✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अंकुर

आ
आनंदयात्री यांनी
Mon, 08/11/2008 - 14:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17615 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Mon, 08/11/2008 - 16:44 नवीन

अंकुर

माझीही ओंजळ हलकेच त्या दुरडीत रिती होते,
अप्रतिम रुपक!
आताशाच रुजवलेल्या एका बीजालाही एक छोटा हिरवा अंकुर फुटलेला असतो.
काय मस्त लिहिलंएस आनंदयात्री.. आवडलं! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 08/11/2008 - 19:30 नवीन

आंद्या .. क्लास रे

कौलं डोक्यात पडून डोक्याचा भुगा झालेला .. पण आंद्याच्या अंकुराने .. नवचैतन्य आलं .. मस्त रे आंद्या ... मी खाली कुठे क्रमशः दिसतय का ते पघत वथो .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/11/2008 - 14:50 नवीन

छान

खूप छान लिहिलं आहेस! डोळ्यासमोर सगळं वर्णन चित्रासारखं उभं राहिलं, छान वाटलं. आणि फोटोपण मस्त आहे!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 08/11/2008 - 14:55 नवीन

असेच..

सगळं वर्णन चित्रासारखं उभं राहिलं,छान वाटलं यमूसारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मुक्तसुनीत Mon, 08/11/2008 - 22:04 नवीन

+१

मिस्टर यात्री ! फारा दिवसानी तुमचे लिखाण आले. सुरेख ! ताजेतवाने करणारे ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
व
विसोबा खेचर Mon, 08/11/2008 - 14:54 नवीन

केवळ अप्रतीम...!

या अश्या निव्वळ सुखाला विषण्ण विलक्षण छेद देउन जाणारा अव्यक्त सल खस्स्कन काळजात रुतावा, सय दाटुन यावी, अन मग असेच बरेच काही, भळाभळा वहाणारे वहात रहावे, तिथेच उभ्या उभ्याच. मनात दाबुन ठेवलेली ती वेदना अशी जर्राशी फट मिळताच उसळुन बाहेर यावी, चुका शोधुन शोधुन आठवल्या जाव्यात, खपल्या उकरल्या जाव्यात. मग चालु रहावे द्वंद्व अशाच विचारांचे अन खोटारड्या वांझोट्या स्वप्नांचे. केवळ अप्रतीम! कुसुमाग्रजांची आठवण व्हावी इतपत सुंदर लेखन. एखादी कविताच वाचतो आहे की काय असे वाटून गेले! यात्री, जियो....! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 08/11/2008 - 14:56 नवीन

वा!!!

गद्य कविताच जणू...आवडले! अवांतर : बाकी अंगणात झाड, पारिजताकाचा शुभ्र सडा अंथरलेला हे आम्हाला फक्त स्वप्नातच दिसते! :(
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Mon, 08/11/2008 - 16:37 नवीन

सुन्दर...

खुपच छान शब्द चित्र... खुप खुप आवडलं..
  • Log in or register to post comments
श
शेखर Mon, 08/11/2008 - 17:18 नवीन

१++

तु असल पण लिहतोस ? >> मनात दाबुन ठेवलेली ती वेदना अशी जर्राशी फट मिळताच उसळुन बाहेर यावी, चुका शोधुन शोधुन आठवल्या जाव्यात, खपल्या >> उकरल्या जाव्यात. मग चालु रहावे द्वंद्व अशाच विचारांचे अन खोटारड्या वांझोट्या स्वप्नांचे. स्वागत करणारे हसरे घर आता >>हिरमुसले वाटायला लागते, त्याला आपला केवडा हवा असतो,त्यासाठी त्याचे आक्रंदन अन केवड्याच्या मनात काही वेगळेच मस्तच लिहलय... शेखर
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Mon, 08/11/2008 - 17:49 नवीन

सुंदर!

सुंदर!अतिसुंदर!!गद्यकाव्य फारच आवडले
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 08/11/2008 - 17:51 नवीन

खुपच छान लिहिले आहेस.

आनंदयात्री, मनातला अंकुर खुप छान फुलला आहे. :) प्रत्येक वाक्य सुंदर आहे. :)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 08/11/2008 - 18:07 नवीन

आंद्या

मस्तच रे! स्वगत:च्यामारी, आंद्याकडे ललित लेखनाचा क्लास लावायला हवा आता.... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
क
कुंदन Mon, 08/11/2008 - 18:19 नवीन

मस्त रे ....

>>अन समोर सुहास्य वदनाने ती वात्सल्यमुर्ती उभी असते, आई ! ............. मी हलकेच तिच्या पायाशी वाकतो, डोक्यावरुन तिचा आश्वस्त हात फिरतो अन फुलाचा झाडाच्या दिशेने एक अनोखा प्रवास सुरु होतो.. छानच लिहिलयस ...
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Mon, 08/11/2008 - 18:24 नवीन

अप्रतिम

खुप सुंदर लिहिले आहेस्..अजुनहि असच छान वाचायला आवडेल...
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 08/11/2008 - 18:39 नवीन

अप्रतिम..

अतिशय सुंदर ललित. आंद्या लेका तोडलस! अजून येउ द्यात. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Mon, 08/11/2008 - 19:11 नवीन

आनंदा

आनंदा मस्तच रे .... प्राजक्ताचे रूपक आवडले..... जियो..... विद्याधर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 08/11/2008 - 19:36 नवीन

काय आहे हे..

इतकं सुंदर वर्णन.. सकाळचं!! हे लेखन नव्हे केवळ एक तरल कविताच आहे. पारिजातकाचा सडा... कोकीळेची साद.. टपोरा पाण्याचा थेंब.. सुपर्ब!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 08/11/2008 - 21:41 नवीन

घरापाशी येऊन थबकलेल्या

एका भल्या पहाटेच्या यात्रेचे हे अनुभवलेले काही क्षण अतिशय प्रत्ययकारी शब्दात मांडले आहेस रे आनंदयात्री! अत्यंत तरल, प्रतिभावान लिखाण! अभिनंदन. जियो!! चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 08/11/2008 - 22:21 नवीन

खूप सुंदर!!

खूप सुंदर!!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 08/11/2008 - 22:32 नवीन

ललितलेखन

आवडले. आईच्या आश्वस्त हाताने डोक्याला लागलेल्या सगळ्या चिंता,दु:खे दूर करणे अगदी अनुभवण्यासारखे. अन टप्पकन एक टपोरा गारेग्गार पाण्याचा थेंब अगदी अचुक कपाळावर पडावा हे बाकी खरे सुख! काहीसे शब्दबंबाळ वाटण्यासारखे आहे, विशेषतः दुसरा परिच्छेद (भालचंद्र नेमाड्यांच्या 'कोसला'मधील बुद्धदर्शनाची आठवण झाली. विशेषतः रंगाशेठचा प्रतिसाद वाचून!). पण कधीकधी अशी नशाबाजीही हवीच! (आस्वादक)बेसनलाडू अवांतर - अंकुराचा फोटो छान आला आहे. आणखी थोडा शार्प/फोकस्ड् हवा होता का? (अवांतर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/11/2008 - 22:51 नवीन

पहिल्या वाक्यातच

अंधारलेल्या भल्या पहाटे आपल्या गावाने ओलेत्यानेच आपले स्वागत करावं. पहिल्या वाक्यातच काबीज केलेस, आंद्या ! ओलेते गाव ! काय चित्र आहे वा ! - सर्किट
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 08/12/2008 - 00:02 नवीन

सुरेख

चित्रदर्शी प्रकटन आवडले
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 08/12/2008 - 08:58 नवीन

मस्त रे आंद्या ...

एखाद्या सुगंधी फुलाच्या सुवासासारखा ॠहयात भरुन जाणारा व पहाटेच्या दवा सारखेच मन ओथंबुन टाकणारा लेख. मस्त रे आंद्या. तुम्ही असलं काही लिहता हे पाहुन आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. जियो !!! "ओलेते गाव, पारिजताकाचा शुभ्र सडा, ओळखीची झाडं, कोकीळेची 'कूहssकूहssss' आणि वात्सल्यमुर्ती आई ", सारेच अप्रतिम .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 08/12/2008 - 09:07 नवीन

अप्रतिम!!

खरच रे आंद्या ,मस्त लिहिल आहेस. मन प्रसन्न झालं :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 08/12/2008 - 09:26 नवीन

सॉलिड

अगदी सहज आणि सुंदर लिहले आहेस..... फोटो सुद्दा छान आहे.. हे वाचुन आणि फोटो पाहुन मला गोट्या या मालिकेचे बीज अंकुरे अकुरे कोवळ्या मातीच्या कुशीत हे गाण आठवल.. ही लिंक :--http://uk.youtube.com/watch?v=i38b5Z8bMM8 मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 08/12/2008 - 10:13 नवीन

अंकुर

सुंदर... फोटो छान आहे.. डोक्यावरुन तिचा आश्वस्त हात फिरतो अन फुलाचा झाडाच्या दिशेने एक अनोखा प्रवास सुरु होतो. आकाशात तांबडे फुटलेले असते अन आताशाच रुजवलेल्या एका बीजालाही एक छोटा हिरवा अंकुर फुटलेला असतो. खुप छान !!!
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Tue, 08/12/2008 - 10:33 नवीन

वा,

वा, सहज-सुंदर आहे. कसलेही अनावश्यक तपशील नाहीत आणि उगाच भावविवश होणेही नाही. फार सुरेख.
  • Log in or register to post comments
ग
गमत्या Tue, 08/12/2008 - 12:01 नवीन

अप्रतिम..

तुझ्या अप्रतिम लेखनाचा मला अभिमान आहे. गमत्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 08/12/2008 - 15:21 नवीन

क्या बात है!

आनंदयात्रीशेठ, आज बर्‍याच दिवसांनी आपल्या पहिल्या प्रेमाकडे वळलात :) नेहमीप्रमाणेच, एखादा प्रथमदर्शी छोटासा दिसणारा अनुभव मोजक्याच शब्दात परिणामकारकरित्या पोहोचवण्याची सुंदर खुबी झळकते आहे.
त्याला आपला केवडा हवा असतो,त्यासाठी त्याचे आक्रंदन अन केवड्याच्या मनात काही वेगळेच.
क्या बात है! जियो !! ओलेतं गाव, कपाळावर टपोरा थेंब, आईच्या हातातली दुरडी, त्यातली फुलं, काही काटेरी,मंजुळा, त्यातच आपली ओंजळ रिकामी करणं...... केवळ अप्रतिम रे! (आंद्या, बास रे आता इतकं भिडणारं लिहिणं, काळजात कालवाकालव होते वाचताना.)
  • Log in or register to post comments
म
मनी Tue, 08/12/2008 - 16:04 नवीन

मस्त:

मस्त: :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 08/12/2008 - 18:05 नवीन

धन्यवाद

सर्वांनी केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल आभारी आहे. -आनंदयात्री
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/12/2008 - 18:51 नवीन

व्वा क्या बात है !!!

सुंदर ललित, आवडले.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/12/2008 - 22:32 नवीन

सुरेख

सुरेख लिहिलं आहेस! अतिशय आवडलं.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/17/2011 - 12:21 नवीन

आंद्या हे असले काही तुला

आंद्या हे असले काही तुला अचानक स्वप्नात सुचत असावे ( केक्यूले ला पडले तसे) हा लेख पूर्ण कर की
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 02/17/2011 - 23:08 नवीन

खूप छान!

खूप छान!
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 02/18/2011 - 04:29 नवीन

वा!

आवडले!
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 03/05/2011 - 00:53 नवीन

मस्त!

मस्त आहे. खोदकामात असे चांगले वाचायला मिळाले. :) राघव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा