पावले
.
चालता चालता पावले
थांबतात,
थकतात,
कि कानोसा घेतात..
आपल्याच मनोबलाचा!
चालता चालता पावले
अडखळतात,
मागे फिरतात,
कि चाचपतात. .
आपल्याच विश्वासाला!
चालता चालता पावले
शिणतात,
वैतागतात,
कि विचार करतात..
"ती चालता आहेत,
कि चालवली जात आहेत याचा!"
चालता चालता पावले
चाचपतात,
विचार करतात,
कि पडताळून पहातात..
"ध्येय आहे म्हणून..
ती चालतात,
कि ती चालतात म्हणून..
ध्येय आहे?"
चालता चालता पावले
थांबतात,
अडखळतात,
कि विचारी बनतात!!!
====================
आपली स्वाती फडणीस................1995
प्रतिक्रिया
16 Jul 2008 - 12:50 pm | सहज
विचारमग्न पावले आवडली.
अजुन येउ दे.
अविचारी पावले अर्थात वात्रटिका
चालता चालता पावले
थांबतात
म्हणतात
'विचारा' लेका पुढे बघ
पाडशील ना दोघांना
16 Jul 2008 - 2:40 pm | स्वाती फडणीस
:)
16 Jul 2008 - 2:07 pm | ऋषिकेश
ठिक वाटली.
किंचीत लाबली आहे का?
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
16 Jul 2008 - 2:39 pm | स्वाती फडणीस
किंचीत लाबली आहे का?
मला नाही तसे वाटत.
16 Jul 2008 - 6:10 pm | स्वाती फडणीस
कविता वाचणार्यांचे आणि वाचून प्रतिसाद देणार्याचे न देणार्या (न देण्या बद्दल)आभार :)
16 Jul 2008 - 8:51 pm | चित्रा
हे आवडले!
कविताही छान आहे :-) आवडली.
16 Jul 2008 - 10:51 pm | धनंजय
ऋषिकेश यांची प्रतिक्रिया वाचली आणि थोडेसे लांबले आहे, हे पटले.
पैकी :
या भागातला आशय संदिग्धपणे (सुंदर संदिग्धपणे!) आदल्या "ती चालता आहेत, कि चालवली जात आहेत..." यातच आलेला आहे. हे इथे कॉपी-पेस्ट केलेले स्पष्टीकरणात्मक कडवे नसते तरी कवितेचा आशय गहन राहिला असता.
बाकी आशय गहन आहे, आवडला, हे पुन्हा सांगणे नलगे.
16 Jul 2008 - 11:21 pm | स्वाती फडणीस
ती चालता आहेत, कि चालवली जात आहेत..."
आणि
"ध्येय आहे म्हणून..
ती चालतात,
कि ती चालतात म्हणून..
ध्येय आहे?"
यां मधला आषय वेगवेगळा आहे.
इथे पावलांना ती कठपुतली /चावीचे खेळणे असल्याचा भास होतोय तर
"ध्येय आहे म्हणून..
ती चालतात,
कि ती चालतात म्हणून..
ध्येय आहे?"
16 Jul 2008 - 10:59 pm | बेसनलाडू
कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू
16 Jul 2008 - 11:28 pm | केशवसुमार
स्वातीताई,
चालता चालता पावले
थांबतात,
अडखळतात,
कि विचारी बनतात!!! वा.. क्या बात है..
बेलाशेठशी सहमत आशयगर्भ कविता
अतिशय आवडली.. पुलेशु
(अस्वादक)केशवसुमार
आमचा नेहमी प्रमाणे दुसरा प्रतिसाद इथे वाचा
16 Jul 2008 - 11:31 pm | चतुरंग
"ती चालताहेत की चालवली जात आहेत ह्याचा"
ह्याच ओळीपर्यंत खरे कवितेच्या करंजीतले सारण, बाकी पुढचे कव्हर!:)
चतुरंग
16 Jul 2008 - 11:40 pm | स्वाती फडणीस
खरच पुढ्च्या ओळी कव्हर इतक्याच महत्वाच्या आहेत. सारणाला कव्हर नसेल तर करंजी किंवा मोदक बनतच नाही नाही का?
असो माझ्यासाठी त्या पुढच्या ओळीही तितक्याच किबहुदा त्याहून महत्वाच्या आहेत .:)
16 Jul 2008 - 11:44 pm | चतुरंग
दोन्ही महत्त्वाचे आहेच पण गाभ्याचा आशय कुठे जाणवला ते सांगितले - ह्याचा अर्थ कव्हर कमी दर्जाचे आहे असा अजिबात नाही!
कृपया गैरसमज नसावा!
चतुरंग