता आहेत... ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- परेश माझा चुलत चुलत भाऊ. मूंबईला एका मेडीकल सर्जिकल इक्विपमेंट बनवणार्‍या कंपनीत टेक्निशीयन. एक दिवस अचानक त्याचा फोन आला. "दादा, मी आणि माझे मित्र भागीदारीत एक सर्जीकल एक्विपमेंटची कंपनी विकत घेतोय. माझ्या हिश्श्याचे पैसे उभे करण्यासाठी मला तुझ्याकडून मदत हवी आहे." "किती हवेत?" "पन्नास हजार." आधी पैशांच्या बाबतीत वाईट अनुभव असल्यामुळे मी एव्हढे पैसे त्याला देणे शक्यच नव्हतं. पण लहान भाऊ काहीतरी करतोय म्हणून त्याला नाही म्हणणं माझ्या जीवावर आलं होतं. शेवटी मी मनाचा हिय्या करुन पंचवीस हजार दिले त्याला. गणपतीत दिलेले पैसे दिवाळीत परत करायचे असं ठरलं. दिवाळी आली आणि गेली. शिमगा आला. शिमग्यानंतर त्याचं लग्न झालं. साहेब मला पैसे परत करण्याचे नाव काढीनात. मी फोन केला की उचलायचाच नाही. दोन तीन वेळा सलग कॉल केला की फोन स्विच ऑफ करायचा असे प्रकार साहेबांनी सुरू केले. एकदा कधीतरी फोन उचलला त्याने. दादा मी अमुक अमुक तारखेला पुण्याला येतोय तेव्हा पैसे देईन. त्या तारखेनंतर दोन महिने गेले तरी साहेबांचा पत्ता नाही. पुढच्या वर्षीचे गणपती आले. दिवाळी आली. त्याच्या छोटया भावाचंही लग्न झालं. माझी कुठे भेट झाली की साहेब बेशरमसारखे हवापाण्याच्या गप्पा मारायचे. पण पैसे देण्याचे नाव काढायचे नाहीत. आमचा हा पैशाचा व्यवहार त्याच्या बाबांना म्हणजे माझ्या काकांनाही माहिती होता. पण ते ही सोयिस्करपणे डोळेझाक करत होते. त्यांच्याकडे दोन दोन मुलांची लग्न करायला पैसे होते. पण मी त्यांना गरजेच्या वेळी दिलेले पैसे परत करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. शेवटी मी काकांच्या छोटया मुलाला हे सारं सांगितलं. तो बर्‍यापैकी सेन्सिबल आहे. त्याने साडे बारा साडे बारा असे दोन टप्प्यात पैसे दिले. अर्थात ते पैसे त्याने घरातूनच घेऊन दिले असणार. मी त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी पैसे दिले ही माझी चुकच झाली होती.... -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मी अमेरिकेत असतानाची गोष्ट. सप्टेंबर महिना असावा. एका सकाळी सकाळी अश्विनचा, माझ्या मित्राचा फोन आला. "अरे मी अशा अशा अडचणीत आहे. मला पन्नास हजार रुपये दे. दिवाळीत माझे बोनस आणि अ‍ॅरीयर्सचे पैसे मिळणार आहेत. ते मिळाले की मी तुझे पैसे तुला परत करेन." अश्विन खुपच जवळचा मित्र होता. मी भारतात असताना त्याच्या घरी येणं जाणं होतं. त्याची बायको मला भाऊ मानायची. पैसे नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. पण पन्नास हजार जरा जास्तच वाटत होते. नाही दिले तर काय करणार असाही प्रश्न होताच. "हे बघ माझे पैशाचे सारे व्यवहार सध्या बाबा पाहतात. मी माझ्या भारतातल्या अकाउंटमधून ऑनलाईन पन्नास हजार काढले तर ते बाबांना लगेच कळेल. आता मी तुला वीस हजार रुपये देतो. बाबांना काहीतरी सांगेन मी. बाकीचं नंतर बघू." मी त्याला अशा पद्धतीने वीस हजार दिले. यथावकाश मी भारतात आलो. दिवाळी झाली. माझे पैसे देणे बाजूलाच राहिलं, माझ्या मित्राच्या बायकोने घरची परिस्थिती कशी वाईट आहे, अश्विनला एक कोर्स करायचा आहे म्हणून तू पाच हजार दे असं म्हणून पुन्हा एकदा पैसे घेतले. या गोष्टीला आता तीन वर्ष झाली. अश्विनचं बाकी सारं व्यवस्थित चालू आहे. मला कधीतरी अचानक पैशाची गरज पडते. मी आपले पैसे अश्विनकडे आहेत म्हणून फोन करतो. त्याचं रडगाणं सुरु होतं. "अरे तू पाहतोयस ना मी किती वाईट परिस्थितीतून जातोय. माझ्याकडे पैसे असते तर मी दिले नसते का?" मी हताशपणे फोन ठेवून देतो. माझे ते पंचवीस हजार बुडाल्यात जमा आहेत. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ही सुद्धा मी अमेरिकेत असतानाचीच गोष्ट. माधव माझा खुप जुना मित्र. मी बारावी झाल्यानंतर मेडीकलच्या सीईटीच्या कोचिंगसाठी कोल्हापूरला गेलो तेव्हा त्याच्याशी ओळख झाली. तो तेव्हा मराठीतून एम ए करत होता. मी काही मेडीकलला गेलो नाही. इंजिनीयरींगला असताना मी त्याला निळं अंतर्देशीय पत्र पाठवत असे. तो ही उत्तरं देत असे. मी अमेरिकेला जाणार आहे हे कळल्यावर तो मला भेटायला मुंबईला आला. आम्ही माझ्या गावी गेलो. मला आमच्या या पत्रातून टिकलेल्या मित्रीचं खुप अप्रुप वाटायचं. एक दिवस त्याचा फोन आला. म्हणे मला दहा हजार रुपये हवेत. एक डॉलर म्हणजे पन्नास रुपये. दहा हजार काही विशेष नव्हते. कधी परत करणार वगैरे काहीही न विचारता मी तेव्हढे पैसे त्याला दिले. पुढे भारतात आल्यावर एकदा सहज म्हणून पैसे कधी परत करणार आहेस म्हणून विचारलं. देतो लवकरच म्हणाला. आणि त्यानंतर कधीही त्याने माझा फोन उचलला नाही. फक्त रिंग होऊ दयायचा. मी कंटाळून फोन करणं बंद केलं. मला ते पैसे परत हवेच होते असं काही नव्हतं. पण पैसे मागितल्यानंतर मात्र खुप विचित्र वागला तो. पुन्हा पंधरा दिवसांनी वगैरे फोन केला तेव्हा लक्षात आलं की त्याने फोन नंबर बदलला आहे. मी त्या दहा हजारांसाठी कुठे कोल्हापूरला जाणार होतो. आणि त्याहीपेक्षा म्हणजे त्याने त्याचा जो काही प्रॉब्लेम होता तो मोकळेपणाने सांगायला हवा होता.हे असं फोन न उचलणं आणि नंतर नंबर बदलणं या गोष्टीचं खुप वाईट वाटलं. सहा सात वर्ष अंतरदेशीय पत्रातून टिकलेली आमची मैत्री त्याने अशा पद्धतीने संपवली. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आता मात्र मी शहाणा झालोय. कुणी म्हटलं की अरे थोडी मदत हवीय की त्यानं पुढचं काही म्हणायच्या आधीच मी म्हणतो, "पैसे सोडून बोल". मग तो कुणीही, कितीही जवळचा असो. पैसे देण्यास नाही म्हटलं तर नातं दुरावेल, हरकत नाही. जे नंतर होणार आहे ते आता होईल...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
18986 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

संपादक मंडळास विनंती...

धन्या
Mon, 05/07/2012 - 13:43 नवीन
धागा दोन वेळा प्रकाशीत झाला आहे. त्यामुळे हा धागा उडवावा.
  • Log in or register to post comments

ए धन्या , जरा १००० रू. दे ना

सुहास..
Mon, 05/07/2012 - 13:44 नवीन
ए धन्या , जरा १००० रू. दे ना ! , पुढल्या आठवड्यात परत करतो ;) ओके, जोक्स अपार्ट !! संभाळुन करत जा की रे व्यवहार !! ;) ( कर्ज डोक्यावर असलेला )
  • Log in or register to post comments

अरे त्या वाश्याला १०००

प्यारे१
Mon, 05/07/2012 - 14:43 नवीन
अरे त्या वाश्याला १००० देण्यापेक्षा मला च दे. नक्की परत देतो. वाश्याची काही ग्यारन्टी नाही रे! ;) मी पैसे देईन हा पगार झाला की लगेच. :) (वाश्या तुला किती पुरतील रे? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मुक्तपीठ

कपिलमुनी
Mon, 05/07/2012 - 13:45 नवीन
मुक्तपीठीय लेख !
  • Log in or register to post comments

सकाळमध्ये मुक्तपीठ नावाचं

धन्या
Mon, 05/07/2012 - 13:48 नवीन
सकाळमध्ये मुक्तपीठ नावाचं काहितरी स्तंभ की पुरवणी आहे. कधी वाचलेलं नाही. तुम्ही शिवी घातली आहे की चांगलं म्हटलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

शिवी नाही

कपिलमुनी
Mon, 05/07/2012 - 14:06 नवीन
सकाळमध्ये स्वानुभवावर आधारीत लेख मुक्तपीठ या सदरात येत असतात .. हा लेख तसा आहे ..बाकी काही नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Mon, 05/07/2012 - 13:50 नवीन
धन्याशेठ, लेखाला 'विकत घेतलेले शहाणपण' असे नाव शोभले असते बघा.
  • Log in or register to post comments

बर्‍याच वेळा फटका बसला की रे

प्रचेतस
Mon, 05/07/2012 - 13:52 नवीन
बर्‍याच वेळा फटका बसला की रे तुला. त्या लोकेशने दिले का पैसे मग?
  • Log in or register to post comments

त्या लोकेशने दिले का पैसे

धन्या
Mon, 05/07/2012 - 14:10 नवीन
त्या लोकेशने दिले का पैसे मग?
लोकेशने माझे पैसे दिले. मात्र त्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याला खुप कटकटींना सामोरं जावं लागेल असं दिसतंय. कदाचित पोलिसातही तक्रार करावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वाईट अनुभव

सुधीर
Mon, 05/07/2012 - 14:03 नवीन
पैशाच्या बाबतीत काही नियम जे पाळायलाच हवेत. १. कोणालाही अगदी कितीही जवळचा मित्र-नातेवाईक असला आणि कितीही संकटात असला तरी उधारी कधीच देऊ नये. २. जर का तुम्हाला फारच दया येत असेल तर स्वेच्छेने जमतील तेवढेच मदत म्हणून (अर्थात परत करण्याच्या अटीवरच) द्यावेत पण दिल्या नंतर व्यवहार विसरून जावा जणू काही पैसे परत मिळणार नाहीत. देणार्‍याने पैसे परत दिले तर "लाभ" झाला समजावा.
  • Log in or register to post comments

+१११

स्पा
Mon, 05/07/2012 - 14:12 नवीन
चायला लेका... पैसे जास्त झालेले का रे तुला... ३ ३ वेळा फसलास ते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

देर आए दुरुस्त आए.

गणपा
Mon, 05/07/2012 - 14:13 नवीन
बरेच लवकर आलं की रे शहाणपण. ;) (कानाला खडा लावलेला) -गणा
  • Log in or register to post comments

काही मार्ग - ज्याला पाहिजे

जयंत कुलकर्णी
Mon, 05/07/2012 - 14:17 नवीन
काही मार्ग - ज्याला पाहिजे आहेत आणि जर त्याला आपल्याला द्यायचे असतील तर दुसर्‍या कडून द्यावेत एका चेकवर सही आणि तारीख न घालता त्याच्याकडून घ्यावा. मराठी माणुस सही केली की प्रकरण जास्त गांभिर्याने घेतो..हाही अनुभव.. हे लोक बँकेचे पैसे वेळेवर भरतात पण आपले देत नाहीत...दुर्दैवाने लोकांच्या पैशाची बेफिकिरी मराठी माणसात जास्त दिसते... हे अनुभवाने सांगतोय..
  • Log in or register to post comments

चेक

मन१
Mon, 05/07/2012 - 19:37 नवीन
मध्यंतरी मी कुणाकुणाला उसनी म्हणून काही रक्कम देताना असाच आधीच पोस्ट डेटेड चेक घेतला. (माझा सहकारी म्हणाला "विश्वास ठेव, महिन्याभरानं कस्सही करुन देणारच आहे" म्हटलं देणारच आहेस ना, मग एक चेक दे की दोनेक महिन्यानंतरचा. म्हणत असशील तर मी दोनच काय चार महिनेही थांबू शकतो की.) मी रक्कम दिली. चेक घेतला. चार महिन्याने सारे सुरळित झाले. फक्त आख्ख्या हापिसात माझ्या नावाने बोंब झाली. ग्रुपमधील बर्‍याच जणांनी नाके मुरडली. (काहीजण ह्यास माझी बदनामी झाली असेही म्हणाले.) माझा इलाज नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

धन्या.. अरे असंख्य वेळा असले

गवि
Mon, 05/07/2012 - 14:24 नवीन
धन्या.. अरे असंख्य वेळा असले मनस्ताप देणारे अनुभव आलेत रे. अगदी शंभर टक्के अस्सेच. अर्थात इतक्या मोठ्या रकमा आणि इतक्या वेळा नव्हे पण कमी स्केलवर असेच अनुभव आहेत बर्‍यापैकी. जवळचेच लोक असतात काय करणार. या उलट माझा एक पॉझिटिव्ह अनुभव मित्राचं नाव न घेता सांगतो. माझा कॉलेजातला एक मित्र. आता अनेक वर्षं आम्ही एकमेकांपासून हजारेक किलोमीटर लांबच्या शहरांत राहतो. अनेक वर्षे प्रत्यक्ष भेटही नाही. दोघांचीही नोकरदार स्थिती आणि संसार एकसारख्याच स्थितीत. तरीही आमच्या दोघांमधे आपसूक एक विश्वासार्ह मनी एक्स्चेंज डेव्हलप झालेलं आहे. अगदी मेडिकल इमर्जन्सीपासून ते खरेदीच्या मोहात पडून क्रेडिट कार्ड बिलाच्या तडाख्यात सापडलो आहे असं खरंखुरं जे काही असेल ते कारण सांगून आणि इव्हन न सांगताही आम्ही एकमेकांना फक्त एस एम एस किंवा एका ओळीचा फोन करतो. समोरचा किती देऊ शकेल याची कल्पना ठेवून सरळ रक्कम मागितली जाते. समोरुन शक्य नाही असं उत्तर आलं तरी दुखावणे वगैरे प्रकार होत नाही, कारण नाही म्हणतोय म्हणजे खरंच पैसे हाती नाहीयेत यावर गाढ विश्वास आहे. पण नकार हा अपवादच.. बर्‍याचदा फक्त ओक्के असं उत्तर देऊन अर्ध्या तासात पैसे ट्रान्सफर झालेले असतात. डिफॉल्ट वेळ १ महिना. एक महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत पैसे परत जमा झालेले असतात. हे सर्व दोन्ही बाजूंनी.. आणि दहा-बारा वर्षांत एकदाही "कधी देतोस माझे पैसे?" असं तोंड उघडून म्हणायची वेळ दोघांवरही आलेली नाही. घरच्या इतरांना पत्ताही न लागता हा व्यवहार बिनबोभाट चालू असतो.. असा मित्र लाभणे ही परमेश्वरी कृपाच. अर्थात हा अपवाद झाला. पैसा हा कोणतंही नातं बिघडवू शकतो आणि पैशाबाबत खेळ हा आगीशी खेळ आहे हे खरंच.
  • Log in or register to post comments

अगदी असाच माझाही एक मित्र

धन्या
Mon, 05/07/2012 - 14:40 नवीन
अगदी असाच माझाही एक मित्र आहे. नात्यातलाच. काकीचा छोटा भाऊ. मी दिड वर्ष बाहेर होतो. बाबांना माझं बॅ़क अकाऊंट हा झेपणारा प्रकार नव्हता. मी बिनधास्तपणे माझं एटीएम कार्ड, इंटरनेट बँकिंगचे युजर आयडी, पासवर्ड सारं काही दिड वर्षासाठी त्याच्याकडे दिलं. त्यानंही माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. अगदी आजही जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा पैशांची देवाणघेवाण करतो. पैसे जवळ असतील तर पुढच्या पाच मिनिटात खात्यात जमा होतात. त्यानंतर "माझे पैसे दे" असं म्हणायचीही कधी वेळच येत नाही. गरज संपली आणि पैसे उपलब्ध झाले की आम्ही लगेच पैसे परत करतो. पण असे मित्र विरळाच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हॅहॅहॅ धन्या किती पैसे वाटतोस

यकु
Mon, 05/07/2012 - 14:37 नवीन
हॅहॅहॅ धन्या किती पैसे वाटतोस बे? अशा लफड्यात अडकलेले पैसे वसुल करण्याचं कॉन्ट्रॅक्ट देतो काय मला? ;-) ही बघ केस ष्टडी - आमची एक मुंबईची मैत्रिण. घरची बरी. इंटरनेटवर सतत चॅटींग वगैरे करायची. आमची ओळख पण याहू वर झालेली. तिला एकदा कुणी बँगलोरचा आयटीवाला भेटला. तो तेव्हा प्रोजेक्टसाठी यूएस मध्ये होता, नंतर तिला भेटायला मुंबईत वगैरे आला. त्यांची ओळख वगैरे वाढली. ही आमची मैत्रिण लग्नाळू वगैरे होतीच. पण हा बाब्या मॅरीड होता. पण त्याच्या बायकोसोबत किटकिटी सुरु असल्याने डिव्होर्स घेणार आहे वगैरे तो तिला बोलायचा म्हणे. रोजच्या बोलण्यातून ह्या बँगलोरवाल्या बाबाने तिच्याकडून 60 हजार रुपये दोस्तीमध्‍ये घेतले. तिनेही दिले. दोन महिन्यात तिला तो पैसे परत देणार होता. सहा महिने उलटले तरी त्याने तिला पैसे दिले नाहीत. यूएस में हु, बँगलोर में आ रहा हूं, सॅलरी नही मिली, खर्च ज्यादा हुआ - डिव्होर्स हो गया- वाइफ को पैसा देना पडा काहीही सबबी सांगायचा. हिने तोपर्यंत घरी काहीबाही सांगून ते 60 हजार रुपये कुठे गेले त्याची जुगाड केली. पण तिचे वडील पासबुक दाखव (अभ्युदय बँक) म्हणाले तेव्हा ही टरकली - आणि एके दिवशी फोनवर रडायला लागली. आय लव्ह यू म्हणालो तरी पण थांबेना ;-) मग मी व्यवस्थित सगळी स्‍टोरी विचारली तेव्हा तिने त्या यूएस-बँगलोरवाल्याचे फोन नंबर दिले. फोनवर मी त्याच्याशी बोललो तर त्यानं अशा अशा मुलीकडून पैसे घेतले असल्याचं कबूल केलं. मी पैसे देऊन टाक म्हणालो तर माझ्यासमोरही तो दर फोनमध्‍ये त्याच सबबी सांगू लागला. कदाचित त्या खर्‍या असतीलही. पण त्यात फालतु आमची मैत्रिण अडकली होती ना. ती मला रोज फोन करायची, आणि अर्थातच रडायची ;-) एके भले सकाळी पठाणी विचार केला आणि त्या बँगलोरवाल्याला एसेमेस टाकला - म्हटलं तुझी कंपनी, तुझं घर वगैरे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत (खरोखर काढले होते), पैसे परत कर - नाहीतर तुझ्या कंपनीत जाऊन हे लफडं सांगेन. त्यानं अजीजीनं असं करु नको वगैरे सांगितलं - पण पैसे परत करण्‍याचं मात्र नाव घेईना. नंतर तर फोन पण टाळू लागला. फोनवर होत नाही म्हटल्यावर आता काहीतरी हातपाय हलवणे आले. त्याला एके दिवशी एसेमेस टाकून दिला - म्हटलं भौ, आज साडेसहा वाजताच्या फ्लाइटनं आम्ही दोघं (मी आणि ती मैत्रिण, आमच्या दोघांचं लग्न ठरल्याचीही बतावणी केली ;-) ) बंगलोरला येतोय. तिकिटाचे पैसे + साठ हजार रुपये तयार ठेव. नाही, तर ‍सगळे डॉक्‍युमेंट सोबत आणतोयच, पोलीसांना भेटल्याशिवाय मार्ग नाही. तुझ्‍या कंपनीमध्‍ये पण जाऊ. त्यानंतर मात्र त्याची टरकली. सेम डे त्यानं 20 हजार रुपये माझ्या खात्यावर ट्रान्स्फर केले. आणखी आठ दिवस वेळ दे, राहिलेले 40 हजार देतो म्हणे. म्हटलं नाही ! आठ दिवस वगैरे काही नाहीच. आणि 20 हजार रुपये दिलेस म्हणून मी बिलकुल खूश झालेलो नाही. तु किती लफडेबाज आहेस ते माहित झालंय - तिला तिकडे सांगतो डिव्होर्स झालाय आणि तुझ्या फोनवर बायको आन्सर करते. सगळे पैसे आज म्हणजे आजच पाहिजेत, नाहीतर आहेच साडेसहाची फ्लाइट. हवंतर उद्यापर्यंतचा वेळ देऊ शकतो. तरी अॅडजस्ट होऊ शकत नाही म्हणे.. म्हटलं ठिक. पण हा लास्ट चान्स. 20 आलेलेच होते. ;-) आठ दिवसात त्यानं काय लफडं केलं माहित नाही, पण राहिलेले 40 हजार पण माझ्या खात्यावर आले. मैत्रिण खूश ! म्हटलं च्यायला तुमच्या मुंबईतल्या मुलींच्या, बापाचे पैसे वाटेल तसे उधळत रहाता आणि नंतर भोकाडं पसरता. आत्ता अशात त्या बँगलोरवाल्याचा त्या मैत्रिणीला फोन आला होता म्हणे - की खरोखर डिव्होर्स झालाय आणि मला तुला भेटायचं आहे. तिनं सांगितलं 'यश अँण्‍ड आय गॉट मॅरीड, आय अॅम प्रेग्नंट, डोंट कम' ;-) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) म्हटलं बरंय, दिल को बहलाने के लिये गालिब खयाल अच्छा है ;-) (पठाण ) यक्कू
  • Log in or register to post comments

भन्नाट किस्सा !!!

धन्या
Mon, 05/07/2012 - 14:50 नवीन
म्हटलं बरंय, दिल को बहलाने के लिये गालिब खयाल अच्छा है
अगदी अगदी. बाकीचं व्यनीत विचारेन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

आणि एके दिवशी फोनवर रडायला

स्वानन्द
Mon, 05/07/2012 - 15:20 नवीन
आणि एके दिवशी फोनवर रडायला लागली. आय लव्ह यू म्हणालो तरी पण थांबेना Wink ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय लव्ह यू?? :-o काय म्हणावं आता?? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय

यकु
Mon, 05/07/2012 - 16:21 नवीन
ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय लव्ह यू?? काय म्हणावं आता??
हो ना राव.. मुली रडायला लागल्या की काय करावं तेच समजत नाही मला ;-) अर्थात तिला तशा वेळी आय लव्ह यू म्हटल्यानंतर 'यशा, डुकरा मला इथं पप्पा विचारतील त्याचं मरणाचं टेन्शन आलंय आणि तुझं हे.. वगैरे वगैरे ओव्या ऐकाव्या लागल्याच होत्या ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

यशा, डुकरा मला इथं पप्पा

स्पा
Mon, 05/07/2012 - 16:24 नवीन
यशा, डुकरा मला इथं पप्पा विचारतील त्याचं मरणाचं टेन्शन आलंय आणि तुझं हे.. वगैरे वगैरे ओव्या ऐकाव्या लागल्याच होत्या लैच रोम्यांटिक र =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

रोम्यांटिक नाही तर काय !!!!

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 05/07/2012 - 19:24 नवीन
रोम्यांटिक नाही तर काय !!!! तसे डुकरा बद्दल अजून पण काही गोष्टी ऐकून आहोत. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

गपा रे लेको आता.. किती बाजार

यकु
Mon, 05/07/2012 - 19:26 नवीन
गपा रे लेको आता.. किती बाजार उठवाल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

प्रयत्न योग्य दिशेत आहेत. यश

गवि
Mon, 05/07/2012 - 16:26 नवीन
प्रयत्न योग्य दिशेत आहेत. यश येईलच. इथे नाही तर कुठेतरी .. पण यश येईल.. चालू दे. बाकी आपण कसेही असलो आणि वागलो तरी डुक्कर वगैरे आपणा पुरुषांना कधी ना कधी स्त्रीवर्गाकडून म्हटले जाणारच.. त्याचे फार मनावर घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हीहीही खरंय गवि, आजकाल

यकु
Mon, 05/07/2012 - 16:36 नवीन
हीहीही खरंय गवि, आजकाल शब्दांकडे लक्षच देत नाही मी ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तिनं सांगितलं 'यश अँण्‍ड आय

वपाडाव
Mon, 05/07/2012 - 17:45 नवीन
तिनं सांगितलं 'यश अँण्‍ड आय गॉट मॅरीड, आय अ‍ॅम प्रेग्नंट, डोंट कम'
यशा, इतकं यश सद्य स्थितीत पुरेसं आहे असं नै वाटत का? गविसुद्धा याच यशाबद्दल बोलत असावेत हा अंदाज...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हॅहॅहॅ वप्या लेका गप ना राव

यकु
Mon, 05/07/2012 - 17:49 नवीन
हॅहॅहॅ वप्या लेका गप ना राव ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

क्रमही महत्वाचा आहे..

गवि
Mon, 05/07/2012 - 17:50 नवीन
क्रमही महत्वाचा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सबसे बडा रुपैय्या..

चिगो
Mon, 05/07/2012 - 14:43 नवीन
पैशांच्या बाबतीत मी थोडा नालायक आहे. ह्या बाबतीत मी जरा जुनाट मार्गावरच विश्वास ठेवतो. "कर्ज देऊ वा घेऊ नये." एकदा कॉलेजमध्ये असलेल्या एका मित्राने २० हजार मागितले मला. आता हा काही जवळचा मित्र-बित्र नव्हे, फक्त कॉलेजात होता एवढंच, आणि त्याचा आजपर्यंत कधी फोन-बीन काही नाही.. आणि मुख्य म्हणजे त्याला पैसे दिल्यावर त्याच्या मागे धावयला मेघालयातून नागपुरला जाणार कोण? म्हटलं, गोली मारो.. नाहीत म्हणून सांगितलं. डोकेदुखी विकत घेऊ नये, ह्या विचाराचा मी आहे. आणि स्पष्ट सांगायचं अश्या वेळी, "काही कोलॅटरल देऊ शकत असशील, तर बघुया" म्हणून..
  • Log in or register to post comments

अनंत फंदीचा फटका

रणजित चितळे
Mon, 05/07/2012 - 14:45 नवीन
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको ॥ २ ॥ बरेच शिकवून जातो.
  • Log in or register to post comments

+१

हारुन शेख
Mon, 05/07/2012 - 15:12 नवीन
परंतु जामिन राहू नको ॥ २ ॥ असेच म्हणतो ! ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

(पठाण ) यक्कू __/\__ आणि एके

स्पा
Mon, 05/07/2012 - 14:45 नवीन
(पठाण ) यक्कू __/\__ आणि एके दिवशी फोनवर रडायला लागली. आय लव्ह यू म्हणालो तरी पण थांबेना =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))
  • Log in or register to post comments

अरे मन्या

मी-सौरभ
Mon, 05/07/2012 - 17:40 नवीन
तो यकु आय लव यु म्हणाल्याने तिने जास्त जोरात रडायला सुरवात केली असं सूड म्हणत होता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

धन्या!

पैसा
Mon, 05/07/2012 - 14:46 नवीन
बराच महाग धडा मिळाला की रे तुला! येशा, एखादी पठाणी रिकव्हरी एजन्सी वगैरे काढ काही तरी. चांगली चालेल!
  • Log in or register to post comments

लेख वाचून Hamlet मधला हा डायलॉग आठवला !

हारुन शेख
Mon, 05/07/2012 - 14:59 नवीन
Neither a borrower nor a lender be; For loan oft loses both itself and friend, And borrowing dulls the edge of husbandry. This above all: to thine own self be true, And it must follow, as the night the day, Thou canst not then be false to any man. -- William Shakespeare, “Hamlet”, Act 1 scene 3 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

मित्रा, लै मित्र गमावलेत मी

वपाडाव
Mon, 05/07/2012 - 14:59 नवीन
मित्रा, लै मित्र गमावलेत मी सुद्धा यातच... फार वाइट रे पैसा... जाउ दे... -------------------------------------- बादवे, माझे सरुटॉबाने कट्ट्याचे उधार कधी परत देणार ??
  • Log in or register to post comments

चांगलाच महाग

स्मिता.
Mon, 05/07/2012 - 15:10 नवीन
अनुभव चांगलाच महाग पडला रे तुला! खूप लोक गरजेच्या वेळी उधार घेतात आणि नंतर कितीही पैसे आले तरी परत देण्याचं नाव घेत नाही (सगळ्यांना असे अनुभव असतातच हे वरच्या अनेक प्रतिक्रियांवरून कळतेच आहे). कसं काय रहावतं काय माहिती. कुणाकडून साधे ५०-१०० रुपयेसुद्धा घेतले असतील तर ते आधी परत केल्याशिवाय माझ्या जिवाला चैन पडत नाही. असो. असे कोणाला पैसे उधार देतेवेळी थोडं सावधच राहिलेलं बरं. एखादा जवळचा मित्र पैसे मागत असेल तर का, कश्यासाठी वगैरे थोडी चौकशी करून समाधानकारक उत्तरं मिळाली तरच आणि आपल्याला सहजासहजी करता येईल अशीच मदत करावी. जुजबी ओळखीवर कोणाला आर्थिक मदत न करणेच भले असे वाटायला लागले आहे!
  • Log in or register to post comments

बहुतेक जणं फसतातच....

प्रभाकर पेठकर
Mon, 05/07/2012 - 16:08 नवीन
To keep a friend don't borrow don't lend. मी ही अनेकदा फसलो आहे. दुर्दैवं. शहाणपण सहजासहजी येत नाही.
  • Log in or register to post comments

आता तर मी कोणाचा

कुंदन
Mon, 05/07/2012 - 16:22 नवीन
आता तर मी कोणाचा "पैसे देतो म्हणुन फोन आला तरी "पैसे सोडुन बोल" असेच बोल्तो.
  • Log in or register to post comments

मी दोन-तीन जणांना पैसे दिले

पिंगू
Mon, 05/07/2012 - 16:59 नवीन
मी दोन-तीन जणांना पैसे दिले होते. त्यातील एक जण अजून काही पैसे देऊ शकला नाही. त्याला धरुनच आहे. तसं मी पण एका मित्राचा देणेकरी लागतो आणि रक्कम फार मोठी आहे. त्यामुळे मित्राला स्पष्ट कल्पना दिली की मला आता ह्यावेळेस तुझे पैसे देता येणार नाहीत आणि त्यासाठी मला ६ महिने आणखी लागतील. तेव्हा मित्र मला एकच गोष्ट म्हणाला की तुझ्यावर माझा इतका विश्वास आहे की तू मला वर्षभरानंतर पैसे दिले तरी चालतील. त्यामुळे मी स्वतःला काही मित्रांच्या बाबतीत भाग्यवान समजतो. बाकी जे आहेत त्यांना ठकास ठक अशीच वागणूक देतो.. ;) - पिंगू
  • Log in or register to post comments

चालायचेच ...

छोटा डॉन
Mon, 05/07/2012 - 18:05 नवीन
चालायचेच. बर्‍याचदा ठरवुन ठेवले आहे की हे पैशाचे कौतुक बास आता, पण ऐनवेळी वेळ आली की जमत नाही. बर्‍याचदा पैसे दिले आहेत, बुडाले आहेत पण अजुनही 'नाही' म्हणु शकत नाही. काहीवेळा केवळ 'परत द्यायची इच्छा नाही' हेच कारण खरे वाटावे अशी वागणुक असते, बाकी इतर गोष्टी छानछौकीत चालु असतात, पैसे परत करायचे सोडुन. असो, सध्यतरी ह्याचे सोल्युशन नाही, कुणाला सापडल्यास आम्हाला आवर्जुन कळवा. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

काहीवेळा केवळ 'परत द्यायची

धन्या
Mon, 05/07/2012 - 20:12 नवीन
काहीवेळा केवळ 'परत द्यायची इच्छा नाही' हेच कारण खरे वाटावे अशी वागणुक असते, बाकी इतर गोष्टी छानछौकीत चालु असतात, पैसे परत करायचे सोडुन.
अगदी खरंय बाबा. सगळं अगदी व्यवस्थित चालू असतं. आपण आपलेच पैसे मागितले की रडगाणी सुरु होतात. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

बर्‍याचदा असे होते की नाही

गणामास्तर
Mon, 05/07/2012 - 19:30 नवीन
बर्‍याचदा असे होते की नाही म्हणायला जमत नाही. समोरच्या व्यक्तीला माहीत असते की आपण कुठल्याच अडचणीत नसून पैसे देऊ शकतो, आपल्यालाही माहीत असते की सगळे पैसे एका हप्त्यात व लवकर मिळायची सुतराम शक्यता नाही. तरी सुद्धा काही लोक सतराशे साठ रडगाणी ऐकवुन लुबाडण्यात यशस्वी होतात. बर्‍याचदा पोळून झाल्यावर आत्ता कुठे थोडे नाही म्हणायला जमू लागले आहे.
  • Log in or register to post comments

हेच आणि असेच म्हणतो. तरी

बॅटमॅन
Mon, 05/07/2012 - 19:34 नवीन
हेच आणि असेच म्हणतो. तरी सुदैवाने अजूनतरी वाईट अनुभव नै आले कधी, पण "नाही" म्हणायचे लक्षात नक्कीच ठेवले पाहिजे. पैसे आणि पुस्तके या दोन्ही बाबतीत. (घेतलेले पैसे परत न करणार्‍यांचा तिरस्कारक आणि पुस्तकचुंबक) बॅटमॅन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

+१

मोदक
Tue, 05/08/2012 - 01:44 नवीन
>>>पैसे आणि पुस्तके या दोन्ही बाबतीत. खरे आहे... पैशाचे २ / ३ अनुभव आले पण सुदैवाने परत मिळाले. पुस्तकांसाठी झकास स्ट्रॅटेजी वापरतो. लकडी पुलावर जुनी पुस्तके मिळतात, त्यातून अत्यंत जीर्ण अशी व्यवस्थापन / व्यक्तीमत्व विकास / जुने Readers Digest वगैरे आणून ठेवायचे (एका पुस्तकाची किंमत रू १० किंवा जास्तीत जास्त १५.) कुणी पुस्तके वाचायला मागीतली की ह्या गठ्ठ्यातले "हवे ते घेऊन जा" असे उदार मनाने सांगायचे. पुलं आणि क्रिकेट्चे कलेक्शन मागणारा कोणी आला तर एकच उत्तर.. "इथे येवून वाच. नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणाची सोय करतो.. पण पुस्तक मिळणार नाही."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

म्हणून किसनला अशी पुस्तकं

स्पा
Tue, 05/08/2012 - 08:59 नवीन
म्हणून किसनला अशी पुस्तकं दिलीस होय रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

साहेब, तुमचं नवंकोरं पुलंचं

धन्या
Tue, 05/08/2012 - 10:41 नवीन
साहेब, तुमचं नवंकोरं पुलंचं "एक शुन्य मी" माझ्याकडे आहे. परत दयायचं आहे. सरुटॉबाने कट्टयाला आणायला विसरलो. पुढच्या वेळी न विसरता आणेन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बहुतेक तुझ्यामुळे आलेल्या

गणपा
Tue, 05/08/2012 - 13:10 नवीन
बहुतेक तुझ्यामुळे आलेल्या अनुभवा नंतरचेच ते बोल असावेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मलाही तसंच वाटतंय. मोदक, तुझं

धन्या
Tue, 05/08/2012 - 14:55 नवीन
मलाही तसंच वाटतंय. मोदक, तुझं पुस्तक हडप करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. फक्त तुझं पुस्तक घेतल्यानंतर आपण एकदाच भेटलोय. आणि तेव्हा मला आठवण झाली नाही. तुझं पुस्तक तुला मिळेल याविषयी निश्चिंत राहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

पुलं आणि क्रिकेट्चे कलेक्शन

प्रचेतस
Tue, 05/08/2012 - 15:17 नवीन
पुलं आणि क्रिकेट्चे कलेक्शन मागणारा कोणी आला तर एकच उत्तर.. "इथे येवून वाच. नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणाची सोय करतो.. पण पुस्तक मिळणार नाही."
इतकं असूनही मोदकने तुला पुस्तक, ते ही पुलंचं, आणि ते ही नवं कोरं दिलं म्हणजे कमाल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा