✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)

च
चतुरंग यांनी
Tue, 03/11/2008 - 10:45  ·  लेख
लेख
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ४)
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ५)
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ६)
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ७)
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ८)
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ९)
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १०)
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ११)
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १२)

Book traversal links for मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)

  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14263 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

क
केशवसुमार Tue, 03/11/2008 - 11:00 नवीन

वा!!

चतुरंगशेठ, स्तुत्य उपक्रम्..अभिनंदन आणि शुभेच्छा.. संकल्प सिद्धिस न्या.. पहिल्या पाच रुबाया उत्तम झालेल्या आहेत... (मद्य न चाखलेला मधुशालेचा चाहता)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 03/11/2008 - 11:06 नवीन

उत्तम!

नक्षीदार तरीही आकलनीय शब्दयोजना आणि लय. भावानुवाद आवडला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. (उत्सुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/11/2008 - 11:31 नवीन

सुरेख...

रंगराव, सुरेखच भावानुवाद. तुमचं खरंच कौतुक वाटतं. संपूर्ण मधुशालेचा हा मराठी भावानुवाद म्हणजे मिपाकरता एक खजिनाच म्हणावा लागेल! पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती.. आपला, (मधुशालाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 03/11/2008 - 13:17 नवीन

सहमत

सुरुवात झकास झालीय. पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग Tue, 03/11/2008 - 20:32 नवीन

धन्यवाद तात्या!

रसिकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे मूळ लेखनात काही दुरुस्त्या करता आल्या तर निर्दोष कृती देण्याचे मनसुबे तडीस जातील. नीलकांताच्या मदतीने संपादनाची शक्ती पूर्ववत स्थापित करावी ही आग्रहाची विनंती - ह्याबाबत आधीही संवाद साधलेला आहेच. ('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 16:44 नवीन

:)

('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते. आपली मागणी पूर्ण केली आहे असं आम्हाला आठवतं! :) ('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) नक्कीच होऊ शकते. मिसळपावला नान्या आणि मधुशाला दोघे सारखेच लाडके आहेत. येथे पंक्तिप्रपंच नाही! :) आपला, (न्यायप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 03/12/2008 - 19:11 नवीन

हो तात्या आपण मागणी पूर्ण केली आहे!

त्याबद्दल आपले आभार. तुमच्या दिलदारपणाला आमची दाद! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
कोलबेर Wed, 03/12/2008 - 00:21 नवीन

सहमत

पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती..
असेच म्हणातो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धनंजय Tue, 03/11/2008 - 11:42 नवीन

उत्तम प्रकल्प

शुभेच्छा! शब्दयोजना आवडली. एक रुबाई तितकी समजली नाही "भरुन आणिला काव्यचषक हा कविस्वरुपी मद्याला" ओळीचा अर्थ लागला नाही. मुळात मोठे कल्पक समांतर रूपक आहे. द्राक्ष/वेल=भाव मद्य=कल्पना प्याला=कविता साकी=कवी** वाचक=पीणारा पुस्तक=मधुशाला ती पूर्ण साखळी अनुवादित रुबाईत लागत नाही. विशेषकरून ** ठिकाणी. बाकी अनुवादाला सलाम! आम्ही आनंदाने वाचत आहोत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/11/2008 - 20:37 नवीन

प्रतिसादाबद्दल आभार धनंजय.

प्रकाशित करण्याआधीच्या संपादनाच्या शेवटल्या फेरीत ही सुधारणा राहून गेली - तिथे "भरुन आणिला काव्यचषक हा काव्यस्वरुपी मद्याला" असे योजले होते. तात्यांनी संपादनाचा अधिकार पूर्ववत केल्यास मूळ लेखनात ही दुरुस्ती होईल. -------------------------------------------------------------- धनंजय, वरील दुरुस्ती केली आहे आता रुबाई मूळ काव्याशी सलगी दाखवते! संपादनाचे अधिकार दिल्याबद्दल तात्यांचे आभार :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ल
लिखाळ Tue, 03/11/2008 - 18:14 नवीन

छान

फार छान अनुवाद. कल्पक. एक वाटले ते मोकळेपणी सांगतो. मला काव्य, अनुवाद यातले काही कळत नसून सुद्धा धाडस करतो आहे. सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१। रसिक स्वागते तुमच्या सादर, करतो मी ही मधुशाला ।।१। आज अर्पितो रसिकांस्तव तरि, ही जगताची मधुशाला ||२|| तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, .... मूळ हिंदी कवितेत कवी प्रत्यक्ष वाचकाला उद्देशून लिहित आहे. तसेच हिंदीमधिल 'आप' न वापरता 'तू' असे मित्रत्वाने कवी संबोधत आहे. तो वाचकाशी सरळ संवाद साधत आहे असे जाणवले. आपल्या अनुवादात मात्र आपण सर्व रसिकांशी संवाद साधत आहात. त्यामुळे थोडी औपचारिकता वाढली आहे. त्यामुळे अनुवादित कविता थेट वाचकाशी बोलण्यात थोडी मागे पडेल का? !! पुलेशु. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/11/2008 - 20:39 नवीन

लिखाळराव आपले आभार.

आपली सूचना नक्कीच विचार करण्याजोगी आहे. संपूर्ण काव्याच्या अनुषंगाने तिचा वापर कसा करुन घेता येईल हे मी जरुर तपासून बघेन. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ब
बहुगुणी Sun, 06/22/2008 - 18:34 नवीन

धन्यवाद, आणि एक सुचना...

चतुरंगः अतिशय आवडलेला अनुवाद, धन्यवाद. लिखाळांच्या वरील प्रतिक्रियेबद्दलः तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, या ओळीऐवजी तूच सखे जणू वारुणी माझी, मी तो आसुसला प्याला, अशी रचना केल्यास चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
च
चतुरंग Sun, 06/22/2008 - 21:02 नवीन

अनुवाद आवडल्याचे आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद बहुगुणी!

स्वागतार्ह सूचनेबद्दल आभारी आहे. आपण सर्व रसिक इतक्या आत्मियतेने ह्या अनुवादाचा विचार करत आहात ह्यातच सर्व आले! 'मधुशाला' हे अनेक वेगवेगळे आयाम दाखविणारे काव्य आहे. नुसते सखी, वारुणी किंवा एकच व्यक्ती ह्यांना उद्देशून लिहिलेले नसून ते सर्वसमावेशक तत्त्वज्ञाच्या पातळीवरही जाते, असे मला वाटते, तेव्हा काव्यात असलेल्या त्या सर्व भूमिकांना न्याय मिळेल अशीच संकल्पना वापरावी लागेल असे वाटते. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/11/2008 - 22:40 नवीन

वा वा वा !!!

अतिशय सुंदर.. येऊ द्या... - सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/12/2008 - 00:51 नवीन

अप्रतिम..

मला वाटते धनंजय यांनी घडवून आणलेल्या चर्चेत मी आपल्याला सुचवलं होतं की आपण संपूर्ण मधुशाला मराठित आणा म्हणून... मी खरंतर वाटच पहात होते. खूप आनंद झाला आपण माझ्या विनंतीचा मान ठेवलात. एकच सांगते आपल्या या मधुशालेने मिपाची उंची आंतर जालिय मराठी जगतात बाकीच्या संकेत स्थळांपेक्षा खूप वाढली आहे. आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय सुंदर भाषा, शब्द आणि रचना.. लयबद्ध.. पुढच्या रूबायांच्या प्रतिक्षेत आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/12/2008 - 02:21 नवीन

धन्यवाद प्राजु!

धनंजयने घडवून आणलेल्या चर्चेचा दुवा माझ्या लेखनात देण्यामागचे कारणच हे होते की ह्या लेखनाची पार्श्वभूमी काय आहे ते वाचकांना कळावे. ह्या अनुवादामागचे कारण माझे मराठीप्रेम जितके आहे तितकेच तुझ्यासारखे मि.पा. वरचे रसिकही आहेत हे नक्की! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 17:15 नवीन

सुंदर आणि लयबद्ध..अनुवाद

चतुरंग छान उपक्रम सुरु केलात.. अतिशय उत्तम ,लयबद्ध अशी रचना केली आहे... पुढील भाग लवकरच टाका..वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Sat, 03/29/2008 - 21:20 नवीन

हा भाग आवडला

हा भाग आवडला, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 06/23/2008 - 09:33 नवीन

सुंदर भावानुवाद

नक्षीदार तरीही आकलनीय शब्दयोजना आणि लय. भावानुवाद आवडला.
हेच म्हणतो. कॄपया अजुन येऊद्यात. चाणक्य
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/23/2008 - 09:42 नवीन

लिहा लवकर

लिहा लवकर पुढे.. सुरेखच जमले आहे...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/24/2008 - 01:09 नवीन

यशोधरा,

एकूण आठ भाग प्रसिद्ध झालेत. नववा लिहिणे सुरु आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 06/24/2008 - 09:20 नवीन

चतुरंगजी,

चतुरंगजी, सॉरी, मला माहीत नव्हते, शोधते आता. इथे जुन्या लिंक्स देता येतील का?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा