फावल्या वेळात भरपूर पैसे कमवा.
मार्केटिंग नाही, चेन नाही.
अमेरीकन कंपनी.ट्रेनींग फ्री.
या संध्याकाळी. धुरु हॉल दादर(प).
गेल्या आठवड्यात मी सात मिटींग अटेंड केल्या होत्या.आता पाठ होत आलं होतं सगळं.तुमची स्वप्नं पूर्ण करा.बायनरी प्लॅन . चौसष्ट पेअर्स झाल्या की थायलंड.पाचशे बारा झाल्या की रेस्युडीयल इन्कम.
इथे, आता तुम्ही आहात.एक राईट ला एक लेफ्ट्ला.इकडे एक पेअर झाली की इन्कम सुरु.कोड घ्या . कामाला सुरुवात करा.
कंटाळलो.मला हवं ते मिळेना.मग आज सकाळी हवी तशी जाहिरात वाचली.
धुरु हॉल.
"या या सर." एक चिकणा पुढे आला."सकाळी आपणच फोन केला होता ना?"
आफ्टर शेव्ह चा घमघमाट . हे सगळेच मिटींगच्या आधी बावीस मिनीटं दाढी करतात."हे सारंग सर, आपली अपलाईन.यांच्या मार्गदर्शनाखाली...."मला कंटाळा आला.मी सुरुवात केली.
"तुम्हाला माझ्या अटी मंजूर आहेत ना ?"
"हो हो सर..."
"मी पाच कोडघेउन एंट्री घेतो "चिकण्याचा उघडलेला जबडा बंद होईना.
" पण म्हणजे, साडेबाविस हजाराचा खर्च" थोडासा अविश्वासाचा सूर.
मी पाकीट बाहेर काढलं. चिकण्याचा खालचा ओठ थरथरायला लागला.
"पण माझी अट ?"
" मंजूर आहे सर."
"कमिशन?"
"कमिशन नाही सर. त्याला इन्कम म्हणा" इतका वेळ गप्प बसलेल्या अपलाइन बोलका झाला.
"डायरेक्ट बँकेत सर."
पुढचे सगळे प्रश्न संपले.
" ते खातंउघडायचे फॉर्म..?"
" तयार आहेत सर"
"तुम्ही फक्त सह्या आणा सर, बाकी मी बघतो "
चिकणा पेटला.
"छान "
आठव्या दिवशी मनोरमा सकट सगळ्याची खाती तयार.
पंधरा दिवसानी चेकबुक.केवायसी चा गाजावाजा न होता पाच नव्या खात्याची भर . अर्थात ठरलेल्या अटी प्रमाणे माझ्या नावावर काहीच नव्हते. मनोरमा शेट्टी स्टार परफॉर्मर.स्टेजवर उभं राहून मनोरमा आपली सक्सेस स्टोरी सांगतानाचे फोटो पण आले.
छान. छान.
---------------------------------------------------------------------------------------------------
परळला उतरलं की डाव्या बाजूला रेड रोज देसी बार आहे.तोडणकर कंपनीचा . बाजूला बीटींग चा धंदा .दुपारी मी गेलो तेव्हा भाया माझी वाट बघत होता.
"केम छे दादा? पानी? यां बेहो तो."
:भाया एक काम आहे."भाया अर्थातच तयार.तासाभरानी आम्ही दोघं मुलुंडच्या चिंधी बाजारात (गणेश सिनेमाच्या बाजूला) कपडे शोधत होतो. विचारे कुरीयरचा , बँकेचा युनीफॉर्म मिळता मिळता दोन तास गेले. पण ठीक आहे. भायाला माप फिट बसलं.
तिथून महालक्ष्मी ला . जिजाई नगरच्या बाजूला प्रविण छेडा रद्दी घेतो.विकतो.
"कि आई सेठ? "(कसे काय शेठ आपण?)
"मला कोल पाहिजे?"
" किती किलो ? "
" पाच.आणखी घोड्याची मासिकं असली तर टाक."
आजची खरेदी संपली. भायाला काम समजावून सांगता सांगता साडे सात वाजले. हातात हजाराची एक नोट ठेवत मी निघालो.
विनीता उद्या महत्वाच्या कामाला जाणार होती. तिला फोन करून मी पण लवकरच झोपलो.
---------------------------------------------------------------------------------------------------जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाजूने एक बारीक गल्ली जाते. रोप वॉक लेन. या लेन मध्ये डाव्या बाजूला एक बद्री मंझील आहे. ईब्राहीम मुल्ला या नामांकीत सॉलीसिटर फर्मचं हेड ऑफीस. पहिल्या मजल्यावर ज्युनिअर वकीलांच्या केबीन . डाव्या बाजूला स्टाफ साठी मोठा हॉल.
सुंदर इंटीरीयर. छान छान पारशी मुली दिवसभर मान खाली घालून टायपींग करतात. नोकरीच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या डोक्यात
सारखं छापलं जातं की भारतातल्या सगळ्यात जुन्या आणि मोठ्या कंपनी साठी टायपींग करताना एक चूक म्हणजे कदाचीत करोडो रुपयांच नुकसान. बरचसं खरं ही आहे. हाईप नाही. मुल्ला साहेब वयाच्या विसाव्या वर्षापासून वकील आहेत. जवळ जवळ दोनशे बहुराष्ट्रीय
कंपन्या त्यांच्याकडे आहेत. झीया मोदी, अतुल तुळजापूरकर, एकेकाळचे इथलेच ज्युनिअर.मुल्ला साहेबांचा खास माणूस म्हणजे सुरेश पिळ्ले. कंपनीत त्याला बुटका पिळ्ले म्हणतात. चारफूट अकरा इंच . पण पिळ्ले ला वाईट वाटत नाही. भगवंतानी कमी दिलेल्या दोन तीन इंचाची भरपाई दुसरीकडे केली आहे.फास्टेस्ट टायपीस्ट म्हणून त्याची ख्याती आहे. मुल्ला साहेबांचा खाजगी सहायक.वरच्या मजल्याचा इनचार्ज.
ऑफीस मधल्या मुली पिळ्लेला घाबरतात. त्याच्या नजरेत एक वेगळीच चमक आहे जी फक्त बायकानांच समजते.त्यामुळे वरच्या मजल्यावर त्याला भरपूर एकांत मिळतो.
त्या दिवशी सकाळी साडेअकराच्या दरम्यान पिल्ले फार खूशीत होता. साहेब सलग तीन दिवस कोर्टात ऍपीअर होणार होते.चार दिवस दहा दहा तास टायपींग करून झीरो मिस्टेक ड्राफ्ट तयार केले होते. साहेबानी नजर टाकल्यावर इतके प्रसन्न झाले की लंडनहून परतताना
आणलेला नवा मोबाईल पिल्लेचा झाला. बन्सिलाल माणेकचंद ची मॄत्युपत्राची केस. तीन नातेवाईकांनी तीन मृत्युपत्रं कोर्टात दाखल केली होती. साहेबानी बनवलेला ड्राफ्ट वाचताना पिल्लेला एक पॉवरबाज इरेक्शन आलं होतं.शक्यता होती की तीन दिवसानंतर साहेब लोणावळ्याला जातील. तोपर्यंत नेटवर तहान भागवयला लागणार होती.
पिळ्ले डोळे मिटून स्वस्थ बसला होता. ह्युमन डायजेस्ट ची एक गोष्ट वाचून झाली होती. आता दुसरी कुठली वाचावी...
त्याच्या पायांची हालचाल जोरात सुरु झाली. एसीच्या गारव्यात एक सुगंध मिसळायला लागला होता.जवळ जवळ यायला लागला तेव्हा त्यानी डोळे उघडले.साहेबांच्या चेंबरकडे जाणारी एक बाई दिसली.
पिळ्लेनी जोरात आवाज दिला.
"कोई नही जायेगा उधर . साब नही है."(ये स्टाफ स्साला हरामी है)
सुगंध आणखी जवळ आला.
"गुड मॉर्नींग सर. "
एक सुंदर चेहेरा त्याच्या क्युबिकलमध्ये वाकून हसत होता.पिळ्लेची तारांबळ उडाली.
त्याच्या कोनाड्यात अचानक उजेडच उजेड.
"आईये ना .कहासे आये आप "
"मै मनोरमा . मनोरमा शेट्टी." बाई आता आत वळली.
हिरवा टीशर्ट. पांढरी ट्रावजर्स. हलकासा मेकअप.सुगंधाचे अपार लोट.
" हँडरायटींग एक्सपर्ट.तुशार पुरोहीत ने भेजा है. आपकी विलका केस है."
पिळ्ले खदखदला. "मेरा विल नही बाबा"
"बैठीये ना आप. बडा साब गया है कोर्टमे.आपको टीम दिया मेरेको याद नही."
बाई बसली. पिळ्लेच्या बाजूला. "सिग्नेचर देखनेका था"
पिळ्लेच्या मनात भलतीच चक्र फिरायला लागली होती.
मै कल आती सुबामे.पिल्ले भानावर आला. डोळ्यात चकाकी आली.
"माय कार्ड सर" निमुळत्या नखांमध्ये डोळे अडकले.
"आप मेरा हँडरायटींग देखिये ना" बाईच्या चेहेर्यावर थोडीशी नाराजी.
"एक पेपर दिजीये" ...कोरडा स्वर . पिळ्ले बावरला.
" मिस्टर पिळ्ले मै हँडरायटींग एक्स्पर्ट है.मेरेको कंपारिजन के लिये और भी कागज चाहिये."
"कागज हा... हा कागज.. आय यम सॉरी" या परफ्यूम नी वेड लागायची वेळ आली होती.
"ये मेरे बॉस का रायटींग देखिये."इटालीक्स मध्ये लिहीलेली सुंदर लड काळ्या अक्षरातली त्यानी समोर ठेवली.
" आपके बॉस का रायटींग क्या करू .. मेरेको पार्टीके रायटींग का सँपल चाहिये..".बाईच्या कपाळावर आठी पडली होती.
"ये क्या हो रहा है...आता पिळ्ले थोडा भनावर आला.
अचानक सुंदरीच्या चेहेर्यावर हसू उमलले.
"आय कॅन अंडरस्टँड...रीलॅक्स... मै आपकी रायटींग से आपका कॅरेक्टर पढ सकती है..."
त्यानी लेटर हेड पुढे घेतले"..टेल मी.. व्हॉट टु राईट.."
"सींपल.... राईट ए टु झेड इन स्मॉल . कॅपीटल राईट ..वन टु टेन ... आपका सिग्नेचर...."
सुरेश चा हात वेगात चालायला लागला...
"आपका ये वाय देखिये .. आयडेंटीटी .. क्रायसीस है..."
डोळ्याला डोळे भिडले....
टीशर्ट थोडा खाली ओढला बटनानी आपली जागा सोडली..
पुश अप ब्रा चा इफेक्ट व्हिजीबल...एक मोठठा काळा तीळ ..
बटन लावत ... सुंदरी हसली... "ये आपका आठ का फीगर ईट सेज .."
" यु आर वेरी वेरी नॉटी...."पिळ्ले नी लाळ गिळली...
प्लीज .. वेट... जाना मत... मै बाथरूम होके आया....
पिळ्ले घाईत घाईत बाथरूम कडे पळाला...
आज जास्त वेळ लागला नाही.. पिळ्ले फारच उत्तेजीत झाला होता...
--------------------------------------------------------------------------------------------------- हात पुसत पुसत पिळ्ले जागेवर आला . सुगंध जागेवर होता. सुगंधा नाहिशी झाली होती..
दचकून त्यानी इकडे तिकडे पाह्यलं .... कुणीच नाही..
आपण फसलो... टेबलवर जोरात मूठ आपटून पिळ्ले गेट पर्यंत धावत गेला ..
"वो लेडी ... वो गयी साब..." गेट वरचा भय्या.म्हणाला..
धावत धावत परत टेबलकडे....
कागद पसरलेले ..पेन खाली पडलं होतं..
मोबाईल .. नविन मोबाईल ..गेलेला होता..
"स्साली चोर मोबाईल लेके गयी"
"चोर.. चोर स्साली..
खाली पडलेले कागद गोळा करता करता राऊंड सील पण मिळालं...
नसीब मेरा ऑफीस का कुछ गया नही.
संध्याकाळी कोलाबा पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार नोंदवली गेली. मनोरमा शेट्टी मोबाईल चोर.
--------------------------------------------------------------------------------------------------
रात्री विनीतानी पाच लेटरहेड (राउंड सील सहीत) माझ्याकडे दिली.एकेक टप्पा पार पडत होता.
मनोरमा शेट्टी कागदावर अस्तित्वात आली होती.तिचं बॅंक अकाउंट तयार झालं होतं . पिळ्ले छातीठोक सांगेल मनोरमा आहे. चोर आहे. पण आहे. अमेरिकन कंपनीकडे फोटो आहेत.कोलाबा पोलीस स्टेशनला रेकॉर्ड पण आहे. चेकबूक तय्यार.
भाया चेक घेउन येत होता.बॅ़केचा प्यून. बँकेत जात होता विचारे कुरीयर मधून. ऑल सिग्नल वेर गो.. गो.. गो....
---------------------------------------------------------------------------------------------------
आता फक्त राहिली मेहेता ची आणि त्याच्या बहिणीची स्टोरी.
----------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
8 Jun 2008 - 10:13 am | रामदास
पुढचा भाग टाकला आहे. तो बोर्डावर दिसत नाही. बहुतेक दोन दिवसापूर्वी लिहायला सुरुवात केल्यामुळे असावे.
8 Jun 2008 - 10:30 am | यशोधरा
सॉल्लिड!!
9 Jun 2008 - 1:06 am | बिपिन कार्यकर्ते
सॉल्लिड... असेच म्हणतो.
बिपिन.
अवांतरः हा शब्द खूप दिवसांनी सापडला...
8 Jun 2008 - 10:32 am | अभिज्ञ
रामदास साहेब,
खुपच सुंदर लिहिता राव तुम्हि.
वाचकाला शेवटच्या ओळिपर्यंत खिळवून ठेवता.
मला तर वाटते कि आपण कोणि प्रख्यात लेखकच आहात.
आपल्या कवितेचा लेखहि अत्यंत सुंदर होता. त्याच्या अगदिच दुस-या टोकाला असलेला हा
विषयहि आपण अतिशय लीलया हाताळत आहात.
अभिनंदन.
असेच लेख येउ द्यात.
अभिज्ञ.
9 Jun 2008 - 12:18 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
8 Jun 2008 - 11:09 pm | विसोबा खेचर
वा रामदासराव!
सुंदरच लिहिता तुम्ही! वाचायला एकदम मस्त वाटतं!
अजूनही लेखन येऊ द्या प्लीज..
तात्या.
8 Jun 2008 - 11:14 pm | भडकमकर मास्तर
हं... आता सगळी लिंक लागायला लागलीय...
चांगले चालू आहे...
येउद्यात लवकर...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
9 Jun 2008 - 2:25 am | चतुरंग
प्लॉट उलगडायला लागलाय!
तुमची लिहिण्याची ष्टाइल एकदम खतरा आहे - छोटी-छोटी वाक्ये लिहून एखाद्या चलतपटाचा आभास उभा होतो.
येऊदेत अजून.
चतुरंग
9 Jun 2008 - 11:52 am | ऍडीजोशी (not verified)
अप्रतीमच आहे. पुढले भाग पटापट टाका हो. उत्सुकता जास्त ताणून धरू नका.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
9 Jun 2008 - 12:26 pm | शार्कुला
Solid Versatality aahe !
Maja yetey tuzhe likhaan vachayla !
Solid relief aahe ! var Bheti cha aanada aahe!
9 Jun 2008 - 1:09 pm | विदुषक
वा फरच छान !!!
आपण चित्रपटाची पटकथा लिहलि आहे का कधी ?
तुमच्या सारख्या सशक्त लेखकाची तिथे फार गरज आहे
मजेदार विदुषक
9 Jun 2008 - 1:56 pm | झकासराव
टाकणार लेखन आणि कथेला जब्बरदस्त वेग आहे.
जोरकस.
येवु दे पुढचा भाग पटापट. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
10 Jun 2008 - 3:25 am | llपुण्याचे पेशवेll
प्रसंग रंगविण्याची विलक्षण हातोटी. मानले बुवा. प्रत्यक्ष चित्रपट बघत आहे असे वाटत आहे. पण चित्रपटापे़क्षाही प्रभावी कारण आशय समजून घ्यायला जास्त डोके लावावे लागत नाहीये.
खुर्ची ला खिळून बसलो आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
पुण्याचे पेशवे
10 Jun 2008 - 5:01 pm | अनिल हटेला
छान !!!!
अप्रतीम मान्डणी आणी भन्नाट वेग!!!!
पुढील भाग लवकर टाका ,रामदास जी!!!!
वाट बघतोये!!!!!!!!!!!!!!
11 Jun 2008 - 12:14 pm | धमाल मुलगा
रामदास काका,
खर्र खर्र सांगा, तुम्ही चित्रपटांच्या पटकथा लिहिता की नाही?
सस्पेन्स थ्रिलर्सची पटकथा तुम्ही इथे टाकलीये...खरं की नाही?
अगदी हॉलीवूड स्टाईल कॅमेरा इन-कॅमेरा आउट, सीन्स कटींग, पात्रांचा समोरची चाल पटकन लक्षात येणार नाही असा चाललेला खेळ....
ज ह ब ह र्या!!!!!!!!!!!!!!!!
उत्कंठा आणखी किती ताणणार?
येऊद्या पुढचा भाग लवकर :)
पेरी मेसन / डॅन ब्राऊन वाचताना जसं खिळायला होतं तसं वाटतंय :)
- (भतिजा) ध मा ल.
12 Jun 2008 - 7:13 am | रामदास
हे माझे प्रथम प्रकाशन आहे. पटकथा लिहीण्याची ताकद माझ्यात नाही.
पुढचा भाग येतो आहे. (फ्लॅशबॅक संपले आहेत.)
रसायन जमले पाहिजे.
आभारी आहे.
ता.क. आपण रहस्यमय प्रकारे कुठे नाहीसे होता?
21 Jun 2008 - 6:22 pm | बिपिन कार्यकर्ते
पटकथा लिहीण्याची ताकद माझ्यात नाही.
काय फेकताय काका? :)
बिपिन.
21 Jun 2008 - 6:36 pm | II राजे II (not verified)
वरील सर्वाशी सहमत.
बाकी हा भाग वाचने कसे राहून गेले हे कळालेच नाही... पण आज वाचला जबरा !!!
छान जमला आहे... वेगाने नाट्य घडत आहे... वेग व्यवस्थीत राखला आहे अभिनंदन !
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!